Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

यु. जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग सहा

य
यशवंतकुलकर्णी
Tue, 10/19/2010 - 06:22
💬 22 प्रतिसाद

Book traversal links for यु. जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग सहा

  • ‹ मैसूर भजी
  • Up
  • यु.जी. कृष्णमूर्ती: भाग सात (अंतिम) ›

प्रतिक्रिया द्या
13452 वाचन

💬 प्रतिसाद (22)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 10/19/2010 - 07:04 नवीन
लेखनाची शैली उत्तम असल्यामुळे लेखन सहज वाचून होते. पण, वाचल्यावर नेमका काय प्रतिसाद लिहावा या बाबतीत गोंधळ होतो. म्हणजे, मनावर लिहावे तर फ्रॉइडचा शिष्य युंग याने असेच अद्भूत अनुभवावर लिहिल्याचे स्मरते. ' मृत्यु' म्हणजे काय यावर तर हजारो वर्षापासून चर्चा होत आहे त्यामुळे 'यु. जी. कृष्णमूर्ती’यांचा उत्तम परिचय करुन देत आहात असे म्हणून केवळ पोच द्यावी लागत आहे. चुभुदेघे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 10/19/2010 - 17:38 नवीन
प्रा डॉ. शी सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इ
इन्द्र्राज पवार Tue, 10/19/2010 - 08:13 नवीन
मी तुम्हाला यापूर्वीच लिहिले होते की, महेश भट्टांचा एक किरकोळ अपवाद वगळता मी युजींच्या बद्दल फार तुरळक वाचले होते [परवीन बाबींविषयी तर प्रथमच, इथेच वाचले]....तेही एवढ्यासाठीच की नेमके जे. आणि ओशो यांच्या शिकवणीत (जरी ते Teaching ही टर्म वापरीत नसले तरी..) नेमका काय फरक आहे, इतपतच. पण इथपर्यंतचा तुम्ही घडविलेला प्रवास हा फार लक्षणीय आहेच शिवाय या लेखमालेमुळे युजींचा जीवनाविषयक दृष्टीकोन सविस्तरपणे (तसेच प्रगल्भतेने) तुम्ही मांडण्यात फार यशस्वी झाला आहात असे मी मानतो. "....माझ्या, सगळ्या गुरूंच्या चिंध्या करण्याचे धैर्य तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही फोटोग्राफ्स, कर्मकांड, जन्मदिन उत्सव आणि तसल्याच गोष्टी करणारे सांप्रदायिक राहाल..." ~~ हा विचार खरंतर क्रांतीकारीच आहे. 'गुरू' संज्ञेला एक विशिष्ट असा गंध आहे, जिच्यापुढे प्रतिवाद घालणे अशीष्ट मानले जाते. पण इथे खुद्द गुरूच 'माझे वाक्य म्हणजे ब्रह्म असे मानू नका...त्याला सतर्क विरोध करण्याची क्षमता तुमच्यात आली तरच, शिकवणीचा उपयोग...' असाच सल्ला देत आहे, हे गुरुशिष्य परंपरेतील तर्कसंगतीच्या पल्याड जाते. युजींचे तत्वज्ञान ज्यांना पटले ते त्यांचे शिष्य झाले हे तर या लेखमालेद्वारे समजलेच, पण ज्यांना ते विचार पटत नाहीत तेही रूढ अर्थाने त्यांच्या विरूद्ध नसणार कारण शेवटी 'मतभेद' हीदेखील ज्ञानसंपादनाची एक पायरीच आहे. खुद्द युजींचे जेकेंशी मतभेद होत असल्याचे यशवंतरावांनी सविस्तरपणे मांडलेच आहेत. आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद फारच थोड्यांना कळतो; पण म्हणून त्याचे सत्य नाकारणे शहाणपणाची गोष्ट मानली जात नाही. युजींच्याबाबतीतदेखील हा दाखला अचूक लागू होतो. त्यांची शिकवण कदाचित मला समजणार नाही; पण याला दुसरी बाजू अशीही असेल (किंवा आहेच...) की, माझी ती पात्रता नसेल, अधिकार तर नाहीच. इथे श्रद्धेचा भाव व्यावहारिक पातळीवर घेतला तर युजीसारख्यांचे खूपसे विचार स्वीकारता येतात. फिजिक्समधील मास्टर ज्यावेळी 'रिलेटिव्हीटी' सूत्रावर विश्वास ठेवतो, ती एक प्रकारची श्रद्धाच असते, कारण त्याच्या नजरेत त्यावेळेपुरता का होईना 'आईन्स्टाईन' त्याचा गुरूच असतो. "...मी फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की व्यक्ती नावाचा कसलाच प्रकार कुठंच नाही. ते म्हणजे ज्ञानाचे विशिष्ट गाठोडे असते - तो विचार असतो - पण तिथे व्यक्तीत्व नसते...." हा विचार मला फार भावला. इथे 'विशिष्ट' शब्दाचे प्रयोजन फार काही सांगते. 'मी अमुक एका विद्यापीठातून एम.ए. ची पदवी घेतली आहे...' असे जेव्हा कुणी म्हणतो तिथे त्याने एका 'विषया' त ती डिग्री मिळविलेली असते असाच सर्वसामान्य अर्थ होतो. त्याच्याकडील ज्ञानाचे गाठोडे हे कधीच संपूर्ण विश्वाच्या घडामोडीने भरू शकत नाही. ब्रह्माचे ज्ञान डोक्यात ठेवलेल्या ऋषिला नदीपलिकडे नेणारा नावाडी, पूर आल्यानंतर म्हणतो, 'महाराज, काय म्हणता? तुम्हाला पोहायला येत नाही? मग काय उपयोग हो तुमच्या या ज्ञानाचा?" ~ इथे ज्ञानाची व्याख्या ही सापेक्षच असते. सभामंडपात आपल्याकडील त्रिकाल ज्ञानाने वाहवा मिळविणार्‍या त्या ब्रह्मर्षीला नदीत नाव बुडू लागल्यानंतर आपले ज्ञान म्हणजे एक फुसका फुगाच आहे याचेच अंतिम ज्ञान झाले....वर युजी म्हणतात असे व्यक्ती नव्हे तर तिच्याकडील ज्ञानाच्या गाठोड्याला महत्व असते.....आणि त्या ज्ञानाला अनेक पदर असू शकतात. रमण महर्षींसोबतच्या भेटीसमवेतचा संवाद तर मला थेट जी.ए.कुलकर्णींच्या "यात्रिक" कथेकडे घेऊन गेला. युजी हे डॉन क्विक्झोटच्या भूमिकेत तर रमण महर्षी व्हॅटिकॅनच्या प्रवचकांच्या भूमिकेत. अंतिम ज्ञान म्हणजे काय? याच्या संवादातदेखील फरक नाही, इतके त्यात साम्य आहे. "....तुम्ही जे आहात त्यापेक्षा कुणीतरी वेगळे बनण्याच्या दिशेने हालचाल नसेल तेव्हा, तुमचा स्वत:शी कुठलाच वाद राहात नाही...." ~~ हेच सर्वोत्तम सार आहे. धन्यवाद यशवंतराव. इन्द्रा
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Tue, 10/19/2010 - 09:17 नवीन
"आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद फारच थोड्यांना कळतो; पण म्हणून त्याचे सत्य नाकारणे शहाणपणाची गोष्ट मानली जात नाही." - हेच रमण महर्षीन्च्या मोक्षानुभूतीला लागू होऊ शकेल काय? सापेक्षतावाद कळावा, तुर्यावस्था प्राप्त व्हावी ही अभीप्सा 'आत्ता च्या आत्ता चॉकलेट हवे' अशा प्रकारे पूर्ण होईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
इ
इन्द्र्राज पवार Tue, 10/19/2010 - 09:56 नवीन
"....हेच रमण महर्षीन्च्या मोक्षानुभूतीला लागू होऊ शकेल काय? ..." ~ यशवंतराव याचे उत्तर तुम्ही द्यावे....मलाही ते समजून घ्यायला आवडेल. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
य
यशवंतकुलकर्णी Tue, 10/19/2010 - 15:52 नवीन
हेच रमण महर्षीन्च्या मोक्षानुभूतीला लागू होऊ शकेल काय? सापेक्षतावाद कळावा, तुर्यावस्था प्राप्त व्हावी ही अभीप्सा 'आत्ता च्या आत्ता चॉकलेट हवे' अशा प्रकारे पूर्ण होईल का ?
होऊ शकत नाही असंच म्हणायचं आहे तर स्पष्ट तसं म्हणून टाका ना. त्यामुळं मला किंवा कुणाला राग येण्याचं काही कारण नाही किंवा कुणाचंच काही नुकसानही होणार नाही. युजींबाबत मी पक्का मुसलमान आहे त्यामुळं कुणी काहीही म्हटलं तरी सारखंच. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
श
शशिकांत ओक Tue, 10/19/2010 - 08:23 नवीन
एका वाक्यात युजीं
मला माझा स्वत: (चा) म्हणता येईल असा एकही विचार, एकही शब्द, एकही अनुभव माझ्याकडे नाही.
भरपूर वाचनाचा एक आनंददायक अनुभव. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
भ
भाऊ पाटील Tue, 10/19/2010 - 09:37 नवीन
पहिल्या २ भागानंतर हा भाग काहीतरी कंटेंट असलेला वाटला. :) बहुधा महेश भट आणि परवीन बाबी यांनी काय केले ह्याच्यात मला काहीही इंटरेस्ट नाही म्हणून तसे वाटले असू शकते. >>लेखनाची शैली उत्तम असल्यामुळे लेखन सहज वाचून होते. पण, वाचल्यावर नेमका काय प्रतिसाद लिहावा या बाबतीत गोंधळ होतो - ह्याबाबतीत बिरुटे सरांशी सहमत.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Tue, 10/19/2010 - 09:43 नवीन
खर तर वाचुन गडबडलो की काय प्रतिसाद देऊ, पण बिरूटेसरांचा प्रतिसाद पाहुन मी एकटाच नाही तर.. एका वाचकाच्या नजरेतुन (युजींच्या नव्हे.) युजींच एकुणच बौध्द धम्म आणी तत्वज्ञान याविषयीच नॉलेज काय होत आणी मत काय होती ?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 10/19/2010 - 10:40 नवीन
युजींसोबत फिरायला गेले. काही अंतर चालुन गेल्यानंतर रस्त्याच्या कडेने साप नव्हे तर कोब्रा जातीच्या सापांचे अख्खे कुटूंबच सोबत करतेय हे पाहुन महेश भट आणि परवीन बाबी यांनी उलट धूम ठोकली ही अतीशयोक्ती आहे. रजनीशांनी मात्र एन्लायट्न्मेंटनंतरही आपण सेक्स करू शकतो आणि इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा चांगला करू शकतो अशा बाता अमेरिकन प्रसारमाध्यमांसमोर मारलेल्या आहेत. त्यांच्या सोबतीणी राहिलेल्या महिलांनी मात्र रजनीशांची अमेरिकेतून हकालपट्टी झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतींत "ही वॉज जस्ट बिलो दॅन एनी अ‍ॅव्हरेज मेल" असे मत नोंदवलेले आहे. रजनीशानी कधीच आपण फार मोठे असल्याचा आव आणला नाही. उलट लोकाना ते नेहमीच डोन्ट फॉलॉ माय फिलॉसॉफी...बीकॉज आय डोन्ट हॅब वन असे सांगत. रजनीशाना नावे ठेवल्यामुळे जर युजी मोठे ठरू शकतात असे नाही .
  • Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी Tue, 10/19/2010 - 15:41 नवीन
ही अतीशयोक्ती आहे.
ओके.
रजनीशाना नावे ठेवल्यामुळे जर युजी मोठे ठरू शकतात असे नाही .
ओके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Wed, 10/20/2010 - 08:51 नवीन
कोब्रा जातीच्या सापांचे अख्खे कुटूंबच साप अंडी घालतात आनि त्यानन्तर त्या अंड्यांना सोडून जातात. साप थंड रक्ताचे प्राणी असल्याने अंडी उबवणे वगैरे काहीही नसते. अर्थातच पिल्ले सांभाळणे , पिल्लाना भरवणे हे देखील नसते. सापांतील नर मादी एकत्र रहातात वगैरे कधीच होत नसते. ( हिन्दी चित्रपट वगळता...) तुम्ही सापांचे आख्खी कुटुंब म्हंटले म्हणून ते अतीशयोक्त आहे असे म्हणालो. अर्थात तो दोश तुम्ही ज्या पुस्तकावरून हा लेख लिहिलात त्या पुस्तकाच्या लेखकाचा असावा असे मानूया पण त्या अंधश्रद्ध लेखकाची मते या लेखात तुम्ही तुमची मते म्हणून दिली आहेत. अवांतर : इमॅजीन करतोय की सापांचे कुटूंब आहे. बायको साप नवरा सापाला म्हणते " फुस्स्स अहो ऐकलत का. मला गळ्यात एक तन्मणी करून आणा ना या नागपंचमीला" पोरगा साप आईसापाला विचारतोय. आई आपण विषारी असतो का ग? मघाशी एकदम गडबडीत माझी जीभ दाताखाली आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी
म
मदनबाण Tue, 10/19/2010 - 17:37 नवीन
हे लोक सांगतात क्रोध करू नका - पण माझ्या मनात तर सतत क्रोधाची भावनाच खदखदत असते, त्यामुळे ते जे सांगत आहेत ते पूर्णत: चुकीचे आहे कारण क्रोध न करण्याची कुठलीतरी स्थिती गाठण्यापेक्षा, आत्ता माझ्या मनात खदखदत असणारा राग माझ्यासाठी कितीतरी खरा आहे स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः। प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ॥५- २७॥ यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः। विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः॥५- २८॥ अर्थात :--- बाहरी स्पर्शों को बाहर कर, अपनी दृष्टि को अन्दर की ओर भ्रुवों के मध्य में लगाये, प्राण और अपान का नासिकाओं में एक सा बहाव कर, इन्द्रियों, मन और बुद्धि को नियमित कर, ऍसा मुनि जो मोक्ष प्राप्ति में ही लगा हुआ है, इच्छा, भय और क्रोध से मुक्त, वह सदा ही मुक्त है। संदर्भ :--- श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ५वा श्लोक २७ /२८
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Tue, 10/19/2010 - 18:18 नवीन
Contradictions do not exist. If you find any check your premises. इथे मला, contradictions आणि confusions हातात हात घालून चालताना, चमत्कारांना शिव्या, पण चमत्कार इ इ. असे दिसत आहे. खरं तर महेश भटांना कोवुरांचे बक्षीस मिळवायची खुपच संधी होती. मला तरी या सर्व लोकांमधे काहीच फरक दिसत नाही. ( युजींमधे आणि त्यांनी ज्या ज्या लोकांना Bastard म्हणून नावाजले आहे त्यांच्यात आणि ह्यांच्यात काहीच फरक दिसत नाही. असो ! किंवा "OK". :-) पण लिखाण चांगले केले आहे हे निर्विवाद !
  • Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी Tue, 10/19/2010 - 19:02 नवीन
जयंत कुलकर्णी साहेब, खरंच तुम्हाला युजींमध्ये आणि बाकी सर्वांमध्ये काही फरक वाटत नसेल (आणि इथे त्या तुमच्या कोवूरां ची लोककल्याणकारी बडबड आणि ग्रेटनेसही फिका असेल तर, आणि तरच), मी असं मुद्दाम म्हणू इच्छितो की यू मे बी समव्हेअर निअरबाय ऑफ जंपींग आऊट ऑफ होल धीस मेस्स कॉल्ड वर्ल्ड!!! हे कसंय? ;-) Image removed. पाचलेगावकर महाराज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ज
जयंत कुलकर्णी Tue, 10/19/2010 - 19:13 नवीन
हो कोण बाबा आहेत ? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी
य
यशवंतकुलकर्णी Tue, 10/19/2010 - 19:18 नवीन
ते पाचलेगावकर महाराज आहेत. मराठवाड्यात ते फार प्रसिध्द होते त्यांच्या काळात. तो साप सतत सोबत घेऊन हिंडायचे; लोकांच्या अंगावर पण सोडायचे (गंमत म्हणून...चावावा म्हणून नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
र
रेवती Tue, 10/19/2010 - 19:16 नवीन
काही गोष्टी पटल्या बर्‍याच नाही पटल्या! माझ्या विचारांमध्ये बदल होत गेल्यावर कदाचित न पटलेले विचार पटू लागतील व आज पटलेले विचार बदलतील.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 10/19/2010 - 21:18 नवीन
"कोब्रा जातीच्या सापांना" बहुतेक नाग म्हणतात. असो, मला युजींचा उद्धटपणा फार आवडतो.
  • Log in or register to post comments
व
विलासराव Tue, 10/19/2010 - 21:51 नवीन
जेके आणि ओशो यांची बरीच पुस्तके वाचली आहेत. युजीं बद्दल विस्ताराने लिहिलेली माहितीपुर्ण लेखमाला आवडली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
आ
आळश्यांचा राजा Tue, 10/19/2010 - 22:27 नवीन
इंटरेस्टिंग. आवडलं. परत वाचायला हवं. कष्ट घेऊन लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! हे असं बोलणारा माणूस माहीत नव्हता.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/20/2010 - 05:04 नवीन
जे लिहिलं आहे ते नक्कीच वाचनीय आहे. मला युजींबद्दल काहीच माहिती नव्हती. आपण खूप कष्ट घेऊन ही लेखमाला लिहिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन! आणि धन्यवाद, ज्या विषयाबद्दल, व्यक्तीबद्दल अजीबात महिती नव्हती त्यांच्याबद्दल इतकी विस्तृत माहिती दिल्याबद्दल. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा