Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कॉर्पोरेट तमाशा १४ : count down

र
रन्गराव
Tue, 10/19/2010 - 19:36
💬 30 प्रतिसाद

Book traversal links for कॉर्पोरेट तमाशा १४ : count down

  • ‹ कॉर्पोरेट तमाशा १३- फुल्ल टू फिल्मी
  • Up

प्रतिक्रिया द्या
8805 वाचन

💬 प्रतिसाद (30)
र
रन्गराव Tue, 10/19/2010 - 19:45 नवीन
http://www.misalpav.com/node/14540 http://www.misalpav.com/node/14560 http://www.misalpav.com/node/14575 http://www.misalpav.com/node/14584 http://www.misalpav.com/node/14592 http://www.misalpav.com/node/14623 http://www.misalpav.com/node/14625 http://www.misalpav.com/node/14706 http://misalpav.com/node/14839 http://misalpav.com/node/14852 http://misalpav.com/node/14873 http://misalpav.com/node/14888 http://misalpav.com/node/14987 आणि आते रंजक काय असत. त्याचा एक नमूना- http://misalpav.com/node/14923
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 10/19/2010 - 19:59 नवीन
मॅनेजरच्या जाचापायी नोकरी सोडली असं म्हणायचय का तुम्हाला? असे ५६ मॅनेजर येणार किती नोकर्‍या सोडणार आपण? दुसरं समोरच्याने कसं वागावं हे आपण ठरवू शकतच नाही पण समोरच्याने आपलं वागणं देखील ठरवता कामा नये अगदी इनडायरे़क्टली देखील. तुम्ही नोकरी नको होती सोडायला रन्गराव. त्या मॅनेजरचा काय सुंठीवाचून खोकला गेला मेल्याचा.
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Tue, 10/19/2010 - 20:05 नवीन
नक्की कस उत्तर द्यायचा ते माहित नाही. तरी प्रयत्न करतो. पूर्ण मॅनेजमेंट सामील होती त्यात. त्यामुळे राजीनामा दिला नसता तर तो ज्या पदधतीन सांगेल तस वागावा लागल असत. ती कल्पना सहन झाली नाही. आयटी मध्ये तेंव्हा नवीन होतो राजकारणाचे डावपेच माहित नव्हते. मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे सुरूवात चुकीची झाली होती. आणि राहीली गोष्ट औषधावाचून खोकला जाण्याचा. त्याच कर्म त्याच्या बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/19/2010 - 20:07 नवीन
त्या मॅनेजरचा काय सुंठीवाचून खोकला गेला मेल्याचा. ज्ञानेश्वरीतील ओवीवर आधारीत सुविचार - या जगात काही दुर्लभ असेल तर ती आहे सद्वासना.
तुमच्या दोन वाक्यांचा एकत्र अर्थ लावा शुचिताई!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Tue, 10/19/2010 - 20:15 नवीन
मॅनेजरचा दुर्लभ खोकला सद्वासनेने सुंठीवाचूनच गेला मेल्याचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
रन्गराव Tue, 10/19/2010 - 20:24 नवीन
तुमच्या सद्भावनेच्या ह्या दुर्लभ खेळापायी मी एवढा टंकल ते वाया जाईल. कारण तुमचा खेळच आता जास्ती ईंटेरेस्टींग होईल अशी भिती वाटायला लागली आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Tue, 10/19/2010 - 20:26 नवीन
एकदम ईश्टॉप!!!! नो मोअर कमेंट्स :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
य
यशवंतकुलकर्णी Tue, 10/19/2010 - 20:15 नवीन
एका शीख जनरल मॅनेजरसोबत माझ्याबाबतीत अशीच खटखट झाली होती.. डोके तापून मी राजीनामा देऊन टाकला; पण घरचे लोक पुढे काय करशील म्हणून काळजी करत होते.. आता घरचेच लोक जास्त आधी राजीनामा दिला असता तर बरं झालं असतं असं म्हणतात... ;-) सेक्युरिटी गमावून बसायला पण मजा येते काही काळ... :)
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Tue, 10/19/2010 - 20:20 नवीन
>>सेक्युरिटी गमावून बसायला पण मजा येते काही काळ.. खर आहे. आणि अशावेळी आपण दबावाखाली असल्यामुळे पटापट पावलं उचलतो. आणि हा अनुभव एकदा पाठीशी असला की रेसेशन, मॅनेजर असल्या भुतांची भिती रहात नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी
श
शुचि Tue, 10/19/2010 - 20:21 नवीन
बाप रे सेक्युरीटी गमावण्यात मजा :O मला तर नोकरी नसताना स्वप्न पडायची की मी रस्त्यावर लोखंदाचे खीळे, पत्रे गोळा करत फिरते आहे आणि भंगाराच्या भावात विकून कुटुंब चालवते आहे =)) आणि हे केव्हा नवरा जहाजावर डॉलर्स कमावत असताना. आता कमकुवत मनाची म्हणा की काहीही पण असुरक्षितता हा विषयच भीतीदायक आहे बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी
र
रन्गराव Tue, 10/19/2010 - 20:29 नवीन
त्याच कस असत. त्यासाठी नर्मदेतला गोट्यासारख असावा लागत. जग कितीही शंख मारो, आम्ही आमचच खर करनार! ह्यात भीती ह्या भावने पेक्षा लाज ही भावना जास्ती आड येतीये तुमच्या. ;) पळतो आता, नाही तर रात्री मला स्वप्न पडेल - रस्त्यावर गोळा करून आणलेले खिळे तुम्ही माझ्या डोक्यात ठोकताय वगैरे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
म
मधुशाला Tue, 10/19/2010 - 22:28 नवीन
तुम्ही राजीनामा दिला?? मी तुमचा मॅनेजर असतो तर केव्हाच हाकलून दिलं असतं. :) ग्रूपमध्ये रहायचं तर ग्रूपच्या नियमानुसार. उठसूठ कुठलाही रंगराव नियम/कायदे/पद्धती बदलायला लागला तर कसं चालेल? तुम्हाला एवढंच पटत नव्हतं तर अगोदरच सरळ बाजूला व्हायचं होतं.
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Wed, 10/20/2010 - 03:57 नवीन
>>तुम्हाला एवढंच पटत नव्हतं तर अगोदरच सरळ बाजूला व्हायचं होतं. "I will change the things around me!" असा एक किडा असतो त्याच्यामुळे सगळा तमाशा घडला. >>ग्रूपमध्ये रहायचं तर ग्रूपच्या नियमानुसार. उठसूठ कुठलाही रंगराव नियम/कायदे/पद्धती बदलायला लागला तर कसं चालेल? आपण एक मज्जा करूयात. तुम्ही जिथं कुठ मॅनेजर व्हाल तिथ मला काम करायला बोलवा. मग परत आपण हा खेळ करूयात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुशाला
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 10/20/2010 - 06:10 नवीन
हा हा हा.. म्हणजे तुम्ही चांगले मॅनेजर नाही म्हणायचे. चांगले मॅनेजर असा विरोधी विचार करणार्‍याना आयुष्यातून उठवून ठेवतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुशाला
ब
बाहुली Wed, 10/20/2010 - 08:07 नवीन
>>>>ग्रूपमध्ये रहायचं तर ग्रूपच्या नियमानुसार.... इथे नियम ग्रूपने बनवले नव्हते .. त्यामुळे खरेतर मॅनेजरने जायला हवे होते...जो टिमच्या कल्पना समजावुन घेतो तो चान्गला मॅनेजर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुशाला
प
पक्या Tue, 10/19/2010 - 23:11 नवीन
त्या घडीला जे केलंत ते बरोबर केलंत रंगराव .
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Wed, 10/20/2010 - 01:21 नवीन
तुमचा गॉडफादर (आर्किटेक्ट) गेला तेव्हाच समजले की आता अजुन कुणीतरी (मॅनेजर किंवा तुम्ही) जाणार. तुम्हीच जाणार असेच जास्त वाटत होते कारण तुम्ही कंपुत सामील झाला नाहीत (ती चुक मि.पा. वर करु नका :) - ह्.घ्या.) पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. - नेत्रेश.
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Wed, 10/20/2010 - 03:52 नवीन
वाचून मज्जा आली! आपण आता नवीनच कंपु तयार करूयात मिपावर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
स
सूर्य Wed, 10/20/2010 - 05:13 नवीन
पहिलाच जॉब असल्याने (बाकी काही जबाबदारी नाही असे गृहीत धरतो) तुम्ही बरोबर केलेत. अशा अनुभवांमधुन आपण शिकत जातो. तरी परिस्थीती बदलण्यासाठी काहीतरी वेगळे केले पाहीजे होते असे वाटते. पुन्हा, पहिल्याच नोकरीमधे कसे वागावे हा अनुभव आपल्याला नसतो व तो अशा पद्धतीनेच मिळतो, असे मला वाटते. खात्री आहे, की असा मॅनेजर तुम्हाला परत भेटला असेल. तेंव्हा तुम्ही परिस्थीती बदलु शकलात का? कशी? हे वाचण्यास उत्सुक आहे. लिखाणाबद्दल : माझ्या दृष्टीने चांगले लिहीले आहे. काही पॉझिटीव्ह प्रतिसाद येतात तर काही निगेटीव्ह. काही व्यक्तीगत पातळीवर उतरु शकतात. आपण त्या पातळीवर उतरायचे की नाही ते आपण ठरवायचे. - सूर्य
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Wed, 10/20/2010 - 08:10 नवीन
पहिलाच जॉब असल्याने (बाकी काही जबाबदारी नाही असे गृहीत धरतो) तुम्ही बरोबर केलेत. अशा अनुभवांमधुन आपण शिकत जातो. तरी परिस्थीती बदलण्यासाठी काहीतरी वेगळे केले पाहीजे होते असे वाटते. पुन्हा, पहिल्याच नोकरीमधे कसे वागावे हा अनुभव आपल्याला नसतो व तो अशा पद्धतीनेच मिळतो, असे मला वाटते. बरोबर आहे :) खात्री आहे, की असा मॅनेजर तुम्हाला परत भेटला असेल. तेंव्हा तुम्ही परिस्थीती बदलु शकलात का? कशी? हे वाचण्यास उत्सुक आहे. दुसर पर्व ह्याच बाबतीत आहे. >>लिखाणाबद्दल : माझ्या दृष्टीने चांगले लिहीले आहे. काही पॉझिटीव्ह प्रतिसाद येतात तर काही निगेटीव्ह. काही व्यक्तीगत पातळीवर उतरु शकतात. आपण त्या पातळीवर उतरायचे की नाही ते आपण ठरवायचे. मान्य आहे. म्हणूनच संयम ठेवला इतके दिवस. पण शिवशिवनार्या हातांना किती दिवस थांबवनार? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्य
अ
अनिल २७ Wed, 10/20/2010 - 08:19 नवीन
>>>> दुसर पर्व ह्याच बाबतीत आहे. काय ?? दुसरे पर्व पण आहे ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
ब
बाहुली Wed, 10/20/2010 - 05:36 नवीन
मला पण असाच अनुभव आला आहे ..मनाविरुद्ध काम करुन आपण आपलाच अपमान करतो... मी पण असाच तडकाफडकी राजीनामा दिला होता... खुप छान वाटलेले.... ;) छान लिखाण... All the best :)
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Wed, 10/20/2010 - 07:56 नवीन
खूप छान वाटते हे मात्र खर. स्वातंत्र्य इतक महत्वाच का असत ते पटतं अशा वेळी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाहुली
क
कानडाऊ योगेशु Wed, 10/20/2010 - 05:50 नवीन
संपूर्ण प्रकरणात सगळ्यात दुबळे पात्र म्हणजे आर्किटेक्ट,रंगरावांचा गॉडफादर.त्याला अनुभव असुनसुध्दा मॅनेजरचे प्रकरण कसे हाताळायचे हे समजले नाही.त्याला राजकारणाचा असलेला तिटकारा समजु शकतो पण बेसिक सर्व्हायल पुरता तरी राजकारणाचा सामना करता आला पाहीजे.तो करता येत नसेल तर तुमची टेक्निकल विद्वत्ता काय कामाची? आणि मॅनेजर जे काही करत होता त्याचे एक कारण म्हणजे वरुन येणारा दबाव पण असु शकतो.कंपनीमध्ये अगदी श्रूड पण कंपनीबाहेर नॉर्मल व्यक्तिमत्व असणारे एक-दोन मॅनेजर मीही पाहीले आहेत. नारायण मूर्तींनी म्हटल्याप्रमाणे " लव्ह युवर वर्क, नॉट युवर कंपनी" ह्याची प्रचिति काही वर्षांच्या अनुभवानंतर येतेच येते. जियो रंगराव जियो.
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Wed, 10/20/2010 - 07:32 नवीन
योगेश तुमचे प्रतिसाद विरोधी असूनही मला आवडतात. बहुदा ते मांडताना त्याला भक्कम विचाराची जोडणा असते म्हणून. ;) >>संपूर्ण प्रकरणात सगळ्यात दुबळे पात्र म्हणजे आर्किटेक्ट,रंगरावांचा गॉडफादर.त्याला अनुभव असुनसुध्दा मॅनेजरचे प्रकरण कसे हाताळायचे हे समजले नाही.त्याला राजकारणाचा असलेला तिटकारा समजु शकतो पण बेसिक सर्व्हायल पुरता तरी राजकारणाचा सामना करता आला पाहीजे.तो करता येत नसेल तर तुमची टेक्निकल विद्वत्ता काय कामाची? इथ कदाचित माझीच चुक झाली असेल. त्यांची भुमिका नीट रंगवता आली नाही बहुदा. मला नेहमी वाटायच की आपण ही त्यांच्या सारख व्हावं आणि नेहमी तसा प्रयत्नही करायचो. पण पुढं एक गोष्ट लक्षात आली की अस करणे ही विसंगती आहे. Trying to be like him is a paradox b'coz he never tries to be like anybody else. गीतेतला कर्मयोग म्हणजे काय ह्याच खर उदाहरन होत ते. राजकारण शिकन्याच्या मोह माझ्यासारखे लोक आवरू शकत नाहीत. पण त्या मार्गाला जायचीही गरज पडली नाही असा माणूस आपल्यापेक्षा किती तरी पटीन जास्ती कणखर मनाचा असावा लागतो. आणि त्यांच्या सर्व्हायलच म्हणालात तर ते पुढे ज्या कंपनीत गेले तिथ लवकरच CTO झाले. आणि खूप चांगला काम करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
न
नगरीनिरंजन Wed, 10/20/2010 - 05:50 नवीन
राजीनामा देणे हा पलायनवाद झाला. राजीनामा दिल्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटत होत्या आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही भांडलात त्याला काहीच अर्थ राहिला नाही. राजीनामाच द्यायचा होता तर आधीच भांडण करण्यापेक्षा शांतपणे निघून जाता आले असते. पण तुम्ही तिथे राहून झगडणे तर राहिलेच पण इतर सहकार्‍यांच्या मनातही किल्मिष निर्माण करून निघून जायचा निर्णय घेतला. शिवाय राजीनामा देऊन दुसरीकडे असे लोक नसतील याची काहीच खात्री नाही. त्यामानाने तुमचे आर्किटेक्ट बरोबर वागले. मनासारखे काम करता येत नाही म्हणून शांतपणे निघून गेले. इतराना प्रभावित करण्याचा खटाटोप न करता. असो. ही माझी वैयक्तिक मते आहेत. वाद घालण्याचा किंवा चूक बरोबर ठरवण्याचा हेतू नाही.
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Wed, 10/20/2010 - 07:52 नवीन
>>राजीनामा देणे हा पलायनवाद झाला. हे खरच मनाला बोचलं. पण ते चुकीच आहे अस म्हणून नव्हे तर कदतचित सत्य पचवायला कठीण असत म्हणून. पण पूर्ण उत्तर खाली लिहितो आहे. >>राजीनामा दिल्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटत होत्या आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही भांडलात त्याला काहीच अर्थ राहिला नाही. हा मुद्दा मान्य आहे. त्यावेळी तिथ राहून जे बरोबर आहे ते करयला लावायला सगळ्यांना भाग कस पाडायच हे नवशिख्याला माहीत नव्हत. त्यामुळे तिथून निघून जाण हाच एक पर्याय दिसत होता त्यावेळी. आपल्याला पाहिजे ते करता आलं नाही कमीत कमी जे करायचा नाही ते कराव लागू नये म्हणून राजीनामा दिला होता. >>राजीनामाच द्यायचा होता तर आधीच भांडण करण्यापेक्षा शांतपणे निघून जाता आले असते. पण तुम्ही तिथे राहून झगडणे तर राहिलेच पण इतर सहकार्‍यांच्या मनातही किल्मिष निर्माण करून निघून जायचा निर्णय घेतला. >>त्यामानाने तुमचे आर्किटेक्ट बरोबर वागले. मनासारखे काम करता येत नाही म्हणून शांतपणे निघून गेले. इतराना प्रभावित करण्याचा खटाटोप न करता. हो त्यानी जे केल तेच बरोबर केल. खर तर ज्या वेळी राजीनामा दिला होता तेव्हाच मी ही सोडून जायचा विचार केला होता. त्यावेळी सर म्हणाले होते -" Don't give up until you are assured that its not going to work. Whatever has happened as a architect I'm responsible for that. Just b'coz I could not succeed is not good enough excuse to assume that you will also fail!" आणि शेवटच्या दिवशीही त्यांनी मला हेच सांगितल होत. आता माझ जजमेंट " काहीही करण्यासारखा राहील नाही" हे कदाचित चुकीच असेल! >>शिवाय राजीनामा देऊन दुसरीकडे असे लोक नसतील याची काहीच खात्री नाही. हे सत्य कुणिही नाकारू शकत नाही. पण नवीन जागी नवीन सुधारणा करता येतात मागचे अनुभव वापरून. पुढचा भाग ह्याबद्दलच आहे! >>ही माझी वैयक्तिक मते आहेत. वाद घालण्याचा किंवा चूक बरोबर ठरवण्याचा हेतू नाही. मतभेद हा आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. तुम्ही जसा योग्य पद्धती मांडलात तस सर्वानी केल तर काहीच अडचण नाही. परखड मत प्रामाणीकपणे मांड्ल्याबद्द्ल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
अ
अनिल २७ Wed, 10/20/2010 - 07:44 नवीन
रन्गराव.. तुम्ही ग्रेट आहात.. मला तुमचे लेखन फार्फार आवडते.. तुम्ही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला अन माझे डोळे पाणावले.. आता हा कार्पोरेट तमाशा आमच्या भेटीस येणार नाही या जाणीवेने जीवघेणा त्रास होत आहे.. कृपा करुन परत तिथे जॉईन व्हा अन तमाशाचे खूप खूप भाग आम्हाला वाचायला द्या.. प्लीज.. :(
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 10/20/2010 - 08:24 नवीन
दोनास एक या प्रमाणात दर दोन प्रतिसादांमागे रन्गरावांचा एक प्रतिसाद. लेखाचा ट्यारपी वाढवून देतोय.
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Wed, 10/20/2010 - 10:09 नवीन
काय करनार विजूभाऊ? दुर्लक्षित मिपा कर असल्यामुळं अस करावा लागता. त्या निमित्तान आपल्या सारख्या थोरामोठ्यानी इथ पायधूळ झाडली. धागा धन्य झाला ;) वर आता टी आर पी अजून वाढनार तुमच्या ह्या प्रतिसादामूळे. देवबाप्पा कसे फेडणार हे उपकारांच ओझं. आतून दिसतोय का तुला ओझ्याखाली दबलेला मी. का वीजूभाऊंना घाबरून तु तिथून ही पळ काढलास? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा