'गावगुंफण' : सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगती
💬 प्रतिसाद
(18)
ग
गांधीवादी
Wed, 10/20/2010 - 14:21
नवीन
वैद्यकीय महाविद्यालयातल्या आदर्शवादी तरुणांचे, प्रत्यक्ष एक चांगले काम हाती घेतल्याबद्दल.
श्री. रंगकर्मी अतुल पेठे यांनी हा माहितीपट बनविला त्याबद्दल,
आणि आपण हि माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
आमच्या वस्तीत सुद्धा काही स्त्रिया पुढाकार हेऊन बचत गटाच्या योजना चालवितात.
- Log in or register to post comments
स
सुनील
Wed, 10/20/2010 - 14:25
नवीन
हॅलो मेडिकल फाउंडेशन ह्या संस्थेला अनेक शुभेच्छा!
काही वर्षांपूर्वी चीनमध्ये "अनवाणी डॉक्टर" ही मोहीम राबवली गेली असल्याचे वाचले होते, त्याची आठवण झाली.
- Log in or register to post comments
स
सहज
Wed, 10/20/2010 - 16:28
नवीन
आपण हा माहीतीपट कुठे पाहीलात? आंतरजालावर हा लघुपट उपलब्ध आहे का?
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
गुरुवार, 10/21/2010 - 07:48
नवीन
मी हा माहितीपट पुणेरी पध्दतीनं फुकटात पाहिला पण याच्या डी.व्ही.डी. आता उपलब्ध आहेत. अतुल पेठे यांचा संपर्क इथे मिळेल. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळू शकेल.
- Log in or register to post comments
म
मितान
Wed, 10/20/2010 - 17:00
नवीन
अतिशय चांगल्या कार्याची माहिती करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातही अशा प्रकारचे काम चालते. स्वतंत्रपणे कोणताही गाजावाजा न करता चाललेली ही कामं बघताना खरंच खूप प्रेरणा मिळते.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/20/2010 - 17:15
नवीन
अतिशय सकारात्मक बातमी, माहिती, धाग्याबद्दल मनापासून आभार. 'तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे' या प्रश्नाचं उत्तर ही सर्व मंडळी आपल्या कृतीतून देत आहेत.
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Wed, 10/20/2010 - 17:18
नवीन
अदितीने सुंदर शब्दांत मांडले आहे.
उत्तम माहिती. हा अनुबोधपट लवकरच पाहायला मिळेल अशी आशा आहे. अतुल पेठे यांच्यासारखे लोक कसलाही गाजावाजा न करता वर्षानुवर्षे उत्तम काम करत आहेत. त्यांच्या कामाला माझ्या अनेक शुभेच्छा.
- Log in or register to post comments
श
शहराजाद
Wed, 10/20/2010 - 19:09
नवीन
+१
- Log in or register to post comments
श
शहराजाद
Wed, 10/20/2010 - 19:11
नवीन
फोटोदेखील आवडला
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
गुरुवार, 10/21/2010 - 08:41
नवीन
आरती प्रभूंची ओळ अतिशय प्रिय आहे. ती इथे वापरलेली पाहून आनंद झाला. धन्यवाद!
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 10/20/2010 - 18:54
नवीन
उत्तम ओळख. संस्थेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन.
माझ्या (चौथी पास असलेल्या) आजीने त्या काळी (ब्रिटिश काळात) Trained दाई हा कोर्स केला होता. आणि गावातील बाळंतपणांमध्ये सुईण म्हणून ती जात असे. तिला अर्थातच फार काही उपचार करण्याची सोय नव्हती पण बाळंतपणात घ्यायची स्वच्छतेची काळजी वगैरे सुधारणा प्रत्यक्षात आल्या असतील. कदाचित केस कॉम्प्लिकेटेड होत आहे हे लवकर लक्षात येत असेल तर बाळंतिणीचा जीव वाचण्याची शक्यता वाढत असेल.
नंतरच्या काळातसुद्धा खेड्यातल्या जनतेच्या सोयीसाठी डॉक्टरकीचा दहावीनंतर ३ वर्षांचा कोर्स सुरू करण्याची कल्पना ८० सालाच्या मागेपुढे निघाली होती. त्यावेळी माझ्या आठवणीप्रमाणे प्रतिभा पाटील महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्री होत्या. पण ती बारगळली (बहुधा सुरूच झाली नाही)
हल्ली अशा प्रकारच्या योजना सरकारी पातळीवर राबवल्याच जात नाहीत. :(
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
गुरुवार, 10/21/2010 - 08:38
नवीन
सध्या सरकारतर्फे आशा (Accredited Social Health Activist) ही योजना राबवली जाते. तिची रचना 'हॅलो'च्या कामासारखीच आहे. अधिक माहिती इथे मिळेल.
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Wed, 10/20/2010 - 19:00
नवीन
स्त्रियांच्या सक्षमीकरणाला माझा नेहमीच पाठिंबा रहात आलेला आहे.
परंतु, असे लक्षात येते, की सक्षम होण्याची पहिली पायरी म्हणजे गावागावांत दारुबंदी हा पहिला उपक्रम चालवण्यात येतो.
त्यामुळे मी हा पाठिंबा काढून घेतलेला आहे.
(इतर कामे आधी करा, मग वेळ मिळालाच, तर दारुबंदी वगैरे करा. सुरुवात तिथून नको. )
- Log in or register to post comments
क
क्रेमर
Wed, 10/20/2010 - 19:17
नवीन
संस्थेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा.
- Log in or register to post comments
ज
जागु
गुरुवार, 10/21/2010 - 08:23
नवीन
चिंतातुरजंतु खुप छान माहीती दिलीत. अजुन येउद्यात अशा प्रकारची माहीती.
- Log in or register to post comments
ए
ए.चंद्रशेखर
गुरुवार, 10/21/2010 - 08:45
नवीन
श्री. पेठे यांच्या कार्याची माहीती सांगणारा लेख छान वाटला. फारच चांगले कार्य आहे हे.
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
गुरुवार, 10/21/2010 - 11:16
नवीन
धन्यवाद. एक किंचितशी दुरुस्ती करतो. अतुल पेठे यांनी 'गावगुंफण' हा माहितीपट बनवलेला आहे. त्यात (आणि या लेखात) ज्या सामाजिक कार्याची ओळख करून दिलेली आहे ते कार्य हॅलो मेडिकल फाउंडेशन ही संस्था करत आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
गुरुवार, 10/21/2010 - 22:05
नवीन
.
- Log in or register to post comments