कलादालन
I bet तुम्ही कधी हे पाहीले नसेल - भाग ५
Primary tabs
कालचा तो फोटो कदाचित आपण पाहीला असावा,'धुर' असेल अस वाटत खरं,पण नाही तो धुर नव्हता.उत्तर मजेशीर आहे,उत्कंठा व ज्ञान वाढवणारे,पण जाउ दे तुम्हाला नाही ऐकायच तर आम्ही का बोटांना त्रास द्यावा?
असो,तर आज हे गणपती बघा,साध्या पीओपीने बनवले आहेत्,मग एवढे चमकतायत का?? (obviously फ्लॅश कींवा लाईट मारली नव्हती,नाही तर त्यात खास काय राहील? पण तुम्हाला जे खरे वाटेल ते मत बनवुन घ्या)

एखादा चांगला कॅमेरा घ्या! हल्ली कॅमेरे स्वस्त झाले आहेत...
तुम्ही त्या वरच्या काळ्या डागांबद्दल बोलता आहत का?
ते 'Paint' वापरुन मुद्दाम केले आहे.आणि तस पण मोबाईलकडुन जास्त अपेक्षा करु नये अस वाटत्,ताबडतोब फोटो काढायला मिळतो हेच खुप आहे.
ज्या संस्थेने हा गणपती प्रदर्शनाला ठेवला होता त्यांनी केलेली दावे :
१) ह्या गणपतीला फक्त व फक्त ऋषीमुनींनी बनवले आहे,म्हणुन त्याला तेज प्राप्त झाले आहे.
२) मुर्ती बनवताना सर्व 'संस्कार' कटाक्षाने पाळल्याने ह्या मुर्तीत ९९% देवत्व आले आहे.
३)मुर्तीला प्रदर्शना पुर्ण केल्यावर (कीती त्या आठवत नाही) अनेकजणांना चक्कर येणे व काही साक्षात्कार होणे असे अनुभव आले आहेत्,आपणही प्रदर्शना घालुन वेगळा अनुभव घ्यावा.
म्हणुन ही मुर्ती खास आहे.
माझ्याकडुन 'विचारला गेलेला' प्रश्न :
आपण कसे बोलु शकतो ९०% टक्के देवत्व आले आहे? कोणत्या आधारावर व ९९% च का??
उत्तर मिळालेच नाही म्हणुन देउ शकत नाही.
तर आता आपणास समजल असेल.
मुर्ती बनवताना सर्व 'संस्कार' कटाक्षाने पाळल्याने ह्या मुर्तीत ९९% देवत्व आले आहे
कुणा एका ऋषीच्या मनात क्षणभराकरीता एका अप्सरेचा विचार घोळल्यामुळे १% कमी झाला असावा. अन्यथा १००% कुठे जात नव्हते!
प्रदर्शना नाही रे शानबा.... प्रदक्षिणा
"उत्तर मिळालेच नाही म्हणुन देउ शकत नाही" से महावाक्य आवडले.
देव फ्लुरोसंट असतो ही एक नवीन माहिती कळाली आज.
fluorocene(a chemical compound) व rare earth metals ने बनला असावा.