Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हे लोक कॉलेजात का गेले ?

म
मिसळभोक्ता
Fri, 10/22/2010 - 21:23
🗣 57 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
9584 वाचन

💬 प्रतिसाद (57)
च
चित्रा Sun, 10/24/2010 - 15:15 नवीन
मिभोंचे लिखाण बघता हा शब्द जातीवाचक म्हणून वापरला असे नसावे. पण मुद्दाम वापरला असावा. हल्ली वेगळ्या जाती असतात-त्या बरेच जण पाळतात उदा. आय आय टीतले इंजिनीअर, साध्या कॉलेजांमधील इंजिनीअर. इ. इ. असो. अलिकडेच 'विदा' नको, 'डेटा' हवा, म्हणून जे झाले त्यामुळे ही भाषाशुद्धी इथे नको तेथे (का स्वतःच्या पॅव्हिलिअनमध्ये?) राबवली असावी. http://mr.upakram.org/node/2903#comment-48340 हा प्रतिसाद पूर्ण अवांतर ठरू नये यासाठी -- वर उत्तरे आली आहेत. अजून एक उत्तर आईबापांकडे पैसा आहे म्हणून गेले, असेही उत्तर असू शकते. आमच्या इथे एक बेकरी (पावाची भट्टी?!) चालवणारी बाई आहे - ती हार्वर्डमधून इकॉनॉमिक्स आणि मॅथमॅटिक्स केल्यानंतर आता बेकरी चालवते. http://www.boston.com/lifestyle/food/articles/2010/10/20/joanne_chang_spins_pantry_staples_into_rich_desserts_complete_with_crispy_magic_frosting/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
म
मिसळभोक्ता Mon, 10/25/2010 - 17:37 नवीन
"मेहतर" हा शब्द शिवकालीन (उदा. मदारी मेहतर) असल्याने चालला असता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
च
चित्रा Wed, 10/27/2010 - 03:54 नवीन
चालला असता, कारण कोणाला कळला नसता ;) तुमचे म्हणजे आ बैल मुझे मार असे झाले. असो. (कोणालाही बैल म्हटलेले नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी. कसली वेळ आली आहे, प्रत्येक गोष्ट सांगावी लागते).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
प
पिवळा डांबिस Wed, 10/27/2010 - 06:26 नवीन
इथे मिभोकाकांनी आपल्या सर्वांच्या लाडक्या भाईकाकांचे उदाहरण अनुसरण्यास हरकत नसावी.... भाईकाकांनी आपल्या चितळे मास्तर या व्यक्तिचित्रात प्रथम लेख लिहितांना भंगी हा उल्लेख केला आहे (१९६०च्या दशकात) पण चितळे मास्तर ही कॅसेट काढतांना मात्र झाडूवाले असा उल्लेख केलेला आहे (१९८०च्या दशकात) :) बरे सत्य बोला, यथातथ्य चाला!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
न
नितिन थत्ते Wed, 10/27/2010 - 09:14 नवीन
उल्लेख जातीवाचक आहे की नाही याचे काही लॉजिक असावे. जेव्हा व्यवसायाचे नाव म्हणून 'भंगी', 'लोहार', 'चांभार', 'गवळी', हे शब्द येतात तेव्हा ते जातीवाचक नसतात. "तू आत्ता आलास तेव्हा कोपर्‍यावरचा चांभार होता काय रे?" या प्रश्नात चांभार हा शब्द व्यवसायदर्शकच आहे. कोपर्‍यावरचा 'चपला शिवणारा' जातीने चांभार आहे की नाही हे माहितीही नाही. पण एखादा भंगी जातीचा इंजिनिअर मनुष्य माझा बॉस असताना मी जर "मी भंग्याच्या हाताखाली काम करतो" असे म्हटले तर तो जातीवाचक (पक्षी: डिरॉगेटरी) उल्लेख आहे. पुलंच्या त्या वाक्यात "भंगी पण जाऊन येतात" हा उल्लेख जातीवाचक आहे असे मला वाटते. म्हणूनच त्यांनी तो बदलला असावा. अवांतर : वरच्या लेखातला उल्लेख अमेरिकेसंबंधी असावा त्यामुळे तर तो जातीवाचक असण्याची काहीच शक्यता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
व
विकास Wed, 10/27/2010 - 13:25 नवीन
जेव्हा व्यवसायाचे नाव म्हणून 'भंगी', 'लोहार', 'चांभार', 'गवळी', हे शब्द येतात तेव्हा ते जातीवाचक नसतात. हे सर्वशब्द तसेच इतर तत्सम सर्वच शब्द आधी व्यवसायाशी निगडीत आहेत आणि नंतर त्याचे गैरवापर झाले आहेत. पेशांवरून अचूक निरिक्षण करून मराठीत काही चपखल म्हणी देखील पूर्वापार चालत आल्या आहेत. त्याचा देखील विचार केला तरी असेच लक्षात येते की त्यात "जात" म्हणून हिणावणे नसते... असो. पण एखादा भंगी जातीचा इंजिनिअर मनुष्य माझा बॉस असताना मी जर "मी भंग्याच्या हाताखाली काम करतो" असे म्हटले तर तो जातीवाचक (पक्षी: डिरॉगेटरी) उल्लेख आहे. नक्कीच डिरॉगेटरी आहे. पुलंच्या त्या वाक्यात "भंगी पण जाऊन येतात" हा उल्लेख जातीवाचक आहे असे मला वाटते. म्हणूनच त्यांनी तो बदलला असावा. शक्य आहे. पण जर अधुनिक मराठी साहीत्य शोधले तर त्यात असे अजूनही प्रयोग मिळू शकतील असे वाटते. पुलंना कोणी तरी नंतर "पॉलीटीकली करेक्ट" होण्यास सांगितले असावे. तात्पर्यः मिभोंनी जातीवाचक उल्लेख केला असे अजिबातच वाटले नाही. वरच्या उदाहरणात जर मिभोंनी ५०० भंग्यांना पिएचडी पदवी आहे असे म्हणायच्या ऐवजी ५०० बस कंडक्टर्सना/पोस्टातील कारकुनाला/थिएटरमधील तिकीटाच्य खिडकीतल्याला पिएचडी आहे असे म्हणले असते तर चालले असते का? वास्तवीक अशांची तर हल्ली अनेकदा थट्टा होते पण त्यात जात नसल्याने चालून जाते. थोडक्यात आपण इतरांबद्दल नक्की सेन्सेटीव्ह आहोत का नुसतेच पॉलीटकली करेक्ट हा विचार करायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ल
लिखाळ Wed, 10/27/2010 - 14:12 नवीन
मूळ दुवा न वाचताच प्रतिसाद देतो आहे म्हणजे म सं स्थळाच्या लौकीकाला जागतच आहे. शिकताना अ‍ॅसिस्टंटशीप वगैरे मिळते म्हणून त्या मोहाने जास्त काळ शिकत राहायचे आणि पिएच्डी वगैरे झाली की शिक्षणाआधीच्या व्यवसायाकडे वळायचे असे काही असेल का? :) तसे असेल तर अमूक इतके पिझा डिलेवरी बॉय सध्या बॅचलर करत आहेत वगैरे विदा जास्त उत्साहवर्धक असेल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा