Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खानदेशी पदार्थ्-बटटी

क
कच्ची कैरी
Sat, 10/23/2010 - 20:23

प्रतिक्रिया द्या
7475 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ड
डावखुरा Sat, 10/23/2010 - 20:50 नवीन
छान ओळख... कच्ची कैरी नावावरुन पदार्थाची खमंग चव जिभेवर रेंगाळली.. आम्ही पुडाची बट्टी करतो..लाटुन तुला घड्या चौकोनी आकार देउन मग ती चाळ्णीवर वाफवुन घेतो.. नंतर तुकडे करुन मंद आचेवर तळुन घेउन.. बट्टी मोडुन त्यावर गोड..आंबट वरण(चिंच-गुळ) आणि तगावर्‍आणी तुप ,लिंबु... अगदी आत्ताही जिभेला पाणी सुटलंय.. किण्वा मस्त खरपुस गरम गरम तळ्लेली बट्टी सोबत कैरीचे तिखट लोण्चे... तळण नको असल्यास ओवेन मध्ये भाजुन घेउ शकतो.. गोड..आंबट वरणाचीही कृती द्या की सोबत..
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 10/23/2010 - 20:52 नवीन
दाल-बाटीचाच प्रकार दिसतोय. छान असावा.
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Sat, 10/23/2010 - 21:49 नवीन
आणि या बट्टी सोबत आबंट गोड वरण मस्त लागते. आंबट गोड वरण साहित्यः तुरीची डाळ १ वाटी फोड्णीचे साहित्य मोहोरि,जीरे,हिंग हळद्,तिखट कढ लींब खोब्रे किसलेले १ चमचा गुळ लिंबा एवढा चिंचेचा कोळ २-३ चमचे तेल पाणी गरजे प्रमाणे नेहमी प्रमाणे वरण शीजवुन घ्या कढईत तेल तापवा त्यात फोड्णि घाला फोड्णीतच हळ्द आणी तिखट घाला वरण टाका पाणी टाका मिठ्,चिंच्,गुळ घाला खोबरे घाला २-३ उकळ्या काढा गरमा गरम आंब्ट गोड वरण बट्टी सोबत खाय्ला तय्यार् आवडत असल्यास थोडा गोडा मसालाही घालावा
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Sun, 10/24/2010 - 15:09 नवीन
काय पाकृदिनाचा सोहळा चालु आहे काय मिपावर ?
  • Log in or register to post comments
स
स्वछंदी-पाखरु Sun, 10/24/2010 - 16:01 नवीन
काय आज तर मेजवान्याच मेजवान्या आहेत मिपा वर... पाकृ मस्त लिहीली आहे आहे खास करुन मला सगळ्यात जास्त आवडणारी खान्देशी डीश..... या मधे जरासं ज्वारीच पीठ पन घालतात ना हो?? याला दाल बाफले अस पण म्हणतात. खान्देशी बट्टी करायचा अजुन एक प्रकार (लहानपणीपासुन बघत आलेलो)म्हणजे त्याचा असा गोळा तयार करतात. जमीनी मधे एक छोटासा खड्डा करुन त्यात काटक्यांचा (भूईमूगाचे वाळलेले झाड)विस्तव तयार करतात (हल्ली हे शक्य नाही मग छोटीशी कोळश्याची शेगडीवर पण करता येत). मग हे गोळे त्या निखार्‍यांमधे टाकतात.मग ते छान खरपूस भाजल्या नंतर बट्टी तयार होते. मग ही बट्टी साध्या पण जरासे पातळ वरणा त्यावर कालवून मस्त शुद्ध तुप भरभरुन टाकतात आणि मग खातात. बट्टी सोबत तोंडी लावण्यासाठी तिखट वांग- बटाटा ची भाजी कैरी व गुळ घालुन बनवतात. खान्देशात आपल्या आपल्या आवडी निवडी नुसार बर्‍याच बट्टी बनवायच्या वेगवेगळ्या पद्ध्ती आहेत. त्यातल्या त्यात मला ह्या प्रकारच्या बट्ट्या खुप आवडतात. धन्यवाद... स्व पा बट्टी सारखाच माझा आकार गोल गरगरीत आहे
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Tue, 10/26/2010 - 10:51 नवीन
विदर्भातदेखील ही बनवल्या जाते . पण निखार्‍यावर भाजुन, सोबत तुप, वरण आणी वांग्या-बटाट्याची भाजी. शेतात हुरडा पार्टीप्रामाणे बट्टी पार्टीदेखील करतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वछंदी-पाखरु
न
निनाद मुक्काम … Fri, 12/10/2010 - 03:04 नवीन
डाळ फळ ती भटाची बट्टी करायची पध्धत आमच्या कडे होते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वछंदी-पाखरु
स
स्पंदना Mon, 10/25/2010 - 16:04 नवीन
आज सगळ्या पाककृती एकदम वाचल्या म्हणुन एकदम प्रतिसाद देते आहे. १. खान्देशच खाद्य वैभव आमच्या साठी उघडल्या बद्दल धन्यवाद. २ . नवी नाव!! नव रुप !! अन सारे फोटो अगदी झकास. कैरी बाइ नावासारख्या तोम्डाला पाणी सुटणार्‍या पाककृतीम्बद्दल एकदम चार पाच धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Mon, 10/25/2010 - 21:25 नवीन
नुसती बट्टी का बरं? सोबत आंबट्-गोड वरणाची पण पाकृ द्या. बाकी बट्टी एकदम मस्त दिसतेय. :) बट्टी ही तळुन, उकडुन, आणि भाजुन सुद्धा बनवतात, मला भाजुन बनविलेली बट्टी फार आवडते.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Tue, 10/26/2010 - 15:48 नवीन
मी बट्टी हा पदार्थ कधीच खाल्ला नाही...जरुर करुन पाहीन...काहीतरी वेगळे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा