Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टिळक कि दाते

अ
अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 10/28/2010 - 06:12
🗣 65 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
20547 वाचन

💬 प्रतिसाद (65)
अ
अवलिया गुरुवार, 10/28/2010 - 09:18 नवीन
हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
र
रेवती गुरुवार, 10/28/2010 - 15:35 नवीन
भारतीय पंचांगांची उपयुक्तता काहीच नाही तसं नाही नाना! मला अजूनही पंचांगाची जरूरी भासते. आजचा दिवस शुभ कि अशुभ असे रोज काही बघितले जात नाही पण मोठी खरेदी असेल तर जरूर बघते. कोणी अंधश्रद्धा वगैरे म्हटले तरी चालेल पण ती सवय झालिये. अतिरेक होणार नाही एवढे पाहिले म्हणजे झाले. आता तर कारमध्ये ठेवायचे छोटे पंचांग बाजारा आले आहे. दोन तीन वर्षापूर्वी एका ओळखीच्या काकांनी भेट म्हणून दिले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
५
५० फक्त गुरुवार, 10/28/2010 - 09:44 नवीन
आम्ही २३ वर्षे प्रत्यक्ष पंचांगकर्ते दातेंचे सख्खे शेजारी होतो, पण सोलापुरात पण माझे काही मित्र ज्यातले बरेच ब्राम्हण सोनार होते ते टिळक पंचांग वापरायचे. लहानपणी हि दोन्ही पंचांग घेउन काय कुठे मागं पुढं आहे हे पाहायचा खेळ खेळायचो त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 10/28/2010 - 09:49 नवीन
http://misalpav.com/node/5590#comment-83116 इथे दिलेला प्रतिसाद परत देत आहे. त्यातला काही अंश देत आहे. पृथ्वीची स्वतःभोवतीची फिरण्याची गती खुप मोठी असल्याने भोवरा जसा गुंगत असतो तसेच पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती गुंगते, फिरते. हा साधारणतः २६००० वर्षाचा एक चक्र असा कालावधी आहे. यालाच विलोम अथवा परांचन गती असे म्हणतात. त्यामुळे आज असलेला धृव तारा सतत बदलत असतो. ह्या परांचन गतीमुळे वसंत संपात बिंदू हा दर वर्षी ५०.२ विकला इतका क्रांतीवृत्तावर मागे मागे जातो. तीच अयनांश गती होय. मेष रास ही अश्विनी नक्षत्रापासुन सुरु होते. अश्विनी नक्षत्रातील ज्या स्थिर ता-यापासुन सुरु होते तिला अश्विन्यारंभ बिंदू असे म्हणतात. ह्याच बिंदूजवळ जेव्हा पूर्वी वसंत संपात बिंदू होता ते शून्य अयनांश वर्ष मानले आहे. परंतु अश्विन्यारंभ बिंदूबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. शून्य अयनांश वर्ष हे शके २०० ते शके ५०० यादरम्यान असावे. याच वेळेस केवळ नक्षत्रावर आधारीत ज्योतिष गणितामधे, पश्चिमेकडुन आलेला राशी विचार बसवला गेला. या काळात केवळ निरिक्षणावर आधारुन ही अयनांश गती ५८ ते ६० विकला मानून गणित केले जात असे. (३६० अंश पूर्ण वर्तुळ, एक अंश म्हणजे ६० कला, एक कला म्हणजे ६० विकला). यापद्धतीत ग्रहांचे भोग नीट येत असत, ग्रहण कालात मात्र प्रत्यक्ष आणि गणितात दोन मिनिटे ते २० मिनिटे (त्याकाळी घटका पळे) फरक पडु लागला. परंतु निरिक्षणाला अनुभव आणि गणिताची जोड देवुन दुरुस्ती केली जात असे. पूढे पूढे काही अपरिहार्य कारणांमुळे देशभरातील ज्योतिर्विदांचा एकमेकांशी संपर्क तुटला. तरी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने गणिते मांडुन, निरिक्षणांची जोड देवुन कालमापन करत असे. सन १९१७ साली सांगलीला लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिर्विदांची सभा झाली. त्यात अयनांश गती ५०.२ विकला निश्वित केली. जी आजही मान्य आहे. पुण्यातील विद्वान ज्योतिषी रघुनाथशास्त्री पटवर्धन यांनी 'शुद्ध टिळक पंचांग' चालु केले. शून्य अयनांश वर्ष शके ४९६ मानुन त्यांनी गणित केले. टिळक पंचांग टिळकांनी चालु केले नाही. सोलापुरचे दाते शास्त्री यांनी याच सभेनंतर अयनांश गती ५०.२ विकला मानुन पंचांग आणले, जे आजही सर्वमान्य असुन दाते पंचांग या नावाने प्रख्यात आहे. दाते व टिळक पंचांग यात ४ अंशांचा फरक आहे. लाहिरी (उत्तरेकडे प्रचलित असलेले) व दाते यांचे अयनांश समान आहेत. तर कृष्णमुर्ती (केपी पद्धतीचे जनक) यांच्यात आणि दाते यांच्या अयनांशात सहा कलांचा फरक आहे. टिळकानी याविषयीची विस्तृत चर्चा आर्क्टिक होम ऑफ वेदाज आणि ओरायन या ग्रंथांमधे केली आहे. सायन मेष रास ही वसंत संपात बिंदूपासुन सुरु होते व ३० अंशावर संपते. तिथुन पुढे वृषभ वगैरे. निरयन मेष रास ही अश्विनि आरंभ बिंदू पासुन होते. तेथून पुढे प्रत्येकी सव्वादोन नक्षत्रे. रॉफेल एफिमेरीज मधे अयनांश मिळवले की निरयन राशी भोग मिळतात. अन्यथा नक्षत्रभोग दोन्हिकडे समान आहेत. अश्विन्यारंभ बिंदुविषयीचे प्रमुख पक्ष सध्या दोन आहेत. झिटा पेशियम (जयंती तारा) हा आरंभबिंदु मानणारा झिटा पक्ष आणि १४ व्या नक्षत्रातील (चित्रा मधील ) ता-यापासुन १८० अंशावर आरंभ बिंदु मानणारा चित्रा पक्ष. भारत सरकार मान्य अयनांश( तसेच दाते + लाहिरि) हे चित्रापक्षीय आहेत. १ जाने २००८ ला हे २३।५८।१६, १ जाने २००९ ला २३।५९।११ तर १जाने २०१०ला २४।००।०४ असे आहेत. चांद्रमास २९.५ दिवसांचा असतो. चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे असते. पौर्णिमेस चंद्र ज्या नक्षत्रात असतो ( १० पैकी ९ वेळा) त्यानुसार त्यामहिन्याला नाव पडले आहे. जसे चित्रा नक्षत्रात असतो तो महिना चैत्र, श्रवण नक्षत्रात असतो तो श्रावण वगैरे. प्रत्येक चांद्र महिन्यात रवि दुस-या (पुढल्या) राशीत प्रवेश करतो. ज्या चंद्रमासात रवी दुस-या राशीत प्रवेश करणार नाही तो महिना अधिक मास म्हणुन गणला जातो. गणिताने हे आधीच काढता येते. सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यात सुमारे ११ दिवसांचा फरक पडतो. तो अधिक मासामुळे भरुन काढला जातो. त्यामुळे आपली दिवाळी साधारणतः आक्टोबर ते नोव्हेंबर याच दरम्यान असते. जर असे केले नसते तर दिवाळी दरवर्षी एक महिना मागे आली असती. आणि सण आणि ॠतु यांचा सुयोग्य ताळमेळ राहिला नसता. गणिताने फाल्गुन ते अश्विन हेच मास अधिक मास होतात. ज्या महिन्यात रविच्या दोन राशी प्रवेश होतो तो क्षय मास होतो. कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष हेच केवळ क्षयमास होतात. हा क्षयमास १९, ११९, १४४ वर्षानी येतो. हे सुद्धा गणितानेच काढले जाते. माघ मास कधीही क्षय किंवा अधिक मास होत नाही. --अवलिया
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar गुरुवार, 10/28/2010 - 09:55 नवीन
धन्यवाद साहेब..बरीच माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ध
धमाल मुलगा गुरुवार, 10/28/2010 - 12:34 नवीन
हॅट्स ऑफ...हॅट्स ऑफ...हॅट्स ऑफ!!! उत्तम माहिती नाना. धन्यवाद. काय साला, अस्सं डिट्टेलिंग पाहिजे ह्या विषयांवर. इतर विषयांवर भरपूर काही सापडते इकडं तिकडं गुगलागुगली केली तर. पण अशा विषयांवर संकल्पनेचा मुळ गाभा काय आहे, त्याचा वापर कसा केला जातो, तो तसा का केला जातो इत्यादी गोष्टी फारशा समोर येत नाहीत. मुळात त्यसाठी अशा गोष्टींचा अनुभव/अभ्यास असणंही गरजेचं आहेच म्हणा. नाना, अशीच मौलिक माहिती आम्हाला देत रहावे ही विनंती. :) बाकी, आम्ही दाते पंचांगच वापरतो. (बहुतेक रामदासकाका म्हणतात तसं शेजारपाजारचे 'काय अमंळ वेड** आहेत हे लोक' असं म्हणू नये म्हणून असेल किंवा समाजासोबत चालण्याची म्हणजेच समाजाशी समरस होण्याची उपजत सवय अस्ल्याने असेल कदाचित. :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मृत्युन्जय गुरुवार, 10/28/2010 - 11:05 नवीन
आम्ही तर ब्वॉ कालनिर्णय पंचांग वापरतो. :D
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 10/28/2010 - 11:54 नवीन
आजकाल जोतिष क्लासमधे पण ' कालनिर्णय पंचाग ' असेल तरच प्रवेश मिळतो असे ऐकले आहे . :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रभो गुरुवार, 10/28/2010 - 15:20 नवीन
सोलापुरचा असल्याने सोलापुरी दाते पंचांग....... प्रश्नच नाही.. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 10/28/2010 - 15:36 नवीन
लग्गेच भाव खायला सुरुवात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
अ
अडगळ गुरुवार, 10/28/2010 - 15:49 नवीन
आमच्या घरी हे वापरतात. अमंळ वेड** (अडगळ)
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 10/28/2010 - 17:02 नवीन
म्हणून उत्तर भारतीय पंचांग बघा किंवा गुजराती पंचांग (उदा: जन्मभूमीचे पंचांग)बघा . गणिताचे श्रेय सोलापूरकर दात्यांना दिलेले दिसेल.
  • Log in or register to post comments
प
पक्या गुरुवार, 10/28/2010 - 20:34 नवीन
अवलिया आणि चंद्रशेखर साहेब, छान माहिती दिलीत. कुलकर्णी साहेब , तुम्ही हा धागा काढल्याने खूपच नवीन माहिती मिळाली, धन्यवाद. एकोळी का असेनात पण चांगल्या चर्चेला तोंड फुटत असेल तर अशा धाग्यांचे स्वागतच आहे.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 10/29/2010 - 00:55 नवीन
पंचांग आणि कॅलेंडर वेगवेगळे का?
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 10/29/2010 - 01:25 नवीन
पाश्चिमात्य कॅलेंडर हे दिवस-रात्र यावर अवलंबून असते आणि दिवस (वार), महीना आणि वर्ष यावर ठरते. पंचांग म्हणजे पाच अंगांचे: तिथी, वार, नक्षत्र, (सूर्य-चंद्र) योग आणि कारण (अर्ध तिथी, म्हणजे काय ते माहीत नाही!) यावर गणिते करून तयार केलेला "कालनिर्णय" (प्रकाशन नाही) असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा