Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मोती साबण

अ
अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 10/28/2010 - 10:13
🗣 40 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
18850 वाचन

💬 प्रतिसाद (40)
प
प्रचेतस गुरुवार, 10/28/2010 - 10:19 नवीन
आम्ही तर म्हैसूर सँडल चंदनी साबण वापरतो. इतर साबणांपेक्षा हे साबण महाग आणि अस्सल चंदन अर्क असल्याने ही प्रथा पडली आहे.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/28/2010 - 20:23 नवीन
आम्ही पण म्हैसूर सॅन्डल सोप वाले!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
श
शिल्पा ब गुरुवार, 10/28/2010 - 20:25 नवीन
हॅ...आम्ही तर रोजच म्हैसुर संदल साबण वापरतो....म्हणून दिवाळीत मोती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/28/2010 - 20:31 नवीन
आम्ही तर रोजच म्हैसुर संदल साबण वापरतो.... तुम्ही काय ब्बाबा!! मज्जा आहे तुमची!!! :) आम्हाला बापडा तो दिवाळीतच मिळतो!!! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
प
प्रियाली गुरुवार, 10/28/2010 - 20:35 नवीन
वीरप्पन तुमच्या ओळखीचा होता का हो? ;) ह. घ्या हं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब गुरुवार, 10/28/2010 - 21:50 नवीन
ओळखीचा म्हणजे...नात्यातलाच होता म्हणा ना...कोणाला सांगू नका हं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
N
Nile गुरुवार, 10/28/2010 - 22:37 नवीन
आता कळलं तुम्ही इतक्या पाशवी का ते. रक्तातच आहे ते तुमच्या, तुमचा दोष नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब गुरुवार, 10/28/2010 - 23:38 नवीन
काय करणार? नाईलाज आहे.. पण तुम्ही अवांतर आणि खोडसर आहात असे कुठेशी ऐकु आले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 10/29/2010 - 11:41 नवीन
>>तुम्ही अवांतर आणि खोडसर आहात असे कुठेशी ऐकु आले... ते निरमा लावतात ना म्हणुन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
न
नितिन थत्ते Fri, 10/29/2010 - 17:25 नवीन
खोडसर हा शब्द आवडला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Fri, 10/29/2010 - 17:29 नवीन
छान...पण तो शब्द माझा नाही ... कोणाचा ते स्वतः धुंडाळावे. ;) एखाद्या काय आहे च्या धाग्यावर सापडतोय का बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 10/28/2010 - 10:23 नवीन
अरे वा एका ओळी वरुन सहा अओळींवर मजल गेली हे काही थोडे नाही.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 10/28/2010 - 11:15 नवीन
हो
  • Log in or register to post comments
प
पंख गुरुवार, 10/28/2010 - 12:23 नवीन
लहानपणी गावी दिवाळिची भेट म्हणून एका पतसंस्थेतर्फे काही साखर, तूप, खोबरे ई. वस्तुंसोबतच २-३ मोती साबणही मिळत.. ईतर वेळेस मोती साबण बघायलाही भेटत नसत..फार आनंद व्हायचा. मजा यायची. कुठे गेले ते दिवस ?
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 10/28/2010 - 20:11 नवीन
सध्या इतरही साबण दिवाळीत वापरणारे लोक आहेत पण पूर्वी मोती हा दिवाळी स्पेश्शल असायचा आणि दिवाळीसाठीच त्याचे उत्पादन होत असे (ऐकीव माहिती). एक दोन किराणा दुकानात मला आठवतय, दुकानदार आधी विचाराय्चे कि यावर्षी तुमचा मोती 'बुक' करायचा का? ऐनवेळी म्हणे मिळत नसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंख
व
विकास गुरुवार, 10/28/2010 - 13:03 नवीन
दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला "मोती" साबणच का? मला वाटते तसे करावे असे ऋग्वेदातील आठव्या सुक्तामधील त्रेपन्नाव्या ऋचेमधे त्याचे स्पष्ट कारण दिलेले आहे. ;) कृ. ह.घ्या. :) अभ्यंगस्नानाच्या वेळी उटणे लावण्याची प्रथा आहे. अनेक वर्षांपूर्वी जेंव्हा हमाम/लाईफबॉय आणि गिचका होणारे लक्स वगैरेच आयताकृती साबणे होती तेंव्हा मोती साबण हा जरा गोल असल्याने तसे नाव, जाहीरात, किंमतीने पेश्शल वाटायला लागला असावा. तेच म्हैसूर सँडल सोप संदर्भात.
  • Log in or register to post comments
स
स्वतन्त्र गुरुवार, 10/28/2010 - 13:23 नवीन
आधी दिवाळी म्हंटला कि वर्षातून एकदाच कपडे मिळायचे,त्याचच अप्रूप असायचं ...असही त्यावेळी कदाचित Lifebuoy चा जमाना असल्यामुळे मोती साबण जरा महागतला वाटायचा शिवाय सुगंधही चांगला ....म्हणून मोती साबण वापरात असावे कदाचित, आणि पुढे तीच प्रथा पडली !
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 10/28/2010 - 17:22 नवीन
मोती साबण मस्तच. पण म्हैसूर चंदन अहाहा .... ब्रम्हानंदी टाळी लागते माझी.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 10/28/2010 - 17:46 नवीन
आम्ही पण मैसूर सॅंडल सोप च. :)
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 10/28/2010 - 20:28 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
पक्या गुरुवार, 10/28/2010 - 19:50 नवीन
जी काय प्रथा पडली ती मस्तच. दिवाळी म्हटले की इतर अनेक गोष्टींबरोबर अभ्यंग स्नान , उटणे आणि मोती साबण हे हवेच.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 10/28/2010 - 19:53 नवीन
अय्या!!!! बरी आठवण केलीत..विसरलेच होते मी.
  • Log in or register to post comments
अ
अपूर्व कात्रे गुरुवार, 10/28/2010 - 20:09 नवीन
दिवाळी आणि मोती साबण हे नाते अतूटच. मागच्या वर्षी दुसरा एक साबण आणला, पण अभ्यंगस्नानाला मात्र हट्टाने मोतीच आणायला लावला. बाकी मैसूर सोप वापरला नाही कधी. यावेळी वापरून बघतो.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 10/28/2010 - 20:21 नवीन
आपुन कोन्ताबी साबन लाव्तोय. (रिन साबणाने ग्रीजचे हात धुणारा)
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 10/28/2010 - 21:00 नवीन
मला पिअर्स आवडतो. अगदी सणासुदीलाही! मोती साबण वजनाला जड असतो तसेच तो हातातून घसरून पायावर पडल्यास इजा होइल कि काय असे लहानपणी वाटत असे.;) तसाही तो फेकून मारला तर कपाळमोक्ष होण्याची भिती. हेच मत दिवाळीतल्या बिघडलेल्या लाडवांच्या बाबतीत आहे. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 10/28/2010 - 21:05 नवीन
आमच्या घरी चार दिवसासाठीचे चार साबण : मोती, मैसूर.डव्ह आणी पिअर्स... हॉस्टेलवर एकमेव : मेडिमिक्स.. :)
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा गुरुवार, 10/28/2010 - 21:38 नवीन
आमच्याकडे तीळीचे तेल..आणि वनौषधिंनी युक्त होममेड (आईने बनवलेलं) असे त्यात थोडे बेसन पीठ मिसळुन ते दुधात भिजवुन त्यात थॉडेसे मध कालवुन या पद्धतीचा उट्ण.. वापरतो.. हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम.. खरे अभ्यंग हेच.. आधी हे भिजवलेलं उटण लावुन घ्यायचे वरुन तीळीचे तेल लावुन ४-५ मिनिट तसेच राहु द्यायचे.. थोडा घाम आला कि ते रगडुन काढावे,,,(ही संकल्पना नरक काढणे अशीही ओळखली जाते...) नंतर कोम्हट पाण्यात गुलाब पाकळ्या किंवा आवडता अत्तर फ्लेव्हर टाकुन मस्त अंग शेकुन.. यानंतर बाहेर येण्याच्या आधी कण्केच्या दिवल्यांनी औक्षण.... अशी थोडी वेळ्खाउ आहे पण दिवळीतच ४ दिवस चान्स असतो अशा अंघोळीचा....दवडु नका.. ईतर वेळी फक्त उटण्याचा वापर साबणाऐवजी वापरुन अपण दुधाची तहान ताकावर भागवु शकतो... आयुर्वेदिक स्नान.. संस्कृतीलालसा....
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 10/28/2010 - 23:06 नवीन
वर्णन असं केलयत कि पुन्हा इनो घ्यावा लागणार!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा
ड
डावखुरा Fri, 10/29/2010 - 04:46 नवीन
काकु मला एकदा ईनो कशासाठी नेमकं वापरतात हे तरी सम्जवुन सांगा.. धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Fri, 10/29/2010 - 16:56 नवीन
इनोचं जाऊ द्याहो! एकतर तुम्ही मला काकू म्हणालात्?ऑ? चित्तरंजन वाटिकेत आपण भेटलो होतो. प्राजुच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनावेळी. तुम्हाला मी काकू वाटते का? आजकाल सगळे काकू आणि आज्जी का म्हणतात तेच कळत नाही बुवा! तुम्ही तुमचे 'लालसा' हे नाव बदलणार असल्याचे सांगितले होते तेंव्हा! हां, आता इनोबद्दल! एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नसली, जसे कि पदार्थ किंवा या केसमध्ये ही गुलाबाच्या पाकळ्या वगैरे पाण्यात घालून अंघोळ वगैरे कि जळजळ होते म्हणून इनो! पूर्वी अभ्यंगस्नानानंतर बाथरूमध्येच आम्हा लहान मुलांचे अश्या दिव्यांनी औक्षण व्हायचे. त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा
प
प्रियाली Fri, 10/29/2010 - 17:00 नवीन
रेवती तू एक टकाटक नाव (आयडी) घे त्या आयेशा टकिया सारखं मग बघ तुला कोण काकू आणि आज्जी म्हणतं का ते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
प्रभो Fri, 10/29/2010 - 17:13 नवीन
तरीही मी आज्जी म्हणणारच.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ड
डावखुरा Fri, 10/29/2010 - 17:09 नवीन
लालसा नाव बदलायचं होतं पण कसं ते काही जमलं नाही.. तसं काही वाईट नाहीये.. बरीच विशेषणे पुढे लावली की ते चांगले वाटते..(असे मला वाटते..) प्राजुतै च्या सीडी प्रकाशनाला ही यायचे होते पण नाही जमले.. तुम्हाला काकु नको म्हणु चालेल पण तुम्हीच सुचवा मग काय म्हणु ते... हां, आता इनोबद्दल! एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नसली, जसे कि पदार्थ किंवा या केसमध्ये ही गुलाबाच्या पाकळ्या वगैरे पाण्यात घालून अंघोळ वगैरे कि जळजळ होते म्हणून इनो! हे मात्र अस्सल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
अनिता Fri, 10/29/2010 - 01:42 नवीन
मोतीचा च्॑दन साबण्...आता मिळतो की नाही माहित नाही.. अवा॑तर : लालसाच्या प्रतिक्रियेत उटण च्या जागी मट्ण वापरले तर काहीतरी छान पदार्थ होइल असे वाटते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा
व
विकास Fri, 10/29/2010 - 02:58 नवीन
मोतीचा च्॑दन साबण्...आता मिळतो की नाही माहित नाही.. हा घ्या! :-) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिता
ड
डावखुरा Fri, 10/29/2010 - 17:16 नवीन
अनिता तै मटण..अन् ते पण दिवाळीच्या शुभ्मुहुर्तावर.... नका आठवण देउ... आणि मट्नात दुध्,मध छे काहीतरीच काय... (झाडपालाहारी)..लालसा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिता
च
चिंतामणी गुरुवार, 10/28/2010 - 21:42 नवीन
काका नॉस्टॉल्जीक केलेत हो तुम्ही. :(
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 10/28/2010 - 22:31 नवीन
लहानपणी अभ्यंगस्नानासाठी उटणे वापरायचो ते आठवते. उटणे धुवून काढायला दुधात कालवलेले बेसन-पीठ वापरत असू, असे सुद्धा आठवते. साबणाचे काही आठवत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अडगळ गुरुवार, 10/28/2010 - 23:46 नवीन
मोती /लाइफबॉय्/जीवा/चंद्रिका/हमाम्/राम्देवबाबा -आसारामबापू आश्रमाचे साबण (१०/१२ रु. नग) बाहेर नळाखाली तिथं जो पडला असेल तो साबण लावून आंघोळ उरकतो. (त्वचेवरुन उम्र ओळखू येणारा ) अडगळ.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/29/2010 - 11:35 नवीन
'सासासासा रे गप पधपगरेग धधध ध मध ......' तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफ बॉय..! आम्ही नेहमी लाईफबॉय वापरतो.. स्वस्त अन् मस्त..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा