Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुखपृष्ठाकरता शब्दांकन हवे आहे, चित्रसंकलन करून हवे आहे..

व
विसोबा खेचर
Sat, 10/30/2010 - 13:01
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4417 वाचन

💬 प्रतिसाद (12)
स
स्पा Sat, 10/30/2010 - 13:04 नवीन
तुम्हाला mail करायची का ती JPEG file ?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 10/30/2010 - 13:07 नवीन
व्य नि ने पाठवा किंवा जाहीरपणे येथे प्रतिसादात डकवा.. काहीही चालेल.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्रियाली Sat, 10/30/2010 - 13:12 नवीन
चित्रांसाठी गरज लागते आहे हे ठीक हो पण संकलनासाठी इतरांची मदत तुम्हाला का पडावी, शब्दप्रभू? शब्दप्रभू हे विशेषण आवडले. :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 10/30/2010 - 13:23 नवीन
संकलनासाठी इतरांची मदत तुम्हाला का पडावी, शब्दप्रभू?
पहिली गोष्ट म्हणजे मी शब्दप्रभू नाही.. मिपावरचा मी एक कडमड्या लेखक आहे! :) एकवेळ त्या धाग्यातील चित्रांना, मुखपृष्ठाला साजेसं मी काही लिहिलंही असतं, तसा प्रयत्नही करून पाहिला परंतु त्या धाग्यातील चित्रं इतकी भन्नाट आहे की बोल्तीच बंद होते.. :) म्हणून आज मी मग यशोधराने काढलेलं एक चित्र मुखपृष्ठावर टाकलं आहे व त्याला समर्पक काही ओळी लिहिल्या आहेत.. पण योगेशच्या त्या लेखातील चित्रं अशक्य आहेत.. :) प्रियाली, तू करशील का प्रयत्न? पण तुला जळ्ळं त्या भुताखेतांशिवाय दुसरं काही लिहिता येत नाही.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Sat, 10/30/2010 - 13:49 नवीन
तुला जळ्ळं त्या भुताखेतांशिवाय दुसरं काही लिहिता येत नाही..
सिंहगडावर भुतं दिसली असतील तरच मीही लिहिते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
य
यशोधरा Mon, 11/01/2010 - 07:51 नवीन
>म्हणून आज मी मग यशोधराने काढलेलं एक चित्र मुखपृष्ठावर टाकलं आहे >> हायला हे कधी झालं? मलाच बघायला नाही मिळालं!.. तात्या, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Sat, 10/30/2010 - 13:43 नवीन
सिंहगडावरचा रानमेवा दाटलेले ढग्..ओलेता दरवळ.. अधुन मधुन झरझरत्या ..रेशिम सरी.. सिंहगडावरचा रानमेवा...चाखा कधी तरी..... नुकतीच कापलेली कोवळी काकडी त्यावर तिखट मिठाची सुरेख रांगोळी... तशीच तिखट मिठ ल्यायलेली कच्ची कैरी ... गडावरच्या मेव्याची चवच न्यारी... शेंगा,आवळे ,चिंचा अन बोरं द्रोणातली .. आंबट गोड अन किंचित मीठ लावलेली तोंडात टाकताच अगदी लहानपणीची "बाळवाटी "आठवली.. ... रानमेव्याची आठ्वण जिभेवर दाटली...... खमंग दरवळणारी खेकडा भजी.. त्यावर झटका देणारी तळलेली मिरची.... .... अन जिभेवर आणि पोटावर माया करणारे मस्त दही.. ..जगात रानमेव्याच्या तोडीचं आहे का काहि? गरम गरम पिठलं अन भाकरी... चवीला खर्डा लागतो "जिव्हा"री दह्याचा थंडावा ...माधुर्याचा शिडकावा.. ..या अनुभवूया सिंहगडावरचा रानमेवा..... ता.क. अर्र्र्र्र्र्... ओळी जास्त झाल्या कि....जाउ दे! :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 10/31/2010 - 15:44 नवीन
छान ग जाई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
व
विसोबा खेचर Sun, 10/31/2010 - 16:10 नवीन
मस्त लिहिलं आहे.. अजून थोडं शॉर्ट हवं असं वाटतं.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Sun, 10/31/2010 - 17:00 नवीन
दाटलेले ढग्..ओलेता दरवळ.. अधुन मधुन झरझरत्या ..रेशिम सरी.. सिंहगडावरच्या रानमेव्याची लज्जतच न्यारी ताज्या काकडी अन कैरीवर तिखट मिठाची सुरेख रांगोळी... शेंगा,आवळे ,चिंचा अन बोरं द्रोणातली ..आंबट गोड अन किंचित मीठ लावलेली तोंडात टाकताच अगदी लहानपणीची "बाळवाटी "आठवली.. ... रानमेव्याची आठ्वण जिभेवर दाटली...... खमंग दरवळणारी खेकडा भजी अन तळलेली मिरची.... खर्डा पिठलं अन भाकरी...दह्याचा थंडावा ...माधुर्याचा शिडकावा.. ..या अनुभवूया गडावरचा रानमेवा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Sun, 10/31/2010 - 17:07 नवीन
ओक्के..! :) आता चित्र पाठवा.. मनापासून आभार.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Sat, 10/30/2010 - 13:35 नवीन
झाला कि टाकेन!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा