कलादालन

कोलाज.... पुन:प्रयत्न..

Primary tabs

हातात कॅमेरा घेतल्यावर काही ना काही टिपल्या जातंच.. त्यातल्या त्यात डिजीटल कॅमेरा, म्हणजे तर "क्लिकक्लिकाट"च.. एवढ्यात भरपूर भटकंती झाली. त्यावेळी टिपलेली ही काही दृष्ये... हे मसुरीत उमललेले फुल... Image removed. ट्रेकींगला गेलो असतांना समोर हे दिसलं, आणि भरुन पावलो... Image removed. हा चीनचा भाग (तिबेट), अरुणाचलमधील सैन्याच्या पोस्टमधून दिसलेला... Image removed. अंदमानच्या जंगलातील प्रकाशाचा खेळ... Image removed. स्वतःचे नाव सार्थक करणारे मेघालय... Image removed. निसर्गाचे "अ‍ॅब्स्ट्रॅक्ट" चित्र... Image removed. ही छायाचित्रे आवडली तर आणखी काही डकवावी म्हणतो... मिपाकरांनो, प्रयत्न गोड मानून घ्यावा, ही विनंती !!
स्वानन्द

आणखी येऊ द्या.

तुम्ही इतक्या ठिकाणी फिरला आहात तर, मग एकेका परीसरावर एकेक धागा टाका. म्हणजे एकसंधता येईल आणि शिवाय त्याबरोबर तिथले अनुभव पण कधन केलेत तर आणखी बहार येईल :)

स्वानन्द

अरे हो ... एक विचारायचं राहिलंच... यात कोलाज कुठे आहे?

एक विचारायचं राहिलंच... यात कोलाज कुठे आहे?

हेच अगदी मनात आले.

बाकी फोटु मस्तच ! त्यातल्या त्यात रेनबो वाला फोटु आवडला.
(वाह एक इंग्रजी शब्द आला बॉ प्रतिक्रीयेत)

चिगो

वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो एकत्र करुन टाकलेत म्हणून "कोलाज" असं नाव दिलंय.. चुभुद्याघ्या..

यशोधरा

भारी! दुसरा, तिसरा आणि मेघालय हे ३ फोटो खूप भारी आहेत!

धमाल मुलगा

दादानू, लै दिवसांनी बोर्डावर तुपलं नाव दिसलं बा. :)
आता फोटूसोबत काही झकाऽऽस लेखही टाका देवा.

अवांतरः 'मेघालय' एकदम अप्रतिम! आणि तिबेट, डोंगरातलं इंद्रधनु....सुंदरच!!!