Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

त्रिशंकुच ...

छ
छोटा डॉन
Mon, 11/01/2010 - 10:53
🗣 67 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
11280 वाचन

💬 प्रतिसाद (67)
अ
असुर Mon, 11/01/2010 - 18:18 नवीन
श्रामो, माहीतीबद्दल धन्यवाद! मला त्यामुळेच शंका आहे की मनसेला डावलून बाकी पक्षांना काही करायचे असेल असेच काही करावे लागेल. आणि तसेही तत्व आणि आदर्श वगैरे गोष्टी हल्ली दुर्मीळ आहेत. त्यामुळे "जिथे माझा फायदा, तोच माझा कायदा" हेच तत्व अनुसरुन त्यालाच 'स्थानिक राजकारण' असे गोंडस नाव दिलंय! याला कुणीही अपवाद नाही हे विशेष! दिल्लीत एकमेकांचे गळे धरणारे लोक गल्लीत गळ्यात गळे घालून फिरतात हे पण मजेशीर आहे. दिल्लीतले गल्लीत नाही, गल्लीतले दिल्लीत नाही. सगळी आहे 'कूटनिती'!!! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
प
प्रिया देशपांडे Mon, 11/01/2010 - 18:31 नवीन
हे मात्र खरे आहे. कोकणात एका सेनेच्या नेत्याने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या दोन नेत्यांना आंब्याच्या मोठ्या बागा विकल्या होत्या काही वर्शांपूर्वी. विधानसभेत मात्र ते एकमेकांचे शत्रु असायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
स
सूड Mon, 11/01/2010 - 14:27 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार !!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 11/01/2010 - 14:31 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार !!
झी मराठी अ‍ॅवॉर्डस जास्ती बघत जाउ नका ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Tue, 11/02/2010 - 15:34 नवीन
हो ना, रविवारी पाह्यलं त्याचा हँगओव्हर होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्रिया देशपांडे Mon, 11/01/2010 - 15:13 नवीन
विजयी उमेद्वारांचे अभिनंदन. मनसे आणि सेना खरोखरच एकत्र येतील? सामना मध्ये बाळासाहेबांनी राज ठाकरेंना बाळराजे टमरेलकर म्हंटले.राज ठाकरेंनी सेनावाल्यांना करवंटी का शेंदूर म्हंटले. मनसेवाल्यांनी बाहेरून पाठिंबा द्यावा आणि कामे करुन घ्यावीत.
  • Log in or register to post comments
P
pramanik Mon, 11/01/2010 - 15:27 नवीन
मनसेने फक्त शिवसेनेचीच कास धरावी,अन्यथा मराठीला तडा जाईल ह्यात शंका नाही. अन्य सर्व पक्ष हे फक्त घाणेरडे राजकरण करुन आपला स्वार्थ साधायला बघतात. त्या अन्य पक्षांना स्वःताला मराठी बोलवतच कस??
  • Log in or register to post comments
उ
उपास Mon, 11/01/2010 - 16:34 नवीन
सगळ्यांचीच कोंडी झालेय.. शिवसेनेने आणि मनसेने आधीच एकमेकांना जाहीर शिव्या दिल्या, आता एकत्र आले की सत्तेसाठी कोडगेपणाचा शिक्का बसणारच.. ह्यात एक म्हणजे मनसेने सत्तेत न जाता बाहेरुन किंवा विरोधात राहून वचक ठेवला ना तर पुढे मुंबई महानगरपालिकेत फायदा होऊ शकतो.. पण एकदम बघण्यालायक ठरणार आहे आता सगळ्या पक्श्याच्या हालचाली.. सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन.. प्रश्न : १. मनसे दुसर्‍या क्रमांकावर किती ठिकाणी आहे? २. अशी किती ठिकाणी आहेत की मनसे फॅक्टर मुळे काँग्रेसने फायदा उचलल्ला? मराठीचा ठसा उमटला हे नक्की.. हे ही नसे थोडके!
  • Log in or register to post comments
त
तिमा Mon, 11/01/2010 - 16:43 नवीन
दोघांनी एकमेकांच्या टमरेल व वरवंट्याला शेंदूर लावून एकत्र पंगतीला बसावे. पांच वर्षांत टमरेलांचे कमोड होतील आणि वरवंट्याचे पाटे!!!
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Mon, 11/01/2010 - 17:11 नवीन
इकडे सगळे जण राजकीय फायद्या-तोट्याची गणितं मांडताहेत. पण या निकालामुळे कल्याण-डोंबिवलीच्या डोकेदुखीत भर पडली आहे त्याचं काय? एक तर सत्ता परिवर्तन झालं नाही . कल्याण-डोंबिवलीत आधीच उन्मत्त असलेली शिवसेना आता आणखीनच उन्मत्त होईल. (जसे सध्या केंद्रात झाले आहे. आपण काहीही केले तरी कोण काय उपटणार? सत्ता आमचीच अशी मस्ती काँग्रेसला आली आहे. कल्याण -डोंबिवलीत युतीची हीच मेंटॅलिटी आहे. पंधरा वर्ष सत्ता भोगली, शहराचा सत्यानाश केला आणि वरती ८५% कामं पूर्ण केल्याचे दावे. खाकी चड्डीवाल्यांची मात्र फाटली हे छान झालं. ) मनसे हा एक नविन पर्याय म्हणून आजमावायला खरोखरच चांगला होता. राज ठाकरे यांचा जाहीरनामा पण खरोखरच चांगला होता. रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि नविन बांधकामांना बंदी हे तर खूपच आकर्षक होतं. आणि ते स्वतः म्हणतात त्याप्रमाणे एक संधी द्यायला काहीच हरकत नव्हती. बरं, मनसे नाही तर नाही निदान काँग्रेस-राष्ट्रवादीला तरी मेजॉरिटी मिळाली असती तरी चाललं असतं. सत्ताबदल फार आवश्यक होता. सव्वीस वर्षांमध्ये मी डोंबिवलीची आत्ताएवढी वाईट अवस्था कधीच पाहिली नाही. अख्खी डोंबिवली जणू फुटली आहे. इतकी वाईट अवस्था असूनही फक्त ४६% मतदान याला काय म्हणावं. आता फक्त देवावर हवाला ठेवून दिवस काढायचे, दिवस कसले वर्षं. ५ वर्ष. तेच ते फुटलेले रस्ते, घाणीचं साम्राज्य, डास,रोगांच्या साथी,प्रचंड प्रदूषण, बेसुमार बांधकामं आणि अक्राळविक्राळ लोकसंख्या. एवढं सगळं असून जागेचा भाव अवघा ५००० रुपये प्रति स्क्वेअर फूट. परमेश्वरा आता तूच आमचा सहारा. आता उद्या म्हा. ठाकरे काय बकतो ते पाहायचं?
  • Log in or register to post comments
प
प्रिया देशपांडे Mon, 11/01/2010 - 17:49 नवीन
पण ह्यामुळे जे कोणी सत्तेवर येतील त्यांच्यावर वचक असनार नाही का? तुम्च्यापैकी(मनसे सोडुन) नीट सत्ता राबवायला कोणीही लायक नाही असेच क्.डों.करांना सांगायचे असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
इ
इनोबा म्हणे Mon, 11/01/2010 - 18:23 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे
स
सुहास.. Mon, 11/01/2010 - 21:14 नवीन
अप्पा !! एक मिनीट !! शांत हो जरा , अजुन धिंगाणा बाकी आहे , अख्खी डोंबिवली जणू फुटली आहे. इतकी वाईट अवस्था असूनही फक्त ४६% मतदान याला काय म्हणावं. आता फक्त देवावर हवाला ठेवून दिवस काढायचे, दिवस कसले वर्षं. ५ वर्ष. तेच ते फुटलेले रस्ते, घाणीचं साम्राज्य, डास,रोगांच्या साथी,प्रचंड प्रदूषण, बेसुमार बांधकामं आणि अक्राळविक्राळ लोकसंख्या. एवढं सगळं असून जागेचा भाव अवघा ५००० रुपये प्रति स्क्वेअर फूट. परमेश्वरा आता तूच आमचा सहारा. >>> मग बाकीचे ५४% कुठे गेले आणी ४६% पैंकी आपण बोलणारे मराठी की अमराठी ? मग तुला डिटेल्स देतो... अवांतर : वाश्या, ईथ लिहुन झाल ना !! जा आता मस्त भैय्याच्या हातची पांणट पाणी-पुरी खाऊन ये बर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 11/02/2010 - 05:13 नवीन
अवांतर : वाश्या, ईथ लिहुन झाल ना !! जा आता मस्त भैय्याच्या हातची पांणट पाणी-पुरी खाऊन ये बर !! हा हा हा.. खल्लास. आणि हे ही म्हणतो भैय्या नसेल तर मुंबई बंद पडेल वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 11/02/2010 - 05:11 नवीन
डोंबिवलीत पूर्णपणे या टर्मला युतीची सत्ता होती का? मी तर काल टिव्हीवर ऐकले की या वेळेला पहीली अडीच वर्षे राष्ट्रवादी - काँग्रेस + अपक्ष अशी सत्ता मनपात होती. नंतर शिवसेनेने अपक्ष फोडून सत्ता मिळवली . गेल्या वेळेला २० अपक्ष निवडून आले होते. या वेळेला ११ आले आहेत. जाणकार अधिक प्रकाश टाकतील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर Tue, 11/02/2010 - 10:15 नवीन
अडीच वर्षे राष्ट्रवादी - काँग्रेस + अपक्ष अशी सत्ता मनपात होती माहिती बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
त
तिमा Tue, 11/02/2010 - 15:23 नवीन
अहो, अनेक वर्षांपूर्वी इथे जनसंघाची सत्ता होती. तेंव्हाही ओरपत होते सगळे. बाकीच्या देशात काँग्रेस जावी असे त्याकाळी आम्हाला वाटायचे. पण ते जाउन हे जनसंघी तरी काय दिवे लावणार असे डोंबिवलीचा ग्रामपंचायतीचा कारभार बघितल्यावर वाटायचे. बरं झालं पूर्वीच डोंबिवली सोडली ते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा