Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी वृत्तवाहिन्यांचे केविलवाणे मराठी..

प
पंख
गुरुवार, 11/04/2010 - 07:02
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2147 वाचन

💬 प्रतिसाद (11)
श
श्रावण मोडक गुरुवार, 11/04/2010 - 07:09 नवीन
अहो, नका बघत जाऊ इतक्या तपशिलात वाहिन्या. उगा का जिवाला त्रास करून घ्यायचा? हेडलाईन पहाव्यात, त्यातून जितकी बातमी कुणालाही कळते तेवढीच त्यांनाही कळलेली असते. बाकी सारे तपशील असतात.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 11/04/2010 - 07:38 नवीन
मग हे लोक ऊथळपणाचे ईतके प्रदर्शन का करतात
महत्त्वाचा प्रश्न आहे खरा.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 11/04/2010 - 09:59 नवीन
तुला पहिल्याच वाक्यातली "बर्‍याच दिवसांपासून हि गोष्ट खटकली" नाही का? बाकी हाफ सेंचुरी, रन्स, बॅट्समन, बॉलर्स, इ शब्द मला मराठीत नॉर्मल वाटतात. लकी हा शब्द मी मराठीत वापरत नाही. बाकीच्या इंग्लिश शब्दांची सामान्य रूपं करून मी त्यांना मराठी बनवून टाकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ध
धमाल मुलगा गुरुवार, 11/04/2010 - 11:19 नवीन
अरे शुध्दीचिकित्सक मॉड्युलांनो :D शांत व्हा..शांत व्हा . श्री./सौ./कु. (जे काय असेल ते राव...) पंख ह्यांनी मराठीत विंग्रजी शब्दांच्या खिचडीविषयी हा लेख लिहिलाय असं नाय काय वाटत? :) (आता, जर का माझ्या वाचण्यातून त्यांच्या लेखातलं सुद्दलेकनावरचं भाष्य सुटलं असेल तर आपलं काऽऽय बा,.....सुमडीत माघार :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
५
५० फक्त गुरुवार, 11/04/2010 - 07:43 नवीन
तुम्ही उल्लेख केलेला परिच्छेद वाचला तर असं वाट्लं की हि माझ्या आसपास बोलली जाणारी मराठी आहे. हिच गोष्ट मला सांगाय्ची असती तर मी सुद्धा अशीच सांगितली असती. त्यांचं मराठी हे बोली - बोलल्या जाणा-या मराठीच्या जवळ्पासचं असतं असं मला वाटतं. तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण मनसे किंवा इतर पक्ष या गोष्टित लक्ष घालायची शक्यता फार कमी, त्यांच्याकडे सध्या भाषाविषया पेक्षा गणितीय आकडेमोड (पक्षी- घोडेबाजार) विषय जास्त महत्वाचा आहे. आणि नंतर सुद्धा जर त्यांनी ह्या गोष्टित लक्ष घालायचं ठरवलं तर त्यांना ' षुध मराटी क्से बोलवावे याचे कलास काढवावे लागतील'' म्हणुन श्री. श्रा.मो. म्हणतात तसं - ह्या गोष्टी फार गांभिर्यानं घेउ नका, आपली मराठी एवढी नाजुक नाही की अशा फुटकळ घट्नांमुळे गडबडुन जाईल. तपशिलात पाहायचंच असेल तर - बदनाम मुन्नी किंवा वाजलेल्ले बारा किंवा आलेली अप्सरा आणि उभ्या रेल्वे वरुन आडवे जाणारे रा.रा. मा. श्री. रजनीकांत असे पुष्कळ पर्याय उपलब्ध आहेत, ते पहा. आणि सचिन पहायचा असेल तर प्रत्यक्ष मॅच पाहा, त्याचा खेळ कोणत्याही भाषा, वाहिन्या या सर्वांच्या पलिकडचा आहे. त्याच्या खेळाचं मिपा वरच्या जेपींनी केलेलं वर्णन या निवेदकांना वाचायला दिलं ना तर फेफरं येउन बोबडी वळेल त्यांची. हर्षद
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 11/04/2010 - 10:05 नवीन
प्रसार माध्यमांनी मराठी बिघडवली हे खरे, पण त्याचे कारण इंग्रजी हे नसून हिंदी हे आहे.
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे गुरुवार, 11/04/2010 - 10:47 नवीन
मी पंख ह्यांच्याशी सहमत आहे. कोणच्याही कामात कस जोपासला पाहीजे असे वाटते. शुद्ध मराठी बोलणारी लोकं आहेत. जरा शोधले तर सापडतील. सचिन ची फलंदाजी आवडते कारण त्यात क्वालीटी ;) आहे. मराठीत छान सोपे शब्द आहेत, उगाचच भेसळ काय़
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 11/04/2010 - 22:52 नवीन
मी ह्या वृत्तवाहिन्यांच्या वेबसाईटवरही ह्या गोष्टीकडे लक्ष वेधले रादर संकेतस्थळावर लक्ष वेधले असते तर फरक पडला असता, नाही का?
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 11/04/2010 - 23:01 नवीन
पंखजी, इतरही भाषांचे प्रवाह सामावून घेउन मराठी वाहती ठेवतायत ते!;) काहीही म्हणा पण अहमदाबादचे हे स्टेडीयम जाम लकी ठरले आहे हे वाचून जाम हसू आले.
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 11/05/2010 - 00:11 नवीन
ह्यांची भाषा, सामान्य ज्ञान याबद्दल एकंदरीत आनंदच आहे. गूगलच्या जमान्यात 'स्टार माझा'चे बातमीदार दोह्याला दुबईत नेऊन वसवतात आणि लोकसत्ता अमेरिकेतील निकालांवर भाष्य करताना उमेदवार स्त्री आहे की पुरुष, हे पाहण्याचेही कष्ट घेत नाही. उदा. - भळभळता पराभव.. ख्रिस्तिन ओडोनिल : कट्टरपंथी टी पार्टीचे लोकप्रिय उमेदवार. डेलवेअर सिनेटच्या जागेवर त्यांना जोरदार मार खावा लागला. कार्ली फिओरिना : ह्यूलेट-पॅकार्ड अर्थात ‘एचपी’ या जगद्विख्यात कंपनीचे हे माजी कार्यकारी अधिकारी कॅलिफोर्नियातून पराभूत झाले.
  • Log in or register to post comments
P
pramanik Fri, 11/05/2010 - 03:39 नवीन
एवढे प्रामाणिक प्रयत्न ह्या मराठी मीडीयाकडुन होत आहेत्,त्यांना असे भाषेच्या चुकीमुळे कमी लेखु नये. काही वृत देणा-या पत्रकार कौतुक करावे ईतके छान आहेत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा