काथ्याकूट

मैत्री म्हणजे कांय?

Primary tabs

मैत्री म्हणजे कांय?

समज तुला तहान लागली आहे.

समोर पाणी नाहिये , यावेळी मीही तुझ्यासोबत नाहिये.

अशा वेळी समजा तुझी तहान शमलीच , तर खुशाल समज की , मला तुझ्या घशाची कोरड जाणवली आहे आणि ती

मी माझ्याकडे ओढून घेतली आहे !

मैत्री म्हणजे कुणीतरी , कुणाची तरी ,

ओढून घेतलेली तहान आहे.

ते नातंच इतकं महान आहे , की ,

त्याला मैत्री हे शिर्षक खूपच लहान आहे !

मैत्री म्हणजे मला जाणवलेला

तुझ्या घशाचा कोरडा आहे !

ज्याला हे समजलं तो शांत आहे ,

इतरांचा मात्र मैत्रीच्या नावाने ओरडा आहे !

विसोबा खेचर

मैत्री म्हणजे कुणीतरी , कुणाची तरी ,
ओढून घेतलेली तहान आहे.

मैत्री म्हणजे मला जाणवलेला
तुझ्या घशाचा कोरडा आहे !

छ्या! कैच्या कैच कविता आहे हो! ;)

माफ करा उदयभाऊ, परंतु ही कविता मला विशेष आवडली नाही...

तात्या.

विजुभाऊ

अशा वेळी समजा तुझी तहान शमलीच , तर खुशाल समज की , मला तुझ्या घशाची कोरड जाणवली आहे आणि ती

मी माझ्याकडे ओढून घेतली आहे !

बापरे आता मिपा वर परकाया प्रवेशाचे फ्याड आले की काय?
आम्बोळी तुझा कन्दील दे रे याना. कोणी भाड्याने ( हे नेणार्‍याचे विशेषण नाही) नेला नसेल तर

धमाल मुलगा

आम्बोळी तुझा कन्दील दे रे याना.

हा:हा:हा: आम्बोळीशेठ, चला, नवीन बिझनेस सुरु झाला...

कोणी भाड्याने ( हे नेणार्‍याचे विशेषण नाही) नेला नसेल तर

आईच्ची कटकट...:-))

उदयराव,
नाय बॉ भिडलं ! त्यातून कविता 'तंत्र' ह्या टायटलात टाकलीत..गंडलो ना!

असो, राग नसावा.

मदनबाण

त्यातून कविता 'तंत्र' ह्या टायटलात टाकलीत..गंडलो ना!
:)))))

(नमस्कार माझा तव निरीक्षणास) असे म्हाणणारा.....
मदनबाण

विकि

लेखक ना.सी. फडके यांचा मित्र या विषयावर लेख प्रसिध्द आहे त्यात ते म्हणतात नुसता सहवास म्हणजे मैत्री नव्हे त्यांच्या मते मित्र या शब्दातील खरे मर्म फारच थोड्या लोकांच्या अनुभवाला आलेले असतात. एखाद्या व्यक्तीचा आपल्याला अधिक सहवास मिळाला म्हणजे लगेच त्याचा मित्र म्हणून उल्लेख केला जातो. ते चुकीचे आहे. सहवासाने मैत्री जमेलच असे नाही. सहवास आणि मैत्री यांचा परस्परसंबध फारच थोडा असतो.
त्यासाठी ते काही उदाहरणे देतात दोन कर्मचारी कचेरीत शेजारच्या टेबलावर वीस पंचवीस वर्षे बसून काम करत असतात. त्यांना एकामेकांचा सहवास लाभत असतो म्हणुन त्यांच्यात गाढ मैत्री असेलच असे सांगता येणार नाही .काही व्यक्तीचे बालपण एकत्र गेलेले असते. एकत्र खेळता खेळता त्या व्यक्ती मोठ्या होतात. मोठेपणी त्या व्यक्ती त्यांचे मर्ग बदलतात,ते दोघेही भिन्न कार्यक्षेत्र निवडतात . आपला तो बालपणीचा संवंगडी कधी भेटला तर आपण त्याचा उल्लेख बालमित्र,लंगोटीमित्र असा करतो एकामेकांशी बोलाताना अरे,जारे करतो.पण आपली त्याच्याशी मैत्री असेलच असे नाही.अश्या बालमित्राशी वागताना सलगी असते.मित्रभाव मुळीच नसतो.
मैत्री ही विचारांच्या जुळणीतून निर्माण होते.खरा मित्र सूर्यप्रकाशासारखा मार्गदर्शक असतो. तो आपल्या जीवनप्रवाहाला योग्य वळण देतो.तो आपल्याला वाममार्गापासून परावृत्त करतो.

सहज

सप्रे साहेब कविता नक्कीच उत्तम आहे. अहो "विकि" यांच्याकडुन चक्क काहीतरी वेगळं व पुर्वग्रहदुषीत / धादांत चुकीचे / वादग्रस्त / राजकीय नसलेले काही तरी वाचायला मिळाले!! ;-) धन्यवाद विकिसाहेब असे काहीतरी लिहीत जा की राव माणसातलं. सुखद धक्का. परत एकदा विनंती असे काहीसे वेगळे वरचेवर लिहीत जा राव. आपली राजकीय मते जुळत नसली तरी असा संवाद, अशी मते ऐकायला नक्कीच आवडलीत. जियो!!!

सप्रेसाहेब तुमची कविता जिंकली!!!!

>> "विकि" यांच्याकडुन चक्क काहीतरी वेगळं व पुर्वग्रहदुषीत / धादांत चुकीचे / वादग्रस्त / राजकीय नसलेले काही तरी वाचायला मिळाले!! ;-)

हाहाहाहाहाहा :))))))))
सहमत, सहमत, सहमत..........!!!!!

>>>>आपली राजकीय मते जुळत नसली तरी असा संवाद, अशी मते ऐकायला नक्कीच आवडलीत.
या विधानाशीही सहमत !!!

सारांश :-सप्रेंच्या कवितांनी माणसांचा स्वभाव बदलण्यास मदत होते. ;)

उदय सप्रे

डॉक्टर साहेब,
तुमची गझल छान आहे , मी त्यावर तशी प्रतिक्रिया पण लिहिली आहे.
उदय सप्रे

विकास

विकीसाहेब,

आपली खर्‍या अर्थाने प्रतिक्रीया आवडली.

खरा मित्र सूर्यप्रकाशासारखा मार्गदर्शक असतो. तो आपल्या जीवनप्रवाहाला योग्य वळण देतो.तो आपल्याला वाममार्गापासून परावृत्त करतो.

म्हणूनच आम्हाला तुमचे मित्र होयचे आहे जेणे करून आपले "डावे" पण (वाम मार्ग )बंद होतील. :-)

बाकी थट्टा सोडून द्या... त्याच संदर्भात "Best Mirror is friend's eye" हा क्धीतरी वाचलेला सुविचार आठवला.

मनापासुन

मैत्री म्हणजे मला जाणवलेला
तुझ्या घशाचा कोरडा आहे !

या कवितेत मैत्री म्हणजे नुस्ता "रडा" च आहे.
किंवा मैत्री म्हणजे संपादकाकडुन साभार परत आलेल्या कविताना दाद देण्याचा राडा आहे
असे मला मनापासुन वाटते

विदेश

-शांत राहण्याला दुसरा नाही पर्याय !