Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उजव्या सोंडेचा गणपती

श
शुचि
Mon, 11/08/2010 - 03:47
🗣 70 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
26568 वाचन

💬 प्रतिसाद (70)
ए
ए.चंद्रशेखर Mon, 11/08/2010 - 04:58 नवीन
गणपतीचे सोवळे कडक असते. म्हणजे काय? लेखिका काही खुलासा करू शकतील काय?
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 11/08/2010 - 07:28 नवीन
तेच विचारण्याकता हा धागा काढला आहे की नक्की काय कडक असते म्हणजे? पूजेमध्ये फरक आहे की अन्य काही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए.चंद्रशेखर
ए
ए.चंद्रशेखर Mon, 11/08/2010 - 07:43 नवीन
सोवळे हे एक रेशमी वस्त्र असते ते नेसावयाचे असले तर ते मऊ असण्याची आवश्यकता आहे. गणपती चे सोवळे म्हणजे काय? पूजा करणार्‍याने जर हे काही असे सोवळे नेसणे अपेक्षित असेल तर ते कडक कसे असू शकेल? यात पूजेमधल्या फरकाचा काय संबंध असू शकतो? काहीतरी कुठेतरी गोंधळ होतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Mon, 11/08/2010 - 07:59 नवीन
http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=JalgaonEdition-13-1-13-07-2008-74580&ndate=2008-07-13&editionname=jalgaon या लेखात सोवळे हा शब्द वस्त्र या संदर्भात वापरलेला नसून मी वपरला आहे त्या अर्थी वापरला आहे. लेखात खालील वाक्य आहे - " उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक असते व ते मूर्तीकारालाही पाळावे लागते."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए.चंद्रशेखर
ए
ए.चंद्रशेखर Mon, 11/08/2010 - 08:01 नवीन
तुम्ही काय अर्थाने हा शब्द वापरला आहे ते सांगाना म्हणजे प्रश्नच मिटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Mon, 11/08/2010 - 08:12 नवीन
"सोवळे" हा शब्द येथे बर्‍याच अर्थांनी वापरला गेला आहे मुख्य म्हणजे - त्या त्या देवतेची नित्योपासना, तदनुषंगीक विधी, पावित्र्य, कर्मकांडं , पंचोपचारी पूजा, मूर्ती पूर्वाभिमुख, दक्षीणाभिमुख वगैरे असावी काय आदि गोष्टींकडे लक्ष देणे , स्तोत्राची आवर्तने आदि माझ्या लक्षात येतील तितके मुद्दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए.चंद्रशेखर
ए
ए.चंद्रशेखर Mon, 11/08/2010 - 08:37 नवीन
मला आतापर्यंत सोवळे, सोवळी शब्दाचे दोनच अर्थ माहित होते. एक म्हणजे नेसण्याचे रेशमी वस्त्र व दुसरा म्हणजे केशवपन केलेली विधवा स्त्री. शुचि ताईंनी आता या शब्दाचा तिसरा अर्थ सांगितला आहे. या अर्थाचे स्वरूप तर प्रचंड व सर्वव्यापक दिसते आहे. मात्र या अर्थाने हा शब्दप्रयोग कसा करावा हे समजले नाही. असो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
व
वेताळ Mon, 11/08/2010 - 05:27 नवीन
अतिशय माहितीपुर्ण व सुंदर मुक्तक.....
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 11/08/2010 - 07:29 नवीन
माहीती देण्यासाठी धागा नसून "चौकशी" या सदराखाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
वेताळ Mon, 11/08/2010 - 07:46 नवीन
पण गणपतीची सोंड उजवीकडे असते अन डावीकडे असते,त्यात देखिल काही गोम आहे ही माहिती ह्या लेखातुन मला कळाली म्हणुन हा लेख माझ्या करिता माहितीपुर्ण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
स
स्पा Mon, 11/08/2010 - 05:30 नवीन
मूर्ती फार प्राचीन दिसतेय...... शिवाय .. गणपतीच्या बाजूला अजून एका देवीची प्रतिमा दिसतेय...... त्याबाबतीत सुद्धा प्रकाश टाकावा ........
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 11/08/2010 - 08:15 नवीन
स्पा बरोबर ती मूर्ती प्राचीन आहे. मला "अँटीक स्पिरीचुअल गोष्टी" जमविण्याचा नाद आहे मला ही एका अँटीक दुकानात सापडली. दुर्मीळ आहे कारण पाषाणाची आहे. ती देवी सिद्धी आहे म्हणूनच त्याला सिद्धी विनायक म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्रशु Mon, 11/08/2010 - 16:44 नवीन
ती देवी रिद्धी असावी कारण सिध्दीविनायकाच्या मुर्ती मध्ये गजाननाची सोंड हि उजव्या बाजुस सिद्धी कडे वळलेली असते असे म्हणतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Mon, 11/08/2010 - 16:48 नवीन
आभारी आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/08/2010 - 08:14 नवीन
अनिल अवचट यांचे 'स्वतःविषयी' अलिकडेच वाचलं त्यात त्यांनी त्यांच्या घरातल्या अनेक गंमती लिहील्या आहेत. अनिल व सुनंदा अवचट दांपत्य नास्तिक, त्यामुळे त्यांच्या मुलींना देव-धर्माची ओळख नव्हती. माहितीत कमतरता राहू नये म्हणून दोघांनी मुलींसाठी देव आणायचे ठरवले, हौस मुलींचीच. मग स्नेह्यांकडून देव कुठे मिळतात याची माहिती काढून तुळशीबागेत खरेदीला गेले. मोठ्या मुलीने गणपतीची मूर्ती पसंत केली आणि ती निघाली उजव्या सोंडेच्या गणपतीची! दुकानदाराला एकूणच अवचट कुटुंबियांच्या 'वकूबा'ची कल्पना आल्यामुळे त्याने डाव्या सोंडेचा गणपती घ्यायला लावला. शेवटी अनिल अवचटांनी त्यातही घासाघीस करायचा प्रयत्न केल्यावर दुकानदाराने "देवाची किंमत अशी घासाघीस करून ठरवायची नसते" वगैरे ऐकवलं आणि वाटेला लावलं. काही दिवसांनी या देवपूजा खेळातून मन भरल्यावर गणपती (आणि धाकटीचा विठ्ठल, दोघेही) इतर खेळण्यांच्या बादलीत जाऊन बसले. अनिल अवचटांच्याच शब्दांत "नशीब तो दुकानदार आमच्या घरी कधी आला नाही!"
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 11/08/2010 - 08:23 नवीन
मस्त :) छान प्रसंग सांगीतलास. इथे फिट्ट बसतोय. त्या दुकानदाराने उजव्या सोंडेची मूर्ती घेण्यापासून परावृत्त केले तर :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/08/2010 - 08:37 नवीन
दुकानदारानं का परावृत्त केलं हे कारण शुचि, तूच लेखात लिहीलं आहेस, 'सोवळं कडक असतं'. आता मला विचारशील तर गणपतीचं सोवळं कडक असतं का नाही याचं खरं-खोटं आधी ठरवावं लागेल आणि ते ठरवण्यासाठी गणपतीला उत्तरं द्यावी लागतील. तेव्हा गणपतीबद्दल माहित नाही, पण काही माणसांच्या लेखी उजव्या सोंडेच्या गणपतीचं सोवळं (म्हणजे काय असतं ते ही मला माहित नाही) कडक असतं. आता अशीच काही माहितीची देवाणघेवाणः १. ओवळा नावाचं गाव ठाण्याच्या जवळ आहे. २. 'म्हैस'मधे पुलं "... सुपे, रोवळ्या,फणस, इ.इनी आपल्या जागा सोडल्या" असा उल्लेख करतात. यातल्या 'रोवळ्या' म्हणजे काय? ३. अतिअवांतरः पुलंच्या उल्लेखावरून आठवलं, 'आयुका'त आजपासून १२ नोव्हेंबरपर्यंत पुलंच्या जयंतीनिमित्त पुलस्त्य आठवडा साजरा होणार आहे. यातले कार्यक्रम विशेषतः शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी असतील, पण मोठ्यांनीही जाण्यास हरकत नाही. संध्याकाळी आकाशदर्शनाचे कार्यक्रम होतील. (बाकीच्या भाषांतराचा कंटाळा आल्यामुळे मला आलेलं इमेल तसंच चिकटवत आहे.) The activities planned are Science experiment demonstrations, Learning how to indulge in basic Astronomy, Story-telling drama about Constellation, Question-Answer sessions, Public talks and exciting Sky Watching sessions with telescopes at night. These activities will repeat daily in a pre planned schedule (given below) from 2:00 pm to 10:30 pm. The venue would be the Chandrasekhar Auditorium and the Science Park of IUCAA. There are no fees charged for any session. However seats for various sessions will be given strictly on first-come-first-served basis until all the seats are taken. For the sky watching session Free passes are being issued, which can be collected from the security office of IUCAA. IUCAA invite the parents and guardians to bring wards to participate in these activities on any one of these six days according to their convenience. In case a large group is coming from a school or an organization then they are requested to confirm their participation in advance. कार्यक्रमाची रूपरेखा 2:00 pm to 3:00 pm : Science Toys Demonstration 3:30 pm to 4:30 pm : Visual Astronomy learning session 5:00 pm to 5:30 pm : Astro-drama – 'Constellation Stories' 6:00 pm to 7:00 pm : Public Lecture by various scientists 7:30 pm to 10:30 pm : Skywatching sessions ( in 1 hr batches ) subject to the weather - in-case of cloudy sky IUCAA plans to conduct extra show on some other day. Contact IUCAA reception number - 25604 100 In-case of any special request Mr Samir Dhurde / Aparna Joshi may be contacted via above number
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
स
सूड Mon, 11/08/2010 - 08:43 नवीन
बांबूने विणलेल्या टोपलीसारख्या पण डब्याप्रमाणे उभ्या घाटाच्या असतात. मुख्यतः कोकणात, तांदूळ धुतल्यानंतर त्यातील पाणी निथळून जाण्यासाठी ते रोवळीत ठेवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/08/2010 - 08:47 नवीन
"सुड" आणि चंद्रशेखर, धन्यवाद. (अर्धी-घाटी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
मृत्युन्जय Tue, 11/09/2010 - 12:20 नवीन
ते Science experiment demonstrations चे वाचुन मला एकदम शाळेतले शनिदर्शन आठवले. आयषॉट सांगतो सगळेजण छातीठोकपणे ४-५ कडी दिसत आहेत म्हणुन सांगत असताना मला मुद्दलात शनिच दिसला नव्हता. नंतर एकदा शाळेतच दुर्बिणीतुन शुक्र दाखवला होता. तो साध्या डोळ्यांनी जितका तेजस्वी दिसत होता त्यापेक्षा दुर्बिणीतुन अंमळ थोडा धूसरच दिसत होता. (कदाचित झोपेची वेळ झाल्यमुळे असेल तसे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ए
ए.चंद्रशेखर Mon, 11/08/2010 - 08:42 नवीन
रोवळ्या या शब्दाचा अर्थ वेताच्या किंवा तत्सम विणलेल्या टोपल्या असा आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रशु Mon, 11/08/2010 - 08:59 नवीन
नीट पहाता वरील मुर्तीची सोंड उजवीकडे वळलेली असली तरी तीचे टोक डावीकडे वळलेले वाटते... (मी बघण्यात चुकत असेन तर खुलासा करावा) बाकी उजव्या सोंडेचा गणपती हा तांत्रिक मार्गाने उपासना करण्यार्यांचा म्हणुन ओळखला जातो असे मागे कुठेतरी वाचले आहे.
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 11/08/2010 - 09:29 नवीन
बघते. ही माहीती रोचक आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु
ए
ए.चंद्रशेखर Mon, 11/08/2010 - 09:36 नवीन
पुण्याच्या सारसबागेतील गणपती बहुदा उजव्या सोंडेचा आहे. त्याची पूजा करण्याची पद्धती किंवा वर शुचि ताईंनी सांगितलेल्या असंख्य गोष्टी फारश्या निराळ्या पद्धतीने केल्या जातात असे ऐकिवात तरी नाही. त्यामुळे उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा विशेष पद्धतीनेच करावी लागते असे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
म
मधु बन Mon, 11/08/2010 - 09:51 नवीन
मी खात्रीपुर्वक सन्गु शकत नाही, पण माझ्या महिती प्रमाणे गणपतिची सोंड ज्या बाजुला आधी वळलेली असते त्या सोंडेचा तो गणपति आहे अस मानतात. त्यामुळे मला वाटत हा गणपति डाव्या सोंडेचा आसावा. (पण नक्की माहित नाही)
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 11/08/2010 - 12:22 नवीन
हे माहीत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधु बन
आ
आळश्यांचा राजा Mon, 11/08/2010 - 17:57 नवीन
मला वाटत हा गणपति डाव्या सोंडेचा आसावा.
असंच वाटतं. बाकी डाव्या/ उजव्या विचारसरणीवरची चर्चा चालू द्या! बादवे नारळीकरांची "उजव्या सोंडेचा गणपती" नावाची छान कथा आठवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधु बन
व
विसोबा खेचर Mon, 11/08/2010 - 10:00 नवीन
डाव्या सोंडेच्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेमध्ये काय फरक असतो यावर जाणकार प्रकाश टाकू शकतील काय?
शुचिजी, डाव्या सोंडेचा, उजव्या सोंडेचा.. वगैरे देवांचे प्रकार हे मानवनिर्मित आहेत. काही मंडळींनी बहुधा स्वत:च्या दानदक्षिणेची एक सोय म्हणून हे सारं अवडंबर माजवलं आहे. देव हे 'एक तत्व नाम' आहे आणि पूजा ही पूजा असते व ती मनापासून व भक्तिभावाने केल्याशी कारण..! देव हा भावाचा भुकेला आहे.. त्याचं सोवळं-ओवळं असणं, ते कडक असणं की मवाळ असणं, इत्यादी सार्‍या गोष्टी माझ्या मते भंपक आहेत.. तात्या. -- एक तत्व नाम उभे विटेवरी..!
  • Log in or register to post comments
प
पक्या Mon, 11/08/2010 - 11:13 नवीन
तात्या, ते ख्ररच तसं नसतं वगैरे शुचिताईंनाही माहित असेल की . पण जी काय प्रथा आहे ,रीत आहे , नियम आहे जे काही आहे ते त्यांना माहिती म्हणून हवे असेल. वर अदितीने सांगितल्याप्रमाणे जसे अवचटांनी मुलींच्या माहितीसाठी घरी देव आणले तसेच उजव्या सोंडेचा गणपतीबद्द्ल जे काही विशेष आहे ते माहितीसाठी त्यांना जाणुन घ्यायचे असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Mon, 11/08/2010 - 14:56 नवीन
पण जी काय प्रथा आहे ,रीत आहे , नियम आहे जे काही आहे ते त्यांना माहिती म्हणून हवे असेल.
मीदेखील तीच माहिती दिली आहे.. 'एक तत्व नाम..' आणि 'निर्व्याज भक्ति..' हा एकच नियम आहे, रीत आहे..! बाकी उजवी सोंड, डावी सोंड, अशी सगुण रुपं अनेक असू शकतील. परंतु त्या अनुषंगाने येणार्‍या कडक-मवाळ सोवळं-ओवळं वगैरे गोष्टी केवळ अवडंबर आहे.. 'अरे बापरे..! तो तर उजव्या सोंडेचा गणपति आहे.. त्याची पूजा-अर्चा नीट झाली नाही, एकदष्णी, आवर्तनं वगैरे नीट झाली नाहीत तर तो कोपेल..!' अशी मग वर्षानुवर्ष भिती घातली जाते..! असो.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
श
शुचि Mon, 11/08/2010 - 15:05 नवीन
आत्ताच ग्लोबलमराठी डॉट कॉम या साईट (http://www.globalmarathi.com/GlobalMarathi/20100913/5650305159087210613.htm) वर जाऊन एक लेख वाचला. त्यात म्हटले आहे - 'श्रीगणेशपुराण' आणि 'श्रीमनमुद्गलमहापुराण' या दोन ग्रंथांव्यातिरिक्त शुद्ध निर्गुण गणेशोपासकांसाठी, निष्काम गणेशोपासकांसाठी इतर कोणत्याही ग्रंथांची आवश्यकता नाही. श्रीगणेशपुराण असो की श्रीमनमुद्गलपुराण दोनपैकी कोणत्याही पुराणात अगदी एका ओळीचा सुद्धा 'उजवा गणपती व डावा गणपती' असा भेददर्शक एकही उल्लेख चुकूनही सापडत नाही. ज्योतिषशास्त्रात जशी पत्रिकेच्या मंगळाची एक अनामिक भीती बसलेली आहे तशीच उपासकांमध्ये उजव्या गणपतीविषयक निरर्थक भीती आहे. असू शकेल. पण माझ्या मनात ही शंका बरेच दिवस घर करून होती म्हणून येथे मांडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
वेताळ Mon, 11/08/2010 - 15:21 नवीन
आता अजुन एक माहिती द्या हिंदु धर्मात असा कोणता देव आहे का ज्याच्या उपासनेसाठी अटी,सोवळे किंवा अवडंबर माजवले जात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Mon, 11/08/2010 - 15:28 नवीन
पण दत्ताचं सोवळं (हाच शब्द मी ऐकला आहे.) खूप कडक असतं वगैरे ऐकून आहे. तसं इतर देवांचं नाही. असंच काहीसं उजव्या सोंडेच्या गणेशमूर्तीचं ऐकलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
विसोबा खेचर Mon, 11/08/2010 - 15:31 नवीन
हे सारे पसरवलेले गैरसमज आहेत.. 'एक तत्व नाम' आणि 'निरलस भक्ति' या दोनच गोष्टी कृपया लक्षात ठेवा.. दत्त, शंकर, विठोबा, गणपति हे सारे एकच आहेत हे कृपया लक्षात घ्या.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
व
वेताळ Mon, 11/08/2010 - 15:40 नवीन
त्या देवांच्या पुजार्‍यांचे सोवळे किंवा त्याचा आचार ,त्याचे वागणे अगदीच दुट्टप्पी असते. पण इतरांना तुच्छ समजणे हे तर अगदी साधी बाब त्याच्यासाठी आहे. असल्या लोकाना देवप्राप्ती तरी होते का?सरळा साधा नामस्मरणाचा किंवा भक्तीचा मार्ग सोडुन आडवळणाच्या मार्गाला जाण्यात काय जरुरी आहे?मला एक उजव्या सोंडेच्या गणपतीची मुर्ती भेट मिळाली आहे. गेली ५ वर्षे ती शोकेस मध्ये मस्त दिसते आहे. त्यामुळे इतका विचार करण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मुक्तसुनीत Mon, 11/08/2010 - 15:41 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
श
शुचि Mon, 11/08/2010 - 15:49 नवीन
+१ >> इतरांना तुच्छ समजणे हे तर अगदी साधी बाब त्याच्यासाठी आहे >>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ट
टिउ Mon, 11/08/2010 - 16:04 नवीन
देव माणसाच्या मनात राहतो, देवळात फक्त पुजार्‍याचे पोट राहते. - गाडगे बाबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
विसोबा खेचर Mon, 11/08/2010 - 15:24 नवीन
त्यात म्हटले आहे - 'श्रीगणेशपुराण' आणि 'श्रीमनमुद्गलमहापुराण' या दोन ग्रंथांव्यातिरिक्त शुद्ध निर्गुण गणेशोपासकांसाठी, निष्काम गणेशोपासकांसाठी इतर कोणत्याही ग्रंथांची आवश्यकता नाही.
माझ्या मते तर वरीलदेखील दोन्ही ग्रंथांची आवश्यकता नाही.. गणपतिचं केवळ दोन मिनिटांचं मनापासून केलेलं स्मरण पुरेसं आहे.. 'गणपति बाप्पा मोरया..' इतकं नामदेखील पुरेसं आहे..! आमच्या ग्यानबा-तुकोबांच्या भागवतधर्मात केवळ नामस्मरण हीदेखील मनापासून केलेली भक्तिच मानतात..
पण माझ्या मनात ही शंका बरेच दिवस घर करून होती म्हणून येथे मांडली.
हे बरीक उत्तम केलंत.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
अ
अर्धवटराव Mon, 11/08/2010 - 18:42 नवीन
काय झालं काय तात्या तुम्हाला अच्यानक ?? चक्क निरलस भक्ती काय, भावाचा भुकेला काय, एक तत्व नाम काय... दोन पेग व्हीस्की, मासळीचं जेवण आणि तंबाखु पान जमवुन दोन तंबोर्‍यांना आजुबाजुला घेउन कुठल्याश्या रागदरबारीत रमणारा तात्या अच्यानक दोन वाट्या ताक, साबुदाणा खिचडी खाउन, कपाळी बुक्का लाउन हरि हरि करत पंढरीच्या वाटेला जाताना दिसला... अंमळ डोळे पाणावले. वासुनानांना पाठवतोय तुम्हाला परत बोलवायला... अहो काकाजींनी रानडुकराची जबरी शिकार केलीय... जंगी बेत आहे रात्री देवास्करांच्या वाड्यावर. (न पचणार्‍या गोळ्या घेणारा) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Tue, 11/09/2010 - 06:23 नवीन
वासुनानांना पाठवतोय तुम्हाला परत बोलवायला... अहो काकाजींनी रानडुकराची जबरी शिकार केलीय... जंगी बेत आहे रात्री देवास्करांच्या वाड्यावर.
सुंदर प्रतिसाद.. नक्की येतो असा गुरुवर्य काकाजींना निरोप द्या प्लीज.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 11/08/2010 - 11:51 नवीन
सोंड उजव्या बाजूला वळलेल्या सिद्धीविनायकांची पूजा प्रामुख्याने तांत्रिक नियमांनी जास्त निबद्ध झाली; कारण बहुतेक गणपती डाव्या सोंडेचेच दिसतात...तांत्रिक लोक तंत्र विद्ये च्या पुजे साठी उजव्या सोंडेच्या गणपतिची आराधना करीत असावेत..असा एक तर्क आहे
  • Log in or register to post comments
म
मी_ओंकार Mon, 11/08/2010 - 12:17 नवीन
आप्पा भिंगार्डे आठवला. - ओंकार.
  • Log in or register to post comments
प
पारा Mon, 11/08/2010 - 13:24 नवीन
उजव्या सोंडेचा गणपती हा जागृत मानला जातो, त्यामुळे त्याच्या संदर्भातील पूजाअर्चा, व्रतवैकल्ये अधिक कसोशीने पालवी लागतात असा समज आहे. मात्र माझ्या मते ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे.
  • Log in or register to post comments
न
निस्का Mon, 11/08/2010 - 16:57 नवीन
उजव्या सोंडेच्या गणपतीला नॉन-वेज चालत नाही. म्हणजे शुचिताईना सामिष भोजनाचा त्याग करावा लागेल :P (हे मला सांगण्यात आल्यावर माझे आर्ग्युमेंट = त्याला देऊ नका, तुम्ही खा)
  • Log in or register to post comments
स
संकेत Mon, 11/08/2010 - 15:49 नवीन
शुचितै, तुम्हाला इथे कुणी सांगितले की उजव्या सोंडेचा गणपती लय डेंजर असतो. त्याची कडक उपासना करावी लागते. तसं केलं नाही तर मुलाबाळांच्या जिवावर उठेल. पैसाअडका कमी होईल. आजार येतील तर तुम्ही पाळणार का आचार आणि कर्मकांडे करणार का? -संकेत.
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 11/08/2010 - 15:54 नवीन
मूळ हेतू हा होता लेखाचा की उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजाअर्चा कशा प्रकारे करायची ते जाणून घ्यायचं होतं. मग मी प्रयत्न तर नक्कीच केले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संकेत
स
संकेत Mon, 11/08/2010 - 15:56 नवीन
प्रयत्न करायचे म्हणजे तुमचा विश्वासही झाला. तुम्ही अंधश्रद्धा पसरवण्याचा हा उद्योग थांबवावा अशी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. मिसळपाव संपादकांनी याकडे लक्ष पुरवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
इ
इंटरनेटस्नेही Tue, 11/09/2010 - 06:23 नवीन
यात कसला आला आहे अंधविश्वास? कोणी तरी आपले अध्यात्म विषयक प्रश्न विचारले म्हणजे अंधविशास झाला का? उगाच की बोर्ड बडवु नका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संकेत
इ
इंटरनेटस्नेही Mon, 11/08/2010 - 22:39 नवीन
यात कसला आला आहे अंधविश्वास? कोणी तरी आपले अध्यात्म विषयक प्रश्न विचारले म्हणजे अंधविशास झाला का? उगाच की बोर्ड बडवु नका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संकेत
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा