कलादालन

काही कविता दुर्लक्षित विषयांवर....

Primary tabs

माझ्या काही कविता प्रकाशित कराव्या म्हणतो........ दैनंदीन गोष्टीच पण काहींना अश्लील वाटू शकतील्...नसल्या तरी..... संकेतस्थळाची लिन्क टाकण्याआधी कॄपया अभिप्राय द्यावा.........
स्पंदना

किल्लेदार तुम्ही वेगळ्या धाटाचे आहात्,अन त्या मुळे तुमच लिखाण ही वेगळच असेल.

जी सगळ्यात अस्विकारणिय अशी वाटते ती पहिला टाकुन बघा, म्हन्जे पाठोपाठ येणार्‍या थोडा कमी झटका देतील्...काय?

स्पंदना

कि कि कि ले ल्ली ल्ले ल्ले दा र अहो या अश्लिल नव्हेत हो या जरा.....

थांबा ठसका लागलाय पाणी पिउन येते

मनि२७

अरेरे काय हि कविता आणि काय तुमची विचारशक्ती + कल्पना...

मनि२७

ओन रिस्क वर प्रकाशित करावी वाटली तर करा ;-)

मराठमोळा

हाहाहा....
राघवाने एकदा ऐकवल्या होत्या ह्या कविता आणि अभंग..
पण इथे नका टाकु हो किल्लेदार मामा. फारच जहाल आहेत त्या. ;)

किल्लेदार

मी आधीच म्हणालो होतो की काहींना या पेलवणार नाहीत. लिन्क काढून टाकू का ?
इतर विषयांवर तर खूप लिहिले जाते आणि खूप जण लिहितात.

ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. हे एक असे सत्य आहे की हिम्मतवान मनुष्यदेखिल ज्याला सामोरा जाऊ शकत नाही(पाठमोराच जातो) :) :) :)

ते असो. मला स्पष्ट अभिप्राय हवेत म्हणजे हा दुवा मी काढून टाकीन.

स्पंदना

राहु दे हो किल्लेदार . धागा नका काढु . उगिच उसवा उसवी कशाला?

राघव

टाकलीसच का लिंक इथं..
कर लेका अजून आडवेपणा !!

स्पंदना

किल्लेदार या कविता अश्लिल नाहीत. मी ठणकावुन सांगते. परवाच इथे ' माझे बद्धकोष्ठ' चांगलाच गाजला.

या कविता ना आडवळणी आहेत!

किल्लेदार

आपल्या पाठींब्यासाठी धन्यवाद....
पण इथे अजून कविता टाकायची हिम्मत नाही. वर दिलेल्या संकेतस्थळावर अजून एक काव्य आहे.

कविता छान आहेत. कविता वाचून मग मी साईट आड्रेस पाहीला आणी परत खोखो हसत सुटलो. :)
कारण sheekavi च्या ऐवजी sheekhavi असे वाचले.