Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डाव्या शेपटीचा मारुती

प
परिकथेतील राजकुमार
Tue, 11/09/2010 - 06:55
🗣 177 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
34114 वाचन

💬 प्रतिसाद (177)
र
राजेश घासकडवी Tue, 11/09/2010 - 06:59 नवीन
मारुतीचे सोवळे कडक असते. म्हणजे काय? लेखक काही खुलासा करू शकतील काय? राजशेखर
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/09/2010 - 07:01 नवीन
तेच विचारण्याकता हा धागा काढला आहे की नक्की काय कडक असते म्हणजे? पूजेमध्ये फरक आहे की अन्य काही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Tue, 11/09/2010 - 07:02 नवीन
सोवळे हे एक रेशमी वस्त्र असते ते नेसावयाचे असले तर ते मऊ असण्याची आवश्यकता आहे. मारुती चे सोवळे म्हणजे काय? पूजा करणार्‍याने जर हे काही असे सोवळे नेसणे अपेक्षित असेल तर ते कडक कसे असू शकेल? यात पूजेमधल्या फरकाचा काय संबंध असू शकतो? काहीतरी कुठेतरी गोंधळ होतो आहे. राजशेखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/09/2010 - 07:05 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1088109 या लेखात सोवळे हा शब्द वस्त्र या संदर्भात वापरलेला नसून मी वपरला आहे त्या अर्थी वापरला आहे. लेखात खालील वाक्य आहे - " डाव्या शेवटीच्या मारुतीचे सोवळे कडक असते व ते मूर्तीकारालाही पाळावे लागते."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Tue, 11/09/2010 - 07:06 नवीन
तुम्ही काय अर्थाने हा शब्द वापरला आहे ते सांगाना म्हणजे प्रश्नच मिटला. राजशेखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/09/2010 - 07:08 नवीन
"सोवळे" हा शब्द येथे बर्‍याच अर्थांनी वापरला गेला आहे मुख्य म्हणजे - त्या त्या देवतेची नित्योपासना, तदनुषंगीक विधी, पावित्र्य, कर्मकांडं , पंचोपचारी पूजा, मूर्ती पूर्वाभिमुख, दक्षीणाभिमुख वगैरे असावी काय आदि गोष्टींकडे लक्ष देणे , स्तोत्राची आवर्तने आदि माझ्या लक्षात येतील तितके मुद्दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Tue, 11/09/2010 - 07:21 नवीन
मला आतापर्यंत सोवळे, सोवळी शब्दाचे दोनच अर्थ माहित होते. एक म्हणजे नेसण्याचे रेशमी वस्त्र व दुसरा म्हणजे केशवपन केलेली विधवा स्त्री. पराभाऊंनी आता या शब्दाचा तिसरा अर्थ सांगितला आहे. या अर्थाचे स्वरूप तर प्रचंड व सर्वव्यापक दिसते आहे. मात्र या अर्थाने हा शब्दप्रयोग कसा करावा हे समजले नाही. असो. धन्यवाद. सोवळे नेसून पूजा करणे याबद्दल पूजेच्या पथ्यांमध्ये थोडी चर्चा झाली होती. राजशेखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/09/2010 - 07:25 नवीन
आभारी आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
व
विजुभाऊ Wed, 07/25/2012 - 09:36 नवीन
परा च्या प्रश्नाचे नक्की उत्तर काय मिळाले ते उमजेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
च
चिंतामणी Wed, 07/25/2012 - 11:34 नवीन
एक सांगा. ह्या नियमात परा कोठे बसतो??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ए
ए.चंद्रशेखर Sat, 11/13/2010 - 09:12 नवीन
थ्री चिअर्स फॉर परिकथेतील राजकुमार व राजेश घासकडबी. हा धागा फार आवडला. उजव्या सोंडेचा गणपती काय आणि डाव्या सोंडेचा मारुती काय? दोन्ही एकच. मला शुचिताईंच्या लेखनाला प्रतिसाद देऊन जे खरे सांगायचे होते ते तुम्ही दोघांनी अत्यंत परिणामकारक रित्या सांगितलेत. आवडले. बाय द वे ही पूजा कोण आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
न
नगरीनिरंजन Sat, 11/13/2010 - 16:34 नवीन
>>बाय द वे ही पूजा कोण आहे? अहो ती एक व्यक्ती नसून क्रिया आहे. (चुकून पुजा करणे ऐवजी पुजेस करणे असं वाचलं की काय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए.चंद्रशेखर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/09/2010 - 08:32 नवीन
तुम्ही काय अर्थाने पूजा हा शब्द वापरला आहे ते ही सांगा ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Tue, 11/09/2010 - 09:20 नवीन
पूजा या शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतात हे मला माहीत नव्हतं. काही लघुपूजा असतात, काही षोडशोपचारे पूजा असतात.. पण पूजा या शब्दाचा अर्थ बदलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
स्पंदना Tue, 11/09/2010 - 09:27 नवीन
हो अन काही उत्तर पुजा पण असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
स
स्पंदना Tue, 11/09/2010 - 09:29 नवीन
काही पुजा घालतात काही पुजा करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/09/2010 - 09:39 नवीन
आणि मग या पूजांची पथ्य काय असतात? त्यांचं सोवळंही कडक असतं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्पंदना Tue, 11/09/2010 - 09:50 नवीन
ज्याची होते आय मीन ज्याची करायची त्याच्यावर अन जो करणारा आहे अशी या दोघांवर ते अवलंबुन असते. शेवटी काय आप्पापल्या मनातला भाव अन जो करुन घेतो तो द्याव !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/09/2010 - 10:10 नवीन
ज्याची होते आय मीन ज्याची करायची त्याच्यावर अन जो करणारा आहे अशी या दोघांवर ते अवलंबुन असते.
हा भाग मी लक्षात घेतलाच नव्हता! शेवटी प्रत्येक माणूस स्वतःपुरताच विचार करतो हेच खरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
र
राजेश घासकडवी Tue, 11/09/2010 - 09:51 नवीन
पूजा घालणे व पूजा करणे हे दोन वेगळे शब्दप्रयोग झाले. कर्मकांडाच्या दृष्टीने त्यात काही तांत्रिक फरक असू शकतील. अदिती, सोवळं कडक असणं हा पुन्हा कर्मकांडाचाच भाग झाला. पण मुळात भक्तिभाव (तोच शब्द वापरायचा झाला तर)कडक असायला लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
म
मराठमोळा Tue, 11/09/2010 - 10:13 नवीन
पूजा घालणे व पूजा करणे यावरुन मला शाळेत असताना वापरलेले काशी घालणे आणि काशी करणे हे वाक्प्रचार आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/09/2010 - 10:14 नवीन
सोवळं कडक असणं हा पुन्हा कर्मकांडाचाच भाग झाला. पण मुळात भक्तिभाव (तोच शब्द वापरायचा झाला तर)कडक असायला लागतो.
म्हणजे प्रश्न असा आहे की भक्तीभाव कितीही कडक असला तरीही सोवळं कडक असावंच लागतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Tue, 11/09/2010 - 10:35 नवीन
वर लिहिल्याप्रमाणे सोवळं हे झुळझुळीत वस्त्र असतं. मुळात भक्तिभाव कणखर असला तर मग त्यावरचं कर्मकांडाचं आवरण जितकं पातळ तितकं चांगलं असावं असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/09/2010 - 10:54 नवीन
गुर्जी _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 11/09/2010 - 15:02 नवीन
पण गुर्जी, मुळात सोवळं झुळझुळीत वस्त्र असेल तर कडक होतंच कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
अ
अवलिया Tue, 11/09/2010 - 15:06 नवीन
जागृतावस्थेतुन स्वप्नावस्थेकडे जाण्याची सवय असल्यास होऊ शकते. याबाबत शंकराचार्यांनी दिलेला दाखला आहे जिज्ञासुंनी मुळातुन वाचावा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
पैसा Tue, 11/09/2010 - 15:06 नवीन
बरेच वर्षात धुतल नसेल. त्यामुळे धूळ खाऊन खाऊन कडक झालं असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मृत्युन्जय Tue, 11/09/2010 - 17:08 नवीन
न धुता अशी सोवळी वस्त्रे चालतात? पुजेमध्ये स्वच्छतेचे महत्व खुप असते असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 11/09/2010 - 17:52 नवीन
रेशीम धुतलं नाही तरी चालतं असं ऐकलंय... अर्थातच आमच्या घरात 'सोवळं' नावाची वस्तूच नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रियाली Tue, 11/09/2010 - 17:56 नवीन
आधी रेशीम सोवळ्याला का चालत असावे? रेशमाच्या किड्यांना उकळवून मारतात ना रेशीम काढण्यासाठी. :( अरेरे! पूजेआधीच पापाचे धनी. बाकी, इतर सर्व देव धोतर नेसत असताना मारूती शॉर्टस का घालतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
N
Nile Tue, 11/09/2010 - 18:03 नवीन
असेनाका शॉर्टस, पारंपारीक असली की भागतं. मॉडर्न पुजा 'पापिलवार' व्हायला वेळ आहे अजुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Tue, 11/09/2010 - 18:05 नवीन
पारंपरिक शॉर्टस म्हणजे काय बॉ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 11/09/2010 - 18:11 नवीन
घ्या! आख्खे रामायण वाचले अन. ;-) अहो हणमंताने घातली आहे यापेक्षा अजुन काय पावती हवी पारंपारीकपणाची? तुम्हा मॉडर्न हुशार लोकांना संस्कृतीचं मेलं भानंच नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/09/2010 - 18:25 नवीन
प्रियाली हुशार आहे असं उगाच वाटत होतं तर! (पळा, नाहीतर घालत्ये ही दोन दणके मलाही!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
प
प्रियाली Tue, 11/09/2010 - 18:28 नवीन
मी हुशार आहे आणि बरीचही काही आहे. नायल्याकडे यादी आहे. ;) रामायणात येणार्‍या हनुमानाच्या कपड्यांचे वर्णन अशी चर्चा व्हायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/09/2010 - 18:33 नवीन
नायल्या सर्वद्वेष्टा असल्यामुळे ती यादी मला मिळणार नाही याची खात्री आहेच. पण तूच का नाही अशी चर्चा सुरू करत? तू इतिहासप्रेमी आहेस, तुला एकूणच या विषयात जास्त गती आहे, तू हुशार आहेस, इ.इ.इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Tue, 11/09/2010 - 18:37 नवीन
अंधश्रद्धा वाढल्या तर मला पाप लागेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
N
Nile Tue, 11/09/2010 - 18:41 नवीन
लागलं पाप तर लागु दे की. मग लगेच्च एक धागा काढा, कुठलातरी एक धार्मिक ग्रंथ घ्या त्यातील पापाबद्दल दोन ओळी लिहा अन करा चर्चा करा! हाय काय अन नाय काय! -(सुचना)सुचि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
N
Nile Tue, 11/09/2010 - 18:34 नवीन
हुशार हायटेक मॉडर्न आणि रामसे चान.
रामायणात येणार्‍या हनुमानाच्या कपड्यांचे वर्णन अशी चर्चा व्हायला हवी.
तुम्हा पाशवी बायांना चर्चा करायला (आमचा) ब्रह्मचारी हणम्याच सापडला का? आँ? अरे हो वरच्या यादीत पाशवी राहिलंच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Tue, 11/09/2010 - 18:36 नवीन
त्याच्याकडे यादी तय्यार आहे असं म्हटलं नव्हतं मी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/09/2010 - 18:38 नवीन
काय फरक पडतो रे नायल्या पाशवी लोकांनी हणमाबद्दल चर्चा केली तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 11/09/2010 - 18:39 नवीन
हणमंताला थंडी वाजते! आधीच बिचारा उघडा अन शॉर्ट्स मध्ये आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
पैसा Tue, 11/09/2010 - 18:42 नवीन
तो काय हनुमान चालिसा म्हणू शकत नाही पाशवी शक्तीना पळवून लावायला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/09/2010 - 18:43 नवीन
उघडा आणि शॉर्ट्समधे असलेला जॉनमात्र फारच हॉट दिसतो ब्वॉ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 11/09/2010 - 18:45 नवीन
जॉन हॉट दिसेल नाय तर काय दिसेल, त्याची छाती अन पोट इतकं सपाट आहे की तीन डोशे करता येतील एकावेळी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/09/2010 - 18:48 नवीन
नाईलसेठ, सुधरा वेळेत आणि भलत्या फिगर्स बघत बसू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
प
प्रियाली Tue, 11/09/2010 - 18:50 नवीन
ते "हॉट" आम्ही का म्हणतोय आणि हे बेणं हॉट्प्लेटवर डोशे टाकण्याची तयारी करतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 11/09/2010 - 18:53 नवीन
असे सपाट तवे मिळत नाहीत हो सहजी! ;-) आता आयटीतल्या बायकांच्या पाशवीपणा बद्दल ऐकुन असल्याने 'चार गोष्टी युक्तीच्या' माहित असलेले बरे नाही का भविष्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Tue, 11/09/2010 - 18:54 नवीन
हो पण म्हणून असं जॉनच्या पोटावर उठायचं? कुठे फेडशील हे पाप?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 11/09/2010 - 18:56 नवीन
सैपाकघरात डोशे करुन फेडेन हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा