Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इसवी सन ३०१०

अ
अवलिया
Tue, 11/09/2010 - 08:21
🗣 18 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3625 वाचन

💬 प्रतिसाद (18)
र
रणजित चितळे Tue, 11/09/2010 - 08:30 नवीन
सावरकरांचे सहा सोनेरी पाने पुलं चे व्यक्ती आणि वल्ली साने गुरुजिंची शामची आई बम पुरंद-यांचे शिवाजी वरचे पुर्वार्ध व उत्तरार्ध गोनीदांचे आईची देणगी किंवा वि वा शिरवाटकरांचे नटसंम्राट
  • Log in or register to post comments
K
kamalakant samant Tue, 11/09/2010 - 08:59 नवीन
फक्त स॑त साहित्य टिकून राहील. ज्ञानेश्वरी,गाथा,दासबोध,भागवत इत्यादि. स॑त सहित्य हे अजरामर असल्याने तेच राहील. आपटे,फडके,माडखोलकर स्मरणात राहणार नाहीत. गेल्या ८०० वर्षाचा इतिहास हेच सा॑गतो.
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Tue, 11/09/2010 - 10:06 नवीन
आपले म्हणणे बरोबर आहे. मी अॅक्सेप्ट करतो मी चुकलो. खरे म्हणजे वरील वाङ्मय माझ्या आवडीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kamalakant samant
र
रणजित चितळे Tue, 11/09/2010 - 10:06 नवीन
आपले म्हणणे बरोबर आहे. मी अॅक्सेप्ट करतो मी चुकलो. खरे म्हणजे वरील वाङ्मय माझ्या आवडीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kamalakant samant
य
यकु Tue, 11/09/2010 - 10:17 नवीन
अजून हजार वर्षांनी आजची मराठी भाषा नामशेष होईल; आज संस्कृत झालीय त्या परिस्थितीत जाईल. म्हणून अजरामर मराठी साहित्य उपलब्ध असले तरी ३०१० मधील लोकांना ती "त्यांची" भाषाच नसल्याने नेमकं काय लिहून ठेवलंय तेच कळणार नाही. म्हणून मराठीच्या तयार झालेल्या तुरळक पण्डीतांमध्ये वाद होतील - आज संस्कृत पण्डीत संधी-विग्रह, धातुसाधीत आणि अर्थ यावरून घालतात तसे. वि. स. खांडेकरांचे ययाति मूळ हिब्रू /अरेमॅक भाषेतील बायबल सारखे मूळ मराठी मानले जाईल. ;-) शिवाजी सावंतांचे मृत्यूंजय हे लिखाण मृत्यूवर मात कशी करायची त्याबाबतचा ग्रंथ होईल! ;-) पुलं च्या साहित्यात ७० टक्के भाग हा जुन्या काळातील आठवणींचा असतो - बाकी विनोद असतो - पण तो विनोद आहे की नक्की काय ते निश्चित नसेल. त्यामुळे पु.ल. देशपांडे यांच्या साहित्यावर ते नक्की काय आहे याचा शोध घेणारी संशोधन होतील ;-) आजच्या कविता वगैरे कुठल्या कुठे गायब होऊन जातील.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 11/09/2010 - 14:16 नवीन
पुलं च्या साहित्यात ७० टक्के भाग हा जुन्या काळातील आठवणींचा असतो - बाकी विनोद असतो - पण तो विनोद आहे की नक्की काय ते निश्चित नसेल. त्यामुळे पु.ल. देशपांडे यांच्या साहित्यावर ते नक्की काय आहे याचा शोध घेणारी संशोधन होतील
हे बाकी पटलं राव :) अगदी १००० वर्षं कशाला, आणखी दहा वर्षांनंतर पोरांना पु.ल. वाचायला दिलं काही तर निम्म्याहून अधिक तर डोक्यावरुन जाईल त्यांच्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
य
यकु Tue, 11/09/2010 - 14:37 नवीन
हो ना! माझ्या ओळखीच्या काही महाभागांना पुलं चे म्हैस हे कथाकथन सुरूवातीपासून शेवटपर्यंत ऐकवले, ते म्हशीसारखेच तोंड करून बसले होते शेवटपर्यंत, एकदाही न हसता! लोक मुळातच फार बोर झालेत; त्याला पुलंचा काय कुणाचाच इलाज नाही. आणि पुढच्या पिढ्यांतील लहान मुलांना तर काही संदर्भच लागणं अशक्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Tue, 11/09/2010 - 16:12 नवीन
धन्य आहेत असे जीव. :) काय बोलु?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
श
शुचि Tue, 11/09/2010 - 14:03 नवीन
ज्ञानेश्वरी मधील काही शब्द आजदेखील वाचायला अवघड जातात आणि त्याच्या आजच्या मराठीमधील भाषांतराची गरज भासते. अजून १००० एक वर्षांनी ज्ञानेश्वरी राहीलच याची शाश्वती मला तरी देता येत नाही. जरी रहावी असे वाटत असले तरी.
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 11/09/2010 - 15:11 नवीन
घट्ट भाषा म्हणजे काय ते समजले नाही. बाकी तेंव्हाच्या ट्रेंडप्रमाणे वासुनाका अजगर गणुराया आणि चानी माहीमची खाडी चक्र ही पुस्तके टिकून राहतील असे वाटते.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 11/09/2010 - 15:41 नवीन
'मचाक' तेवढं शेवटपर्यंत टिकून राहिल. ;)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 11/09/2010 - 16:13 नवीन
Image removed. आयचा घो! च्यायला...ते मचाकवाले पण आता ॠणं फिणं मानायला लागतील. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
प
परिकथेतील राजकुमार Wed, 11/10/2010 - 07:44 नवीन
मी परवाच नीलकांतला विचारले की ह्या वेळच्या दिवाळी अंकात मिपाचे ॠण मानु काय ? मचाकचा अंक निघेपर्यंत रात्री झोपेतुन दचकुन उठत होता म्हणे तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
सुधीर काळे Tue, 11/09/2010 - 16:35 नवीन
मॉरीशसमधील मराठी भाषिक आजही ज्ञानेश्वरांच्या काळातील मराठी बोलतात. श्रीलंकेतील तामिळी लोक अशीच ३००-४०० वर्षांपूर्वीची तामिळ बोलतात असे माझ्या तामिळी मित्रांकडून ऐकले आहे. मी त्रिनिदादला कांहीं महिने राहिलो होतो तिथे अनेक बिहारी मजूर १००-१५० वर्षांपूर्वी येऊन वसले आहेत. आम्हाला पाहून ते आपुलकीने भजने म्हणू लागत. ती भजनेही खूप जुन्या काळात बिहारमध्ये म्हटली जाणारी होती असे आमच्यातले बिहारीही आम्हाला सांगत. म्हणजे अशा दूरवरच्या भागातील मराठी-तामिळ-हिंदी-भोजपुरी-मैथिली बदलली नाहीं. पण मराठीचे-तामिळचे 'माहेरघर' असलेल्या प्रदेशातच ती Dynamic असल्याने बदलत गेली असे वाटते. मराठी नामशेष व्हायला १००० वर्षे लागणार नाहींत. १०० वर्षेच पुरतील. मराठी तरुणांना मराठी लिहा-वाचायला आताच त्रास होतो हे दिसते तसाच माझ्या तामिळ मित्रांची व बंगाली मित्रांची मुले अद्याप त्या भाषा बोलतात पण लिहू-वाचू शकत नाहींत. आंग्ल भाषेतून शिक्षण घेतल्याचा हा side-effect आहे. थोडक्यात काय? तर संतसाहित्य गाव्य किंवा वाच्य माध्यमात टिकेल पण लिखित माध्यमात टिकेल कीं नाहीं कुणास ठाऊक. बहुदा नामशेषच होईल. संस्कृत तर दूरच राहिली! मराठीची स्थिती आजच्या अर्धमागदीसारखी होईल असे सखेद वाटते!
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Tue, 11/09/2010 - 19:49 नवीन
धार्मीक लेख व ग्रथ सोडून ?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Wed, 11/10/2010 - 05:36 नवीन
पाचव्या पर्यायाला मत देतो. शिवाय, शरदिनीतैंच्या कवितांवर तेव्हा थेसिस लिहिले जातील असेही वाटते, ;)
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Fri, 11/12/2010 - 04:25 नवीन
शेवटि English राहानार, computer मुळे.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 11/12/2010 - 05:10 नवीन
जगात सुमारे सहा हजार भाषा आहेत. त्यातल्या बहुतांश नष्ट होणार याबद्दल वाद नाही. पण सहा अब्जात दहा कोटी ही पुरेशी मोठी लोकसंख्या आहे - त्यामुळे मराठी भाषाच नष्ट होणार असं काही वाटत नाही. तंत्रज्ञान इतकं झपाट्याने विकसित होतं आहे की लवकरच भाषांतरयंत्रं विकसित होऊ शकतील... मग तुम्ही कुठच्याही भाषेत बोला, समोरच्याला ते आपल्या भाषेत ऐकू येऊ शकेल. बाकी टिकून राहाणं म्हणजे नक्की काय ते कळलं नाही. टिकून राहाण्याच्या देखील अनेक पातळ्या असतात. संत वाङमय टिकून राहील म्हणजे ते अजून टिकून आहे हे गृहित आहे. पण म्हणजे नक्की काय? आज ज्ञानेश्वरी किती जण वाचतात? तरी ती 'टिकून आहे' याबद्दल वाद नाही. पुलंचं लेखन त्यांनी लिहिलं त्या काळात वाचलं गेलं त्यापेक्षा अधिक संख्येने आज वाचलं जात असावं. कारण वाचकवर्गच वाढलेला आहे. (हे पुस्तकांच्या खपावरून सहज शोधून काढता येईल) असो. तर मूळ मुद्दा आहे की काय टिकून राहील. चर्चाप्रस्तावकाने टिकून राहाण्याची व्याख्या करावी ही विनंती.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा