Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मासे १६) मांदेली

ज
जागु
Tue, 11/09/2010 - 08:49

प्रतिक्रिया द्या
16913 वाचन

💬 प्रतिसाद (43)
व
विसोबा खेचर Tue, 11/09/2010 - 08:52 नवीन
तीव्र निषेध..! तुम्हाला मिपावरच काय, परंतु मराठी आंतरजालावर कुठेच लिहायची परवानगी नसावी..! तात्या.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 11/09/2010 - 08:54 नवीन
क्या बात है!
ह्याचे सुकेसुकेच कालवण छान लागते.
+१, वर दिलेल्या कृतीप्रमाणे किंवा पाटा-वरवंट्यावर वाटलेल्या खोबर्‍याचे दबदबीत कालवण. हा धागा आठवला :)
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Tue, 11/09/2010 - 08:56 नवीन
जबराट... सोबत आवडीचे सरबत असेल तर यासारखं सुख काही नाही. :) जागुतैंचे आभार. :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 11/09/2010 - 08:57 नवीन
हा लेडी फिश ना? काय म्हणतात बर मुडदुशी? माझी मुल खायला लागली की बस तेव्हढच जेवण होत त्यांच. काय चव असते या माशाला, उद्या आणते आता.
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Tue, 11/09/2010 - 16:32 नवीन
जल्ला मेला, मांदेली येगली न मुडदुशी येगली गो बाय !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्पंदना Wed, 11/10/2010 - 03:01 नवीन
आर जाळु नको माझी पोर तुझ्या मानगुटावर बसतील . ह्ये बघ आमी हाय घाटावरच आमची काय मच्छीत पी एएच डी न्हाय साधारण तसा दिसतो म्हणुन म्हंटल. उगा साम्गायला गेल तर टांगायला नको नेउ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 11/10/2010 - 13:25 नवीन
आर जाळु नको माझी पोर तुझ्या मानगुटावर बसतील . अहो जल्ला मेला म्हणजे कुनाला जालायचा नाय काय. तां एक अशी बोलायची रीत असता. ह्ये बघ आमी हाय घाटावरच आमची काय मच्छीत पी एएच डी न्हाय साधारण तसा दिसतो म्हणुन म्हंटल. मिपा वर थोडे दिस राहा आनी अशे धागे वाचीत रहा, PhD होऊन जाईल आपोआप. जल्ला हाय काय आनी नाय काय. बाकी घाटावरच्या थोड्या रेशिप्या पन टाका की आमच्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
सुनील Tue, 11/09/2010 - 19:31 नवीन
हा लेडी फिश ना? काय म्हणतात बर मुडदुशी? अहो नाही हो! मुडदुशे असे दिसतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्पंदना Wed, 11/10/2010 - 03:03 नवीन
एव्हढा मसाला लावुन ठेवल्यावर कसे बाइ दिसतील ते? त्या पेक्षा खाउन उरलेले काटे अन शेपट्या दाखवायच्या ना? मग ओळखले असते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ज
जागु Wed, 11/10/2010 - 07:32 नवीन
ते मुडदुशी मसाल्यामुळे दिसत नाहीत. संपुर्ण माश्याचे फोटो मिळतील का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Wed, 11/10/2010 - 14:51 नवीन
संपूर्ण मुडदुशाचे फोटो कोळणीकडेच कारण हे मासे घरी आणताना सहसा शिरच्छेद करूनच आणले जातात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
य
यशोधरा गुरुवार, 11/11/2010 - 11:36 नवीन
मुडदुशे म्हंजेच नगली ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील गुरुवार, 11/11/2010 - 12:13 नवीन
कोंकण - गोवा - मुडदुशे कारवार - नगली (नोगली) मंगलोर - काने इंग्रजी वळणाची भारतीय हाटेले - लेडी फिश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ज
जागु गुरुवार, 11/11/2010 - 12:20 नवीन
आता तुम्ही फोटो टाकाच. आमच्याइथे काय म्हणतात कोणास ठाउक ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील गुरुवार, 11/11/2010 - 12:31 नवीन
फोटो सध्या शक्य नाही कारण "आमच्या (सध्याच्या) इथे" हा मिळत नाही! पण नंतर नक्की (अगदी कोळणीसकट!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
म
मनि२७ Tue, 11/09/2010 - 09:01 नवीन
धन्य ती जागू ताई...आणि धन्य ते मासे ... कुठे सापडतात ग तुला असले मासे ज्याचे नाव पण कधी ऐकले नाहीत.... तुला तर आता एक अवार्ड द्यायला हव खर तर... समुद्रातले , तळ्यातले , नदीतले सगळे मासे तुझ्या परिचयाचे झाले असतील नाही का ;-)
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Tue, 11/09/2010 - 09:07 नवीन
>>कुठे सापडतात ग तुला असले मासे ज्याचे नाव पण कधी ऐकले नाहीत.... हॅ हॅ हॅ.. मासे माहित असायला किनार्‍यावर असायला लागतं, भारताच्या मध्यभागी आणि उत्तर भारतात ते कशाशी खातात हे सुद्धा माहित नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनि२७
द
दिपाली पाटिल Tue, 11/09/2010 - 18:09 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
स
स्पंदना Tue, 11/09/2010 - 10:20 नवीन
अय्यो मनी माउ परिचयाचे होते हो ! खाउन टाकले ना ते , पास्ट झाला त्यांचा झणझणीत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनि२७
म
मराठमोळा Tue, 11/09/2010 - 10:23 नवीन
>>पास्ट झाला त्यांचा झणझणीत ! अपर्णा तै, हाहाहा... =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ज
जागु Tue, 11/09/2010 - 09:44 नवीन
विसोबा :smile: नंदन धागा छान आहे. मराठमोळा धन्यवाद. अपर्णा नविन नाव कळल तुमच्यामुळे. मनी अ‍ॅवॉर्डच नाव काय द्याल ? बाकी धन्स हो एवढी स्तुती केल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 11/09/2010 - 10:00 नवीन
झकास!! Image removed.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 11/09/2010 - 13:45 नवीन
व्वा! गरम गरम मांदेलीचे सुके आणि जोडीला आईच्या हातची तांदळाची भाकरी!
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 11/09/2010 - 13:49 नवीन
मांदेली आवडते कारण त्याच्या सोबतीने बोंबिल घरात येत. नुसती मांदेली तितकीशी आवडत नाही. मांदेलीचं आंबट-तिखट सॉल्लिड!! जागु रॉक्स!
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 11/09/2010 - 15:44 नवीन
>> जागु रॉक्स! असेच म्हणतो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
द
दिपाली पाटिल Tue, 11/09/2010 - 18:06 नवीन
दिवाळी संपते न संपते तोच जागू हजर मांदेलीसोबत...
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 11/09/2010 - 23:45 नवीन
उतारा नको काय, दिवाळीतल्या गोडाधोडाला?! मांदेलीसारखेच साधारण दिसणारे स्मेल्टही असे करता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
स
सुनील Tue, 11/09/2010 - 19:28 नवीन
अहाहा!! चांगली खरपूस तळलेली मांदेली बियरसोबत घ्यावी! आता पापलेट, सुरमई, रावस अश्या "राजेशाही" माशांच्या तुलनेत मांदेली जरा डाउन मार्केट मासळी. पण चवीला जबरा!
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 11/10/2010 - 03:52 नवीन
हे असेच चालत राहिले तर माझ्या शाकाहारी बाण्याचे कठीण आहे ब्वॉ. मी गणपाभौचा, दिपालीतैचा, जागुतैचा एकही पाककृतीचा धागा उघडायचा नाही असं ठरवलेलं असतं. पण जेव्हा धागा दिसतो तेव्हा सारखं लक्ष तिकडे जात असतं. मग म्हणतो, फक्त फोटू बघून घेऊ. केव्हा खालचे प्रतिसाद हळूच वाचून होतात ते समजतही नाही. कधी कधी मात्र अगदी राहवत नाही अन् प्रतिसाद द्यावाच लागतो... तुम्ही लोक अक्षरशः महाआआआआआआआआन आहात... _/\_ :)
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 11/10/2010 - 07:45 नवीन
दिपालि, दिपक, स्वाती, प्रियाली, संदिप, चित्रा, राघव, धन्यवाद. सुनिल पण हे छोटे मासेच खुप चविष्ट असतात.
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 11/10/2010 - 13:19 नवीन
छान धागा. मांदेली हा एक स्वस्त आणि मस्त मासा आहे. खोबरे घालून सुके करा किंवा नुसते तळा, उत्तम लागतात. मात्र तळले तर त्याच दिवशी संपवावेत (कुठलेही मासे). सौम्य चवीच्या माशांना तळताना आले-लसणाची पेस्ट लावू नये, मूळ चव दबते त्यात. नुसते मीठ, हळद आणि तिखट यात स्वर्ग उभा राहतो. पापलेट सारख्या माशाला तर तळताना आले-लसूण लावणे हा माझ्या लेखी अक्ष्यम्य अपराध. तो अतिसौम्य चवीचा मासा आहे. जागुताई, सुरमई तळली तर वास नाही येत (ताजी असेल तर), बांगड्याला मात्र येतो.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 11/11/2010 - 11:33 नवीन
>>पापलेट सारख्या माशाला तर तळताना आले-लसूण लावणे हा माझ्या लेखी अक्ष्यम्य अपराध. तो अतिसौम्य चवीचा मासा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
ज
जागु गुरुवार, 11/11/2010 - 10:33 नवीन
सुनिल मग शिरच्छेद केलेले फोटोही चालतील. त्या लिंकमधे मसाला लावल्यामुळे काहीच कळत नाही. विश्वनाथ तुमच बरोबर आहे. पण सुरमईला थोडा वास येतोच असा माझा अनुभव आहे. कदाचित माझ्या मनातच तो वास बसला असेल.
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 11/11/2010 - 12:00 नवीन
विश्वनाथ माझ्या माहेरी तळताना अजिबात लसुण वगैरे नाही लावत. पण माझ्या सासरी लागतोच.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 11/14/2010 - 04:57 नवीन
अप्रतिम छान लिहीता हो.काय बोलू? आतापर्यंत मासे आणायल गेलं की सुरमई किंवा पापलेट घेउन परतायचो.मग "परवडत नाही..परवडत नाही.." म्हणत बसायचं.इथे तर तुम्ही खजिना उघडून दिलाहेत.झकास हो एकदम. धन्यु.
  • Log in or register to post comments
स
स्पा Sun, 11/14/2010 - 05:01 नवीन
जागू एकदम झकास... :) सगळ्यात स्वस्त...... आणि सगळ्यात मस्त...... असं मान्देलीच वर्णन करता येईल.....
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 12/07/2010 - 12:15 नवीन
गगनविहारी, स्पा मांदेली खुपच स्वस्त असतात ह्या दिवसांत. वरची मांदेली मी २० रु. मध्ये आणली होती.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 12/07/2010 - 12:32 नवीन
काट्यांचे प्रमाण काय ? चावून पचवण्यासारखे बारीक की हाडेसदृश मोठ्मोठे ? अर्थात एकूण माश्याचाच साईझ छोटा दिसतोय त्यामुळे ते बारके बारके असतीलसं वाटलं. ते घासाघासाला मध्यम आकाराचे काटे आले की मग मजा येत नाही. चावून टाकता येत नाहीत आणि सारखे काढत बसावे लागतात तोंडातून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
व
विश्वनाथ मेहेंदळे Tue, 12/07/2010 - 13:36 नवीन
मान्देलीला एक मोठा काटा असतो (अर्थात मुळात मासाच छोटा असल्याने तो काटा पण फार मोठा नसतो). या खेरीज काही छोटे काटे असतात पण त्याचा फार त्रास होत नाही. मांदेली तळली असेल तर मान्देलीचा शेपटीकडचा भाग काट्यासकट खाता येतो. अर्थात काटे पूर्ण टाळायचे असतील तर छोट्या माशांकडे वळूच नये. पापलेट, सुरमई,हलवा आणि रावस बस झाले. पुर्व भारतात गेलात तर रोहू आणि हिल्सा :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गणपा Tue, 12/07/2010 - 12:19 नवीन
कोण रे तो? जो हे धागे मुद्दाम परत परत वर आणतोय? ऐन जेवणाची वेळ आहे रे इकडे. दया करा :(
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 12/07/2010 - 12:33 नवीन
काट्यांचे प्रमाण काय ? उवांच्या फणीला असतात तितके काटे. (हसु आवरते घेतेय)
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 12/07/2010 - 12:59 नवीन
यक्क.. :-( बादवे.. अहो आम्ही कोंकणात राहून मासे खाणे अडाप्ट केले आहे. जन्मतः घरंदाज मासेखाऊ नसल्याने काट्यांची अडचण येते..म्हून विचारलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
ज
जागु Tue, 12/07/2010 - 18:26 नवीन
पण खरे तर काटेरी मच्छी जास्त चवदार असते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा