Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्र आणि मंत्री बदल (आपले मत काय?)

इ
इंटरनेटस्नेही
Wed, 11/10/2010 - 15:51
🗣 20 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4153 वाचन

💬 प्रतिसाद (20)
र
रेवती Wed, 11/10/2010 - 16:05 नवीन
नवीन नेतृत्व काही ठोस कामगिरी करू शकेल का? नाही.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 11/10/2010 - 17:55 नवीन
कोणत्याही राजकारण्यापासून काहीच अपेक्षा ठेवू नकोस. खुर्चीत जाऊन बसला की प्रत्येकजण आधीच्यासारखाच वागतो. सगळा दोष खुर्चीचा आहे. आम्ही आपले दर ५ वर्षानी मत देतो. एखादा अगदीच नावडला तर त्याला बदलतो. पण पुन्हा पुन्हा "येरे माझ्या मागल्या!" मनोहर पर्रीकरांसारखा एखादा अपवाद असतो, पण तो लोकाना नको असतो! जास्त कार्यक्षम राज्यकर्ते पण आम्हाला नाही मानवत!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 11/10/2010 - 16:49 नवीन
नव्या चव्हाणसाहेबांच्या कामाबद्दल फारसं वाईट ऐकुन नाही. काँग्रेसच्या 'स्वच्छ चेहरा' गाळणीमध्ये हे फिट्ट बसले. आता पाहूया काय होतं. पवार(ज्यु.) ह्या पदापर्यंत आल्यानंतर पहायचं आणखी कसे कसे बद्ल घडतील ते. (आता पुण्याचे पालकमंत्री कोण मग? ) -(कृष्णाखोर्‍याच्या भानगडी संपण्याची वाट पाहत बसलेला) ध.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/10/2010 - 16:53 नवीन
हे प्रश्न सोडविण्यात नवीन नेतृत्व काही ठोस कामगिरी करू शकेल का?
नाही, मुळीच नाही..! वैयक्तिक मत. राग नसावा.. तात्या.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Wed, 11/10/2010 - 18:26 नवीन
हे प्रश्न सोडविण्यात नवीन नेतृत्व काही ठोस कामगिरी करू शकेल का?
पवारांचे माहित् नाही. महत्वाचे मंत्रीपद सांभाळूनही चव्हाण ह्यांची प्रतिमा गेल्या साडे सहावर्षात खराब झालेली नाही. बायोडेटा पाहिला (http://india.gov.in/govt/rajyasabhampdetail.php?mpcode=1854 ) तर पैसे खाण्यासाटी चव्हाण राजकारणात आले नसावेत असे म्हणायला अजून जागा आहे.! अर्थात स्वतः स्वच्छ असणे वेगळे आणि घाण स्वच्छ करणे वेगळे.
  • Log in or register to post comments
अ
अपूर्व कात्रे गुरुवार, 11/11/2010 - 10:15 नवीन
सध्यातरी "चव्हाण"प्राश पासून महाराष्ट्राची सुटका नाही.
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 11/11/2010 - 10:44 नवीन
"....हे प्रश्न सोडविण्यात नवीन नेतृत्व काही ठोस कामगिरी करू शकेल का?" करू दे, असेच म्हणू या. ~ राजकारणाकडे वा राजकीय घडामोडीकडे आपण कितीही तुच्छतेने आणि नैराश्याने पाहिले तरी हा देश राजकारणी लोकच चालवतील यात दुमत होऊ नये. खंडप्राय आकाराचा देश, आणि अठरापगड जातीधर्माच्या कौलाखाली राहणारी एक अब्जाहून अधिक असलेली लोकसंख्या....यावर एखादा हिटलर, चेंगिझखान वा कॅस्ट्रो येऊन राज्य करेल हे कदापिही संभवत नाही. त्यामुळे 'सुसरीणबाई तुझी पाठ मऊ' या न्यायाने येणार्‍या मुख्यमंत्र्याकडे पाहायचे आणि त्याला त्याच्या त्या पदावरील कारकिर्दीसाठी शुभेच्छा द्यायच्या इतपतच या राज्यातील मतदार करू शकतो. एक चव्हाण गेले अन् दुसरे चव्हाण आले...... उद्या पवार आले वा गेले..... रयतेच्या जीवनमानीत तसूभरही फरक पडणार नाही. अशोकरावांच्या काळात गॅस सिलेंडर मिळायला २१ दिवस लागत, पृथ्वीराजांच्या काळात ३ आठवडे लागतील....इतपतच. इन्द्रा
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 11/11/2010 - 10:49 नवीन
>>अशोकरावांच्या काळात गॅस सिलेंडर मिळायला २१ दिवस लागत, पृथ्वीराजांच्या काळात ३ आठवडे लागतील....इतपतच कऽडक! जबरी टाकलाय. :)
यावर एखादा हिटलर, चेंगिझखान वा कॅस्ट्रो येऊन राज्य करेल हे कदापिही संभवत नाही. त्यामुळे 'सुसरीणबाई तुझी पाठ मऊ' या न्यायाने येणार्‍या मुख्यमंत्र्याकडे पाहायचे आणि त्याला त्याच्या त्या पदावरील कारकिर्दीसाठी शुभेच्छा द्यायच्या इतपतच या राज्यातील मतदार करू शकतो.
कदाचित अशा उदासीनतेच्याच उद्रेकातून एखादा हिटलर घडू शकतो. शेवटी आपल्याकडं 'आपलेच दात अन आपलेच ओठ' अशी परिस्थिती! त्यामुळं कोणी काही धड करायला निघाला, तर त्याला पहिला खोडा घालणारे आपलेच. मग 'सुसरबाई, तुझी पाठ मऊ' हेच करत बसावं लागणार. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
अ
अप्पा जोगळेकर Fri, 11/12/2010 - 04:40 नवीन
यावर एखादा हिटलर, चेंगिझखान वा कॅस्ट्रो येऊन राज्य करेल हे कदापिही संभवत नाही. मग हे चांगलंच आहे की. काही लोक आता भारतात हुकुमशाही आली पाहिजे. आता झाले हे बस झाले असा सूर लावत असतात. तसं तर म्हणायचं नाहीये ना ? हिटलर किंवा चेंगिझखान यांच्या गोष्टी वाचताना रंगून जावे इथवर ठीक आहे. त्यांनी घडवून आणली तशी हत्याकांडे घडणे हे कोणत्याही आधुनिक लोकशाहीसाठी ठीक नाही. ज्यांना लोकशाहीच मान्य नाही त्यांची गोष्ट वेगळी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 11/11/2010 - 19:33 नवीन
"....कदाचित अशा उदासीनतेच्याच उद्रेकातून एखादा हिटलर घडू शकतो. ...." पण कुठे.....? ध.मु....मुळात तुम्हाला जी उदासीनता इथे अभिप्रेत आहे ती खास मध्यमवर्गीय आणि अतिश्रीमंत (वा नवश्रीमंत) गटात सापडेल. त्यामुळे यांच्याकडून कसला आला आहे उद्रेक ? आमटीत मीठ कमी पडले म्हणून बायकोसमोर जितका शक्य आहे तितका करावा लागणारा उद्रेक ही यांची अंतीम धाव ! त्यामुळे हिटलर, कॅस्ट्रो इ. मंडळी यांच्या शब्दकोशात येणे केवळ अशक्य. या गटाला "आपण भले की आपले काम भले..." ही शिकवण ज्यादा प्यारी वाटत असते. प्रत्यक्षात सत्ताधारी तसेच विरोधी या दोन्ही पक्षांना सत्तेवर येण्यासाठी तळागाळातील आणि जातउतरंडीच्या राजकारणात शिजत असलेले गटच मतदानासाठी हवे असतात. तोच त्यांचा केन्द्रबिंदू असल्यानेच आज आपण पाहतोच की केवळ ४५ ते ५२ टक्के मतदानावर या देशात एखादा पक्ष वा आघाडी सत्तेसाठी "प्रबळ" दावा सांगू शकतो. आणि भडकायचे असल्यास उद्या हाच प्रत्यक्ष मतदार भडकू शकतो....."मतदान उदासीनता" दाखविणारा व कोसल्यात राहू इच्छिणारा वर्ग नाही. तेव्हा धूर्त राजकारणीदेखील कोणाला भडकू द्यायचे नाही, कुणाला गोंजारायचे आणि कुणाच्या रागालोभाला भीक घालायची नाही, हे पूरेपूर जाणतो. तेव्हा...."हिटलर इन इंडिया इज अ‍ॅन इम्पॉसिबल इव्हेन्ट...!" इन्द्रा
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 11/11/2010 - 20:49 नवीन
सहमत. एखादी क्रांती होण्यासाठी चीड येणे महत्वाचे असते. आजकाल लोकांना चीड येणे बंद झाले आहे. त्यामुळे उद्रेक वगेरे शक्य नाही. तेव्हा येरे माझ्या मागल्या . . म्हणायचे निवडणुका येइपर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
ध
धमाल मुलगा Fri, 11/12/2010 - 18:11 नवीन
दुर्दैवानं अत्यंत जळजळीत वास्तव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
स
सुनील गुरुवार, 11/11/2010 - 20:33 नवीन
हिटलर इन इंडिया इज अ‍ॅन इम्पॉसिबल इव्हेन्ट...! सहमत! पण दुर्दैवाने तसे झालेच तर, जनतेची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी होईल याची मात्र खात्री!
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Fri, 11/12/2010 - 01:01 नवीन
हिटलर इन इंडिया इज अ‍ॅन इम्पॉसिबल इव्हेन्ट...! सहमत! हिटलर नाही पण जिकडे तिकडे अजारकता माजणार आहे, त्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिक्षण क्षेत्राचा झालेला बट्याबोळ रोजगारी, दळणवळण, वाढती महागाई, वाढती गुन्हेगारी, मराठीचा प्रश्न, पैकी 'वाढती गुन्हेगारी' हि अगदी पेठां मध्ये सुद्धा ठळकपणे दिसू लागली आहे. लवकरच हा देश गुंडांच्या ताब्यात जाणार आहे असे दिसते असे वाटते.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Fri, 11/12/2010 - 03:51 नवीन
मंत्री बदल पटला तर ठिक नाहि तर महाराष्ट्र बदल.
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Fri, 11/12/2010 - 05:37 नवीन
"....मंत्री बदल पटला तर ठिक नाहि तर महाराष्ट्र बदल." ~ या प्रतिक्रियेचा नेमका अर्थ समजला नाही....पण 'महाराष्ट्र बदल' म्हणजे श्री.नरेशकुमार याना "सत्ताधारी पक्ष बदल" असे अपेक्षित असले तर मात्र असे म्हणावे लागेल की त्यामुळे राज्याच्या मानसिक जडणघडणीत फार काही लक्षणीय बदल होईल असे संभवत नाही. सोमवारचा विरोधी नेता मंगळवारी 'वर्षा" बंगल्यात जावून बसला की तो 'आदर्श' च्या वाटेने जाणारच नाही याची शाश्वती कुणीच देवू शकत नाही. तेव्हा मतदारातील उदासिनता जोपर्यंत संपुष्टात येत नाही, तोपर्यंत हा खो-खो चा खेळ चालतच राहणार. आणि आपल्या दुर्दैवाने 'उदासिनतेचा' प्याला इथे कधीही रिता होणार नाही असेच एक अनाकलनीय चित्र घरभिंतीवर आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
ब
बन्या बापु Fri, 11/12/2010 - 17:50 नवीन
किती आले आणि किती गेले ?? कोण कुणासाठी काय करतोय हेच काळात नाही आहे. जोवर घराणेशाही संपत नाही तोवर काही खरं नाही हेच खर...वैयक्तिक मत. बाकी अवांतर एक कविता आठवली... ---------------------- मला माहिती आहे की माझ्हा बा गेला ह्याच रस्त्याने.. मीबी जाईन ह्याच रस्त्याने रगत ओकत ओकत. कधीतरी असा वाटत की ओतावा रॉकेल ह्या धरतीवर आणि पेटवून द्यावा सूर्याने तीला.. पण वाटत तितका ते सोपं नाही आहे. सूर्य काय रोज येतो, रॉकेल कधी मिळणार ते सांगा. :-) ----------------------
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 11/12/2010 - 18:26 नवीन
१३० कोटी लोकांना रोज गिळायला मिळते हे नशिब समजा.. लोकसंख्या आटोक्यात आणली नाहि तर ते पण अवघड होणार आहे..तसे झाले तर त्यात हि आरक्षण येणार..
  • Log in or register to post comments
ब
बन्या बापु Fri, 11/12/2010 - 19:14 नवीन
गिळायला मिळतंय हे ठीक.. परंतु आमच्या नशीबाने मिळतंय. त्यात हे नेते आणि राजकारणी काय हातभार लावतात ? उलटा आमच्या मुखातला घास काढून खातात. मढयावरचा लोणी खाणारी ही जात. खरच आपण एवढे अगतिक आहोत का की आपण षंढ झालो आहोत ? कुणालाच का बरे चीड येत नाही ? (... वैयक्तिक मत.. कुणावर ही आकस नाहि.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
अ
अविनाश कदम Sat, 11/13/2010 - 22:14 नवीन
गेल्या साठ वर्षात जेव्हढे मुख्यमंत्री आले त्यांनी जे केलं त्यापेक्षा हे मुख्यमंत्री काही वेगळे करू पाहतील तर त्यांना मुख्यमंत्री म्हणून अनफीट ठरवून परत पाठविले जाईल. भारतीय लोकशाहीतील राज्यकर्ती म्हणून जी जमात सध्या अस्तित्वात आली आहे तिच्याशी पंगा घेणे कुणालाही शक्य नाही. त्याला पाण्यात राहून माशांशी वैर घेणे म्हणतात. थोडाफार देखावा ठिक आहे. अती क्लिनपणा केलात आणि आमच्या नाका-तोडाशी येऊन आमची उपासमार झाली तर पक्षश्रेष्ठींनाही फाट्यावर मारू, हा त्यांचा उसूल आहे. कंडोमपात कशी ‘आपण सारे भाऊ , सारे मिळून खाऊ’ म्हणत महायुती घडली आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा