समाधी साधन
💬 प्रतिसाद
(57)
य
यकु
Sun, 11/14/2010 - 12:13
नवीन
मी सुध्दा कुतूहल म्हणूनच वाचन सुरू केलं होतं आणि नंतर प्रयोग. ज्याचं वाचून झोप येते त्याचं वाचत राहून जाग येण्याची शक्यता किती ते सांगता येत नाही. ही चक्रे वगैरे फार अद्भुत प्रकार नाहीत. त्या सगळ्यांच्याच शरीरात इन बिल्ट असलेल्या डॉर्मंट ग्लॅण्ड्स (निरूपयोगी ग्रंथी) च काम काय आहे आणि त्या कशासाठी तिथे आहेत हे सायन्सला अद्यापही उमगलेलं नाही. इकडे, पौर्वात्य देशांत आणि विशेषत: भारतात ध्यान वगैरे प्रकारांतून त्या ग्रंथी पुन्हा सक्रिय करायच्या आणि सगळ्या मानसिक-शारीरिक गुंत्यांतून बाहेर पडायच (थोडक्यात मुक्त व्हायचं) हा हजारो वर्षांपासून चालत आलेला पायंडा आहे.. भक्तीमार्ग म्हटला तरी त्यात मानसिकताच हॅमर होत असते आणि त्याचा शरिरावर परिणाम होतोच.. त्यामुळं ध्यान आणि भक्तीमार्ग हे दोन विरूध्द कोन दिसत असले तरी ते एकाच त्रिकोणाचे आहेत.. मग फरक कसला? (हे थोडं अवांतर झालंय.. पण होऊद्या आता काय..)
ज्यांना उमगलं त्यांच्या वागण्यात एकवाक्यता नसली तरी चालेल कारण समोरच्या ऑडीयन्सच्या आणि त्या-त्या काळातील गरजेच्या कलेनं सगळे प्रकार होत गेलेले आहेत.. आणि पुन्हा "मला उमगलेले अमके आणि मला उमगलेले ढमके" टाईप पुस्तके लिहिणार्या/टीका लिहीणारे जुने काळचे आचार्य आणि आजच्या लेखकांमुळंही बराच बोर्या वाजलेला आहे.. कारण जो-तो स्वत:च्या मानसिकतेतून, त्या-त्या कुवतीनुसार समजून घेत असतो आणि बोलत असतो पण ते काही फायनल पिक्चर असू शकत नाही... ते स्वत: पाहायचंच असेल तर मारूतीच्या बेंबीत स्वत:चंच बोट घातल्याशिवाय मार्ग नाही
युजींना रमण महर्षींनी आव्हान नव्हतं दिलेलं, मी तुला मोक्ष देऊ शकतो - पण तु तो घेऊ शकतोस काय असा प्रश्न रमण महर्षींनी केला आणि जो मोक्ष देण्याची पात्रता बाळगतो त्यानं असला अजागळ प्रश्न विचारणं, विशेषत: सगळं करून बसलेल्या माणसाला असा प्रश्न विचारणं युजींना खटकलं आणि "मी कुणा दुसर्याकडून तो घेऊच शकत नसेल तर खड्ड्यात गेला तो मोक्ष" अशी प्रतिक्रिया होऊन युजी निघुन आले... नैतिकतेचा पाठ देण्याबाबत आणि नैतिकता वगैरे झूठ आहे याबाबत बोलायचं तर या दोन्ही गोष्टीत कसलाच फरक नाही... कोणताही माणूस जीवन आणि त्याच्या सर्वव्यापी विकराल हातातून सुटून कुठे जाऊ शकणार? अठराही पुराणे हरिसी गाती...
युजीपूर्व "पोहोचलापणा" हा पूर्णत: मानसिक रूपांतरणावर आधारित होता. म्हणजे पोहोचलेला माणूस कसाही असो, फक्त बोलणं सुंदर असलं की संपलं ! पण युजी हे एकच असं उदाहरण आहे ज्याचं मानसिक रूपांतरण घडूनही, बुध्दांची अवस्था अनुभवूनही तेवढ्यावरच त्यांनी समाधान मानलं नव्हतं... ते आणखी पुढे खोदत गेले आणि पुढे मग शरीराच्या प्रत्येक पेशीचाच स्फोट घडून युजींची ती मानसिकताही मृत पावली आणि ती मानसिकता ज्या शरीरात होती ते शरीरही मृत पावलं.. काही काळच.. आणि नंतर ते शरीर जीवंत झालं तेव्हा तिथं माणूस नव्हताच... फक्त माणूस नसलेलं जीवंत शरीर आणि त्याची कार्य.. त्याला कसले नियम लागत नव्हते, नैतिकतेची बंधानं लागत नव्हती.. त्यामुळे युजी अद्भुत आहेत.. आणि हे रॅशनलही वाटतं.. कारण प्रत्येकाची मानसिकता शरीरात असते आणि शरीर त्या मानसिकतेकडूनच ऑपरेट होत असतं.. म्हणून ते दोन्हीही रूपांतरीत होणे हाच आणि केवळ हाच मापदंड मी मानतो. त्यांनी उपदेश देणे/ शिष्यवर्ग तयार करणे वगैरे भानगडी न करता जे आहे, जसं आहे त्याबद्दल अगदी मनगटानं शेंबूड पुसणार्या पोराच्या प्रश्नालाही शिव्या घालत का होईना पण उत्तरे दिली.... आणि झाल्या गोष्टीचं प्रस्थ न माजवण्याचा अलिखित नियम अगदी मृत्यू होईपर्यंत युजींकडून पाळल्या गेलाय..
माझ्या बाबतीत सुरू झालेल्या लक्षणांबद्दल मी काही सांगू शकत नाही आणि कुणी काही सांगितलं तर ते फक्त " आणखी वाट पहा" यापेक्षा जास्त काहीही नसतं. कारण या प्रक्रियांचा अगदी ठाम रोडमॅपच कुणाकडे नसतो..कारण जाणते लोक हे आकाशात उडालेल्या पक्ष्यासारखे आहेत... कुठून उडाले त्याचा माग काढून फायदा नाही कारण पुढचा मार्ग हवेतला आहे..
सध्यातरी "पोहोचलेपणा" म्हणजे काय ते सांगायला मी अगदीच अपात्र आहे, नेहमीच अपात्र राहिन. कारण कुठलाही नियम बनवला की खेळ,खलास! कुणाचाही संदर्भ द्यायचा नाही असं ठरवलं तर नथिंग टू से, नथिंग, नथिंग.. ओन्ली नथिंग थाऊजण्ड टाईम्स.. बोलबच्चनपणा करून दुकानदारी सुरू करायचा समाजमान्य पर्याय माझ्याकडे आहे... पण त्यापेक्षा बरे धंदे मला करता येतात आणि त्यातून पोटापाण्याची चांगली सोय होतेय ( हे वाक्य मिपावरील माझ्या आध्यात्मिक लिखाणाबद्दल बायका स्वयंपाक घरात तोंडाला पदर लाऊन बोलत असतात तसे बोलणारांना उद्देशून, अरे या ना लेको जरा चव्हाट्यावर! कळू द्या तुमचीही अक्कल ) ... मला जे जीवन अर्ध्यावर सोडून गेले ते लोक फक्त मानसिक रूपांतरण घडलेले लोक होते असे वाटते.. म्हणजे घास तोंडापर्यंत आलेले पण त्याची चव न चाखलेले.. पुढे मग त्यांनी त्या घासाबद्दल कितीही रसाळ भाषेत बोलणे केलेल असो - ते युजलेसच! हे माझं जसं युजलेस आहे तसं.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 11/15/2010 - 19:40
नवीन
तुमचे हे वाक्य बघा:
१) भारतात ध्यान वगैरे प्रकारांतून त्या ग्रंथी पुन्हा सक्रिय करायच्या आणि सगळ्या मानसिक-शारीरिक गुंत्यांतून बाहेर पडायच (थोडक्यात मुक्त व्हायचं) हा हजारो वर्षांपासून चालत आलेला पायंडा आहे..
२) युजीपूर्व "पोहोचलापणा" हा पूर्णत: मानसिक रूपांतरणावर आधारित होता.
जर भारतात/जगात हजारो वर्षांपासुन मुक्त व्हायची कला लोकांना ठाउक आहे तर मग युजीपूर्व "पोचलेपणा" केवळ मानसीक होता असं तुम्ही कसं म्हणु शकता? इतर सर्व ज्ञानशाखांप्रमाणे अध्यात्माच्या प्रांतातही धंदेवाईक लोक होते/आहेत. स्वतःच्या "पोचलेपणाबद्दल" अर्धवट/पूर्णपणे चूकीची खात्री असणारे देखील आहेत. पण आध्यात्मीक ज्ञानसाधनेची युजीपूर्व आणि युजीउत्तर अशी काळी-पांढरी विभागणी करणे हे फार धाडसाचे आहे असं तुम्हाला वाटत नाहि काय? मला युजी वा इतर कोणाही व्यक्तीच्या फायनल अवस्थेबद्दल काहिही म्हणायचे नाहि. ज्यातलं मला काहि कळत नाहि तिथे जज्मेंट देण्यात काय हाशिल? मुद्दा फक्त हाच कि "मला कळलेला हा एकच मार्ग योग्य, बाकि सर्व पाखंड" हि वृत्ती बाळगून आपण या प्रचंड ज्ञानविश्वाला संकुचीत तर करत नाहि आहोत ना? आपल्याला ज्या मार्गाची खात्री पटलीय त्या मार्गाबद्दल कॉन्फीडंट असणं चांगलच. पण इतर मार्ग निखालस चूकीचे, असा निकाल त्यावरुन काढणे चूक आहे असं मला वाटतं.
मी तुम्हाला कुठलाहि संदर्भ न देता "पोचलेपणा" बद्दल लिहायला का म्हटलं ? तर तुमच्या एकंदर लिखाणावरुन असं दिसतय कि या क्षेत्रात तुम्ही दोन पाउलं टाकलेली आहेत. हा प्रवास सुरु करण्या आगोदर तुम्हाला काहि जाणवलं असेल, त्यात काहि तथ्य वाटलं असेल. तुमची स्वतःची "पोचलेपणा"बद्द्ल काहि भुमीका असेल. जर तुम्ही हे विषद करु शकलात, आणि मला ते समजलं तर त्याचा मला फायदाच होईल... हा जो शंकांचा धुराळा उडालाय तो विरळ व्हायला मदत होईल. चित्र थोडंफार स्पष्ट होईल...
अर्धवटराव
- Log in or register to post comments
य
यकु
Tue, 11/16/2010 - 15:50
नवीन
हो.
कारण यापैकी कुणाच्याही शरीराच्या पेशीय रूपांतरणाचा कुठलाही संदर्भ सापडत नाही. चित्त पालटणे वगैरे तर सर्वांनाच दररोजच होत असते. जे कुणी वास्तविक जीवनमुक्त असतील त्यांच्याकडे पाहून कोणत्या तरी हुशार लोकांनी उपनिषदे इ.लोकांनी लिहीले. उपनिषद लिहीणारे ते ऋषि काही वास्तविक त्या अवस्थेत नव्हते; पण मेंटल ह्~अमरींग ने मानसिकता बदलू शकते.
२) युजीपूर्व "पोहोचलापणा" हा पूर्णत: मानसिक रूपांतरणावर आधारित होता.
वरील प्रमाणे.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Wed, 11/17/2010 - 06:15
नवीन
डॉर्मंट ग्लॅण्ड्स (निरूपयोगी ग्रंथी)
मला वाटते, सुप्त हा शब्द योग्य आहे, निरुपयोगी काहीच नसते, उत्क्रांतीमध्ये टिकून राहिलेली प्रत्येक गोष्ट 'उपयोगीच आहे'
आणि या 'ग्रंथी' (यासाठी nerve ganglion असा शब्दप्रयोग मी कुठेतरी वाचला आहे) सुप्त समजल्या जातात कारण त्यांचा 'नक्की' उपयोग अजून समजला नाही.
बुध्दांची अवस्था अनुभवूनही तेवढ्यावरच त्यांनी समाधान मानलं नव्हतं
बेसिकमध्ये राडा!
बुध्दांच्या अवस्थेपलिकडे केवळ आनंद आहे आणी अपार करुणा आहे. जी गौतम बुध्दांमध्ये स्पष्ट दिसते.
कुणाला समाधान मिळले नाही, आणी करुणाही निर्माण झाली नाही, उलट तडफड व चीड वाढत गेली, याचाच सरळ अर्थ असा की बुध्द्त्व प्राप्त झालं नाही.
मनुष्य ''खरोखरच' ज्ञानी वगरै होउ लागतो, त्याला निसर्गनियम कळतात, मनुष्यस्वभाव कळतो, दु:खाची कारणे कळतात, जाणवतात, ( कळणे आणी जाणवणे यात फरक असतो बरं का!), अशा वेळेस तड्फड आणी व्याकुलता शिल्लक रहात नाही.
प्रेमाचे, करुणेचे अश्रु असतात, दुखा:चे, रागाचे बिल्कुल नसतात.
- Log in or register to post comments
स
सद्दाम हुसैन
Sun, 11/14/2010 - 15:40
नवीन
खुप मनोरंजन झाले ...
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Tue, 11/16/2010 - 17:22
नवीन
बराच वेळ मौन पाळून, शेवटी कंटाळून टंकायाला घेतेय.........
आता समाधी का घ्यावी हा प्रश्न आहे, की कशी घ्यावी हा प्रश्न आहे, की अजून काही?
हे मला नीटसे कळले नाही..
खरे तर 'यकु' नक्की काय शोधतायत हेच मला नीटसे कळेलेले नाही!
मी जे काही वाचले आहे त्यातून काही गोष्टी सांगू शकते,
मुळात समाधी म्हणजे मृत्यू नाही , आत्महत्या तर नाहीच नाही.
ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधीत आहेत!
त्यांची देहभावाना संपून ते विश्वातीत झाले आहेत. थोडक्यात 'consciousness' विस्तारला.
ही अवस्था 'योग्य' योगाभ्यासानेच येते. मन एकाचवेळेस सूक्ष्म होते व विश्वव्यापीही होते, त्यामुळे शरीरातील अनेक अनावश्यक क्रिया थांबून ते स्थिर होऊ लागते.
यासाठी अनेक मार्ग आहेत, योग्य मार्गदर्शनाखाली केले तर निदान जंगलात वाट चुकल्याची भावना तरी येणार नाही.
समाधी ही शरीराची एक विशिष्ट अवस्था ( व अर्थातच मनाची सुद्धा- कारण मन, अंतर्मन हे संपूर्ण शरीराचेच भाग आहेत) आहे.
या अवस्थेत काल थांबतो, आणी 'अहम' संपतो. ( म्हणजे नक्की काय ते नंतर...!)
जे शरीरच संपवतात, ते नक्की 'विटले' होते का, याचा शोध घ्यायला हवा. ( मला वाटते 'नाही')
विटलेपणा, पळपुटेपणा आणी इतिकर्तव्यता यात मूलभूत फरक आहेत. त्याचा घोळ कशाला?
अर्धवट आयुष्य सोडणे हे अयोग्यच आहे, पण ते अर्धवट आहे की 'झाले काम एकदाचे' हे कुणी ठरवायचे?
अर्थातच स्वत:नी !
मग त्यात आपण टीका-टिप्पणी करणारे कोण?
आता तुकारामांबद्दल ,
सामाधीच्याही पुढची एक पायरी असते, सदेह वैकुंठगमन!
याचा सरळसरळ अर्थ असा आहे की पंच महाभूते त्यांची त्यांची विलीन झाली.
माती, पाणी, हवा, आग आणी या सगळ्याला नियंत्रित करणारे,मोजता ना येणार 'आकाश' तत्व
हे सगळे शरीरात एक 'फॉर्म' घेऊन एकत्र आले होते ,
ते संपूर्ण वेगळे होऊन संपून गेले ......
आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने |
सर्वात्मकपणे भोग झाला ||
यातून हाच अर्थ प्रतीत होतो असे मला वाटते...
ते नक्की 'कसे' साध्य केले हे मला अजूनतरी माहीत नाही,
कळले की नक्की लेख टाकेन!
"....कारण या प्रक्रियांचा अगदी ठाम रोडमॅपच कुणाकडे नसतो.."
"Truth is a pathless land" हेच खरे आहे!
तोपर्यंत यकुना 'हॅप्पी प्रक्रिया'!
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 11/16/2010 - 17:28
नवीन
हा एक नविनच पैलू वाचायला मिळाला... बघु समजतं का ते.
(वाचक) अर्धवटराव
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2