Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मंद सुगंधी रात करीतसे घात- समस्यापुर्ती (३)

अ — अरुण मनोहर, Tue, 11/23/2010 - 01:42

Book traversal links for मंद सुगंधी रात करीतसे घात- समस्यापुर्ती (३)

  • ‹ बनवा झटपट कविता (समस्यापुर्ती)
  • Up

प्रतिक्रिया द्या
7565 वाचन

💬 प्रतिसाद (41)
प
प्रभो Tue, 11/23/2010 - 04:44 नवीन
पंगतीला खास होता मसालेभात पहिल्या रातीला आला गडी रंगात मंद सुगंधी रात करीतसे घात वर्षातच बाळकृष्ण नांदे घरात
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 11/23/2010 - 04:55 नवीन
हात मेल्या! अखंड लग्नाचीच स्वप्नं बघ तू! ;) दुसरं काही म्हणून सुचत नाही तुला.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
प
प्रभो Tue, 11/23/2010 - 04:59 नवीन
ही माझी नाही तर माझ्या काही मित्रांची परिस्थिती लिहिली आहे.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
संदीप चित्रे Tue, 11/23/2010 - 16:38 नवीन
एका वर्षातच बाळकृष्ण आणायचा इरादा पक्का दिसतोय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
अ
अरुण मनोहर Tue, 11/23/2010 - 05:55 नवीन
रात्री उपवास करणे हे प्रकृती स्वास्थ्यासाठी केव्हाही चांगलेच! बाकी कविता छानच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
म
मिसळभोक्ता Tue, 11/23/2010 - 06:00 नवीन
रात्री उपवास केल्यास भूक लागते, आणि त्याचा परिणाम फारसा चांगला नाही, (आदरणीय) अरुणजी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
ग
गणेशा Tue, 11/23/2010 - 08:56 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
प
प्राजु Tue, 11/23/2010 - 05:05 नवीन
हळूच तिमिरात धरूनीया हात सांग मज बात, तुझिया गं मनात ऋतू बहरात, तुझिया अंतरात मंद सुगंधी रात करीतसे घात...
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 11/23/2010 - 05:57 नवीन
प्राजुचे होम ग्राउंड! (काव्या विषयी बोलतो आहे.) छानच आहे. पण हा नेहमीचाच कोन झाला नाही का? एखाद्या हटके कोनातून येऊ द्यात ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
मिसळभोक्ता Tue, 11/23/2010 - 05:59 नवीन
प्राजूने जरा तंत्रज्ञानाविषयी लिहावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
म
मिसळभोक्ता Tue, 11/23/2010 - 05:11 नवीन
जरी मिळाला खमंग मसालेभात तरी त्यावरी नसे कांद्याची पात मग बघू सिनेमा जाऊबाई जोरात मंद सुगंधी रात करीतसे घात (सूज्ञ वाचकांना हा सुगंध कसला हे कळले असेलच.)
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 11/23/2010 - 06:00 नवीन
हसता हसता नाक दाबल्यामुळे आणखी काही लिहित नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 11/23/2010 - 06:02 नवीन
म्हणजे, दाबलेले नाक सोडा, म्हणतो मी ! उगाच "होते मनोहर तरी" असे कुणाला लिहावे लागू नये, म्हणून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
अ
अरुण मनोहर Tue, 11/23/2010 - 09:04 नवीन
चंट बाला ओढली मंद प्रकाशात चंद चुम्माचाटी साठी बाहुपाशात मंद सुगंधी रात करितसे घात खुंट रुते लागता गालाला हात
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 11/23/2010 - 09:57 नवीन
छान आहे .. अवांतर : फक्त पहिला नियम "चार ओळींच्या कवितेने समस्येचे समाधान करायचे." यात कसल्या समस्येचे हे कळले नाही. . म्हणुन लिहिताना दिशा कळत नाहिये .. जरा सांगावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
अ
अरुण मनोहर Tue, 11/23/2010 - 10:10 नवीन
समस्यापुर्ती मधे जी ओळ दिली असते, ती एखादे कोडे असते. किंवा एखादी परिस्थिती, जी कशी आली असेल हेच एक कोडे होऊ शकते. ह्या समस्येत, सुगंधी रात्रीत घात कसा काय झाला ते उत्तर अपेक्षीत आहे. तुम्ही खाली दिलेले कडवे कविता म्हणून बरे आहे. पण घात झाला हे काही दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Tue, 11/23/2010 - 10:12 नवीन
धन्यवाद .. मला हेच माहित नव्हते .. बदलतो खालील कडवे ... धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
ग
गणेशा Tue, 11/23/2010 - 10:19 नवीन
धुंद तुझीया कवेत श्वास श्वासात धरलेला तुझा मी मखमली हात मंद सुगंधी रात करीतसे घात झोपेतुन उठता पेकाटात लाथ
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 11/23/2010 - 10:24 नवीन
स्वप्नात मखमली सत्यात दुखभरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गवि Tue, 11/23/2010 - 10:19 नवीन
निरोपवेळी निघता सोडुनि हात भारनियमनी विझे दिव्याची वात त्वये म्हणावे येना परतुनि आत मंद सुगंधी रात करीतसे घात .............. मुळात "करीतसे" मधला री ह्रस्व असावा अशी आमची इच्छा आहे..(काव्यात हं..)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 11/23/2010 - 10:20 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
र
राजेश घासकडवी Tue, 11/23/2010 - 10:25 नवीन
तीन ओळी द्या तेरा अक्षर भरुनि अरुणाची ये एक समस्या अजुनि ओळ शेवटी, बसवुनी यमकात "मंद सुगंधी रात करीतसे घात" आम्हाला 'क्ष' वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करून दाखवा असा प्रश्न आला की आम्ही बिनधास्त 'आज आम्हाला मास्तरांनी 'क्ष' चा वाक्यात उपयोग करून दाखवायला सांगितला' असं वाक्य लिहीत असू :)
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 11/23/2010 - 10:32 नवीन
हा: हा: हा: हीच ट्रीक शाळेत मी देखील वापरली होती. मास्तर म्हणाले होते, "प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले!" तसेच गुर्जी, समस्येचे समाधान नाही झाले अजून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Tue, 11/23/2010 - 10:55 नवीन
प्रणयाच्या गणिताचे उल्टे उत्तर मदीर गोडी चाखत दोघे सत्वर मंद सुगंधी रात करीतसे, घात दुसरा आठचा पाच मिळ्वुनी त्यात (एक स्वल्पविराम त्या ओळीत घालण्याचं धार्ष्ट्य केलेलं आहे. घाईघाईत लिहिल्याने थोडी मात्रांची ओढाताण झालेली आहे.)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 11/23/2010 - 11:03 नवीन
आयायाय गं! __/\__ कालिदासासही लाज वाटावी अशी समस्यापूर्ती! जॉबर्‍याच! 'दुसरा आठचा' ऐवजी 'चाराचा तिसरा'' असे वापरल्यास मात्रांची होणारी ओढाताण टाळता येईल गुर्जी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/23/2010 - 11:26 नवीन
गुर्जी, तुम्हाला गुर्जी बनवून एक उत्तम काम केलेलं आहे!! तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार. हा धागा उसवायला लावणार्‍या मेव्याचे स्पेशल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
न
नरेशकुमार Wed, 11/24/2010 - 03:34 नवीन
काव्यात अश्लिल सुद्धा खपवितात आनि इथ्ल्याच आया बहिनि आभार मान्तात. 6900 वेला निशेध. अस्ल्या कवितेचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
अ
अरुण मनोहर Tue, 11/23/2010 - 11:26 नवीन
ट्यूब पेटली! अच्र्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 11/23/2010 - 11:10 नवीन
हडळींचा नाच. खविसांची साथ कवट्यांचा डोगर.हाडांची रास मुंज्याची मुंज.मुडद्यांची वरात मंद सुगंधी रात करीतसे घात
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 11/23/2010 - 11:12 नवीन
बापरे! अमावस्येला वाचून पहायला हवी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
स
स्पा Tue, 11/23/2010 - 12:42 नवीन
फट्टे....................... झकास एकदम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 11/23/2010 - 11:15 नवीन
प.रा ची पार्टी..बाटल्यांची रास चिंतामणी भरवतात त्याला घास. व्हिस्की.मंचुरियन ..जमली बात मंद सुगंधी रात करीतसे घात
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 11/23/2010 - 11:22 नवीन
तुम्हाला पार्टीला बोलावले नव्हते हाच घात असावा बहुदा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
ग
गणेशा Tue, 11/23/2010 - 11:42 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
व
विनायक प्रभू Tue, 11/23/2010 - 12:37 नवीन
चांदीचे ताट सोन्याचा पाट वालाची उसळ मसाल्याचा भात मंद सुगंधी रात करीतसे घात सर्व बेताची लागली वाट
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 11/23/2010 - 12:40 नवीन
वालाची उसळ..!! नक्की "सुगंध"च ना? आणि "मंद"च ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
म
मेघवेडा Tue, 11/23/2010 - 13:20 नवीन
शांतपणे घेई, मला ही घरात, नशीब माझे फळफळले आज! काय बदल झाला, तुझ्या गं स्वरात, कुठून आला गंधर्व गळ्यात? प्रेमभरे गेलो मुका घेण्यास, वाजला कानाखाली हात... मंद सुगंधी रात करितसे घात, चुकून गेलो दुसर्‍याच घरात :O
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 11/23/2010 - 16:48 नवीन
मेव्या, मस्त कविता! शराबी पिक्चर मधला अमिताभ आठवला, " भूले से ये मैं किसके घर आ गया यार!" त्या गाण्याची उलटी सिच्युएशन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
K
kamalakant samant Fri, 11/26/2010 - 06:36 नवीन
जरी मी कुठे दूरवरी स्थीत सा॑गावे कसे आठवणी दाटतात पारीजात जरी तो नित्य सुग॑धीत म॑द सुग॑धी रात करीतसे घात !!
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 11/26/2010 - 13:58 नवीन
मधुकर गुंजारवे रमे पद्मात ना भान राहिले आला चांद नभात। मिटले दळ एकेक बंदी हा आत मंद सुगंधी रात करीतसे घात॥
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 11/26/2010 - 14:50 नवीन
सही रे सुध्या. मस्त कल्पना आहे. फक्त ते मीटराचं बघ. आणि तो 'चांद' खड्यासारखा लागतोय. चंद्रसुद्धा चालेल की! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा