'फेसबुक'वाल्याची गमतीशीर पण केविलवाणी गोष्टः 'द सोशल नेटवर्क'
💬 प्रतिसाद
(17)
स
सहज
Tue, 11/23/2010 - 12:01
नवीन
ओके तुम्ही म्हणताय तर हा सिनेमा बघायच्या यादीत नोंदवला आहे. :-)
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Tue, 11/23/2010 - 12:26
नवीन
डन !!!
लगेचच उद्याची तिकिटे बुक करतो.
परिक्षणाबद्दल धन्यवाद, आता चित्रपट पहायचा कॉन्फीडन्स आला.
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Tue, 11/23/2010 - 12:24
नवीन
अच्छा. भारतात प्रदर्शित झालाय का ?
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Tue, 11/23/2010 - 12:25
नवीन
हा एक मस्त सीनेमा आहे. Total time pass होतो जर drama आवडत असेल तर. चीत्रपटाची सूरूवात तर धमाल आहे.... आणी मूख्य म्हणाजे एक सत्यकथा आहे. अतिमत: त्याला पराजित दाखवलेले नाही, तर गाढवपणाची कीमत तो मोजतो अर्थात त्याला पैशाची फिकिर नाहीच.
- Log in or register to post comments
य
ययाति
Tue, 11/23/2010 - 14:47
नवीन
छान चित्रपट आहे हा
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 11/23/2010 - 15:16
नवीन
फेसबुकवाल्याची कथा पाहिली पाहिजे....
हा मुलगा वल्ड मधला यंगेस्ट मिलेनियर आहे म्हणे...
बाकी फेसबुकवर वेळ घालवण्या पेक्षा फेस टु फेस गप्पा हाणलेल्या केव्हाही चांगल्या... ;)
(चेपुवर खाते नसलेला)
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Wed, 11/24/2010 - 02:29
नवीन
बिलेनियर आहे.
$ २५ बिलीयन = फेसबूक त्यात ६०% मार्क झुकरबर्गचा वाटा
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 11/23/2010 - 15:17
नवीन
चित्रपटाची ओळख आवडली. नाव अर्थातच माहीत होते पण अजून बघायचा आहे. आपली कल्पना चोरली अशी तक्रार करून त्याच्या विरुद्ध ६५ मिलियन्स डॉलर्सचा खटला जिंकणार्यांमधे जशी दोन अमेरिकन (अभारतीय वंशाची) जुळी भावंडे होती तसाच भारतीय वंशाचा दिव्या नरेन्द्र पण होता.
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Tue, 11/23/2010 - 17:07
नवीन
छान परीक्षण. उत्सुकता ताणली आहे. पहायला हवा हा चित्रपट.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Tue, 11/23/2010 - 17:56
नवीन
मी हा सिनेमा पाहिलेला नाही.
पण जर वरील प्रश्न उपस्थित करण्यात यशस्वी झाला असेल तर जरूर बघायला आवडेल.
निव्वळ घटनांची, कथासूत्राची व त्यातल्या कलाकारांची वर्णनं करण्यापेक्षा त्यात कुठची प्रतीकं वापरली आहेत व लेखक/दिग्दर्शक काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत याचं विश्लेषण चिंजंच्या समीक्षेत येतं, ते आवडतं.
- Log in or register to post comments
म
माजगावकर
Tue, 11/23/2010 - 19:29
नवीन
सुंदर परिक्षण!!
आता मात्र बघेन.. जवळ जवळ आठवडा झाला, डाउन-लोड करून..
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Wed, 11/24/2010 - 06:34
नवीन
इथं हे मात्र स्पष्ट करायला हवं की माझ्या परीक्षणातल्या काही गोष्टी चित्रपटात नि:संदिग्ध आहेत, तर काही धूसर आहेत; आणि काही म्हणजे मला जाणवलेल्या विविध गोष्टींच्या विशिष्ट जोडणीतून मला पडलेले प्रश्न आहेत. उदा: चित्रपटातले वकील आणि विविध लोक मार्कला प्रश्न विचारतात, किंवा त्याच्या उत्तरांमुळे/वर्तनामुळे आश्चर्यचकित होतात; त्यातून विनोदनिर्मिती होते, हे स्पष्ट आहे. ती सर्व माणसं वयानं मार्कला खूप ज्येष्ठ आहेत, हेही सुस्पष्ट आहे. चित्रपटात मार्क आणि या ज्येष्ठांमधला विरोधाभास खटल्याच्या माध्यमातून ऐरणीवर येतो. हा चित्रपटाचा मुख्य, उघड, सुस्पष्ट भाग म्हणता येईल.
फेसबुक वापरणार्या तरुण पिढीचं मात्र चित्रपटात तितकं चित्रण नाही. कारण मुख्य कथाभागात त्याला दुय्यम स्थान आहे. सूचक संदर्भ मानावेत असे प्रसंग मात्र येत जातात. उदा: अगदी सुरुवातीला (फेसबुक बनवायच्या आधी) 'दोन मुलींचे चेहरे समोर ठेवून यातली तुम्हाला आवडते ती एक निवडा' असा एक खेळ मार्क बनवतो आणि तो हार्वर्डमध्ये खूप लोकप्रिय होतो असं दाखवलं आहे. किंवा 'रिलेशनशिप स्टेटस'ची माहिती मार्क फेसबुकमध्ये नव्यानं टाकतो आणि नंतर कधीतरी एक मुलगी त्याचा वापर करून आपल्या मित्राला छळते (अधिक तपशील मुद्दाम सांगत नाही).
अशा गोष्टींतून 'सोशल नेटवर्क'चा आणि नव्या पिढीचा खोल संबंध आपल्याला जाणवतो. त्यातून मार्कची विचारपध्दती आणि नव्या पिढीची नात्यांबद्दलची गरज यांच्यातलं घनिष्ट नातं दिसतं. याउलट जुन्या पिढीला मार्क अनाकलनीय (किंवा विचित्र) वाटतो हेही अनेकदा दिसलेलं असतं. म्हणून वरचा प्रश्न माझ्या मनात आला. ज्याला 'टाईमपास' म्हणून सिनेमा पाहायचा आहे असा माणूस 'काय फुकट पिळतोयस!' असं मला म्हणू शकतो. म्हणून वरचा प्रश्न चित्रपटात संदिग्ध आहे असं म्हणता येईल. त्यामुळे तो मांडण्यातलं चित्रपटाचं यशापयश सापेक्ष आहे. शिवाय अखेर चित्रपट 'हॉलिवूड'च्या तर्कशास्त्रानं जातो. त्यामुळे हे अपरिहार्यही आहे, कारण 'पिच्चर' यापेक्षा गंभीर केला तर पॉपकॉर्न खाणारं पब्लिक बोअर होईल!
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Wed, 11/24/2010 - 08:17
नवीन
पहाण्याच्या यादीत नोंद केलेली आहे, परिक्षणाबद्दल धन्यवाद.
स्वाती
- Log in or register to post comments
न
नंदन
Wed, 11/24/2010 - 10:38
नवीन
>>> पहाण्याच्या यादीत नोंद केलेली आहे, परिक्षणाबद्दल धन्यवाद.
--- असेच म्हणतो. आधी वास्तवापासून बर्याच ठिकाणी फारकत घेतली आहे असं परीक्षणात वाचलं होतं, त्यामुळे हा सिनेमा मुद्दाम पाहीन असं वाटलं नव्हतं. आता तुमच्या परीक्षणातील निरीक्षणं (अपघाती अनुप्रास) वाचून त्याची पाहण्याच्या यादीत नोंद केली आहे.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 11/24/2010 - 10:45
नवीन
फेसबुक अथवा मार्क झुकरबर्गबद्दल फार आकर्षण नसल्यामुळे पिक्चर बघण्याची फारशी इच्छा नव्हती. पण परीक्षण वाचून पिक्चर बघावा असं वाटत आहे.
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Wed, 11/24/2010 - 14:20
नवीन
एक गोष्ट सांगायचीच राहिली. जगातल्या समस्त गीकांना हा चित्रपट रंजक आणि रोचक वाटावा. कारण मार्कशी सह-अनुभूती जाणवेल आणि त्यानं जगाला जो अंगठा दाखवला आहे तो म्हणजे अगदी माहेरचा आहेर वाटेल.
- Log in or register to post comments
N
Nile
Wed, 11/24/2010 - 20:57
नवीन
हा निष्कर्ष(?) आवडला. ;-)
शिनेमा 'फर्स्ट डे' पाहिला आणि आवडला. जरी सर्व कथानक वास्तव नसले तरी सिनेमा छान आहे. फेसबुकच्या जन्माची कहाणी म्हणुनही सिनेमा पहावा वाटला.
- Log in or register to post comments