माणसा, माणसा कधी होशील माणूस...
💬 प्रतिसाद
(14)
न
नितिन थत्ते
Fri, 11/26/2010 - 11:04
नवीन
हो !!! बरंच काही करता येईल.
ज्या कारणांमुळे मूल टाकून द्यावे असे त्या व्यक्तीला वाटते ती कारणे नष्ट करण्यासाठी समाजजागृती केली तर प्रमाण कमी होऊ शकेल.
(अवांतर : एवढ्या प्रमाणात नाही हो येत अनाथालयात मुलं )
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 11/26/2010 - 12:21
नवीन
पण मी काय म्हणतो थत्ते चाचा, येवढे सगळे करण्यापेक्षा 'सुरक्षेचे उपाय' सुलभपणे आणि स्वस्तात जनमानसात पोचवले गेले तर अधीक योग्य नाही का?
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 11/26/2010 - 12:48
नवीन
ती पण एक प्रकारची जागृतीच. :)
१. अनेकदा नात्यात इतका अंधविश्वास निर्माण झालेला असतो की फसवणुकीची शक्यताच लक्षात येत नाही. :(
२. चौथातरी मुलगा होईल म्हणून चान्स घेतलेला असतो तिथे साधने काय करणार? ;)
- Log in or register to post comments
P
Pearl
Fri, 11/26/2010 - 11:08
नवीन
>>(अवांतर : एवढ्या प्रमाणात नाही हो येत अनाथालयात मुलं )
आठवड्यात २/३ तर नक्की येत असतील. (संदर्भः दैनिक सकाळ)
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Fri, 11/26/2010 - 11:52
नवीन
पुण्यातील लक्ष्मी नारायण चित्रपट गुहासमोर वाहत्या कॅनॉलच्या बाजूने एक झोपडपट्टी आहे. तिथे एक एक-दीड वर्षाची पोरगी अन्न-पाण्यावाचून तडफडून मेली. तिचे संस्कार देखील करायला बापाकडे पैसा नव्हता. तीन पोरी होत्या, एक गेली तर काय फरक पडणारे, असा विचार करून आई वडील गप्प बसले. कसले विधी आणि कसले काय आणि कोण तो खटला चालविणार त्या बापावर ? कोणत्या पेपरात बातमी येणार ? डॉक्टर ने सगळी परिस्थिती बघून ते आपले शेवटचे मृत्यपत्रक दिले आणि त्या कोवळ्या पोरीच्या तोंडात दुधाचे काही थेंब सोडून मंडळातील काही पोरं शास्त्रीरोडच्या वैकुंठवासी तिला सोडून आले.
त्या मुलीचे नशीब खरेच महान. नाहीतर ह्या क्रूर जगात पोटाचे दोन घास मिळविताना तिला पुढे काय काय करावे लागले असते देव जाने.
मुलांना अनाथालय सोडतात, हे तर मी त्या मुलांचे नशीब समजतो, ह्या जगात निदान अजून एक संधी तरी उपलब्ध होऊ शकते.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 11/26/2010 - 12:18
नवीन
>>ह्या जगात निदान अजून एक संधी तरी उपलब्ध होऊ शकते.
सहमत आहे.
- Log in or register to post comments
P
Pearl
Fri, 11/26/2010 - 12:36
नवीन
ही बातमी खरच भयंकर आहे. मला असे वाटते की यासाठी काहीतरी नक्की केले पाहिजे असे वाटणारे अनेक जण आहेत. पण ही सर्व मदत मोनेटरी हेल्प / as a volunteer म्हणून मदतीचे हात नक्की पुढे येतील. पण गरज आहे good leader ची आणि गरज आहे ही मदत proper channelise करायची.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Fri, 11/26/2010 - 12:12
नवीन
ही समस्या खरोखरच एवढी गंभीर असेल तर, योनिशुचितेच्या भ्रामक कल्पना, कुमारीमातांकडे पाहण्याचा दूषित दृष्टीकोन, लैंगिक व्यवहारांबद्दल खुलेपणाचा अभाव आणि एकंदरीतच लैंगिक अज्ञान हीच याला कारणीभूत आहेत.
अवांच्छित मुले टाळण्याचे उपायच कित्येक लोकांना माहिती नसतील. त्यासाठी, जागोजागी गर्भनिरोधकांची व्हेंडिंग मशिन्स ठेवणे, सुलभ गर्भपातालय काढणे हे तत्काळ उपाय आणि गर्भनिरोधकांबद्दलच्या ज्ञानाचा प्रसार, लैंगिक शिक्षणाचा प्रसार, लैंगिक व्यवहारांबद्दल खुलेपणा आणणे, योनिशुचितेच्या कल्पनांविरुद्ध प्रचार करणे आणि एकूणच या बाबतीतला समाजाचा दुटप्पीपणा कमी करणे हे दीर्घकालीन उपाय आहेत. प्रश्न असा आहे की हे करणार कोण? र.धो.कर्व्यांनी नव्वद-शंभर वर्षांपुर्वी हे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जितका त्रास सहन करावा लागला तेवढाच त्रास कदाचित आताही सहन करावा लागेल. कोण सहन करणार?
लोकानुययी धोरणांमुळे राजकीय पातळीवर काही होणे फार अवघड आहे आणि स्वयंसेवी संस्था बहुतेक एड्स प्रतिबंध, वेश्यांच्या मुलांचा सांभाळ इत्यादी कामांमध्ये (त्यात असणार्या परकीय निधीमुळे?) व्यग्र आहेत. मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यात कोणालाही स्वारस्य नाही.
अशा मुलांना अनाथाश्रमात नेऊन टाकलं तरी त्यांचं भविष्य काय असणार हे सांगायला भविष्यवेत्ते किंवा समाजशास्त्रज्ञांची आवश्यकता आहे काय?
आपल्या महान संस्कृतीच्या जाजमाखाली द्यायची सरकवून असल्या समस्यांची झुरळं.
- Log in or register to post comments
P
Pearl
Fri, 11/26/2010 - 12:38
नवीन
हम्म. १दम मान्य.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Fri, 11/26/2010 - 14:46
नवीन
बरोबर बोलला आहात तुम्ही. तुमचे मुद्दे पटले
अवांतर ::
त्यापुढील समाजसुधारकांचे काही प्रकार नमुद कारावेशे वाटत आहेत .
१. समाजात आता आनखिन एक समाजसुधारक जात येत आहे. जीला समाधानासाठी किंआ निस्वार्थतेने नाही तर आपण काही तरी समाजसेवा करतो आहे हे समाजाला दाखवण्यासाठी काही तरी करायचे असते ..
खुप जवळुन असे समाजसुधारक लोके बघितली आहेत मी, त्यांना पिडीत माणसांच्या व्यथेची नाही तर आपल्या प्रशिद्धीची हाव असते .. खरे समाजसेवक आहेत या जगात पण त्यांच्या बरोबर काम करण्यासाठी २-४ साथीदार नसल्याने उल्लेखनिय काम खुप कमी होते ...
२. समाजसुधारणा केली पाहिजे हे काही लोकांना मनापासुन वाटते, पण मध्यमवर्गीय .. घर .. काम संभाळुन पैसा आणि वेळ नाही देता येत बर्याच जनांना मग कसे तरी पैस्याच्या मार्फत हे लोक मदत करतात .. मग संस्था तो पैसा नक्की कोठे कसा वापरते हे पाहायला ही निट वेळ नसतो आणि मग सिस्टीम वर ओरडुन ते गप्प होतात .. पुन्हा नविन खांदेकरी तयार झालेले असतात तोपर्यंत ...
वरील २ ही प्रकार जेंव्हा नष्ट होतील तेंव्हा मदत करण्याला आणि त्याचे परिनाम दिसायला खर्या अर्थाने सुरुवात होयील असे वाटते ...
- Log in or register to post comments
P
Pearl
Mon, 11/29/2010 - 10:08
नवीन
मला नेहमी वाटतं की ही अनाथ मुले निरागस आहेत. त्यांची काय चूक आहे. They also need to be hugged, they want someone to love them. They also need somebody to take care of them. जेव्हा आपण घरी लहान मुलांचे लाड करतो आणि त्यामुळे ती पण खुष होउन जातात, तेव्हा बरेचदा मला या अनाथ मुलांची आठवण होते. असे वाटते की आपल्या मुलांची घरी आपण किती काळजी घेतो, लाड करतो तेव्हा वाटते की या अनाथ मुलांना पण गरज आहे, आई-वडिलांची, प्रेमाची, काळजीची, लाडाकोडाची, एका सुरक्षित घराची.
लोक हौसेने कुत्री मांजरं पाळतात, त्याना अन्न, वस्त्र, निवारा, प्रेम देतात (अर्थात यात काही चूक आहे असे नाही) पण तेव्हा असं वाटतं की किती विरोधाभास आहे हा जीवनातला. ते पाळीव प्राणी जास्त lucky आहेत या अनाथ मुलांपेक्शा. आणि
सगळ्यात कहर म्हणजे अनाथ आश्रमातले गैरव्यवहार, शोषण, कुपोषण, मुलांची विक्री पाहिले की वाटते की बिचार्यांना तिथेही सुखाने जगू दिले जात नाही. किती खालच्या स्तराला गेला आहे माणूस.
Anyways आपल्याला सर्व सुखं दिल्याबद्दल देवाचे आभार मानावे आणि गरजू/गरीब/अनाथ लोकांना शक्य तितकी आपल्या परीने मदत करावी. इतकच आपण करु शकतो.
पूर्वी कोणीही भिक मागणारे आले की मला वाटायचे की या धडधाकट लोकांना का भिक घाला, हे काम का नाही करत etc. किंवा ही लेकूरवाळी बाई भिक मागती आहे खरी पण कशावरून ती १ प्रोफेशनल भिकारी नाही/ आणि ते मूल पण तिचे आहे की नाही कोण जाणे/ ती त्या मूलाला भिकेतले काही देत असेल की नाही etc. So why should i help these people.
पण नंतर नंतर माझे मत बदलत गेले. मला आता असं वाटतं की may be त्यातले काही लोक खरच गरजू असतील. car मधून जाताना बाहेर भिक मागणारे हात पाहिले की असं वाटतं की आपण भिकार्यांबद्दल असं बोलू शकतो आहोत because fortunately we are at this side of the car glasses (i.e.we are in the car. We are at safer/positive side). Unfortunately आपण त्यांच्या जागी असतो तर. ... छे.. अशी कल्पनाही करवत नाही.
May be या लोकांवर परिस्थितीच वाईट आली असेल. May be they dont have option. Or may be some people or we can say most of the people are doing it purposely. यातले बरेच लोक fake असतीलही. पण काही खरच गरजू असतील. so it should not happen that या fake लोकांमुळे गरजू लोकंवर अन्याय होता कामा नये. या भिकारी लोकांना पण जमेल तेव्हा जमेल तितकी मदत मी केली पाहिजे. कारण कदाचित ८०% वेळा ती मदत वाया जाईल पण at least २०% वेळा तरी गरजू लोकांपर्यंत मदत पोचेल. I think i should help those people because luckily we are in a better position/condition than them.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Mon, 11/29/2010 - 14:58
नवीन
आपले म्हणने पटते आहे ....
पण मदतीला ठोस असे रुप आणले पाहिजे असे माणतो मी ..
मदत म्हणजे गाडि शेजारी भिकारी आला.. त्याच्या चेहर्यावरील करुन भाव मनाला पिळवटुन गेले ...
गाडीची काच खाली झाली .. आणि मनात आलेल्या विचारांची १ रुपया किंमत करुन सिग्नल सुटल्यामुळे आपण पुढे गेलो ..
असेच होत आलेले आहे कायम ...
अवांतर : काही अनुभव
अनाथ आश्रमातले माझे अनुभव खुप वेदनात्मक आहेत .. हळव्या मनामुळे सध्या तरी मी तेथे जाणे बंद केले आहे ...
एकदा एका वृद्धाश्रमात गेलो असताना खेळत होतो सर्वांबरोबर आम्ही ..
मालवणच्या आजींना गाणे म्हणन्याची खुप हौस ..
कोकणी भाषेत त्यांनी सुरु केले .. मालवन माझे गाँव चित्रा माझे नाव ... त्यांना मी साथ देत होतो माझे फ्रेंडस ही होते ..
आणि त्या आज्जींच्या डोळ्यातील गावाकडचे भाव खुप हेलावुन टाकणारे होते ...
आणि तितक्यात कळाले शेजारील काकांचा वाढदिवस आहे .. म्हणुन त्यांची सुन्/मुलगी त्यांच्या १०-१२ वर्षाच्या नातीला घेवुन आली होती .. त्यांना पाहताच त्या काकांनी जी रडायला सुरुवात केली .. अरेरे मन हेलावुन गेले ..
या लोकांना काय हवे आहे तो फक्त मदतीचा हात नाही तर माणुसकीची कास घेवुन प्रत्येकाने आपले करत्व्य पार पाडले पाहिजे असे मनापासुन वाटते ..
माझी मदत खुप तुटपुंजी आहे .. मी मागे ठरवले होते एका मुलाचा शिक्षण खर्च चालवायचा पण ते मला शक्य नाही झाले पैश्यामुळे .. तेंव्हाच ठरवले आधी आपण व्यवस्थीत उभे राहयचे तेंव्हाच आपण आधार देण्यालायक होउ ...
बाकी समाजाप्रतीची करत्व्याची भावना कायम मनात असते पण त्याचे बाजारीकरण समोर पाहिले की मन खिन्न होते ....
----------
पटपट जे मनात आले ते लिहिले .. क्रुपया असंबंध वाटल्यास दुर्लक्ष करावे ..
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 11/26/2010 - 12:47
नवीन
शुचिता म्हणजे काय?
- Log in or register to post comments
च
चंद्रू
Fri, 11/26/2010 - 13:23
नवीन
भाऊ समर्थ नावाच्या एक कविने लिवलं होतं.
पोटात अन्न नाही म्हणून आईच्या थानाना दुध नाही.
. पोराला दुध पाजता यावं म्हणून आयांना बाजारात ऊभं राहून
आपलं शरीर विकावं लागतं. अशा देशाच्या महान संस्कृतीवर मी लघवी केली आहे.
- Log in or register to post comments