Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वाभिमानाचे अग्निकुंड पेटलेच पाहिजे...

अ
अप्पा जोगळेकर
Fri, 11/26/2010 - 10:40
🗣 29 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4684 वाचन

💬 प्रतिसाद (29)
न
नितिन थत्ते Fri, 11/26/2010 - 10:49 नवीन
हा लेख राहतो का उडतो ते पाहतोय. >>मत देताना रस्ते आणि पाणी एवढेच मुद्दे दिसतात आम्हाला, मग निवडणूक पंचायतीची असो नाही तर लोकसभेची! परवाच सर्वांनी "विकास महत्त्वाचा असे मतदारांनी आता ठरवले आहे" म्हणून बिहारच्या मतदारांचे कौतुक केलेले पाहिले.
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Fri, 11/26/2010 - 10:55 नवीन
हा लेख राहतो का उडतो ते पाहतोय. हे वाचून मला तुमचा आयडी रहातोय का उडतोय त्याची काळजी वाटाया लागली आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Fri, 11/26/2010 - 10:59 नवीन
माझ्या आयडीची काळजी करण्यापेक्षा देशात स्वाभिमान कसा जागृत करावा याची काळजी करा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
छ
छोटा डॉन Fri, 11/26/2010 - 11:03 नवीन
श्री. थत्ते ह्यांच्या आयडीची काळजी रन्गरावांनी करु नये असे सांगतो. त्यांनी आधी 'स्वाभिमान जागृतीचे' बोलावे, एकदा तो जागृत झाला की त्यावर असे १काय पण १००० आयडी कुर्बान :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
र
रन्गराव Fri, 11/26/2010 - 11:10 नवीन
एकदम माझ्या मनातल बोलतात थत्ते साहेब. तुमाला हेच सांगायच होतं जरा शब्द घावले नाहीत एवढ्च. दुरूस्ती करून परत - लेखाची काळजी करण्यापेक्षा देशात स्वाभिमान कसा जागृत करावा याची काळजी करा. शब्द सुचवल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
र
रन्गराव Fri, 11/26/2010 - 10:53 नवीन
काय अप्पा कुणाला उठवताय तुमी? ए. सी. मध्ये कसला निवांत बसलोय मी. आनी काय तुमी स्वाभिमानाचे चटके घ्यायला सांगताय. प्रगती, स्थैर्य, अहिंसा ह्यांचा महत्व कधी कळनार तुमासनी? ये वक्त नही है लढनेका, ये वक्त हे डॉलर कमानेका, घर का EMI भरनेका, चान्स मिला तो ऑनसाईट जानेका, दुनिया शांती संदेश देनेका, ओबामाके साथ हात मिलानेका, राहूलबाबा के साथ सपने देखनेका, राजके साथ अपने ही लोगो को मारणेका, ॑अडवाणीके साथ मंदीरपर कलटी मारणेका, फिरभी GTalk status ;"मेरा भारत महान, " यईच लगानेका! आम्ही सज्जन भोळे बापडे लोक हाये, आमासनी हानामार्या शिकवू नगा!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 11/26/2010 - 10:59 नवीन
>>ए. सी. मध्ये कसला निवांत बसलोय मी. +१, हेच म्हणतो. आम्ही इथे छानपैकी ए.सी.त बसलो आहोत, गाणी ऐकत आहोत, कॉफी पित आहोत. ऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑ .... कसला मस्त कंटाळा आला आहे. >>आनी काय तुमी स्वाभिमानाचे चटके घ्यायला सांगताय. प्रगती, स्थैर्य, अहिंसा ह्यांचा महत्व कधी कळनार तुमासनी? होय ना, आम्हाला 'स्वाभिमान' म्हणजे काय अज्याबात कळत नाही. इनफॅक्त तो कशाशी खातात हे ही माहित नाही. कृपया रन्गराव ह्यांनी 'स्वाभिमान' म्हणजे नक्की काय हे आम्हाला सम्जावुन द्यावे. तसेच स्वाभिमान समजण्यासाठी ए.सी. चालत नसेल तर ते ही कळवावे म्हणजे आम्हाला योग्य ती सोय करता येईल, बाकी इतर आवश्यक बाबीही समजुन द्याव्यात. एकदा हे समजले की पुढे यज्ञकुंड किंवा अग्नीकुंड जे काय आहे ते पेटवायला हरकत नाही असे सांगतो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
र
रन्गराव Fri, 11/26/2010 - 11:06 नवीन
>>कृपया रन्गराव ह्यांनी 'स्वाभिमान' म्हणजे नक्की काय हे आम्हाला सम्जावुन द्यावे. गरीबाची थट्टा करता क राव? आमासनी कळाल असतं तर लेखच लिवला नसता होय लांबलचक! आजकाल तर असा वाटाया लागलय, स्वाभिमान देवासारखा असतो. सगळे सांगत्यात देव असतो म्हणून पण दिसत तर कधीच नाय. स्वाभिमानाच पण असच झालय, सगळे म्हण्त्यात आमाला हाय म्हणून पण मला कसा नाय घावला अजून कुणास ठोस. जरा डोक कमीच दिलेल दिसतय देवान मला! बर बाकी कुणाला माहीती अस सांगा बाबानू. देव तुमच्या पोराबाळांच बर करेल ( अजून झाली नसतील तर व्हायची सोयबी करेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Fri, 11/26/2010 - 11:13 नवीन
>>आजकाल तर असा वाटाया लागलय, स्वाभिमान देवासारखा असतो. आत्ता आलात ना मुद्द्यावर ! ही व्याख्या पटण्यासारखी आहे, संकटात किंवा अडचणीच्या परिस्थीत त्या अदृष्य देवासारखा ( ह्याला मानत नसाल तर अजुन काही ) तो सदैव तुमच्या पाठीशी असतो व तोच तुम्हाला त्यातुन मार्ग काढण्यासाठी धैर्य देतो. असो. बाकी ते ए.सी. वगैरेची काळजी सोडा बरं का, क्रांती किंवा विकास नेहमीच रक्त वाहुन आणि घाम गाळुन करावा लागतोच असे नाही. मात्र आपण असे वारंवार हिणवल्याने एक दिवस ए.सी. आणि नॉन ए.सी. गटात संघर्ष उभा राहिला तर त्याचे सर्वात जास्त पाप आणि जबाबदारी तुम्हा लोकांना उचलावी लागेल. * तुम्ही लोक : जे वारंवार ए.सी. वाल्यांच्या क्षमतेवर आणि राष्ट्रप्रेमावर शंका घेतात आणि इतर नॉन वर्गात ही भावना हळुह़ळु मजबुत करण्यास सहाय्य करतात. बाकी असो. - छोटा डॉन अवांतर : माझा अशा विषयांवारचा कोणताही प्रतिसाद थट्टा करणारा नसतो, काही वेळा त्यात 'तिरकसपणा' असतो इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
र
रन्गराव Fri, 11/26/2010 - 11:26 नवीन
बाकी ते ए.सी. वगैरेची काळजी सोडा बरं का, क्रांती किंवा विकास नेहमीच रक्त वाहुन आणि घाम गाळुन करावा लागतोच असे नाही. मात्र आपण असे वारंवार हिणवल्याने एक दिवस ए.सी. आणि नॉन ए.सी. गटात संघर्ष उभा राहिला तर त्याचे सर्वात जास्त पाप आणि जबाबदारी तुम्हा लोकांना उचलावी लागेल. १००% मान्य! * तुम्ही लोक : जे वारंवार ए.सी. वाल्यांच्या क्षमतेवर आणि राष्ट्रप्रेमावर शंका घेतात आणि इतर नॉन वर्गात ही भावना हळुह़ळु मजबुत करण्यास सहाय्य करतात. बाकी असो. जरा स्पष्टीकरण देतोच आता. मी ही ए. सी वालाच आहे गेल्या पाच वर्षापासून, आणि जे काही वर लिहिलं आहे ते स्वतःला आधी लागू आहे ह्याची जाणीव आहे. स्वतःला आरशात आणि आजूबाजूच्या बहुतांशांना( सगळ्यांनाच नाही, अपवाद कमी असले तरी आहेत) बघितल्यावर जे स्पष्ट दिसतं ते नाकारू शकत नाही मी, कदाचित बर्याच जनांना आवडल नाही तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
इ
इंटरनेटस्नेही Fri, 11/26/2010 - 11:12 नवीन
बीअर प्या, चिल रहा.. कशाला टेन्शन घेताय मित्रांनो? चिलॅक्स! = चिल + रिलॅक्स!
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 11/26/2010 - 11:39 नवीन
काय करावं..
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Fri, 11/26/2010 - 12:05 नवीन
अप्पाजोगळेकर काका, काळजी करू नका, खूप खूप अवघड आहे. पण प्रयत्न चालू आहेत. काहीही विधायक करायला हाती घेतले कि हजार अडचणी आल्याच म्हणून समजा. पण हे मन काही ऐकत नाही. सुर्योदयापुर्वीच पुन्हा नव्याने, नवी लढाई लढायला तयार होते. (आपल्या सारख्यांचे असे लेख वाचूनच असेल होत असेल कदाचित. )
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 11/26/2010 - 12:17 नवीन
अग्निकुंड पेटले की सांगा राव कोणीतरी, एक शिग्रेट पेटवुन घेतो त्यावर.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 11/26/2010 - 13:02 नवीन
म्या बी योक बीडी पेटवुक म्हंतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नगरीनिरंजन Fri, 11/26/2010 - 12:20 नवीन
ज्याने त्याने स्वतःचे काम मनःपूर्वक करणे पुरेसे आहे. मग काहीही पेटवायची गरज पडणार नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
च
चंद्रू Fri, 11/26/2010 - 12:54 नवीन
स्वाभिमान आता थोडा बाजूला ठेऊया. रस्ते, पानी, विज इ. विकासातच आपला “विकास” आहे हे बिहारच्या निवडणुकींनंतर स्वाभिमानवाल्यांनाबी यकदम पटलंय. आता विकासासाटी लोकं जात-धर्म पन इसरायला लागालेत म्हणे. चांगलंच आहे. स्वाभिमान बाळगून खायाचं काय? विकासात खायाची भरपूर संधी हाय. ७०/८० टक्के खायाचं २० टक्के विकास करायचा. लोकानचं भलं करायचा हा नवीन फंडा हाय. म्हणजे, नेत्यांचं भलं झालं की लोकांनला बी बरं वाटतंय. तुमी खावा पन आमालाबी थोडं द्यावा येवडंच लोकानला हवय. तुमाला खायाला दिलं नाय तर आमाला थोडंबी मिळणार नाय. म्हनून निवडणूकीत जरूर तुमाला निवडून देऊ. सौदा पक्का! आता निवडनुकीत दुसरं काय र्‍हायलंय? लोकशाही वगैरे ? पारदर्शकतेच्या...............ड. कुल्फी खावा, चिल र्‍हावा.(बीअर परवडत नाय).
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 11/26/2010 - 12:56 नवीन
साला आमचे ढकलपत्र आता नुसते विझलेले कोळसे झाले आहे. नवीन ढकलपत्र आयडी तयार करावा लागतोय कि काय .असे मेल आम्हाला कधी आलेच नाहीत.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 11/26/2010 - 14:57 नवीन
अतिषय जबरदस्त शब्दात मुळ लेख आहे .. खरेच अंगात जोर निर्मान करतो ... जणतेला असा जोर देणारे ही आता कोणी उरत नाहि आणि दिला तरी आपल्याच मश्गुलीत सगळे असतात ... मेरा भारत महान आहे हे कधी कधी अजीबात वाटत नाही .. अवांतर : चर्चे वर उगाच टाकला हा छानसा धागा ..
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 11/26/2010 - 15:03 नवीन
खरेच अंगात जोर निर्मान करतो ... २७ तारीख सुरु झाली कि लोक सारे विसरति.
  • Log in or register to post comments
ई
ईन्टरफेल Fri, 11/26/2010 - 16:32 नवीन
वाचतोय मस्त आहे ले़ख ! (मुर्दाड मराठा)
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Fri, 11/26/2010 - 17:19 नवीन
ठाणा स्टेशनच्या बाहेर आज २६/११ साठी मेणबत्त्या लावल्या होत्या.... आणि बॅक ग्राउंडला स्टेरिओवर गाणे लावले होते.... दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल... आता एवढी विनोद बुद्धी असताना कुठलं अग्निकुंड पेटवणार?
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Sat, 11/27/2010 - 08:05 नवीन
मत पटले. राष्ट्रव्रत घ्या
  • Log in or register to post comments
P
Pain Sat, 11/27/2010 - 08:53 नवीन
आम्ही मतदानाच्या दिवशी पिकनिकला जातो, किंवा आमची मतं विकतो, किंवा १८ पूर्ण झाली तर नावच नोंदवत नाही... सर्व पक्षांचे लोक भ्रष्ट असताना कोणालाही मतदान केले किंवा नाही केले तर काय फरक पडतो? लोकशाहीत प्रजेच्या लायकीवर किंवा नालायकीवर राजा ठरतो. थोडी सुधारणा: लोकशाहीत "बहुसंख्य" प्रजेच्या लायकीवर राजा ठरतो. राष्ट्राचे चारित्र्य, स्वाभिमान हा लोकांच्या चारित्यावर अवलंबून असते. आपल्या बाबतीत ते हजारो वर्षांपूर्वीच लुप्त झाले आहे. थोड्या लोकांकडे हे गुण असतील, तर त्याचा देशाला फायदा होण्याऐवजी इतर नालायक बहुसंख्यांचाच त्यांना त्रास होतो. आम्हाला स्वाभिमानी निडर नेतृत्त्व हवे असेल, तर जागरूक राहिले पाहिजे. आत्ताच्या नेत्यांमध्ये सगळेच बुणगे दिसत असतील, तर स्वत:च राजकारणात उतरले पाहिजे. अव्यवहार्य. तुम्ही स्वत: हे करून पाहिले आहे का ?
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Sun, 11/28/2010 - 04:37 नवीन
अव्यवहार्य. तुम्ही स्वत: हे करून पाहिले आहे का ? हा लेख मी लिहिलेला नाही हे मी सुरुवातीसच लिहिले आहे. तुमचा प्रश्न या लेखाच्या लेखकाला उद्देशून असेल तर ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
P
Pain Tue, 11/30/2010 - 03:04 नवीन
हो. लेखकास उद्देशून आहे. त्याने किंवा त्याचे निकटवर्तीय, समर्थक किंवा कुठल्याही ज्ञानी /अनुभवी व्यक्तीने उत्तर दिले तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
ग
गांधीवादी Sun, 11/28/2010 - 05:50 नवीन
जुन्या काळाच्या कथांमध्ये देवाधिदेव सुद्धा इतक्या पटापट गायब होत नसत, पण आजच्या कलियुगात मात्र गायब होणे आणि गायब करणे हे एक जब्बरदस्त हत्यार राजकारण्यांनी वापरायला सुरुवात केलेली आहे. आज आदर्शाच्या घोटाळ्याचे महत्वपूर्ण कागदपत्र गायब आहेत, उद्या CWG ची कागद पत्रे, परवा 2G स्पेक्ट्रम ची कागदपत्रे, एवढे कमी तर त्या मागील हि माणसे सुद्धा गायब होतील. नाहीतरी चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करून दुसर्या देशात जाऊन निवांत राहत असलेली काही मंडळी ऐकिवात आहेतच. नव्या राजकारणाचे नवे हत्यार : गायब. अवांतर : आमच्या कंपनीत आम्ही आमच्या कामाचे काही कागदपत्रे गुणवत्ता विभागास तत्परतेने उपलब्ध होण्यासाठी ती कागदपत्रे संगणकावर उतरवून घेतो. त्याने एक फायदा होतो, हि कागदपत्रे लागलीच उपलब्द होतात आणि ती साठवून ठेवण्याची जागाही वाचते. बर हे करून ती लाखो कागदपत्रे वर्षानुवर्षे एका (ठीक दर्जाच्या) तबकडीत सामावून ठेवता येतात. अशी संकल्पना आमच्या कंपनीत राबविणे सुरु केल्यामुळे मला त्या महिन्याचे 'निरंतर सुधार' हे पारितोषिक देखील मिळाले होते. Continuous improvement award : For storing the check lists in soft copies. एक जोक : आजचे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. जनतेच्या हातात माहिती अधिकाराचे शस्त्र आहे, पण माहिती गायब आहे.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 11/28/2010 - 08:16 नवीन
काहीतरी पेटवायचेच असेल तर स्वतःची शेपूट पेटवा. त्याला कोणाचीच हरकत असणार नाही. एकदा ती पेटली की तुम्हाला काहीतरी करावेच लागेल.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 11/28/2010 - 08:21 नवीन
रद्द
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा