Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंदमानमधुन सावरकरांचे नाव काढले...

अ
अवलिया
Sun, 11/28/2010 - 07:40
🗣 84 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14141 वाचन

💬 प्रतिसाद (84)
न
नितिन थत्ते Fri, 12/03/2010 - 03:13 नवीन
=)) हा ज्योक शॉल्लेट आहे ब्बॉ. विसोबा खेचर यांना 'तात्या' हे टोपणनाव वापरायला बंदी घालावी हे बरे. ;) ते काहीबाही लिहिणार आणि सावरकरांची फुकट बदनामी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
च
चिंतामणी Fri, 12/03/2010 - 04:12 नवीन
विसोबा खेचर यांना 'तात्या' हे टोपणनाव वापरायला बंदी घालावी हे बरे. Wink ते काहीबाही लिहिणार आणि सावरकरांची फुकट बदनामी. नितिन थत्ते याच्याशी (बहुदा प्रथमच) सहमत. पण हा विनोद "खुद्द तात्यांनी" असे लिहील्यामुळे झाला हे लक्षात घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
इ
इन्द्र्राज पवार Fri, 12/03/2010 - 04:53 नवीन
".....हा विनोद "खुद्द तात्यांनी" असे लिहील्यामुळे झाला हे लक्षात घ्या...." ~ बाप रे ! अन् मी ज्या क्षणाला श्री.जोगळेकर यांचे 'ते' वाक्य वाचले त्या वेळेपासून अक्षरशः सावरकर 'व्यक्ती आणि इतिहास' यावर अधिकारवाणीने बोलणार्‍या (स्थानिक) किमान अर्धा डझन ज्येष्ठांना प्रत्यक्ष भेटून हे "बाटली फोटो" प्रकरण यावर विचारले आणि अकारण त्याना गोंधळात पाडले. दोन रात्री गुगलिंग आणि विकोबाही केले...पण उत्तर शून्य (मूळात आडातच नव्हते, तर पोहर्‍यात येणार कसे...असाच प्रकार झाला). मी स्वतःला 'सावरकरांचे साहित्य आणि जीवनशैली' वाचणारा व त्यावर बर्‍यापैकी लिहू शकणारा असे मानत असल्याने श्री.आप्पांच्या त्या वाक्याने चांगलाच सटपटलो होतो...म्हणून त्यावर काही पाहणी आणि अभ्यास करूनच इथे उत्तरासाठी यावे असे ठरविले होते. पण आता 'ते' करणारे 'तात्या' हे दुसरेच आहेत असे दिसते. असो. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
ग
गवि Mon, 11/29/2010 - 07:01 नवीन
मूळ बातमी आणि इतर तपशील वाचून असं वाटतं की हे कोणाच्या आदेशाने झालेले नसून निष्काळजीपणामुळे झाले असावे. मुद्दाम नाव काढायला लावणे आणि ढिल्या कारभारामुळे ते राहून जाणे यात फरक आहे आणि संसदेत इतका गोंधळ झाल्यामुळे ते सर्वांच्या दृष्टीस पदले आहेच. तर ते आता परत इन्क्लूड करण्यात येईल असे वाटते. बाकी मुद्दाम केलं असेल तर अत्यंत नीच कृत्य आहे. सावरकर हे काही पुराणकालीन व्यक्तिमत्व नव्हे की त्यांचे कार्य धूसर /शंकास्पद आणि पोथ्यांमधे हरवलेले असावे. आत्ता आत्ता पर्यंत त्यांना समोरून पाहिलेले आणि ओळखणारे लोक अस्तित्वात होते. आजही माझ्या मागच्या पिढीने त्यांना जिवंत पाहिलंय. मी स्वतः त्यांच्या निवासस्थानाजवळून (पतित पावन मंदिर) शाळेत असताना खूपदा मधल्या सुट्टीत गेलो आहे. तिथे स्थानिक लोकांकडून त्यांच्या कथा ऐकल्या आहेत. अंदमानला जाऊन त्या कोठडीत माझ्याही डोळ्यात पाणी आलं आहे. त्यांनी जे केलं त्या कर्तबगारीचे एक दोन साक्षीदार कदाचित अजून जिवंतही असतील. तेव्हा असल्या फालतू शंका घेणं हे गलिच्छ आहे. नजरचूकच असावी अशी आशा.
  • Log in or register to post comments
य
यकु Mon, 11/29/2010 - 07:45 नवीन
असंही असू शकेल/ होऊ शकेल. कदाचित ही प्रशासनीक कुचराई / नेहमीचाच गलथानपणा म्हणून जाहीर केला जाईल; काही सांगता येत नाही. कारण काहीतरी करून सारवासारव करावी लागणारच. या मुद्यावरूनच आता दुसरी वेळ आहे. दरवेळी भाजप/शिवसेना काय करते याकडे लोक लक्ष ठेऊन असतात. पण आता शासनाने काहीच पाऊल न उचलल्यास सावरकरांच्या कार्याची/विचारांची आणि भोगलेल्या कष्टांची चाड असलेल्या प्रत्येकाने (यात हे लिहीणारा आणि वाचणारेही आले) दिल्लीत झोपा काढणार्‍या त्या संबंधीत मंत्र्याला आणि शक्य झाल्यास पंतप्रधानांना जाब विचारायला हवा अशी माफक अपेक्षा ~! काढू म्हणे आपण दोन दिवस दिल्लीच्या रस्त्यांवर. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना काय वाटते ते एकदा खणकावून कळू द्या ना त्यांनाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
K
kamalakant samant Mon, 11/29/2010 - 10:13 नवीन
अ॑दमानातून सावरकरा॑चे नाव काढले, हे वाचून नक्की काय वाटले ते सा॑गता येत नाही. राग ,त्वेष,खेद्,हतबलता,भविष्याची चि॑ता या सर्व गोष्टी॑नी काहूर माजले. आणि आम्ही फक्त पत्रोपत्री करण्याचा विचार करतो.दुसरे काहीच करु शकत नाही. त्या धुर॑धरानी दिलेला स॑देश कुठल्या अडगळीत पडला आहे कोण जाणे ? लेखण्या मोडा आणि ब॑दूका हातात घ्या. प्राप्त परिस्थितीत ते शक्य नाही हे दिसत असूनही निदान लेखणिनी तरी--- याल तर तुमच्या सह,न याल तर तुमच्या विना,आणि विरोध कराल तर तो मोडून काढून ---- हा स॑देश द्यायला काय हरकत आहे ? मला असे वाटते-मार्सेल्स ब॑दराला त्या॑चे नाव द्यावे अशी मागणी फ्रान्स सरकारकडे करावी. पण अशीही श॑का येते की आपले सरकार अ॑दमान बाबतीत निष्क्रीय राहील आणि फ्रान्स सरकार मात्र हो म्हणेल.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 11/29/2010 - 11:07 नवीन
वा! मला असे वाटते-मार्सेल्स बंदराला त्यांचे नाव द्यावे अशी मागणी फ्रान्स सरकारकडे करावी. पण अशीही शंका येते की आपले सरकार अ॑दमान बाबतीत निष्क्रीय राहील आणि फ्रान्स सरकार मात्र हो म्हणेल. Hats off, Mr Samant! पण या धाग्यामुळे माझ्या समविचारांचे बरेच सभासद 'मिपा'वर आहेत हे वाचून बरे वाटले. यातले असे कित्येक सभासद आहेत जे मला 'व्यनि'वर प्रतिसाद देतात व 'लेखाखाली कां लिहीत नाहीं' असे विचारल्यास त्याचे कारण 'कुचेष्टा'च आहे हे समजते. 'मिपा'वर असे भीतीचे जे वातावरण आहे ते दूर करण्यासाठी लागतील ते प्रयत्न झाले पाहिजेत! मी एक-दोन संपादकांना एक महिन्यापूर्वी लिहिले होते. हे संस्थळ भयमुक्त असले पाहिजे. आज ते तसे नाहीं हे नक्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kamalakant samant
स
स्वानन्द Mon, 11/29/2010 - 13:32 नवीन
>>हे संस्थळ भयमुक्त असले पाहिजे काळे काकांशी अंशतः सहमत. कधी कधी चेष्टेचा अतीरेक होतो. पण मुळात भय वाटूनच्का घ्यावे. आपल्या मताला केला जाणारा विरोध जर 'केवळ खिल्ली उडवण्यासाठी' केलेला असेल तर सर्ळ दुर्लक्ष करावे. आणि जिथे विरोध करणार्‍याचा सूर कुचेष्टेचा नसेल तिथे उलट अधिक चर्चेला वाव राहतो. आणि आपल्याला माहीत नसलेला दृष्टीकोन नव्याने कळतो. चर्चेचा हाच तर फायदा आहे. जिथे मूळ विचार / विश्वास /श्रद्धा यांच्यात फरक असेल, तिथे 'we agree to disagree' म्हणून मोकळं व्हायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Mon, 11/29/2010 - 14:44 नवीन
'परी तू जागा चुकलासी' असे म्हणावेसे वाटते. कारण जे लोक माझ्याशी फक्त 'व्यनि'द्वारेच बोलतात त्यांच्याविषयी मी तसे लिहिले आहे, स्वतःबद्दल नाहीं. मी भीत असतो तर हे सगळं लिहिलंच नसतं, नाहीं कां! असो. मी स्पष्ट लिहिल्यामुळे माझ्यासारखाच विचार करणारे बरेच सहसभासद आहेत हे कळून मला खरंच आनंद झाला. आणि हा आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारणारा समुदाय वाढेल व त्यामुळे अशा जनसमुदायाच्या मतांना डावलता येणार नाहीं अशी शक्ती निर्माण होईल अशी आशा करून इथेच थांबतो. जिथे विरोध करणार्‍याचा सूर कुचेष्टेचा नसेल तिथे उलट अधिक चर्चेला वाव राहतो. आणि आपल्याला माहीत नसलेला दृष्टीकोन नव्याने कळतो. चर्चेचा हाच तर फायदा आहे. जिथे मूळ विचार / विश्वास /श्रद्धा यांच्यात फरक असेल, तिथे 'we agree to disagree' म्हणून मोकळं व्हायचं. फक्त सहमतच नाहीं तर विविध मतांचे मी स्वागतच करतो! फक्त "Attack the message, not the messenger" हे लक्षात ठेवले कीं बस्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द
अ
अर्धवट Mon, 11/29/2010 - 18:05 नवीन
च्यायला... काळेकाका.. आमी पाठींबा द्येतो तो तुमी मोजतच नाय का काय... अंमळ दुखावलो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
श
शिल्पा ब Mon, 11/29/2010 - 18:36 नवीन
तुम्हीच स्वताला अर्धवट म्हणवता...तुम्हाला कोण कशाला मोजील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
स
स्वानन्द Mon, 11/29/2010 - 19:29 नवीन
नाही नाही, मी ते तुम्हाला नाही तर केवळ व्यनी करणार्‍यासाठी म्हटलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
ध
धमाल मुलगा Mon, 11/29/2010 - 10:26 नवीन
चला, आज तात्याराव सावरकरांना वगळलं, उद्या शिवाजीमहाराजांनाही वगळा...किंवा 'ते महाराष्ट्रातील एक लुटारु होते' असं लहान पोरासोरांना शाळांमधून शिकवायला सुरुवात करा! आम्ही बसलोच आहोत इथे निषेधाचे पाऊस पाडायला.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 11/29/2010 - 10:29 नवीन
किंवा 'ते महाराष्ट्रातील एक लुटारु होते' असं लहान पोरासोरांना शाळांमधून शिकवायला सुरुवात करा! करा? झालंच आहे आधीच... चर्चप्रणीत एका शाळेतला किस्सा सांगितला तर विचारवंत आधीच आमच्यावर डाफरुन असतात ते अजुन डाफरतील... असो. आपलेच दात आपलेच ओठ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
छ
छोटा डॉन Mon, 11/29/2010 - 10:36 नवीन
अवलियाशी सहमत. मागच्यावेळी जेव्हा IGNOU & अलिगढ युनि. च्या पुढाकाराने जेव्हा नविन अभ्यासक्रम रचला गेला तेव्हा शिवाजी महाराजांची दखल ३-४ वाक्यात घेतली होती असे माहित आहे. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 11/29/2010 - 10:47 नवीन
काहीही करुन मुसलमान, ख्रिश्चनांना दुखवायचे नाही हे कॉन्ग्रेसचे धोरण आहे. सत्य मांडणारा जातीयवादी, हिंदुत्ववादी. आणि या कान्ग्रेसी भुमिकेला विचारवंतांचा पाठिंबा असतो. खरे तर हे असले युरोपी आणि अमेरिकी विचारांवर जगणारे विचारवंत म्हणजेच जिथे खाल्ले तिथेच ताटात ओकणारे नराधम हीच भारताची खरी समस्या आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सुधीर काळे Mon, 11/29/2010 - 10:52 नवीन
'ओकण्या'च्या जागी 'वरिजिनल' वापरा कीं! पण 'समझनेवाले समझ गये हैं, ना समझे?' इतना नासमझ कोई नहीं है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सुधीर काळे Mon, 11/29/2010 - 10:48 नवीन
नानासाहेब, लिहा ना! आम्ही वाचलेले नाहीं हे 'प्रकरण'!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विवेक मोडक Mon, 11/29/2010 - 12:09 नवीन
@धमु, आपले अत्यंत लाडके चाचा नेहरु या आधीच शिवाजीमहाराजांना वाट चुकलेला देशभक्त म्हणुन गेले आहेत. आणि तात्याराव सावरकरांचा नेहरु गांधी घराण्याशी संबंध नसल्यामुळे ते देशभक्त असुच शकत नाहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
स्वैर परी Mon, 11/29/2010 - 17:29 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक मोडक
प
परिकथेतील राजकुमार Mon, 11/29/2010 - 11:08 नवीन
सकाळीच वाचलेले आणि फेसबुक स्टेटसला डकवलेले 'If pro is the opposite of con, is progress the opposite of congress? (Richard Lederer)' हे वाक्य आठवले.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Mon, 11/29/2010 - 19:46 नवीन
'If pro is the opposite of con, is progress the opposite of congress? आवडले.
  • Log in or register to post comments
अ
अविनाश कदम Mon, 11/29/2010 - 20:34 नवीन
.........त्यांचा हिंदुत्ववाद पटला त्यांना त्यांची विज्ञाननिष्ठा पटली नाही आणि ज्यांना त्यांची विज्ञाननिष्ठा पटली त्यांना त्यांचा हिंदुत्ववाद पटला नाही...... घोटाळा हा झाला की सावरकर विज्ञननिष्ट होते हे खरे पण दुर्दैवाने त्यांचा हिदुत्ववाद विज्ञाननिष्ट तत्त्वावर आधारीत नव्हता. समाजाकडे विज्ञननिष्ट दृष्टीकोनातून पहाणारा हिदुत्त्ववादी होऊ शकत नाही. हा विरोधाभास समजला नाही तर सावरकर समजणे कठीण.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 11/29/2010 - 21:05 नवीन
सावरकर विज्ञननिष्ट होते हे खरे पण दुर्दैवाने त्यांचा हिदुत्ववाद विज्ञाननिष्ट तत्त्वावर आधारीत नव्हता
मग नक्की कशावर आधारलेला होता? स्पष्टीकरण केल्यास चांगले होईल.
समाजाकडे विज्ञननिष्ट दृष्टीकोनातून पहाणारा हिदुत्त्ववादी होऊ शकत नाही.
हीच तर मोठी गफलत आहे ना.कारण हिंदू धर्म म्हणजे काय याची एक व्याख्या नाही. विविध आचारविचारांचे, रूढीपरंपरांचे लोक एकाच वेळी हिंदू असू शकतात. म्हणजे उपास,पूजाअर्चा, श्राध्दपक्ष आणि विविध कर्मकांडे करणारे पण हिंदूच आणि माझ्यासारखे कर्मकांडामध्ये विश्वास न ठेवणारेही हिंदूच. सिध्दीविनायकाची पूजा करणारे पण हिंदूच आणि मरिआईची पूजा करणारे आदिवासी पण हिंदूच. ख्रिस्ती लोकांमध्ये येशू ख्रिस्त आपल्या पापांकरता क्रुसावर चढला हे मान्य नसेल तर तो मनुष्य ख्रिस्ती असू शकत नाही कारण तो ख्रिस्ती धर्माचा मूळ विश्वास आहे.पण हिंदूंमध्ये अशी एकही गोष्ट नाही की जी केली अथवा केली नाही तर तो मनुष्य हिंदू नाही. अर्थात यात काहीही वावगे नाही. मी वैयक्तिक पातळीवर याच aproach चे समर्थन करतो. पण यातून होते काय की हिंदू म्हणजे नक्की कोण आणि हिंदुत्व म्हणजे नक्की काय याची स्पष्ट व्याख्या करता येत नाही. तेव्हा या सगळ्या जंजाळात सावरकरांची हिंदू शब्दाची व्याख्या म्हणजे "दक्षिणेतील समुद्रापासून उत्तरेतील हिमालयापर्यंत पसरलेल्या या भारत देशाला जो आपली पित्रुभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू". त्या अर्थाचा संस्कृत श्लोकही आहे. आणि त्यापुढे जाऊन हिंदूंनी विज्ञान हाच धर्म मानावा असे त्यांचे मत. म्हणजे कर्मकांडांना फाट्यावर मारावे.सावरकरांची सत्यनारायण पूजा, गाईची पूजा यावरील मते तर प्रसिध्दच आहेत आणि त्यांच्या विज्ञाननिष्ठ निबंधांमधील विचार भल्याभल्यांची भंबेरी उडवतील असेच आहेत. तरीही सर्वसमावेशक हिंदू परंपरेप्रमाणे एकाही देवाची मूर्तीस्वरूपात पूजा केली नाही, एकही कर्मकांड केले नाही,विज्ञानालाच धर्म मानले तरी असे करणारा सुध्दा हिंदू म्हणूनच स्वत:ला म्हणवून घेऊ शकतो आणि विज्ञाननिष्ठ लोक दिसले तर विटाळ होऊन अंघोळ करणारे सुध्दा हिंदूच. तेव्हा "समाजाकडे विज्ञननिष्ट दृष्टीकोनातून पहाणारा हिदुत्त्ववादी होऊ शकत नाही" असे म्हणताना कोणते "हिंदुत्व" तुम्हाला अपेक्षित आहे? कारण या वाक्यातच मुळात विसंगती वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश कदम
श
शिल्पा ब गुरुवार, 12/02/2010 - 22:36 नवीन
एक लक्षात घेतले पाहिजे कि हिंदू धर्म इतरांसारखा कोता नाही...अमुक एक केले कि मी हिंदू असे किंवा उलटे असे नाही.. ज्या काही रूढी, कर्मकांडे आहेत ती त्या त्या समूहाने स्वतःची रोजी रोटी चालू राहावी म्हणून सुरु केलेत असे जाणवते. अमुक एकाच देवाची पूजा करा, अमकेच कपडे करा...इतर देवांची पूजा केली तर धर्मातून बाहेर हे प्रकार आपल्यात नाहीत..हिंदू धर्म खूप ओपन आहे... अभ्यासू माझे म्हणणे कदाचित व्यवस्थित मांडू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
च
चिंतामणी Fri, 12/03/2010 - 03:50 नवीन
हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत् हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५०) 'हिंदू' शब्दाची उत्पत्ती ... आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. आणि त्या जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू हयाच नावाने ओळखत असत. - (१९२३ हिं.,स.सा.वा. ६ : ५) हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले गेल्यापूर्वी हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ४६) हिंदू शब्दाची व्याख्या आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका । पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥ - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७५) सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७४) हिंदुधर्म 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे. - (१९४९ स.सा.वा. ३ : ७१३) स्वा.सावरकरांचे विचार समजुन घेण्यासाठी समग्र सावरकर वाङमय वाचावे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश कदम
न
नितिन थत्ते Fri, 12/03/2010 - 03:54 नवीन
हे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
व
विकास Fri, 12/03/2010 - 04:19 नवीन
आणि हे पण... ;) स्वगतः पर्यावरण विषयात काम करता करता स्वतःचे प्रतिसाद पण रिसायकल/रियुज करता येऊ लागले आहेत... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Fri, 12/03/2010 - 04:35 नवीन
आणि या "दुव्या"च्या खालचे प्रतिसादही वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ड
डावखुरा गुरुवार, 12/02/2010 - 19:12 नवीन
@ क्लिंटन तो संस्कृत श्लोक "जननी जन्मभूमी स्वर्गदपि गरियसी" हा आहे का? नसेल तर कोणता आहे?
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन गुरुवार, 12/02/2010 - 19:26 नवीन
माझ्या आठवणीप्रमाणे "आसिंधुसिंधुपर्यन्ता यस्य भारतभू: पितृभू पुण्यभूश्चैव सरैव हिंदूरिती स्मृत:" चू.भू.दे.घे. पण श्लोकाचा अर्थ वर दिल्याप्रमाणेच आहे आणि ते जास्त महत्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा
व
विकास गुरुवार, 12/02/2010 - 22:14 नवीन
हाच तो श्लोक आहे. मला वाटते सावरकरांनीच तो रचला होता. त्या संदर्भातील थोडक्यात प्रतिसाद येथे पाहू शकता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
सुधीर काळे Fri, 12/03/2010 - 04:18 नवीन
तो श्लोक "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि" असा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा
व
विकास Fri, 12/03/2010 - 04:22 नवीन
तो श्लोक "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि" असा आहे अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी ॥ असे राम लक्ष्मणाला म्हणतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा