२. कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
Book traversal links for २. कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
💬 प्रतिसाद
(5)
ग
गणेशा
Mon, 11/29/2010 - 10:30
नवीन
भाग १ : माझी मुलगी
तु मी अन ममा, आपला ग्रुप होता..
त्यात आपल्या दोघांचा Secrete groupहोता.
आता आपला ग्रुप फुटला आहे,
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..
तुझ्या रुमच्या दारावर लावलेल पोस्टर
It is my Mess and i Love it
पलंगावर पुस्तके उघडी, कपडे पडलेले,
बाजुला ड्राईंग बोर्ड,त्या वर ड्राईंग शीटसचे भेंडोळे
कॉंम्प चालु, अन त्यात तुझा अभ्यास चालु
ममान तुला पसाऱ्या बद्दल दटावणे,मग चिडचिड,
मी हळुच तुझी बाजु घेणे.."सासरी काय होईल देव जाणें"
तिच पुट्पुटणे....आता सार शांत आहे...
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..
तुझ्या कॉलेजची अन मी कारखान्याला जाण्याची एकच वेळ..
मग, ति सकाळची मरण घाई..माझ्या नकळत अंघोळीला जाणे.
१५-२० मिनीटे बाथरुम अडवणे..माझी चिड्चीड..आता फक्त आठवणी
कामावरुन दमुन आलो की..Whatzzz up dad..How was the day विचारण...
रात्री जेवण झाले कि Long ride ला जाण....... मग त्या कॉलेजच्या गमती सांगण..
पी.जे..ऎकविण..ति बरीस्ता कॉफि पिणे...ह्या साऱ्या आठवणी..
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..
तु म्हणजे घरातल आनंदाच कारंज होत..थुइथुइ उडणार..
आता तुझ्या मैत्रीणीचा थवा येत नाहि..चिवचिवाट नाहि..
तुझी रुम शांत आहे..पुस्तके कपाटात.कपडे पण घडी करुन.
ड्रॉईंग बोर्ड भिंतिला टेकुन उभा..कोपऱ्यात गणपती बाप्पा ध्यानस्थ
टेडी बिअर, आणी स्टफ टॉइज पलंगावर बसलेली, तुझी वाट बघत..
फ्रीज मधल्या दुधाच्या पिशव्या,अन बोर्न व्हिटाचा डबा तसाच..
कारण दुध पिणारी माऊ अमेरिकेला गेली आहे.
आम्हाला आठवण येते..पण आम्हि पण खुष आहोत..
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..
---- अविनाश कुलकर्णी
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Mon, 11/29/2010 - 13:22
नवीन
अतिशय सुंदर.............दोन्हीही कविता........
- Log in or register to post comments
प
प्रकाश१११
Tue, 11/30/2010 - 13:37
नवीन
अता रोज नाष्टा करताना काही मिस नाही होत
तरी पण बरेच काही मिस वाटते आहे
हे खूप खरे वाटले.आता तुझ्या कविता मला
माझ्याच वाटू लागल्या आहेत. आवडल्या दोन्ही कविता .
मनापासून !!.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 11/30/2010 - 13:50
नवीन
प्रकाश आणि निवेदिता ताई मनापासुन धन्यवाद ..
प्रकाश .. माझ्या कविता तुमच्या वाटु लागल्यात ही खुप छान प्रतिक्रिया आहे.. आवडली ..
परंतु आपल्या कविता ह्या जास्त खोल .. अआणि प्रत्येक बारीक बारीक गोष्टींचे पण उल्लेख केलेल्या असतात आणि त्या खुप उच्च असतात असे वाटते ...
आता नविन लेखन बंद आहे त्यामुळे तुर्तास मन रमावे म्हनुन जुण्याच कविता देत आहे ...
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Tue, 11/30/2010 - 14:07
नवीन
येवुद्यात नविन कविता
- Log in or register to post comments