सोवळ्यात सुतावर पाय?
💬 प्रतिसाद
(21)
क
क्रेमर
Mon, 11/29/2010 - 14:08
नवीन
सोवळ्यात असताना सुतावरूनही स्वर्ग गाठता येऊ नये म्हणून.
हे प्रश्न गंभीरपणे विचारलेले आहेत याची कल्पना आहे. मला या प्रश्नांविषयी काहीही कल्पना नाही.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 11/29/2010 - 14:25
नवीन
मला वाटते की सोवळ्यात असताना कापूस अथवा त्यापासून बनलेल्या कापडाला / धाग्यांना स्पर्श अलाउड नसतो. म्हणून... बाकी स्वतः सोवळे कधी पाळले नाही म्हणून नक्की कल्पना नाही.
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Mon, 11/29/2010 - 14:36
नवीन
माझ्या माहितीप्रमाणे सोवळे हे 'रेशीम' ह्या धाग्यापासुन बनते व तो एक नैसर्गिक प्रोडक्ट आहे.
बाकी इतर धागे एक तर प्राण्याच्या शरिरावरुन जबरदस्तीने धागे काढुन किंवा मग अ-नैसर्गिकरित्या ( आर्टिफिशयल ? ) बनवले जातात.
ह्यामुळे सोवळ्यात असताना फक्त 'रेशीमवाल्या कापडाचा' सोडुन इतर कोणताही स्पर्श चालत नसावा.
अर्थात ह्या माहितीत चुक-भुल असु शकते.
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
प
पांथस्थ
Mon, 11/29/2010 - 15:02
नवीन
रेशीम चा धागा बनविण्यासाठी रेशमाच्या किड्याला आपले प्राण गमवावे लागतात. हे प्राण्यांच्या शरिरावरुन जबरदस्तीने केस/धागे काढण्यापेक्षा जास्त क्रुर नाहि का?
असो. मला एक अवांतर प्रश्न पडला आहे. सोवळ्यात असतांना मिप्यावरच्या धाग्याचा स्पर्श चालतो का? ;)
- Log in or register to post comments
अ
अनाम
Mon, 11/29/2010 - 16:50
नवीन
माझ ज्ञान यथा तथाच आहे. पण एक एंका आली.
रेशीम हे रेशमाचा किडा जो कोष विणतो त्या पासुन मिळवतात. म्हणजे एक प्रकारे किटक जन्य.
(वर पांथस्तांनी म्हटल्या प्रमाणे ते मिळवताना त्या किड्याला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते.)
'सुत' हे मुख्यत्वे कपाशी (कापुस) पासुन बनवतात. जे माझ्या मते १००% नैसर्गीक आहे. (निदान रेशीम पेक्षा तरी.)
त्यामुळे छोटा डॉन यांचा मुद्दा पटला नाही.
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 11/29/2010 - 15:04
नवीन
सोवळ्यात फक्त रेशमी वस्त्र परिधान करण्यास परवानगी असते. नैसगीक धाग्याचे असल्याने. त्यात खोड काढायची म्हटली तर देवाला वस्त्रे, वाती मात्र कापसाच्या बर्या चालत?;)
माझ्या माहेरी सोवळे ओवळे फार असायचे पण आम्ही लहान असताना मुलांपुरती म्हणून त्यात सूट असायची.
आम्ही सोवळ्यातल्या आई आज्जीला बिनदिक्कतपणे शिवायचो. नंतर नंतर सोवळे हा प्रकारच बंद केला होता असे आठवते.
तोपर्यंत आई आज्जीच्या ठराविक रेशमी साड्या सणावाराच्या आधी धुवून वेगळ्या वाळत घातल्या जायच्या. सोवळे बंद झाल्यावर त्या साड्यांचा उपयोग धुतलेली धान्ये वाळवायला केला गेला.;) कारण ती वस्त्रे बरेचदा धुवून अगदी मऊ झाली होती.
- Log in or register to post comments
म
मी ऋचा
Wed, 12/01/2010 - 07:15
नवीन
>>देवाला वस्त्रे, वाती मात्र कापसाच्या बर्या चालत?
देवाची वस्त्रेही रेशमीच असतात सुती नाही...वाती चालतात कारण त्याचा स्पर्श देवाला होत नाही.
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 12/01/2010 - 07:56
नवीन
कापसाचे -०-०-०-०- अशा आकाराच्या माळेसारखे वस्त्र हाताने वळून बनवतात (बहुधा थोडे कुंकू बोटाला लावून) देवाला घालतात ते आठवते.
त्याचा स्पर्श देवाला होतो.
रेशमी वस्त्र नेहमीच असते का?
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 12/01/2010 - 08:34
नवीन
<<<रेशमी वस्त्र नेहमीच असते का?
परवडेल तसं..
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 12/01/2010 - 13:15
नवीन
गवि म्हणतात तसे ०-०-० असे वस्त्र असते त्याला एकदा हळद तर एकदा कुंकवाचे बोट लावून रंगवतात ते!
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Tue, 11/30/2010 - 12:23
नवीन
Clu pjpjv mUmUCj j
फक्त असेच दिसत आहे. म्हणून प्रतिक्रीया राखुन आहे.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Tue, 11/30/2010 - 12:39
नवीन
internet explorer waparo, fayar fox nathi
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
Tue, 11/30/2010 - 12:38
नवीन
चिंतामणींशी सहमत...
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Tue, 11/30/2010 - 12:57
नवीन
लेख अग्निकोल्ह्यात दिसण्यासाठी कॅरॅक्टर एन्कोडिंग बदलायला लागेल कदाचित - वेस्टर्न आय-एस-ओ ८८५९-१ करून पाहा.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/01/2010 - 10:22
नवीन
सही जवाब. कॅरॅक्टर एन्कोडिंग 'वेस्टर्न' वापरून लोकसत्तेतली जुनी पानं दिसतात.
तुम्हाला हा प्रश्न का पडला असा प्रश्न पडला आहे.
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Wed, 12/01/2010 - 11:22
नवीन
म्हणजे सोवळ्याबद्दलचा का? तो साहित्यिक अंगानं पडलेला प्रश्न आहे. म्हणजे श्री. कृ. कोल्हटकरांचा अन्वयार्थ लावण्याचं काम चालू आहे.
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Tue, 11/30/2010 - 13:00
नवीन
सोवळ्यात कशावरही पाय देउ नये हे स्पष्ट करण्याकरता सुताचा दाखला.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Tue, 11/30/2010 - 14:25
नवीन
आमच्या घरातील सोवळे ( कद) मला मोठे होत असे. चालताना माझा पाय त्यात अडकत असे. त्यामुळे मला पुजा करताना अडथळा येई. प्रसंगी सोवळे सुटे. वडिलांनी मला मग सोवळ्याच्या वस्त्राची अर्धी चड्डी शिवुन दिली होती. त्याला सोवळ्याचीच नाडी होती. ही सोवळी चड्डी घालून मी पुजा करताना सहज वावरता येत असे. मी श्रावणीला देखील ती सोवळ्याची अर्धी चड्डी घालत असे. पण पंचगव्य व गोमुत्र पिताना ते त्या चड्डीवर सांडत असे. त्याचा डागही पडत असे. सोवळ्यातील पुरुष व विटाळशी बाई यात मला विलक्षण साम्य वाटत असे. सोवळ्यात सुती कपड्यांना केवळ पायच नव्हे तर हातही लावत नसे.अन्य माणसाचा स्पर्श देखील वर्ज्य होता. मग घोंगडीला स्पर्श चालतो का? असे भय युक्त कुतुहल माझ्या मनात येत असे. असो गेल ते दिन गेले.... हल्ली आम्ही 'शास्त्रापुरते' देखील सोवळे घालत नाही वा पाळत नाही. याची शिक्षा आम्हाला होणार आहे असे काही शास्त्रकार सांगतात.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/30/2010 - 14:33
नवीन
घ्या! आता राहिलो शास्त्रापुरता!!! ;)
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Tue, 11/30/2010 - 14:37
नवीन
हो ना! काय दिवस आलेत? चालायचेच. हे ही दिवस जातील. मग जरा शास्त्र शुद्ध ( सोवळे घालुन) बसु.
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Wed, 12/01/2010 - 09:50
नवीन
हे वाचून गंमत वाटली.
यामागची काही कारणं तुम्हाला माहीत असतील किंवा इतरांकडून माहीत करून घेता येतील तर कृपया सांगावी. सूत सर्वांना परवडे पण रेशीम महाग असे. त्यामुळे सोवळं पाळणं सर्वांना शक्य होऊ नये अशी काही सामाजिक उच्च-नीचतेची मांडणी होती का?
- Log in or register to post comments