Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

समाजाच प्रबोधन करण्याची गरज.....

न
निरंजन
Mon, 11/29/2010 - 16:47
🗣 22 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4956 वाचन

💬 प्रतिसाद (22)
ऋ
ऋषिकेश Mon, 11/29/2010 - 16:51 नवीन
नुसत मुलांचच नाही तर आज सर्वच समाजाच प्रबोधन करण्याची गरज आहे.
हे अगदी खरं आहे. प्रश्न असा आहे की हे प्रबोधन करायचं कसं?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 11/29/2010 - 17:06 नवीन
खुप उत्तम पद्धतीने आपण बोलत आहात .. सर्व मनापासुन पटले .. एकदम बरोबर आहे .. तुम्ही यीतके जबरदस्त पद्धतीने लिहिले आहे की आम्हाला काय बोलावे तेच कळत नाहिये .. अश्या लेखनामुळे आणि त्यातील विचारांच्या देवान्घेवान करण्यामुळे ही नक्कीच समाजात उल्लेखनिय बदल घडतीलच घडतील.. आणि असे वैचारीक पद्धतीने समाजात सर्व ठीकाणी माहीती दिली गेली पाहिजे असे वाटते ..
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Mon, 11/29/2010 - 18:58 नवीन
निशब्द...:(
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 11/29/2010 - 19:10 नवीन
विषय अतिशय उत्तम रितीने मांडलेला आहे. यावर प्रतिक्रिया काय येतात तेच बघयाचे आहे. तुमचा अभिमान वाटतो तुम्ही अशा प्रकारचे काम करता त्याबद्दल.!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 11/29/2010 - 19:47 नवीन
तुम्ही चांगले काम करताहात आणि मगच लिहिताय हे महत्वाचं. तुम्ही दिलेल्या व्हिडिओचा दुवा पूर्वी मिपावर देण्यात आला होता. समोर बसलेल्यांपैकी कितीजण 'राम' (एकपत्नी या अर्थी) असतील? शाळांमधून लैंगिक शिक्षण सक्तीचे असायला हवे. आपल्याकडे एखाद्याच्या खाजगी आयुष्यात डोकावून पाहण्याची सवय तर आहेच पण कायद्याने तो गुन्हा ठरत नाही हे वाईट (आणि ठरला तरी कोण जुमानतय?). तुम्ही उल्लेख केलेला तृतीयपंथी कोणते कपडे करतो यावरही लोकांची प्रतिक्रिया अवलंबून आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Tue, 11/30/2010 - 02:19 नवीन
आपल्या कार्याला पाठींबा आहे.
मुलांचच नाही तर आज सर्वच समाजाच प्रबोधन करण्याची गरज आहे.
खरे आहे.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 11/30/2010 - 03:32 नवीन
आपल्याकडे लहान मुलांशी एड्स , एच आय व्ही बद्दल बोलणे म्हणजेच बिघडवणे असे समजतात...त्यांना पूर्ण माहिती नसते किंवा असली तरी काहीतरी अर्धवट असते... अशी माहिती घातकच. दुसरे म्हणजे वेश्यांची मुले हा प्रश्न लवकर सुटणारा नाही...खरे म्हणजे घरातील आईनेच मुलांवर संस्कार केले पाहिजेत मुलींशी कसे वागावे त्याचे...पण आयाच शिकवतात कि अशा कपडे घातलेल्या मुली तशाच, यांचे असेच वगैरे..(मी पाहिलेले आहे )...आता घरातील एक मुख्य बाईच असे म्हणत असेल तर मुलांना काय वाटणार? भले ती कोणाचीही मुलगी असो. बाकी समाजमन हळूहळू बदलले आहे बऱ्याच गोष्टींबाबत तर याविषयीही बदलेल हळूहळू...फक्त वृतपत्र, ब्लॉग्स, अशी संस्थळे इ. ठिकाणाहून या विषयी प्रबोधन करणारे लिहिले गेले पाहिजे.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 11/30/2010 - 03:33 नवीन
उत्तम लेख! परिस्थितीने नाडलेल्या लोकांशी सुस्थितीतले लोक कसे वागतात हे पाहण्यासारखे असते. असो. वेश्याव्यवसाय कायदेशीर करण्याबाबत तुमचे मत काय आहे? यासाठी काम करणार्‍या एखाद्या संस्थेबद्दल तुम्हाला माहिती आहे काय?
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 11/30/2010 - 03:37 नवीन
कायदेशीर झाल्यावर कायदेबाबू हा एक पिपासू घटक त्यांच्या साडेसातीत जमा होईल दुसरे काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Tue, 11/30/2010 - 03:57 नवीन
बरोबर आहे पण सध्याच्या पोलिसांच्या क्रूर छळापासून तर सुटका होईल ना? परिस्थितीवश अडकलेल्यांनाच गुन्हेगार ठरवणे हे कोणत्या न्यायात बसते? कायदेशीर केला तर कमीतकमी त्यांच्या कामाच्या वेळा, किमान वेतन वगैरे ठरवणारे कायदे कागदावर का होईना पण येतील. पुढे मागे सुधारणेला वाव तरी राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
म
मिसळभोक्ता Tue, 11/30/2010 - 04:01 नवीन
कुठलीही गोष्ट कायदेशीर करणे, याचा अर्थ एकच. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नावर ट्याक्स लावणे. किमान वेतन, किमान वेळा.. ह्याबरोबरच कामाचे स्वरूप कायदेशीर भाषेत वाचायला आवडेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Tue, 11/30/2010 - 04:18 नवीन
आपल्या प्राचीन व महान आणि लवकरच महासत्ता होऊ घातलेल्या देशाच्या सरकार, कायदा वगैरे बाबींबद्दल बर्‍याच लोकांच्या मनात असलेला विश्वास आणि आदर पाहून ऊर आणि डोळे भरून आले. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 11/30/2010 - 04:22 नवीन
डोळेच भरून आले ना ? की आणखी काही ?? असो, जरा ह्या कायदेशीर वेश्याव्यवसायाची कायदेशीर व्याख्या करून दाखवा ना भौ ! (ओह, आणि कॉलिंग युयुत्सु.....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Tue, 11/30/2010 - 04:36 नवीन
कायदेशीर व्याख्या वगैरे कीस काढायला ही जागा नाही. अनिच्छेने वेश्याव्यवसायात आलेल्या किंवा ढकलल्या गेलेल्या स्त्रियांना गुन्हेगार समजले जाऊ नये ही साधी भावना आहे या मागे. यातून तुम्हाला टॅक्स आणि त्या व्यवसायाचे कायदेशीर वर्णन याच गोष्टी रोचक वाटत असतील तर आपण वेगवेगळ्या दिशांना पाहत आहोत हे स्पष्ट आहे. असो. सद्यपरिस्थितीत मी या बाबतीत निष्क्रीय असल्याने यापुढे वाद घालायची माझी इच्छा आणि लायकी नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 11/30/2010 - 04:38 नवीन
अरेरे वाईट वाटले. अशी वेळ कुणावरही यायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Tue, 11/30/2010 - 04:43 नवीन
:-) खरं आहे. तुमच्यावर ती वेळ आलेली नाही आणि तुम्ही सक्रीय आहात याबद्दल तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 11/30/2010 - 04:48 नवीन
अभिनंदनाबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Tue, 11/30/2010 - 04:51 नवीन
धन्यवाद देण्यातका सुसंस्कृतपणा दाखवल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 11/30/2010 - 04:53 नवीन
धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद. (ता. क. वन ई इज मिसिंग इन युवर प्रतिसाद.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
स
सुधीर काळे Tue, 11/30/2010 - 12:37 नवीन
निरंजनसाहेबांचे त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल आणि इतका सुंदर लेख इथे पोस्ट केल्याबद्दल अभिनंदन. त्याबरोबरच अहमदनगरच्या निरंजनसाहेबांचे त्यांच्यावर झालेले हल्ले सामर्थ्याने परतविल्याबद्दल खास अभिनंदन.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 11/30/2010 - 22:34 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
ब
बेसनलाडू Tue, 11/30/2010 - 22:17 नवीन
लेखातील विचारांशी बराचसा सहमत आहे. (सहमत)बेसनलाडू एकंदर निराशाजनक परिस्थितीतही यासारख्या लक्षवेधी बातम्यांनी दिलासा मिळत असतो, हेही तितकेच खरे. (दिलासित)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा