Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बासुंदी......मदत हवी आहे...

म
मृगजळ
Sun, 12/05/2010 - 08:04

प्रतिक्रिया द्या
8481 वाचन

💬 प्रतिसाद (22)
प
पर्नल नेने मराठे Sun, 12/05/2010 - 09:41 नवीन
अग म्रुगजळ... अगदी सोपे आहे. दुध आटव, त्यात साखर, चारोळ्या, केशर, वेलची घाल. मी परवाच केली होती. त्यात मी सिताफळाचा गर घातला होता. सिताफळ बसुन्दी तयार ;)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 12/05/2010 - 09:57 नवीन
सीताफळाचा गर कुठला ? बी च्या आतला की बाहेरचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
श
शैलेन्द्र Sun, 12/05/2010 - 12:25 नवीन
बासुंदीची पाकृ ( पाच लोकांसाठी) साधारण ४- ५ लिटर दुध घ्यावे (म्हशीचे, फुल क्रीम). एका पसरट कढईत गॅसवर उकळायला ठेवावे, कढइ जितकी मोठी व पसरट तितके चांगले, दुधाला उकळी फुटली की गॅस कमी करावा, आणि एका उचटनीने किंवा झार्‍याने मधे मधे हलवाले, हवे तर कढइत खाली काही चमचे टाकावे म्हणजे दुध लागत नाही, दुध थोडेसे लागतेच, तेंव्हा न घाबरता ते खरडुन काढावे. ते शिजुन एकजीव होते. साय धरु देवु नये. हळुहळु दुध तांबुस होते. दुध आटुन अर्धे झाले (तिन-चार तास) की चवीनुसार साखर टाकावी. तसेच दुधाचा मसाला व इतर गोष्टी आवडीनुसार टाकाव्या. थंड करुन वाढली तर छान घट्ट लागते, मला थंड बासुंदी नुस्ती खायला आवडते, काहींना गरमागरम पुरीबरोबर आवडते. दुसरा शॉर्ट्कट म्हणजे दोन लिटर दुधात अर्धा किलो खवा टाकुन अर्धा तास शिजवावे, पण पहिल्या प्रकारची चव या प्रकाराला येत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Sun, 12/05/2010 - 17:37 नवीन
बासुंदी......मदत हवी आहे... शीर्षक वाचून वाटले की बासुंदी......'खायला' मदत हवी आहे... ट्रंक भरतच होतो तेवढ्यात 'मायना' वाचला.. अन् मग बेत रद्द केला.. :)
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sun, 12/05/2010 - 17:49 नवीन
नरसोबाच्या वाडीला बासुंदी चांगली मिळते, पण तिथे मोठ्या कढईत- मोठ्या आचेवर बासुंदी आटवतात, रबडी हा प्रकार (म्हणजे घट्ट आटवलेली बासुंदी) खावा तर नरसोबाच्या वाडीचाच. तिथे खवा न घालता बासुंदी बनवतात. आम्ही गेलो की फक्त बासुंदीवरच ताव मारतो....
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 12/05/2010 - 18:11 नवीन
नाही हो ताई, रबडी खावी तर मथुरा- इंदोरची...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
र
रेवती Sun, 12/05/2010 - 19:31 नवीन
वाडीचीही बासुंदी छान असते हो पण तिथे गरमागरम पुर्‍या नसल्यामुळे मी ताव नाही मारू शकत.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र Mon, 12/06/2010 - 18:33 नवीन
मी रबडी म्हणालो, बासुंदी नाही... उत्तरेत बासुंदी मिळतच नाही, नाही म्हनायला गुजरातेत दुध्पाक नावाचा एक नापाक पदार्थ मिळतो.. याक्क्क,,,,, पण रबडी.... मथुरा- वृन्दावन किंवा इंदोरचीच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
च
चिंतामणी Sun, 12/05/2010 - 18:29 नवीन
वाडीच्या बासुंदीला तोड नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
र
रेवती Sun, 12/05/2010 - 17:56 नवीन
कृपया खवा घातलेली बासुंदी करू नका. त्याला खरी बासुंदी म्हणवत नाही. दूध निम्मे आटवून केलेली बासुंदी चांगली लागते.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 12/05/2010 - 18:31 नवीन
दूध निम्मे आटवून केलेली बासुंदी चांगली लागते. खवा घालुन बासुंदी करणे म्हणजे शॉर्टकट. त्याला आटवलेल्या बासुंदीची चव म्हणजे खमंगपणा येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Sun, 12/05/2010 - 19:32 नवीन
खमंगपणा येत नाही. भयंकर सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
स
स्पंदना Mon, 12/06/2010 - 12:00 नवीन
रेवतीशी अजस्त्र सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
न
निवेदिता-ताई Sun, 12/05/2010 - 18:04 नवीन
रेवती.............तु़झे मताशी मी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
श
शहराजाद Mon, 12/06/2010 - 02:00 नवीन
दोन जाड बुडाच्या नॉनस्टिक पॅनमध्ये दोन-तीन वाट्या दूध धालून आटवावे.आवडीनुसार दाट आटल्यावर ते काढून ठेवावे व आणखी थोडे दूध आटवावे. (मी १/३ होईपर्यंत तरी आटवते.) असे सर्व दूध आटवून झाले की साखर घालून पुन्हा सर्व एकत्र किंचित आटवावे. केशर - वेलची पूड इ. बासुंदी जराशी निवल्यावर घालावे. चारोळी घालायची असल्यास तुपात हलकी तळून वेगळी ठेवावी आणि खाण्याच्या थोडी आधी मिसळावी. लोखंडी कढईतली बासुंदी अतिशय खमंग आणि छान रंगाची होते, पण नवीन शिकताना सवय नसेल तर हमखास दूध खाली लागते. नॉनस्टिक पसरट भांड्यात दूध लागण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळे एकाच वेळी दोन भांड्यांत दूध आटवणे सोपे होते. थोडे- थोडे आटवायलाही वेळ तेवढाच लागतो, पण दोन भांड्यामुळे एकूण दूध निम्म्या वेळात आटवून होते. ही बासुंदी देखील चवदार खमंग लागते. थोडे थोडे आटवण्याचा फायदा हा की एखाद्या वेळी चुकून दूध खाली जळले तरी तेवढा घाणा काढून टाकता येतो. सर्व दुधाला जळका वास लागत नाही. ( सर्व दूध एकदम आटवताना जर खाली लागले तर बहुतेक वेळा तो वास संपूर्ण दुधाला लागतो. जळकी खरवड काढून टाकली, वरून कितीही केशर घातले तरी तो जळकट वास खाताना डोके वर काढतोच). मात्र भांड्यांचे नॉनस्टिक आवरण झिजलेले, चरे इ. पडलेले नसावे. (मी दूध आटवण्याचे भांडे वेगळे ठेवते) जर रोजच्या वापरातले भांडे असेल तर त्यात आधी केलेल्या उग्र चवीच्या पदार्थाचा वास शिल्लक राहिला नाही ना हे बघावे. दुधात वास सहज शोषले जातात. लोखंडी कढई वापरायची असेल तर ती पांढरट दिसेपर्यंत घासावी अन्यथा बासुंदी बिघडू शकते. दूध आटवता आटवता अखेरीस अगदीच कंटाळा आला तर एक लीटरला एक चमचा ह्या प्रमाणात तांदळाची बारीक पिठी गार दुधातून लावावी म्हणजे पटकन दाटपणा येतो. (पण अर्थातच ती निर्भेळ बासुंदी नाही.)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Mon, 12/06/2010 - 08:47 नवीन
हे वाचल्याने एकदम डोहाळे लागून आज बासुंदी केली :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 12/06/2010 - 09:14 नवीन
बाप रे ! हनुमानाच्या वर ताण !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/06/2010 - 09:20 नवीन
वारलो !!! Image removed. बासुंदीध्वजाच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
र
राजेश घासकडवी Mon, 12/06/2010 - 10:18 नवीन
आणि इथे घामाचे थेंब वगैरेही नसून निव्वळ मृगजळ आहे... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ध
धमाल मुलगा Mon, 12/06/2010 - 12:06 नवीन
अरे बासुंदीध्वज काय, मृगजळ काय? Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
स
स्वच्छंदी_मनोज Mon, 12/06/2010 - 16:16 नवीन
हाताशी मोकळा वेळ, रविवार दुपार आणी झोपमोड होणार नाही याची खात्री असल्याशीवाय मी बासुंदीच्या वाटेला जातच नाही
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 12/06/2010 - 19:44 नवीन
बासुंदी ची बशी पण मिळते ति दुधात टाकली कि दुध उतु न जाता आटत रहाते.... पण चितळ्यांची बासुंदी वा मथुरा भवन ची राबडी चांगली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा