वेणी सोडुनिया : गौळण
💬 प्रतिसाद
(6)
स
स्पंदना
Tue, 12/07/2010 - 03:40
नवीन
कविता छान आहे.
पण 'वासना रहित प्रेमाचे प्रतिक' हे नाही पटल. उलट मी म्हणेन सर्वस्व अर्पिण्याची परिसीमा म्हणजे 'गौळण! ' त्याचा नटखट पणा , त्याचे यौवनावस्थेत पदार्पण करत असतानाचे घातलेले धिंगाणे, म्हणजे गौळण!
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 12/07/2010 - 18:10
नवीन
सर्वस्व अर्पिण्याची परिसीमा याचे पण फार वेगवेगळे अर्थ काढले जातील.
श्रीकृष्णाने बालवयात देखील खूप खोड्या केल्यात. दही दूध चोरणे, कुणाच्या वेण्या बांधने वगैरे.
ते वर्णन सुद्धा याच काव्यप्रकारात मोडते. :)
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 12/07/2010 - 03:56
नवीन
छान... या वरुन मला हे भजन आठवले :--- वृंदावनी वेणू कवणाचा माये
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 12/07/2010 - 18:13
नवीन
फारच सुंदर भजन आहे हे.
या काव्यप्रकाराबद्दल माझा पण तसा फारसा अभ्यास नाहीये. फक्त जुजबी ओळख तेवढी आहे.
हा काव्यप्रकार संत एकनाथांनी खूप चांगल्या तर्हेने हाताळला.
कदाचित सर्वात जास्त गौळणी त्यांनीच लिहिल्या असाव्या.
"आज गोकुळात रंग खेळतो हरी" आणि "किती सांगू मी सांगू कुणाला"
ह्या कविता/गीते गौळण या प्रकारातच मोडणार्या आहेत.
कवी उत्तमकुमार रचित आणि गोदावरी मुंढे यांनी गायलेल्या गौळणींची कॅसेट मागे महाराष्ट्रभर खूप गाजली होती.
"वाजवितो पावा कृष्णमुरारी, वेडी झाली राधा ऐकून बासरी" हे गीत मला खूप आवडले होते.
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Wed, 12/08/2010 - 14:30
नवीन
नेहमी प्रमाणेच एकदम मस्त!
>>गुपचिप आला हा उघडोनी ताला
ताला म्हणजे काय?
>>झोपेमधी होते याने रंग टाकीला
इथे 'झोपेमधी होता याने रंग टाकीला' बरोबर वाटेल असं वाटतं.
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Wed, 12/08/2010 - 15:48
नवीन
ताला म्हणजे कुलूप.
मी झोपेमधी होते तेव्हा कृष्णाने रंग टाकीला, असे राधा म्हणतेय. :)
- Log in or register to post comments