जे न देखे रवी...

मानाचा मुजरा!

Primary tabs

अठरावर्षांपूर्वी घडले एक पहा नवल
चेंडु-फळीचा खेळ खेळण्या पडे एक पाऊल

वामनमूर्ती बघता, त्याला भलेभले हासले
तलवारीसम बॅट तळपता डोळेही दिपले

एकामागुन एक मोडितो विक्रमही सगळे
टीकाकरण्या जाती तेही ठरती की बावळे

असा घडविती शिष्यच तेची गुरु 'रमाकांत'
स्वर्गीय पित्याचा पुत्र असे हा खरा मातृभक्त

'अजित' राहुनी निभवी तोही धाकलीच पाती
खेळामधला 'डॉन'ही त्याला देई यशोपावती

जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा
पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा

अजून खिळती त्यावर सार्‍या अभिमानी नजरा
मराठमोळ्या 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा!

चतुरंग

शितल

अजून खिळती त्यावर सार्‍या अभिमानी नजरा
मराठमोळ्या 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा!

चतुर॑ग साहेब, छान कविता केली आहे,

मराठमोळ्या 'सचिन' ला आमचा ही मानाचा मुजरा!

वरदा

झकासच
वामनमूर्ती बघता, त्याला भलेभले हासले
तलवारीसम बॅट तळपता डोळेही दिपले


खरंच.....

मनस्वी

आवडली.

एकामागुन एक मोडितो विक्रमही सगळे
टीकाकरण्या जाती तेही ठरती की बावळे

विसोबा खेचर

जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा
पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा

क्या बात है! सुंदर...

तात्या.

सहज

मुजरा आवडले.

पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा

हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट वाटते.

'सचिन' तुला रे मानाचा मुजरा!!!!

जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा
पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा

एकदम मस्त कविता...........!!!

-दिलीप बिरुटे
(जुन्या सच्याचा फॅन )