Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १

भ
भानस
Fri, 12/10/2010 - 19:29

प्रतिक्रिया द्या
28079 वाचन

💬 प्रतिसाद (48)
व
विलासराव Fri, 12/10/2010 - 19:35 नवीन
माझी आवडती उसळ.
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Fri, 12/10/2010 - 21:01 नवीन
वालाच्या भाताची पाक्रु लवकरात लवकर टाका please !
  • Log in or register to post comments
भ
भानस Fri, 12/10/2010 - 21:22 नवीन
मस्तानी, विलासराव प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्तानी
र
रेवती Fri, 12/10/2010 - 21:05 नवीन
डाळींब्या कितीही चांगल्या भिजल्या असू दे त्या सोलताना उजव्या हाताच्या अंगठ्याचे नख दुखते.;) पाकृ छान, पुढच्या भागाची वाट बघते. फोटू कुठे आहे?
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 12/10/2010 - 21:15 नवीन
हो ते नख दुखतेच.. आणि कितीही पोट भरलेलं असलं तरी डाळींब्यांची उसळ म्हंटलं की तोंडाला पाणी सुटतेच. पाकृ. भन्नाट. कधी एकदा करते असे झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
भ
भानस Fri, 12/10/2010 - 21:19 नवीन
रेवती, मला तर दिसतोय गं. डा़ळिंब्या सोलताना चांगल्या पाच सहा तास पाण्यात ( गरम पाणी घ्यावे सुरवातीला ) ठेवाव्यात. स्वतःहूनच उमलून येतात. ताटात थोड्या थोड्या घेऊन उरलेल्या कोमट पाण्यातच ठेवून सोलाव्या. फार काही करावेच लागत नाही या पध्दतीने. ( तरीही हे फार कंटाळवाणे काम आहेच म्हणून घरातल्या सगळ्यांना सामील करून घ्यावे यात. ;) ) धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
प्राजु Fri, 12/10/2010 - 21:24 नवीन
मलाही फोटो नाही दिसत आहे.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भानस
भ
भानस Fri, 12/10/2010 - 21:36 नवीन
असे का होतेय गं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
उ
उपास Fri, 12/10/2010 - 21:11 नवीन
डाळींब्यांचे बिरडे.. मस्तच.. बाहेर सोललेल्या डाळींब्या विकत मिळण्याईतके सुदैवी असाल तर मौजाही मौजा! ;)
  • Log in or register to post comments
भ
भानस Fri, 12/10/2010 - 21:20 नवीन
इथे स्वतः मेल्याशिवाय... :) आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास
र
रेवती Fri, 12/10/2010 - 21:26 नवीन
अगदी अगदी! स्वत: मेल्याशिवाय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भानस
उ
उपास Sat, 12/11/2010 - 03:23 नवीन
अगदी इतकुश्या बिरड्यासाठीही तासन तास डाळींब्या सोलत बसावे लागत असल्यानेच मी असं म्हटलं.. आपल्यात नाय बा तेवढा पेशन्स.. बायकोला मस्का हाच एकमेव उपाय नाहीतर दोघांनी तिकडे गेल्यावर लाड करुन घ्यायचे ;) - (तद्दन आळशी) उपास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
व
विलासराव Sat, 12/11/2010 - 05:21 नवीन
बाजुच्या तांबे हॉटेलमधे हि उसळ मिळते. थोडक्यात आम्हाला मेल्याशिवायही स्वर्ग दिसतो. फक्त जरा गोडसर असते गुजराती टाईप. तुम्ही बनवलेली भाजी एवढी छान दिसतेय की बस्स. खायला बोलवाल तरी माझी काहीच हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
न
निवेदिता-ताई Sat, 12/11/2010 - 05:47 नवीन
हा हा हा .............अगदी बरोबर..............स्वत: मेल्याशिवाय....???????????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ब
बेसनलाडू Fri, 12/10/2010 - 21:26 नवीन
फोटो पाहून जीभ खवळली. बायकोकडे या उसळीसाठी कटकट करावी लागणारसे दिसते (दोष भानसताईंचा!) (खवय्या)बेसनलाडू काही प्रश्न- वाल आणि डाळिंब्यांत (असल्यास) काय फरक? कडवे वाल नि साधे वाल यांत (असल्यास) काय फरक)? की सगळे (इकडून तिकडून) सारखेच? :) (जिज्ञासू)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
भ
भानस Fri, 12/10/2010 - 21:34 नवीन
फरक नाही.( निदान माझ्या माहितीनुसार ) मात्र कडवे वाल व गोडे वाल यांच्या चवीत खूप फरक आहे. कडवे ते कडवेच. फोडणीत पडलेच की कधी एकदा घास तोंडात जातोय असे होऊन जाते... :) कडवे नसलेच तर ( जिव्हेचे चोचले अनावर झाले म्हणून... नाईलाजाने ) गोडे वाल करायचे अन समाधान मानायचे झालं. शिवाय मायदेशीही बरेच वेळा कडवे वाल सहजी ( प्रत्येक किराणावाल्याकडे किंवा सर्रास मॉल्स मध्येही ) मिळत नाहीत तर देशाबाहेर तर विचारूच नका. बायकोला डाळिंब्या सोलायला मदतही करा बरं का... ( निदान थोडा दोष हलका होईल... ;) ) धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
प
प्रभाकर पेठकर Tue, 11/05/2013 - 05:51 नवीन
कडवे वाल चवीस (गोड्यावालापेक्षा) किंचित कडसर असतात. वाल भिजवून सोलले की सोललेल्या वालांना डाळींब्या किंवा बिरड्या म्हणतात. आम्ही उसळीत साखरे ऐवजी गुळ घालतो. शिवाय भरपूर कोथिंबीर. उसळीत फोडणी करताना त्यात ओवा जरूर घालावा. वाल वातकारक असल्याने वात प्रकृतीच्या व्यक्तीला बाधू शकतात. ओवा वात हारक आहे. वात विरहित पचनास मदत करतो. उसळ कमी पातळ केली तर, नुसते कच्चे तेल घालून, 'मधल्यावेळचे खाणे' म्हणूनही अप्रतिम लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भानस
च
चिंतामणी Sat, 12/11/2010 - 03:59 नवीन
फोटो पाहून जीभ खवळली. बायकोकडे या उसळीसाठी कटकट करावी लागणारसे दिसते मला एकट्यालाच जास्त आवडत असल्याने योग यायला वेळ लागतो. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
प
पिंगू Sat, 12/11/2010 - 00:23 नवीन
मी केव्हाही बिरडं खाण्यासाठी ते सोलून द्यायला तयार असतो. चला ह्या वीकांतासाठी आणखी एक भर टाकतो.. - (बिरडेवाला) पिंगू
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 12/11/2010 - 01:51 नवीन
हा...जिभवर लगेच चव निर्माण झाली बघा. :) फोटु बी लयं झ्याक काढला हाय... :)
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 12/11/2010 - 04:55 नवीन
काहि वेळा डाळिंब्या व्यवस्थित शिजत नाहित..टचटचित रहातात..त्यावर काहि उपाय?....
  • Log in or register to post comments
भ
भानस Sat, 12/11/2010 - 17:25 नवीन
डाळिंब्या फोडणीत घातल्या की व्यवस्थित हलवून दोन भांडी पाणी घालावे. आंच मध्यम ठेवून वरती झाकण ठेवून त्या झाकणावरही पाणी घालावे. साधारण दहा ते बारा मिनिटांनी झाकणावरचे पाणीही डाळिंब्यावर टाकून पुन्हा हलवून अजून एक वाफ आणावी. जोवर डाळिंब्या बोटचेप्या होत नाहीत तोवर मीठ, गूळ्/साखर व अमसूल यातले काहीही घालू नये. कमी शिजलेल्या डाळिंब्या गूळ/साखरेने ताठरून जातात. नंतर शिजत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
N
Nile Sat, 12/11/2010 - 05:02 नवीन
फोटोपाहुन जीव गेला. सजावट मस्तच.
  • Log in or register to post comments
क
कौशी Sat, 12/11/2010 - 16:24 नवीन
रेसीपी मस्त आहे पण फोटो दिसत नाही.. काय करू.??????
  • Log in or register to post comments
भ
भानस Sat, 12/11/2010 - 17:34 नवीन
काय गडबड आहे मला कळत नाही. :( चिंतामणी, पिंगू, -Nile, कौशी व मदनबाण धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौशी
प
प्रियाकूल Sat, 02/23/2013 - 15:13 नवीन
ह्याला आव्रिकै असहि म्हन्तात का?
  • Log in or register to post comments
भ
भानस Tue, 11/05/2013 - 02:59 नवीन
प्रियाकूल, मी तरी हा शब्द ऐकला नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाकूल
र
रश्मि दाते Sat, 02/23/2013 - 18:02 नवीन
फोटो दिसत नाहीये
  • Log in or register to post comments
भ
भानस Tue, 11/05/2013 - 03:00 नवीन
मला फोटो दिसतोय नीट. आता यावर काय बरे उपाय करावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रश्मि दाते
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 02/23/2013 - 18:18 नवीन
वालाचे बिरडे म्हणजे जीव की प्राण... आठवड्यातून एकदातरी हवेच... आणि होतेच ! फोटो बाकी जीवघेणा आहे... पण आत्ताच बिरडे खाऊन मिपावर चक्कर मारायला आलोय म्हणूनच जगलोवाचलो आहे :)
  • Log in or register to post comments
भ
भानस Tue, 11/05/2013 - 03:02 नवीन
इस्पीकचा एक्का, धन्यवाद! बिरडे असे नुसते म्हटले तरिही लगेच जठराग्नी खवळायला लागतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 02/23/2013 - 18:23 नवीन
पुण्याला आपटे रोडवर आशा डायनिंग होल आहे तिथे कायम बिरड्याची उसळ असते... मस्त बनवतात .. रेसिपी आवडली ...
  • Log in or register to post comments
भ
भानस Tue, 11/05/2013 - 03:03 नवीन
अविनाश कुलकर्णी.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
स
स्वाती दिनेश Sat, 02/23/2013 - 18:30 नवीन
पाकृ छान!फोटू का दिसत नाहीये? (प्रत्येक घरच्या उसळीची पध्दत आणि त्याबरोबरच चव वेगळी..) स्वाती
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Sat, 02/23/2013 - 21:23 नवीन
पाकृ छान आहे आणि फोटो सुद्धा मस्त.. पण वाल कडु असतात थोडे चवीला.... त्यामुळे जास्त आवडत नाहीत.
  • Log in or register to post comments
भ
भानस Tue, 11/05/2013 - 03:04 नवीन
अनेक आभार्स! वालाचा कडवटपणा मोडण्यासाठी गूळ/साखर घालावी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini
अ
अनन्न्या Wed, 02/27/2013 - 15:15 नवीन
मस्त दिसतेय उसळ!! मी यात कांदा घालते.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/28/2013 - 06:10 नवीन
फोटू मस्त आलाय. :-)
  • Log in or register to post comments
भ
भानस Tue, 11/05/2013 - 03:05 नवीन
अत्रुप्त आत्मा, आभार्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
त
त्रिवेणी गुरुवार, 02/28/2013 - 06:43 नवीन
मलाही फोटो दिसत नाही. plz परत एकदा फोटो पोस्ट करा ना? डाळिंब्यांची उसळ पहिल्यांदा केली तेव्हा सालासहीतच केली होती. नंतर कळले की साल काढायचे असते.
  • Log in or register to post comments
भ
भानस Tue, 11/05/2013 - 03:07 नवीन
मला फोटो दिसतोय. आशा आहे तुम्हालाही दिसेल. सालासहीत.:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
प
पियुशा गुरुवार, 02/28/2013 - 07:29 नवीन
ओइंग !!! मलाही दिसत नाहिये फोटु. मुळात हा प्रकार कधी पाहिला नाही, खाणे तर दुरच म्हणुन निदान फोटु पाहुन तरी समाधान मानले असते तेदेखील नै नशिबात आमच्या ;)
  • Log in or register to post comments
भ
भानस Tue, 11/05/2013 - 03:08 नवीन
फोटो दिसतोय. तुम्ही पुन्हा एकदा पाहाल का? :) धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
क
कच्ची कैरी Mon, 03/04/2013 - 07:49 नवीन
मी हि उसळ एकदाच खाल्ली आहे फार आवडली होती मला पण ते सोलण्याच्या धाकात कधी करून पाहीली नाही http://mejwani.in/
  • Log in or register to post comments
भ
भानस Tue, 11/05/2013 - 03:10 नवीन
मग तीच चव आठवत सोलायला घ्या. कधी कढईत फोडणीला पडतील कळणारही नाही. :) धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्ची कैरी
र
रश्मि दाते Mon, 03/04/2013 - 08:24 नवीन
आवडली सगळ्यांना,धन्यवाद.
  • Log in or register to post comments
भ
भानस Tue, 11/05/2013 - 03:11 नवीन
रश्मि, वा! आवडली सगळ्यांना हे वाचून खूप मस्त वाटले. धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
व
विनटूविन Sun, 08/04/2019 - 11:17 नवीन
हे भारतात ऑनलाईन मिळत नाहीत. लोक हजार प्रकारचा राजमा विकतात पण वाल नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा