सामाजीक सवयी
💬 प्रतिसाद
(95)
व
विजुभाऊ
Mon, 12/13/2010 - 07:57
नवीन
खरच?
आधी वाचता येईल असा लिहा. तुमच्या टाइपिंग ने डोळ्यांना फार म्हणजे फार त्रास होतो.
गोगोलमामा
तुमचा जालावरचा अब्य्स क्मी प्ड्तोय. ही चुचु ल्पी आहे.
ती म्राठी भाषेस एक देण्गी आहे
- Log in or register to post comments
व
वेताळ
Sun, 12/12/2010 - 08:54
नवीन
तुम्हच्या बद्दल काकु आम्हाला अभिमान आहे.
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Sun, 12/12/2010 - 08:57
नवीन
अय काकु किस्को बोल्ता बे तु :ओ
- Log in or register to post comments
व
वेताळ
Sun, 12/12/2010 - 09:00
नवीन
बर चुचु, तुझ्याबद्दल आम्हाला अभिमान आहे.
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Sun, 12/12/2010 - 09:01
नवीन
आता कस ;)
- Log in or register to post comments
श
शुचि
Sun, 12/12/2010 - 15:23
नवीन
लहानपणपासूनच बालकांना बाळकडू पाजणे जरूरी असते - की आपाला शक्यतो समोरच्याला त्रास होऊ नये, सन्जोप रावांनी उल्लेख केलेल्या प्रमाणे सार्वजनिक्/खाजगी मालमत्तेची निगा, समोरच्याचा विचार करून वागणे वगैरे वगैरे.
या औपचारीकतांचे भान हे लहान वयातच मुला/मुलींना द्यावयास हवे असे मला वाटते.
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Sun, 12/12/2010 - 17:39
नवीन
>>जेंव्हा आपण एखादा गुणविषेश एखाद्या समजाला/जातीला चिकटवतो तेंव्हा तो वांशिक नसुन परिस्थीतीजण्य आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे.
ह्या वाक्यान थोडा गोंधळून गेलो. त्याला कारण अशी
१. एखादा गुणविषेश एखादा समाज/ जात स्वतःहून मिरवतो ( इतर कुणी तो चिटकवलेला नसतो) पण तो नेहमीच त्याला शोभेल अस वर्तन करेल असे मात्र नाही.
२. काही गुण/सवयी परिस्थिती जण्य नसून फायद्याच्या व सोयीच्या असतात.
३. परिस्थितीमुळं गुण निर्माण होतात ही अपूर्ण माहीती. गुणांमुळे परीस्थिती बदलते त्याच काय?
ह्यातील प्रत्येकाची ऐतिहासिक तसच तात्कालीक उदाहरणं देता येतील. आणि तुम्ही माझ्यापेक्षा जास्ती उदाहरणं देवू शकता. त्यामुळ तुम्ही म्हट्ल्याप्रमाणे कदाचित फक्त वांशिकता नसेल कारन. पण फक्त परिस्थितीन सगळ बनतं हा युक्तीवाद तितकासा ठीक नाही वाटत.
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Mon, 12/13/2010 - 06:56
नवीन
"ह्यातील प्रत्येकाची ऐतिहासिक तसच तात्कालीक उदाहरणं देता येतील. आणि तुम्ही माझ्यापेक्षा जास्ती उदाहरणं देवू शकता."
मनाला लागलं का? हलंक घेत जा हो...
"एखादा गुणविषेश एखादा समाज/ जात स्वतःहून मिरवतो ( इतर कुणी तो चिटकवलेला नसतो) पण तो नेहमीच त्याला शोभेल अस वर्तन करेल असे मात्र नाही."
अख्खा समाज जर तसे वर्तन करत नसेल तर तो दांभीक ठरतो, जर एखादी व्यक्ती तसे करत असेल तर ती अपवाद ठरते. जसे आपण भारतिय आपल्या कौटुंबीक संस्थेबद्दल अभिमान बाळगतो, याचा अर्थ असा नाही की भारतातला प्रत्येक मुलगा श्रावण्बाळ आहे व प्रत्येक स्त्री/ पुरुष एकनिष्ट असतो. पण एक समाज म्हणुन आपण नक्किच इतरांच्यापेक्षा वेगळे आहोत, म्हणुन या मुल्यांचा आपण अभिमान बाळगतो.
"२. काही गुण/सवयी परिस्थिती जण्य नसून फायद्याच्या व सोयीच्या असतात."
काही नाही, सगळ्याच परिस्थीतीजण्य सवयी फायद्याच्या व सोयीच्या असतात.. फायदा व सोय हेच परिस्थीतीजण्य सवयींचे कारण आहे.
"३. परिस्थितीमुळं गुण निर्माण होतात ही अपूर्ण माहीती. गुणांमुळे परीस्थिती बदलते त्याच काय?"
पुर्ण- अपुर्णच्या वादात मला जायचं नाही, पण गुणांमुळे परिस्थीती कि परिस्थीतीमुळे गुण हे कोंबडी-अंडेसारख आहे. म्हणजे बघा.. मारवाडात राहणारा मारवाडी अभाव्ग्रस्त परिस्थीतीमुळे दरीद्री असतो, त्यामुळे तो काटकसरी होतो. म्हणजे बघा, परिस्थीतिमुळे गुण बदलला... मग हा काटकसरी गरिब मारवाडी देशांतर करतो व्यापार करतो व श्रीमंत होतो. म्हणजे गुणामुळे परिस्थीती बदलली, आता श्रीमंत झालेल्या या मारवाड्याची मुले तितकी कंजुष- काटकसरी नसतात, म्हणजे परिस्थीतीमुळे परत गुण... अति उधळी झालेली मारवाड्याची मुले जुगार-सट्टा खेळत सगळ वैभव गमावतात.. परत गुणामुळे परिस्थीती...
जाउद्या... कापुस कोंड्याची गोष्ट आहे...
पण तेवढ उदाहरणांच हलक घेत जा राव...
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Mon, 12/13/2010 - 09:52
नवीन
>>मनाला लागलं का? हलंक घेत जा हो...
ह्यावरून तुम्हीच हलक घेतलेल दिसत नाही ;)
>>गुणांमुळे परिस्थीती कि परिस्थीतीमुळे गुण हे कोंबडी-अंडेसारख आहे
एकदम बरोबर! म्हणूनच परिस्थितीजण्य असा निष्कर्श बरोबर ठरत नाही!
>>पण तेवढ उदाहरणांच हलक घेत जा राव...
तुम्हीपण बंधु :)
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Mon, 12/13/2010 - 10:06
नवीन
"एकदम बरोबर! म्हणूनच परिस्थितीजण्य असा निष्कर्श बरोबर ठरत नाही!"
मी लेखात ज्याला परीस्थिती म्हणालोय ते मुख्यता: भौगोलीक संदर्भात आहे.. कौटुंबिक नाही.. आणि भौगोलीक परीस्थिती गुणांमुळे सहसा नाही बदलत..
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 12/13/2010 - 03:56
नवीन
या सर्व प्रतिसादकांमधे केवळ चुचुआज्जीच तेवढी शहाणी आहे.
- Log in or register to post comments
न
नंदन
Mon, 12/13/2010 - 05:09
नवीन
लेखातल्या परिस्थितिजन्य सवयींवरून आचार्य विनोबा भाव्यांनी दिलेले एक उदाहरण आठवले. हिंदू-मुसलमान सलोखा वाढावा म्हणून आयोजित केल्या गेलेल्या एका कार्यक्रमात दोन्ही धर्मीयांनी एकाच ताटात जेवावे (अरबस्तानातल्या प्रथेप्रमाणे) अशी टूम निघाली. प्रामुख्यानं कोरडं जेवण असणार्या मध्यपूर्वेतल्या भोजनाच्या दृष्टीने ते ठीक आहे; मात्र रसभाजी, आमटी असणार्या भारतीय जेवणाला त्याच पंगतीत (!) बसवणे हे चुकीचे आहे, हे विनोबांनी त्यांना समजावून दिले.
बाकी परिस्थितिजन्य सवयींचा भाग लक्षात घेतला तरी बर्याचदा 'व्हेन इन रोम...'चे तत्त्व पाळणे हे अधिक सयुक्तिक ठरावे.
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Mon, 12/13/2010 - 07:01
नवीन
छान उदाहरण...
"बाकी परिस्थितिजन्य सवयींचा भाग लक्षात घेतला तरी बर्याचदा 'व्हेन इन रोम...'चे तत्त्व पाळणे हे अधिक सयुक्तिक ठरावे."
खरय, फक्त रोमन होण्यासाठी काय काय कराव लागेल व काय कराव लागणार नाही हे माहीत पाहीजे.
- Log in or register to post comments
S
sagarparadkar
Mon, 12/13/2010 - 08:50
नवीन
एका आफ्रिकी देशाचे अध्यक्ष इंग्लंड्च्या अधिकृत भेटीवर गेले होते. राणीने राजवाड्यात मेजवानी दिली होती, त्यावेळचा प्रसंग होता. संपूर्ण जेवण झाल्यावर खास 'ब्रिटिश शिष्टाचारा'ला अनुसरून 'फिंगर बाऊल' देण्यात आले. मेजवानीला दोन्ही देशांतील मिळून बरीच मान्यवर मंडळी उपस्थित होती. फिंगर बाऊल मधे लिंबाची फोड पाहून त्या आफ्रिकी देशाच्या अध्यक्षांनी ती फोड त्याच बाऊलमधे पिळली आणि ते कोमट 'सरबत' घटाघटा पिऊन टाकले.
हे पाहून 'स्टिफ अप्पर लिप' ब्रिटिश मंडळी अवाकच झाली. पण राणीने पण प्रसंगावधान राखून आपल्या फिंगर बाऊलमधे लिंबू पिळून ते गरम पाणी सहजपणे पिऊन टाकले. मग सर्वांनाच तसेच करावे लागले, आणि 'आफ्रिकन देशाच्या अध्यक्षाच्या औचित्यभंगपूर्ण वर्तनाचा' वगैरे मुद्दाच उपस्थित झाला नाही. ...
अवांतरः माझ्या मते तो एखाद्या 'तेलसंपन्न' राष्ट्राचा अध्यक्ष असावा, नाहितर त्याच्या 'मागासलेपणाची' अतिरेकी चर्चा 'टॅब्लॉईडस' ना वर्षभर पुरली असती, असे माझे प्रांजळ मत.
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Mon, 12/13/2010 - 09:17
नवीन
त्या काळात ग्रॅ़ज्युएट झाल्या झाल्या मला एक छोटिशी नोकरी लागली होती.
मी व माझा सहकारी ऑफिसात खुप काम करायचो. एकदा खुप उशिर झाला होता.
तो म्हणाला जेवुनच घरी जाउयात सो मी त्याला एक रस्तरां सुचविले.
आम्ही जेवलो व 'फिंगर बाऊल' देण्यात आले.
त्याने मला विचारले कि तु हे ऑर्द्र केलेस का, हे काय आहे? मी त्याला गमतित म्हटले लिम्बु पिळ न पी ;).
तो खरच तसे करणार हे लक्शात आल्यावर मी त्याला थाम्बवुन त्याला काय ते समजावले.
अजुनही आमची मैत्री कायम आहे. साहेब, हल्ली मंत्रालयात बसुन मुख्यमंत्र्यांचे प्रवास शेड्युल करतात.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 12/13/2010 - 09:21
नवीन
आपली मुख्यमंत्र्यापर्यंत वट आहे दाखवण्याची क्षीण प्रयत्न
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Mon, 12/13/2010 - 09:24
नवीन
आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत वट असलेल्याशी ओळख असणार्याशी सलगी ठेवून आहोत हे दाखवायचा क्षीण प्रयत्न..
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 12/13/2010 - 09:26
नवीन
मुख्य प्रवाहात सामील होण्याचा क्षीण प्रयत्न
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Mon, 12/13/2010 - 09:28
नवीन
आम्ही जिथे असतो तो प्रवाह मुख्य....बाकी सगळे फाट्यावर..
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 12/13/2010 - 09:30
नवीन
ओके.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Mon, 12/13/2010 - 10:43
नवीन
आप्ल्याला ईन्ग्लिश येते हे दाखविन्याचा क्शिन प्रयत्न.
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Mon, 12/13/2010 - 09:33
नवीन
क्षीण प्रयत्न कशाला म्हणताय .... ठ्सठशीत देखावा म्हणालात तरी हम डरता नाय किस्को ;) अपुनकी हैइच वट =))
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 12/13/2010 - 09:35
नवीन
हांग आशी !
आजकाल चुचु आज्जी लैच फार्मात आहे. पौष्टिक लाडूंचे सेवन केल्याचा परिणाम म्हणावा काय?
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Mon, 12/13/2010 - 09:35
नवीन
हांग अश्शी!!! =))
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Mon, 12/13/2010 - 09:44
नवीन
वा वा..
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Mon, 12/13/2010 - 10:23
नवीन
आपण ग्रॅज्युएट झालोय, हे दाखवायचा यशस्वी प्रयत्न.
तसेच आपण ज्याला शिकवलं ते कुठल्या कुठ्ठ पोचले हे दाखवणारी यशस्वी जाहीरात.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Mon, 12/13/2010 - 10:37
नवीन
भायेर हाटेलात जाउन खाउ शकतो हे दाखविन्याचा क्शिन प्रयत्न.
- Log in or register to post comments
ल
लतिका धुमाळे
Mon, 12/13/2010 - 09:36
नवीन
आपण हाताने जेवतो म्हणून देतात फिंगर बाउल. पण जे सुरी, काटे , चमच्याने जेवतात त्यांना हात धुतले काय आणि नाही काय सारखेच.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Mon, 12/13/2010 - 09:40
नवीन
मग ही प्रथा कुठल्ली? कारण गोरे लोक हातात चमच्या, काटे अन सुऱ्या घेऊन जेवतात...मग त्या लिंबाच्या पाण्याचं काय?
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Mon, 12/13/2010 - 09:50
नवीन
जेवल्यावर बोट थंड पडतात, म्हणुन देत असावे.. ;-)
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Mon, 12/13/2010 - 09:53
नवीन
हॅ हॅ हॅ ...किंवा हातात एवढे शस्त्र धरू धरू बोटं दुखून येत असतील म्हणून जरा जीवाला बरं वाटावं म्हणून गरम लिंबाच्या पाण्यात बोटं बुचकळून काढायची...
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Mon, 12/13/2010 - 10:39
नवीन
बाकी काही असो, थंडीत, त्या बाउलमधे बोट बुचकळायला मस्त वाटत.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Mon, 12/13/2010 - 10:42
नवीन
बाउलमधे बुचकळायला बोट वळवळ करायला लागली आहेत.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Mon, 12/13/2010 - 10:36
नवीन
एकदा का झा लं प्रत्येक बोट थंड पडतया बघा.
- Log in or register to post comments
य
योगप्रभू
Mon, 12/13/2010 - 10:38
नवीन
ताटात किंवा बाऊलमध्ये हात धुणे ही सवय नक्की कशी (गरजेतून की विलासातून) आली असावी, हा गोंधळाचाच मुद्दा आहे. वाळवंटी किंवा दुष्काळी प्रदेशातील पाण्याच्या दुर्भीक्ष्यामुळे लोकांनी हा पर्याय निवडला असावा, असे मानल्यास राजे-रजवाडे आणि श्रीमंतांकडच्या मेजवान्यांतही ही पद्धत दिसून येते. राजस्थानी जेवणात आजही शेवटी असे गरम पाण्याचे बाऊल येतात तर हैदराबादकडे शाही मेजवान्यांत किंवा बड्या हॉटेलांत हेच पाणी गुलाबाचा अगर वाळ्याचा सुगंध असलेले असते. महाराष्ट्रात मात्र फार पूर्वी सर्वसामान्य घरांत वेगळी पद्धत असे. लोकांची जेवणे झाल्यावर मोरीवर हात धुऊन आंचवल्यावर यजमान स्वतः ते हात पुसून कोरडे करत असत आणि पाहुण्यांच्या हातात तांबूल देत असत. पेशव्यांच्या आणि सरदारांच्या जेवणावळीत बड्या असामींच्या हातावर चांदीच्या झारीतून उन उन सुगंधी पाणी घातले जाई. ते गोळा करण्यासाठीही चांदीचे घंगाळे असे.
यानिमित्त मला माझ्या घरातील शिस्त आठवली. आजारी व्यक्ती व बाळंतीण यांनाच केवळ ताटात हात धुण्याची परवानगी होती. लहान मुलांनी तसे केल्यास 'ताटात हात धुवायला काय बाळंत झालायस का?' असे वडीलधारे फटकारत असत. कोकणात, तसेच घाटावरील खेड्यांत अजुनही एक चांगली प्रथा आहे. घरात येण्यापूर्वी हातापायावर घेतलेले पाणी किंवा जेवणानंतर हात धुतलेले पाणी फुलझाडांत किंवा आळू-कर्दळीच्या वाफ्यांत सोडलेले असते. त्यामुळे छोटेखानी बाग कायम फुललेली राहते.
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Mon, 12/13/2010 - 10:59
नवीन
हातावर चांदीच्या झारीतून उन उन सुगंधी पाणी घातले जाई. ते गोळा करण्यासाठीही चांदीचे घंगाळे असे.
आम्च्या गावात "राजधानी" नावाच्या रेस्तरामध्येही अशीच पध्दत आहे. जेवण झाले कि त्यांचा माणुस येउन हातावर वॉर्म पाणी घलतो.
- Log in or register to post comments
उ
उपास
Mon, 12/13/2010 - 16:18
नवीन
मला हा प्रश्न पडतो की फिंगरबोल मधल्या कोमट पाण्यात बोटे धुता येतील पण जेवण झाल्यावर खळखळून चूळ भरण्याची सवय जी लहानपणापासून लावलेय ती योग्य नव्हे काय.. त्या काड्या घेउन दात कोरत कॅव्हीटी वाढवणे कधीही अयोग्यच.. तुम्ही रोमात असा नाहीतर कुठे, तुमच्या आरोग्याला जे योग्य वाटतं ते तुम्ही करायलाच हव, कुठलाही न्यूनगंड न ठेवता.. मी तर समोरच्यालाच शिकवतो अशावेळी चूळ भरणं कसं योग्य ते, तो अमेरिकन असू दे वा जर्मन वा भारतीय.. ;)
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Tue, 12/14/2010 - 10:03
नवीन
आमच्याकडे प्रातर्विधी साठी वढ्याव गेल्याव बोचा साफ करायाला दगड ( नर्मदेतल्या गोटा असतो तसा त्यातल्या त्यात गुळगुळीत) व झाडीत गेल्याव झुडपाचे पान वापरीत. किंबहुना प्रातर्विधी करणे याला 'झाड्याला' जाणे असच म्हंत्यात. त्याची थोडी संस्कारित आवृत्ती म्हणजे 'परसाकडे' जाणे असेच म्हटले जाते. पण त्यासाठी टमरेल वापरले जाते. बर्याचदा ते गळके असते. म्हणजे शेवटी त्यातले पाणी फक्त शास्त्रापुरतेच रहाते.
पाटी पुसायला त्याच्यावर थुकुन हातानी मंग सारवायचे; नंतर त्या हाताचा सोताबी वास घ्यायचा व दुसर्याला बी द्यायचा. कधी पाटी गांधीटोपीनी बी पुसायची. तीच डोक्याव परत घालायची. हे सर्रास असे त्यात कुणालाच वावगे वाटत नसे.
आमचे देव गुरुजी या सवयींवर बोलत असत पण ते स्वतः तंबाखु खाउन वर्गात कोपर्यातच थुंकत. वर्ग शेणाने सारवलेले असायचे. त्यात थुंकी मिसळून जात असे. सर्व॑ पोर मिळुन नंत॑र वर्ग सारवत असत. पोर जमीनीवरच बसत व गुरुजी खुर्चीत.
जेवणात कशावर काय ही भानगड नसे बाजरीची भाकरी व कांदा चटणी लसुण वा कोड्यास फडक्यात गुंडाळलेले असे. शिष्टाचारा बाबत आमच्या गुरुजींचे ठरलेले उदाहरण म्हणजे धनगर बसले जेवाया आन ताका संग शेवया || वर्गातल्या धनगर मुलांनाही त्याचे काही वाटत नसे. खंडीच्या वरनात मुतायची सवंच आस्ती काही लोकान्ला तव्हा मंग गुरुजी बोलनारचा ना?
असो गेले ते दिन गेले पण प्रवासात वा संकट प्रसंगी पुर्वाश्रमीचे अनुभव उपयोगाला येतात.
अवांतर- विधीमहाविद्यालय म्हन्ल्याव नेमक कंचा विधी करत्यात हा प्रश्न आमाला पडत असे
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Tue, 12/14/2010 - 13:11
नवीन
वाचुन मळमळतेय :(
- Log in or register to post comments
म
मितभाषी
Tue, 12/14/2010 - 18:54
नवीन
वाटीत गरम पाणि घेवुन त्यात लिंबू पिळुन प्या. मळमळ बंद होईल.
- Log in or register to post comments
य
योगप्रभू
Tue, 12/14/2010 - 15:04
नवीन
वेडात मराठे वीर दौडले सात या गाण्यातली एक ओळ सहज आठवली
दगडांवर इथल्या अजुन रंग रक्ताचा... :)
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Tue, 12/14/2010 - 15:36
नवीन
सॉरी.. पण नाही आवडली प्रतिक्रीया..
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Tue, 12/14/2010 - 15:58
नवीन
वेलकम ब्यॅक, प्रकाश!
- Log in or register to post comments
S
sagarparadkar
Tue, 12/14/2010 - 12:10
नवीन
एका छोट्या शहरात सकाळी भरणारे / चालणारे 'लॉ कॉलेज' सुरू होणार होते. पण त्याची बातमी वर्तमानपत्रांत आली ती अशी:
प्रातर्विधी महाविद्यालय उद्यापासून सुरू .... :)
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Tue, 12/14/2010 - 14:23
नवीन
भन्नाट...
ठाण्यात एक प्रसिध्द "आय व्ही एफ" (कृत्रीम गर्भ्धारणा) तज्ञ आहेत. खुप वर्ष मुलं न झालेल्या एका स्त्रीला त्यांच्या प्रदीर्घ उपचारांनंतर जुळे झाले, त्याची पेपरात आलेली बातमी...
"डॉ. ****** यांच्या अथक प्रयत्नाने महीलेस जुळे"
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2