Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भट्के कुत्रे आणि आरोग्य

ज
जयेश माधव
Sun, 12/12/2010 - 15:27
🗣 69 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
12399 वाचन

💬 प्रतिसाद (69)
ट
टारझन Sun, 12/12/2010 - 15:41 नवीन
खरंच ही अतिशय चिंताजणक बाब आहे . मी स्वतः कुत्र्यांच्या बाबतीत खुप जागृक आहे . आमच्या कॉलनीतल्या कुत्र्या फार चावक्या आहेत आणि कधी वस्स्स्कन अंगावर येतील सांगता येत नाही. आमच्या लेन मधली एक कुत्री फारंच भुंकत असते . ती चावत नाही असे लोकं म्हणत असले तरी तिचं तोंड इतकं घाणेरडं आहे की तो स्पर्ष देखील किळसवाणा वाटावा. गेल्याच आठवड्यात जिम वरुन घरी येताना ती कुत्री माझ्या गाडीचा पाठलाग करु लागली. थँक गॉड माझ्या गाडीला साईड मिरर होते,.. त्यात मला ती कुत्री माझ्याकडे झेपावताना दिसली . आता अधिक पळुन किंवा दुर्लक्ष करुन चालणार नाही हे लक्षात आल्यावर मी कच्च्कन मागचा ब्रेक दाबला तशी गाडी ९० अंशात स्किड होउन आडवी झाली . डोळ्याचं पातं लवतं ना लवतं तोच मी गाडी साईड स्टँड ला पार्क करुन पटकन एक दगड उचलला. आणि लवलेलं पातं उघडतं ना उघडतं तोच तो दगड मी त्या कुत्रीच्या डोक्यात रप्पकन् मारला.... तशी ती कुत्री "क्याअ...आआअ.अ..अ..ऊऊऊऊऊऊउ हुजुर .. तेरा तेरा तेरा सुरुर "म्हणत पळाली. =)) आता ती मला पाहिलं की लांबुन च यु टर्ण मारते. मी मस्त ऐटित रात्री अपरात्री कॉलनीत फिरतो . तात्पर्य : आता कुत्र्यांच्या प्रश्नावरही प्रशासन काही करेल ह्या आशेवर रहाल तर कुत्रे चावणारंच ... तुम्ही स्वतः बंदोबस्त करा. कायम एखादा दगड खिशात ठेवत चला... घाबरु नका दगड खिशात ठेवल्याने लगेच धर्मांतर होत नाही . टारझन आयडी द्वारा राष्ट्रीय जनहितार्थ जारी. -( कुत्र्यांना चावुन पिसाळवणारा ) टॉबरमॅण
  • Log in or register to post comments
प
पंगा Sun, 12/12/2010 - 17:17 नवीन
घाबरु नका दगड खिशात ठेवल्याने लगेच धर्मांतर होत नाही .
हा भाग कळला नाही. कृपया खुलासा होऊ शकेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sun, 12/12/2010 - 17:37 नवीन
सुज्ञास सांगणे ण लगे ! - नंबरी गावगुंड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
र
रेवती Sun, 12/12/2010 - 18:54 नवीन
अरे काय हे टार्‍या? तुझ्या पहिल्या प्रतिसादापासून हसतिये.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
न
नरेशकुमार Mon, 12/13/2010 - 05:56 नवीन
आमी सुज्ञ नाय, आमाला सविस्तर कळु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
शाहरुख Sun, 12/12/2010 - 18:13 नवीन
घाबरु नका दगड खिशात ठेवल्याने लगेच धर्मांतर होत नाही .
दगड नव्हे तर विटेचा तुकडा म्हटले पाहिजे ! बाकी जयेशजींच्याशी सहमत आहे..च्यायला, आपण तर मनेका गांधी आणि इतर प्राणिमित्रांना जाहीर आव्हान देतोय की रात्री २ वाजता पुण्याच्या रस्त्यांवरुन टु-व्हिलर वरुन जाऊन दाखवा म्हणून ! अक्षरशः अंगावर उड्या मारतात कुत्री !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
N
Nile Sun, 12/12/2010 - 18:33 नवीन
दगड विटा कशाला, खडुही चालतो म्हणतात. -दंत्या गाववाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
न
नंदन Mon, 12/13/2010 - 06:38 नवीन
>>> दगड विटा कशाला, खडुही चालतो म्हणतात. --- नशीब, नाहीतर त्या व्यक्तीवर 'आय अ‍ॅम अ‍ॅट माय विट्स एन्ड' म्हणण्याची पाळी यायची ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Mon, 12/13/2010 - 07:21 नवीन
=)) =)) तु म्हणजे अगदी 'एन्ड्'चंच बोल्लास! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
व
विजुभाऊ Mon, 12/13/2010 - 08:12 नवीन
दगड विटा कशाला, खडुही चालतो म्हणतात. खडू........? कुत्रे काय पाट्या वाच्तात काय? एन वे. भटके कुत्रे आणि समस्या या कुत्रेप्रेमींमुळे निर्माण होतात कबुतरांमुळे काही समस्या निर्माण होतात. काही धर्मीय कबूतराना किलोच्याकिलो ज्वारी खाऊ घालतात. कबुतरे माजतात आणि इतर लोकांच्या घरात घुसून शीटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
अ
अप्पा जोगळेकर Mon, 12/13/2010 - 10:38 नवीन
कृपया खुलासा होऊ शकेल काय? कुर्ला किंवा मुंब्रा येथील स्टेशनच्या स्वच्छतागॄहात जाऊन ५ मिण्टं उभे रहा म्हणजे कळेल आपोआप. दगड ठेवला तर कुण्णाला डाउट न्है येणार. विटकूराचा तुकडा ठेवाल तर येउ शकतो. आमच्या हितल्या बॅडमिंटन कोर्टपाशी पण कुत्र्यांचा भारी त्रास. एकदा मागे लागला म्हणून रॅकेट घातली टाळक्यात तर गटिंगच तुटलं. तेंव्हापासून सरळ लाथच मारतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
अ
अप्पा जोगळेकर Mon, 12/13/2010 - 10:40 नवीन
कृपया खुलासा होऊ शकेल काय? कुर्ला किंवा मुंब्रा येथील स्टेशनच्या स्वच्छतागॄहात जाऊन ५ मिण्टं उभे रहा म्हणजे कळेल आपोआप. दगड ठेवला तर कुण्णाला डाउट न्है येणार. विटकूराचा तुकडा ठेवाल तर येउ शकतो. आमच्या हितल्या बॅडमिंटन कोर्टपाशी पण कुत्र्यांचा भारी त्रास. एकदा मागे लागला म्हणून रॅकेट घातली टाळक्यात तर गटिंगच तुटलं. तेंव्हापासून सरळ लाथच मारतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
अ
अवलिया Mon, 12/13/2010 - 04:16 नवीन
टारजन इ़ज बॅक. खिशात दगड... द बेस्ट ! माझ्याकडुन एक मस्तानी सप्रेम भेट. पर्‍याच्या कॅफेवर जाउन वसुली करुन घेणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
न
नरेशकुमार Mon, 12/13/2010 - 06:04 नवीन
ओ फुकट्यान्नो, द्यायचि असेल तर सरल द्या ना, कायला इकडं तिकडं हिन्ड्वु र्‍हायले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
नरेशकुमार Mon, 12/13/2010 - 06:13 नवीन
व्हिन्सक टार्‍याचा णीशेध. डोळ्याचं पातं हलवन्यापेक्शा "कुत्ते कमिने, मै तेरा खुन पि जाउन्गा" अशी आरोळी ठोकुन द्यायचि व्हती. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सूर्यपुत्र Sun, 12/12/2010 - 16:45 नवीन
>>या कुत्र्या॑चा काही ब॑दोबस्त व्हावा कि॑वा या॑वर काही उपाय योजना व्हावी असे आपणास वाटत नाही काय? नकी वाटते. कुत्र्यांना फॅमिली प्लॅनींग करायला शिकवायला पाहिजे, त्यासाठी त्यांना उद्युक्त केले पाहिजे. >>हा प्रश्न सामाजीक नाही काय? आहेच. कुत्र्यांना भुंकणे, चावणे यांबाबतचे सामजिक नियम शिकवले पाहिजेत.
  • Log in or register to post comments
प
पंगा Sun, 12/12/2010 - 17:29 नवीन
कुत्र्यांना भुंकणे, चावणे यांबाबतचे सामजिक नियम शिकवले पाहिजेत.
नेमके कोणाचे सामाजिक नियम? या बाबतीतले त्यांच्या समाजाचे नियम ते पाळतातच, असे वाटते. यावर जर काही तोडगा काढायचा असेलच, तर तो 'टू-नेशन थियरी'च्या आधारावरच होऊ शकेल, असे आमचे ठाम मत आहे. ऑल इंडिया कॅनाइन लीगचे अध्वर्यू याकडे लक्ष देतील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्यपुत्र
प
प्रदीप Mon, 12/13/2010 - 13:56 नवीन
कुत्र्यांना फॅमिली प्लॅनींग करायला शिकवायला पाहिजे, त्यासाठी त्यांना उद्युक्त केले पाहिजे.
तुम्ही कदाचित हे थट्टेने म्हटले असेल, पण नेमकी हीच उपाययोजना अनेक विकसीत देशात वापरली जाते. 'भटक्या कुत्र्यांना पकडा, त्यांचे न्यूटरींग (मराठी प्रतिशब्दः वंधीकरण?) करा व पुन्हा त्यांना सोडून द्या'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्यपुत्र
व
वेताळ Mon, 12/13/2010 - 14:07 नवीन
इथे माणसांवर उपचार करताना सरकारच्या नाकी नउ येते मग कुत्र्याना शोधुन फॅमिली प्लनिंग कसे करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
न
नरेशकुमार Mon, 12/13/2010 - 14:12 नवीन
सरकार नाकाने फॅमिली प्लनिंग का करते, हाताने का करत नाय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
प
प्रदीप Mon, 12/13/2010 - 15:04 नवीन
माणसांच्या जीवाची आता जिथे किंमत शून्य झालेली आहे, तिथे जनावरांचे काय? पण मी सूचित केल्याप्रमाणे करायचे नसेल तर भटक्या कुत्र्यांना पकडून मारणे हा एकमेव उपाय रहातो ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
N
Nile Mon, 12/13/2010 - 20:16 नवीन
हे भारतातही केले जाते. म्युनिसीपाल्टीची लोक कुत्र्यांना पकडुन घेउन जाताना अन परत आणुन सोडताना पाहिले आहे. पण इंड्यात कुत्र्यांचे प्रसवणे म्युनिसीपाल्टीपेक्षा जास्त इफिशिंयट असल्याने प्राब्लेम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
उ
उपास Sun, 12/12/2010 - 17:14 नवीन
ह्या प्रश्नाची व्याप्ती दिसते त्यापलिकडे असावी.. रात्री अपरात्री गल्लीतल्या कुत्र्यांच्या भुंकण्या किंवा विव्हळण्यामुळे झोपमोड होऊन त्याचा लोकसंख्येवर परिणाम होत नसेल काय? कुत्र्यांना भटके ठेवताच कामा नये.. एक तर मालक हवा नाहीतर पांजरपोळ.. पण विचार आणि कृती करणार कोण?
  • Log in or register to post comments
प
पंगा Sun, 12/12/2010 - 17:18 नवीन
रात्री अपरात्री गल्लीतल्या कुत्र्यांच्या भुंकण्या किंवा विव्हळण्यामुळे झोपमोड होऊन त्याचा लोकसंख्येवर परिणाम होत नसेल काय?
नेमक्या कोणाच्या लोकसंख्येवर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास
उ
उपास Sun, 12/12/2010 - 17:30 नवीन
सुज्ञांस सांगणे न लगे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
न
नरेशकुमार Mon, 12/13/2010 - 05:58 नवीन
ज्या कुत्र्यांची झोपमोड होईल त्यांच्या लोकसंख्येवर परिणाम होत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
व
वारा Sun, 12/12/2010 - 17:28 नवीन
ईशय बी जबर्या अनी पर्तिक्रीया बी जबर्या...... थ.न्डीत कुत्री चेकाळलीत खर. रात्र भर केकाटत्यात.. आवरा कोन तर त्याना..
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Sun, 12/12/2010 - 18:22 नवीन
ती कुत्री इतकी अ‍ॅग्रेसिव्ह का होतात ह्याचा विचार केला आहे का? तुम्हाला कोणी जेवायलाच देत नसेल तर तुम्ही अन्न मिळवण्यासाठी प्रसंगी भांडणार नाही का ? त्यांना उगाच मजा म्हणून दगड मारणार्यांचा बंदोबस्त कसा करायचा ह्याची चर्चा कधी करायची? आजकाल कुत्री सोडा, जंगातले हत्ती, बिबटे, लांडगेही मनुष्याच्या वस्तीवर हल्ले चढवू लागले आहेत. ह्या सगळ्या प्राण्यांचा बंदोबस्त करायला हवा का? आपण माणसांनी सगळी नैसर्गिक संसाधने संपवल्यावर हे प्राणी कुठं जाणार?
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Mon, 12/13/2010 - 06:00 नवीन
जनु मन्दिरा गान्धिच बोलु लागल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
च
चिंतामणी Mon, 12/13/2010 - 06:08 नवीन
जनु मन्दिरा गान्धिच बोलु लागल्या तुम्हाला मनेका म्हणायचे आहे का? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
न
नरेशकुमार Mon, 12/13/2010 - 06:09 नवीन
तेच तेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
इ
इंटरनेटस्नेही Sun, 12/12/2010 - 20:25 नवीन
टारझन यांच्या प्रतिसादाशी अगदी सहमत. नाहीतरी आपण मोबाईल, पेन ड्राईव्ह, रुमाल, पाकिट, आणि 'पेन' आपल्यासोबत हरघडी बाळगतोच. मग एक दोन दगड स्वच्छ करुन आपल्या खिशात बाळगायला काहीच हरकत नाही. आणि माझं पुर्णपणे व्यक्तिगत मत, हे सर्व प्राणिमित्र म्हणाजे मानवाधिकारवाल्या मंडळीं सारखे असतात. घरात बसुन आपल्या मतांची पिंक टाकणारे अहो कुत्रे रात्री अपरात्री बाईकचाच काय कारचा देखील पाठलाग करतात. आणी प्रत्येकच वेळी आपण काचा बंद केल्या असतील असे नाही.. अचानक त्यांचे आतल्या व्यक्तीला नख जरी लागले तरी इंजेक्शन घ्यावे लागते. - (भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत दयामाय न बाळगणारा यमराज) इंटेश.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 12/13/2010 - 04:13 नवीन
प्रकटाआ...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 12/13/2010 - 04:26 नवीन
या भटक्यां कुत्र्यांचा लयं त्रास हाय च्यायला... यांची अनियंत्रीत प्रजा हेच या बिकट समस्येचे मूळ कारण असावे असे वाटते,च्यामारी पण त्याचा आपल्याला का त्रास ? माझी तर या कुत्तरड्यांमुळे दररोज झोपमोड होते... रात्रीच यांना काय उत येतो कोणास ठावुक? पण माझ्या डोक्याची पार काशी-मथुरा होते त्याचे काय ? साउंड प्रुफ खिडक्या बसवाव्यात काय असा सुद्धा इचार करतोय... साला दिवसभर खाउन जमा केलेल्या कॅलरीज रात्री भुंकुन भुंकुनच कमी करायच्या असतात असे कोणी या कुत्तरड्यांना शिकवुन ठेवले आहे काय ? साला भुंकुन भुंकुन यांची नरडी सुजत कशी नाहीत हेच मला काही केल्या समजत नाहीये !!! कॉमन वेल्थ गेम्सच्यावेळी त्या परिसरातील कुत्री पकडण्यात आली व्हती म्हणे, तसं असेल तर तिच्यामारी माझ्या कॉलनीत असे खेळ भरवावे आणि कुत्तरड्यांचे काम तमाम करावे ,असे सरकारला सुचवावे काय ? असा विचार देखील करुन झालाय. ;) काही झालं तरी मोकाट कुत्तरड्यांचा कायमचा बंदोवस्त झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
ई
ईन्टरफेल Mon, 12/13/2010 - 05:39 नवीन
Image removed.Image removed.से taygar" alt="" /> Image removed.से taygar हित कुत्र्यांची चर्चा चालु हाय अन! तुमि बीबट्याची लिंक देताय आमच्या गावात दर महिन्याला एक बीबट्या पकडला जातो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Mon, 12/13/2010 - 06:13 नवीन
तुमि बीबट्याची लिंक देताय ती बिबट्याची लिंक नसुन वाघाची आहे, ज्यांची संख्या वाढायला हवी त्यांची रोडावत चालली असुन... नको त्या प्राण्यांची संख्या दिन दुगनी रात रात चौगुनी वाढत आहे. संजय गांधी उद्यानातुन बाहेर पडणारे अनेक बिबटे घोडबंदर रोडच्या वाहतुकीने मारले गेले आहेत, बिबट्यांना नैसर्गिक आहार मिळत नसावा, तसेच त्यांचे आरक्षित क्षेत्र मनुष्याने ग्रस्त होत असावे...मग भुकेला जीव मनुष्य वस्तीत येतो !!! उपाय :--- आवारा कुत्र्यांना पकडुन अशा पार्कमधे सोडुन दिले पाहिजे,म्हणजे बिबळ्यांची पोट पुजेची सोय होइल आणि आपल्या शांत झोपेची सुद्धा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईन्टरफेल
छ
छत्रपती Tue, 12/14/2010 - 11:39 नवीन
काल आम्ला मन्त्र्यान्नी हग्या दम दिला. सुद्दलेकन सुदरवा नायत तुम्चा शिरच्छेद होइन मन्ले. तवा आमचे तेल्लाम्प पेतले आनी मनुन रातोरात अब्यास करुन कलफलक सोध्ला. हा तर मदनब्बाण यान्नी बिबत्याचा उपाय सुचव्ला तो कास नामि हे. आम्च्या गावात एका रात्रे बिबट्या आला नि वेशीत झोपेल ३-४ कुत्र्यान्चा फदशा पादला. तेच्यानन्तर दुसर्या दिवसपासुन सगले कुत्रे घाबर्ले आनि घरान्च्या कवलान्वर जावोन लपोन बसु लाग्ले. बिबट्या सोघुन सोधुन कुत्रे फस्त करत राहला. गावतले सगले कुत्रे सन्प्ले. कुत्र्यान्ची लोक्सन्ख्या सम्प्ली पण मानसान्ची वाधली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मनीषा Mon, 12/13/2010 - 04:44 नवीन
खरच .. ही तर दहशतवादा पेक्षा जास्त गंभीर समस्या आहे . चौकशी साठी अनेक सदस्यीय समिती नेमावी .. (त्याच बरोबर अमेरिकेची मदत मागावी काय ? ... या बद्दल विचार विनिमय करण्यासाठी वेगळी समिती नेमावी ) चर्चा करून, शांततामय मर्गाने सर्व प्रश्न सुटतातच, -- मग त्या साठी लागली जरा ५०-६० वर्षे तर काय हरकत आहे ?.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Mon, 12/13/2010 - 12:02 नवीन
मनीषाताई, अहो, तुम्हाला या भटक्या कुत्र्यांचा (स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी) अनुभव दिसत नाही... म्हणूनच असा उपरोध सुचतोय. नशीबवान आहात. मध्यरात्रीच या कुत्र्यांना काय चेव येतो देव जाणे. १५-२० कुत्री एकत्र येऊन चेकाळून भुंकत असतात. रोजची अशी झोपमोड होण्याचं कारण कुत्रे आहे हे वाचून अनुभव नसणार्‍यांना गंमत वाटते, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं हो! लोकांना रात्री फिरताना तर गुंडांपेक्षा कुत्र्यांची भीती जास्त वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
स
स्वानन्द Mon, 12/13/2010 - 13:07 नवीन
अहो ते उपरोधाने लिहीले आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
स
स्मिता. Tue, 12/14/2010 - 05:50 नवीन
नाही हो स्वानंदराव, गल्ली नाही चुकले. ते उपरोधाने लिहिलेय हे कळले मला. पण दुखर्‍या नस वर बोट ठेवलं गेल्याने भावनेच्या भरात लिहिलं गेलं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द
N
Nile Mon, 12/13/2010 - 20:17 नवीन
मध्यरात्रीच या कुत्र्यांना काय चेव येतो देव जाणे. १५-२० कुत्री एकत्र येऊन चेकाळून भुंकत असतात.
त्यांच्या प्रणयाराधनेत व्यत्यय आणल्यावर अजुन काय करतील कुत्रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
म
मनीषा Tue, 12/14/2010 - 05:18 नवीन
अरेरे !! देवा ! बुद्धीप्रामाण्यवाद की काय म्हणतात तो हाच का ? आम्ही कुत्र्यांच्या भुंकण्यामागचा कार्यकारणभाव जाणून घेण्याच्या भानगडीत पडत नाही . कुत्री भुंकायला लागली की त्यांचा आवाज बंद करायला पाहिजे एव्हढेच आम्हाला कळते .. अर्थात शक्य तेव्हढ्या शांततामय मार्गाने ... हे राम .......!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
ग
गवि Mon, 12/13/2010 - 05:59 नवीन
कुत्र्यांना मारायला नाय पायजेल. रात्रीचे भटकू नये.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Mon, 12/13/2010 - 06:03 नवीन
बरोबर हाय, कुत्र्यासारखा विमानदार कोनच नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Mon, 12/13/2010 - 06:36 नवीन
व्हय तर्..खरंच तर हाय.. विमानात बाँब ठिवलाय म्हून फोन आला की लागत्यात नं कुतरे वास काढायला सूं सूं करुन.. अवांतर : जेट एअरवेजवाले नरेश आपणच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
न
नरेशकुमार Mon, 12/13/2010 - 06:45 नवीन
आमि अशिच मज्जा केलि होति. क्शमस्व : करा मि तो नव्हेच. मि असाच एक फुटकळ प्रतिसादक/वाचक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Mon, 12/13/2010 - 06:49 नवीन
अरेरे.. ते तुम्ही नव्हेच ? असू द्या.. असू द्या. आमाला वाटले फुकट इमानाचं तिकिटगिकिट भेटंल तुमच्याकडनं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
म
मितभाषी Mon, 12/13/2010 - 07:13 नवीन
नंगा टारझनचा प्रतिसाद लै भारी. एका ज्वलंत समस्येला वाचा फोडल्याबद्दल श्री जयेश माधव यांचे अभिनंदन. या कुत्र्यांना (पुल्लींगी) खोडव्यात घेवुन बडवायला पाहीजे.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 12/13/2010 - 07:18 नवीन
तुम्ही (स्त्रिलिंगी) कुत्र्यांन्ना सिंगल आउट करत आहात हे मला खटकलेले आहे. आमच्या कॉलनीतल्या डॉली ला नाव सांगायला पाहिजे तुमचं @#@
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा