Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भट्के कुत्रे आणि आरोग्य

ज
जयेश माधव
Sun, 12/12/2010 - 15:27
🗣 69 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
12399 वाचन

💬 प्रतिसाद (69)
अ
अवलिया Mon, 12/13/2010 - 13:04 नवीन
तुमच्या कॉलनीतली डॉली यंदाच्या भादव्याला बाहेरच्या कॉलनीत लै हिंडत होती आणि सध्या पण तिचा जीव बाहेरच्या कॉलनीतच आहे असं परा डान्रावाला सांगत होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Mon, 12/13/2010 - 13:38 नवीन
असेल बाबा :) आजकाल डॉली समस्त स्त्रीलिंगी प्राणिमात्रांचे उक्ते घेईन फिरते म्हणे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
य
योगप्रभू Mon, 12/13/2010 - 09:21 नवीन
श्रीकांत सिनकर लिखित 'इन्स्पेक्टर वाकटकरांच्या चातुर्यकथा' या पुस्तकातील एक कथा आठवली. मुंबईत श्रीमंत व बंगलेवाल्यांच्या घरात चोर्‍यांचे सत्र सुरु झाल्याने आणि गुन्हेगार सापडत नसल्याने पोलिस हैराण झाले होते. या प्रकरणाचा तपास इन्स्पेक्टर विनायक वाकटकरांकडे आला. या घरफोड्या बारकाईने अभ्यासताना एक मुद्दा वाकटकरांच्या लक्षात आला, की या चोर्‍या बहुतेक रात्री एक ते पहाटे चार या तीन तासांतच झाल्या आहेत. त्यांनी याच काळात गस्त वाढवली आणि त्यातून 'राणा' नावाचा बुद्धिमान गुन्हेगार सापडला. त्याच्या चौकशीत अचंबित करणारी माहिती हाती लागली. बंगल्यांमध्ये चोर्‍यांचे तंत्र विकसित करण्यापूर्वी या राणाने माणसांच्या आणि कुत्र्यांच्या गाढ झोपण्याच्या वेळांचा अभ्यास केला होता. त्यामुळे तो बहुतेक चोर्‍या रात्री २ ते ३ या वेळात करत असे. भटकी कुत्री ही कधीही धोकादायकच असतात. अलिकडच्या काळात तर अशा अनेक घटना वाचनात आल्या आहेत ज्यात या भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांचे लचके तोडून मांस ओरबाडून काढले आहे. भटकी कुत्री प्रामुख्याने कचराकुंडीतील खरकट्यांवर पोसली जातात. घरे व हॉटेलमधून कुंडीत फेकलेल्या पदार्थांत तेल व स्निग्धाचे (बटर, चीज) प्रमाण मुबलक असते शिवाय मांसातील हाडांचे तुकडेही कुत्र्यांसाठी मेजवानी असते. ते खाऊन भटकी कुत्री तापट स्वभावाची होतात. (पाळलेले कुत्रे चीडखोर होऊ नये यासाठी कुत्र्याला तेल न लावलेली पोळी खायला देण्याची काळजी मालकाला घ्यावी लागते.) या तापट कुत्र्यांचे दात शिवशिवायला लागतात. ती आपापसांत भांडताना इतर कुत्र्यांचे लचके तोडतात. पळत्या गाड्यांचा पाठलाग करणे, एकट्या पादचार्‍याच्या अंगावर जाणे, हे त्यांचे आवडते खेळ. यात एखाद्या कुत्र्याच्या शेपटावरुन किंवा पायावरुन गाडी गेल्यास ते कायम गाड्यांशी खुनशीने वागते. भटकी कुत्री पिसाळण्याचा धोका अधिक असतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात भटकी कुत्री मलमूत्र विसर्जन करतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिसची साथ पसरते. कुत्र्याचे नीर्बीजीकरण करणे हा उपाय त्यांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी ठीक असला तरी दाताचे काय? कुत्र्याचा दात नुसता कातडीला लागला आणि व्रण उमटला तरी रेबीजची तीन इंजेक्शने आणि धनुर्वाताचे एक अशी चार इंजेक्शने घ्यावी लागतात. मीपण भटक्या कुत्र्यांचा नायनाट व्हावा, या मताचा आहे.
  • Log in or register to post comments
छ
छत्रपती Mon, 12/13/2010 - 12:28 नवीन
कुअतर दसल तअरे कल्जी नाय कराची. पुरवीसारके बेम्बतात १४ सुया घेयाच गरज नाहे दसुद्या त्यन्चे कमाच हे ते.
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Mon, 12/13/2010 - 13:10 नवीन
>>दसुद्या त्यन्चे कमाच हे ते आयला... ही कुठली कुत्री? डसणारी... !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छत्रपती
न
नरेशकुमार Mon, 12/13/2010 - 13:44 नवीन
डसणारी कुत्री माझ्या बालमनात भलतेसलते XXXXXXX इचार आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 12/13/2010 - 17:30 नवीन
कुत्रा चाव्या मुळे जे विष अंगात भिनते ते उतरवण्या साठी साठी एक मंत्र आहे असे वाचले होते.. कुत्रा अंगावर आल्यास घाबरुन पळु नये..त्या मुळे कुत्रा अजुनच बिथरतो..आहे त्या जागी शांत उभे रहावे,,त्या मुळे श्वान पण शांत होतो..जरा वेळ तो थांबतो..व नंतर जातो... जर हाणा मार्या करायच्या असतिल तर एक दगड उपयोगाचा नाहि ..कारण नेम चुकतो..मग गोची होते व कुत्रा डुख धरतो..चांगले १०-१२ दगड जवळ बाळगुन रहावे..म्हणजे नेम चुकला तरी भिति नसते.... डुख धरलेला कुत्रा कधि तरी वचपा काढतोच..
  • Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र Mon, 12/13/2010 - 17:39 नवीन
>>कायम एखादा दगड खिशात ठेवत चला... घाबरु नका दगड खिशात ठेवल्याने लगेच धर्मांतर होत नाही . आणि >>चांगले १०-१२ दगड जवळ बाळगुन रहावे..म्हणजे नेम चुकला तरी भिति नसते.... ?????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
ग
गणपा Mon, 12/13/2010 - 17:39 नवीन
मोकाट कुत्री (कुत्र्यांच अनेक वचन) पकडुन ती चीनला एक्सपोर्ट करावी. १) आपल्याला कुत्र्यांपासुन मुक्ती. २) त्यांच्या जेवणाची सोय. (त्यांच्या म्हणजे चीन्यांच्या, कुत्र्यांच्या नव्हे) ३) उत्पंन्नाच नवीन साधन
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 12/13/2010 - 17:56 नवीन
ज्वलंत विषय आणि सुंदर प्रतिसाद! कुत्रे कुत्र्यांच्याच मौतीने मेले पाहिजेत. प्रजा वाढवण्याचा हक्क फक्त माणसांना असताना त्यांची प्रजा वाढते हे कधीही सहन केले जाऊ नये. रस्त्यावरून जाणारी गाडी ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि ती गाडी आपल्या अंगावरून जाणे किंवा मोठ्या आवाजात किंचाळत जाणे हा त्या गाडीचा हक्कच आहे ही साधी गोष्ट त्यांना कळत नाही. भारतात दरवर्षी लाखाच्यावर बळी घेणार्‍या या गाड्यांविरूद्ध खुद्द माणूस ब्र काढत नसताना ही कुत्री गाडीवर भुंकतात, तिचा पाठलाग करतात म्हणजे काय? कुत्तरडे साले. मारा. ठेचा.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 12/13/2010 - 18:01 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
श
शाहरुख Mon, 12/13/2010 - 18:24 नवीन
नैसर्गिक बैसर्गिक ठेवा बाजूला !! प्रश्न कसा सोडवायचा ते सांगा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Mon, 12/13/2010 - 19:11 नवीन
गल्लोगल्ली उकीरडे नसते तर त्यावर जगणारी भटकी कुत्रीही नसती. प्रश्न काय आहे ते ठरवा आधी. शहरात उकीरडे आहेत म्हणून कुत्री, माकडं वगैरे सहज मिळणार्‍या अन्नामुळे येतात. तुमची गल्ली स्वच्छ ठेवा. कुत्री येणार नाहीत. सगळं शहर स्वच्छ असेल तर अन्नाच्या शोधात ती बाहेर जातील. पण आपण स्वतः स्वच्छता करणे, आजूबाजूंच्या लोकांना स्वच्छता ठेवायला भाग पाडणे आणि भटके कुत्रे दिसल्यास लांब शहराबाहेर नेऊन सोडणे हे करण्यापेक्षा कुत्री मारणे सोपे, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
श
शाहरुख Mon, 12/13/2010 - 19:49 नवीन
धिस मेक्स सम सेन्स :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Tue, 12/14/2010 - 03:05 नवीन
हो ना? गुड. मग आता उगाचच चावू नका बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
प
पंकज Mon, 12/13/2010 - 18:42 नवीन
हि समस्या परप्रांतिय कुत्र्यांमुळे निर्माण झाली आहे. परप्रांतिय कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. भुमीपुत्रांवर अन्याय होता कामा नये.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Tue, 12/14/2010 - 05:12 नवीन
मराठी कुत्रा आन बिहारि कुत्रा यान्च्या भुन्कन्यात काय फरक अस्तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंकज
ह
हुप्प्या Tue, 12/14/2010 - 01:57 नवीन
जर खाण्याकरता प्राणी मारलेले (कायद्याला) चालतात तर लेप्टोस्पायरोसिससारख्या जीवघेण्या रोगांपासून वाचण्याकरता प्राणी मारणे कायद्याने चूक कसे ठरवले? दोन्ही बाबतीत मनुष्य आपल्या फायद्याकरता दुसर्‍या प्राण्याचा जीव घेतो आहे. डास, ढेकूण, झुरळे हे प्राणी उपद्रवकारक आहेत आणि त्यांना मारणे कायदा चूक समजत नाही. त्यांना मारण्याकरता राजेरोसपणे औषधे बनवली जातात, विविध कंपन्या फवारे मारायची कंत्राटे घेतात. तर मग कुत्र्याने काय घोडे मारले आहे? भटक्या कुत्र्यांना मारायला आडकाठी का असावी?
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 12/14/2010 - 05:37 नवीन
म्युनिसीपालिटीला कुत्री मारण्यास कोणत्याही कायद्याने बंदी नसावी असे वाटते. हा प्रकार तथाकथित जनहित याचिकेमुळे झाला आहे. प्राणिमित्र कोर्टात गेले आणि कोर्टाने ऑर्डर काढली. मूळ याचिकेवर शासनाने स्वतःचा बचाव केला नाही कारण कुत्री पकडून मारणे या कामातून त्यांची सुटका होत होती. येथे सांगितलेला मेकॅनिझम वापरला गेला. कोर्टाला कसलीच अकाउंटेबिलिटी नसल्याने कोर्टाने ऑर्डर का काढली असे कोर्टाला विचारण्याची सोय नाही म्हणून हे चालू राहिले आहे. खटल्याच्या वेळी प्राणिमित्र संस्थांनी कुत्र्यांची नसबंदी आम्ही करू (नसबंदीची पुरेशी यंत्रणा नसतानाही) असे सांगितले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा