Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

न पटणारे शब्द.....

५
५० फक्त
Wed, 12/15/2010 - 03:21
🗣 10 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3521 वाचन

💬 प्रतिसाद (10)
म
मृत्युन्जय Wed, 12/15/2010 - 07:14 नवीन
हर्षद साहेब पुर्वी देखील या विषयावर चर्चा झालेली आहे. http://misalpav.com/node/10031
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Wed, 12/15/2010 - 07:29 नवीन
पण तरी सुद्धा मला वाटते ह्यात एक शिवाजी बद्दलची काळजी व्यक्त झाली आहे. बाजीप्रभु ला असे तर म्हणायचे नाही ना की - तो जिवंत असे पर्यंत शिवाजी शक्यतो लांब जाईल व पोहोचेल विशाळगडावर. व हे लवकर होऊदे. जेवढे पटकन होईल तेवढे छान. रणांगणात कधी कोणाचे पार्डे जड होईल हे सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 12/15/2010 - 07:41 नवीन
बाजी प्रभू जवळजवळ २० तास लढत होते. अंगावर झेललेल्या घावानी रक्त वाहून ते थकले होते सरणार कधी रण प्रभो तरी हे कुठ्वर साहु घाव शिरी हे वाक्ये ही एक कवीकल्पना आहे. बाजीप्रभूनी अशी वाक्ये मनात आणली असतील ती केवळ माझा राजा सूखरूप पोहोचू देत. बाजी प्रभूनी देवाला आलवले आहे. माझ्या शरीरात प्राण आहे तोवर मी लढेन आणि शत्रू ला थोपवेन. फक्त रयतेचा राजा सूखरूप पोहोचू देत हीच विनवणी बाजी प्रभू देवाला करत असतील. हे देवा लवकरात लवकर राजा गडावर पोहोचू देत आणि माझी लढाई संपू दे. राजा सूखरूप पोहोचल्यानन्तर कर्तव्य पूर्तीच्या आनन्दात मी मरेन. अजून कुठवर शरीरावर घाव सोसायचे. वेदनानी व्याकूळ झालेल्या जीवाला मुक्ती हवी होती ती देखील कर्तव्य पूर्तीनन्तरच.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 12/15/2010 - 07:53 नवीन
त्या जखमी स्थितीतही त्यांच्यावर वीररसाने स्फुरत राहण्याची सक्ती कशाला. वाटले असेल तसे..त्या वेदनाव्याकुळ अवस्थेत पोचल्यावर. शिवाय वर इतरांनी म्हटल्याप्रमाणे "हे लवकर संपू दे..राजा सुरक्षित पोहोचू दे.." अशी भावना असेलच. कदाचित "राजा सुरक्षित पोचला आणि तोही वेळेतच तर त्याच्या पुढील सेवेसाठी जिवंत राहायची संधीही कदाचित मिळेल" अशी आशाही असेलच. जीव द्यायची तयारी आहे पण वाचला तरी हवे आहे, अशीच स्थिती नैसर्गिक नाही का? असेच घाव अजून खूप काळ झेलत राहावे तर अंत नक्की हे दिसल्यावरही माणसाची कामाविषयीची "पॅशन" तितकीच धगधगती राहावी असे कसे म्हणावे? माकडिणीच्या गोष्टीप्रमाणे मनुष्यप्राण्यातली आई आणि पिल्लू वाढत्या पाण्यात बुडत आहेत. मातृत्वाच्या भावनेने आईने बाळाला डोक्यावर धरून वाचवण्याची शर्थ चालवली आहे. तिच्या नाकाशी पाणी आले तरी तिने बाळाला वर धरले आहे. अशा स्थितीत तिने "आता तरी पाणी लवकर ओसरावे बुवा", "किती वेळ असे मरणाची वाट पाहात उभे राहायचे. आणि किती वेळ आपण बाळाला वाचवून उंच धरु शकू", "आपण जिवंत राहिलो तरच बाळाला वाचवणार ना?" "लवकर पाणी ओसरले तर आपण दोघेही जिवंत राहू नशिबाच्या कृपेने.." वगैरे.... अशी काळजी व्यक्त करणे म्हणजे मातृत्वाला आणि तिच्या "जिगर"ला न शोभणारे विचार नव्हेत.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 12/15/2010 - 13:04 नवीन
एका चर्चेत मीच असा विचार मांडला होता... मला सगळ्यांनी झोडपुन काढले, पण माझे मत अजुनही कायम आहे... हे जिवन-मरणावरच रुपक आहे... पावण्खिंडीचे रुपक वापरुन कवीने आयुष्यावर कवीता केलिय... आज कुणितरी वेगळा विचार करणारा भेटला याचे समाधान आहे. (परत भांडायला तयार) शैलेन्द्र
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Wed, 12/15/2010 - 15:04 नवीन
>> मला हे शब्द बाजीप्रभुंचे असतील असं वाटत नाही, अगदी कितीही काव्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केला तरी सुद्धा. कुसुमाग्रजांचे शब्द आहेत, बाजीप्रभूंचे नाहीतच! ;) गंमत जाऊदे पण अहो कविकल्पना आहे ती. कुसुमाग्रजांनी अथक झुंजणार्‍या एका योद्ध्याची भावनिक स्थिती मांडायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे आपण आपापल्या कुवतीनुसार आकलन करायचे. मग कुणाला त्यात जीवन-मरणाचे रूपक दिसते तर कुणी म्हणतं महाराजांच्या काळजीनं त्यांच्या मनात असे विचार येत असावेत. एक सांगा, आता या कवितेत "पावन खिंडीत पाऊल रोवून" ऐवजी 'दुसर्‍या कुठल्याही खिंडीत पाऊल रोवून शरीर पिंजेतो रण केले' असा उल्लेख असता तर आपल्या मनात हे प्रश्न आले असते का? तेवढा एक उल्लेख सोडला तर इतर कुणाही जीवाची पर्वा न करता लढणार्‍या योद्ध्याची मनःस्थिती या कवितेतून व्यवस्थित चित्रित होईलच. पण बाजीप्रभूंच्या बाबतीत कुसुमाग्रजांनी असं म्हटलं म्हणून "बाजींनी असा विचार केलाच नसता. हे शब्द बाजींचे असूच शकत नाहीत." असा नाही होत काही. :) >> हे जिवन-मरणावरच रुपक आहे... पावण्खिंडीचे रुपक वापरुन कवीने आयुष्यावर कवीता केलिय. हे मस्तच. मी वर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही कवितेचे आपल्या कुवतीप्रमाणे आकलन करावे. सर्वांना समान आकलन झालेच पाहिजे असा काही दंडक नाही. उदा. शाळेत "जरि तुझिया सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही, मी फूल तृणातील इवले उमलणार तरीही नाही" ही कविता शिकलो होतो. या कवितेतून मला शिवाजी महाराजच दिसायचे! :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 12/15/2010 - 15:07 नवीन
मेवे, उत्तम प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
श
शैलेन्द्र Wed, 12/15/2010 - 16:34 नवीन
"मी वर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही कवितेचे आपल्या कुवतीप्रमाणे आकलन करावे. " थोड वेगळ्या शब्दात, कोणती कविता कोणत्या वेळी किंवा कुणाला कशी भिडेल ते नाही सांगता येत, त्याचे काही नियमही नसतात. म्हणुनच, कवितेचा अर्थ असा काही सांगायच्या भानगडीत पडु नये अस वाटत. शरदीनी काकुंच्या कविता म्हणुनच कित्येकदा मनाला भिडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
र
राजेश घासकडवी Wed, 12/15/2010 - 23:27 नवीन
हे जिवन-मरणावरच रुपक आहे... पावण्खिंडीचे रुपक वापरुन कवीने आयुष्यावर कवीता केलिय...
सहमत. देहरूपी खिंडीत सापडलेला आत्मा नश्वर संसाराची दुःख सोसत, तरीही निष्ठेने प्राण पणाला लावून आपलं कर्म करत असताना परमात्म्याच्या मीलनाची, सुटका होण्याची वाट पाहातो व ती तळमळ व्यक्त करतो असा अर्थ मी लावला. बाजीप्रभू हा केवळ निष्ठेचं प्रतीक, घोर संकटं आली तरी पराक्रमाची शर्थ करणारं व्यक्तिमत्व म्हणून येतं. कुसुमाग्रजांनी आपल्या प्रतिभेने या समरप्रसंगाला व्यापक रूप दिलेलं आहे. असं असताना बाजीप्रभूने अमुकच केलं असतं, व तमुकच केलं असतं या चर्चेला तितकासा अर्थ राहात नाही. कविता वेगळी व इतिहासाचं पुस्तक वेगळं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
आ
आत्मशून्य Wed, 12/15/2010 - 15:29 नवीन
पेक्षा चांगला चित्रपट नीघू शकेल ह्या सत्यकथेवर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा