काथ्याकूट
पीके !
Primary tabs
जसे पीजे म्हणजे पकाऊ जोक तसे पीके म्हणजे पकाऊ कोडे ! हा काथ्याकूट काढण्यामागचा हेतू हा की अशी जास्तीत जास्त कोडी समजवून घेणे आणि उत्तरे देण्यातली मजा अनुभवणे.. तर करुया सुरूवात?
पहिला पीके मीच विचारते..
दोन मुंग्या एक केक खात आहेत पण त्यांच्याच जवळ उभी असलेली तिसरी मुंगी खात नाहीये. ती का खात नसेल तो केक?
दोन मुंग्या एक केक खात आहेत पण त्यांच्याच जवळ उभी असलेली तिसरी मुंगी खात नाहीये. ती का खात नसेल तो केक?
कारण केकला मुंग्या लागल्या आहेत. -)
असे असावे.
अबब
कारण त्या केकला मुंग्या लागलेल्या आहेत ना! तीची आई रागावते मुंग्या लागलेलं खाल्लं की :-)
तिला डायबेटीस झालेला असेल.
:))))))
त्या मुंगीला जागचे हलता येत नसेल....
कारण तिच्या "पायांना मुंग्या" आल्या असतील !!
आपलेच,
साठ्यांचे कार्टे .
अरे वा ! अबब आणि ध.मु. दोघांनीही एकदम बरोबर उत्तरे दिलीत.
नुकतंच केजी पास केलेला विद्यार्थी कोणते गाणे म्हणेल?
क्रेझी किया रे
क्रेझी किया रे
योग्य उत्तराच्या खूप जवळ आहे हे उत्तर.. खरे उत्तर 'केजी किया रे' असे आहे !
एक आजारी गरूड अन्नाच्या शोधार्थ उडत असतो तर पोलिस त्याला अटक करतात ! का बरं?
illegal flying !!!!
अरे वाह ! बरोबर.. इतरांनीही कोडी विचारावी.. माझ्याकडे खूप लिमिटेड कोटा आहे !
१३चा घन किती? ( गणितज्ज्ञांनी माफ करावे ! )
सुरूऽऽऽऽर
आमच्या आनंदयात्री मास्तरांची शिकवणी!
तीन तेरा
>सुरूऽऽऽऽर
बरोब्बर !
>आमच्या आनंदयात्री मास्तरांची शिकवणी!
ये बात कुछ हजम नहीं हुई |
अशाच सज्जनांचा सहवास दे !
-(कृतकृत्य मास्तर) मिष्टर आनंद :)
एका मुलाचे नाव प्रकाश असूनही त्याचे सगळे दोस्त त्याला 'पक्या' म्हणायचे. यावरून तो एक शास्त्रज्ञ होता हे सिद्ध करा.
कारण पक्याच्या मित्राचे नाव दिनेश असूनही त्याला सगळे दोस्त 'दिन्या' म्हणायचे.
झाले सिद्ध.. हाय काय अन् नाय काय!
अम्ह्म.. इतके सरळसोट नाही याचे उत्तर ! सुरूवात मुद्दाम सोप्या कोड्यांनी केली मी.. ;-)
कृपया तुम्हीच प्रकाश पाडा उत्तराचा..
विचार करा की जरा..
एका सुसरीचं मगरावर प्रेम बसतं. दोघांच्या घरून विरोध म्हणून ते पळून जाऊन लग्न करायचं ठरवतात. ठरलेल्या रात्री, सुसर नदीकिनारी येते, वाट बघते आणि गाणं म्हणते. कोणतं गाणं?
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
...मगर तुम ना आये !
नंद्या तु बी उतरलास की !!
चाँद फिर निकला.. मगर तुम ना आये..
हेच ते गाणे!
खी खी खी :)
खी खी खी :)
चांद फिर निकला, मगर तुम ना आये
१३ च्या निम्मे ८ होतात, हे सिद्ध करा !!!
आठ एके आठ
आठ दुणे तेरा
....
म्हणून १३ च्या निम्मे ८!
हे हे कसलं सोप्पय!
हे हे हे ... आमच्या क्यालसी मधे ८ च होतात म्हणुन.
-(यम थ्री मधी ३ दा नापास झालेला) गणितयात्री
गलत जव्वाब.. लॉजिकल थिंकिंग आवश्यक आहे पीके असला तरीही !
१. हमे और जीनेकी चाहत ना होती, 'मगर' तुम ना होते
२. आजा 'मगर' मधुर चांदनी में हम
अशी अजून करता येतील...
उत्तर आवडले, नारदाचार्य :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
अहो मुनीवर्य ते 'सनम' आहे.
सनम बरोबर, पण त्या सुसरीची सनम मगरच ना हो? आणि जरा गुणगुणून बघा ना.
आणि.... शेजारचे पळून गेले!
पकाऊ कोड्याच्या उत्तरावर त्यांनी काय टाळ्या वाजवायच्या?
प्रश्न - २० फूट X २० फूट X १२ फूट पाण्याचा हौद आहे. त्यात निम्म्या उंचीपर्यंत पाणी भरलेलं आहे. त्यात जर सर्वसाधारण आकाराचा हत्ती पडला, तर काय होईल?
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
एवढेच ना .. सोप्पय .. तुम्हाला माहित नाही ??
१. हत्ती ओला होईल.
२. हत्तीचा पोपट होईल.
एक्झ्याक्टली हेच म्हणायचे होते नंदु :)))
हहपुवा...
दोन्ही उत्तरे बरोबर :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
धबाक्क्क्क्क... काही पाणी इकडे काही तिकडे.
स्विमींग करेल
तिथला वाचमेन दचकून खुर्चीतून धाप्पकन सांडेल.
१० पैकी १०.
ठ्ठप्पाक !!
कपाळावर हात मारुन घेतला वॉचमनने ;)
पन्नासातून पाच किती वेळा वजा करता येऊ शकतात?
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
एकदाच!
आलं की नाही..
झाला .. माझं विंटरनेट स्लो आहे म्हणुन :( माझ्या आधी पोष्ट झाला तुझा !
५० मधुन ५ हा आकडा वजा केला की ० रहाणार !
(बाकी शुन्य ही कादंबरी न आवडलेला) - आंद्या पाणिनी
तुमच्या शिकवणीप्रमाणे ४५ रहायला पाहिजेत..
म्हणजे तुम्ही आम्हाला भरगच्च फी घेउन चूकीचे शिकवले तर!
तुम्ही शिकवणी विसरलात .. तुम्ही म्हणता तशी आमची शिकवणी असली असती तर मुंगी एवढी सुसंस्कारी नसली असती :))))
एकदाच बरोबर आहे...पण पन्नासातून एकदा ५ घालवले की ४५ उरतात. पुन्हा ५ घालवायला, पन्नास कुठनं आणायचे? :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
तुमचीच शिकवणी लावा(वी) म्हणतो.
पण नारदाचार्य, थोडी 'कळ' काढा :)
[ह. घ्या. हो]
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
आभासी विश्वात सगळेच हलके घेतो. 'कळ' काढण्याचा स्वभाव असला की हलकेच घ्यावे लागते. त्यामुळे बिनधास्त चालू द्या.
आमचा हत्ती झाला ..
अळी मिळी गुप चिळी ठेवली असती तर काही बिघडले नसते :(
चला आता मी घालते कोडी, दोन हत्ती ज॑गलातुन चालले असतात, एक जण असाच झाडावर जाऊन बसतो, तर दुसरा का नाही?
त्याचे पाय दुखत नसतात?
(अंदाजपंचे)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
..........
झाला की नाही पोपट?
त्याला झाडावर बसायचा कंटाळा आलेला असतो.
बास की डोकं पकवणं. द्या की उत्तर काय ते....
मिपावरची 'फाष्टेश्ट फिफ्टी' म्हणुन गिनली जाइल ...
वेदश्री चा विजय असो !
पीके चा विजय असो !
मिपाधर्माचा विजय असो !
एका झाडावर ४ हत्ती बसलेले असतात...
पहिला हत्ती पडतो...का?
दुसरा पण पडतो...का?
तिसरा पण पडतो...का?
चौथा पण पडतो....का?
शेवटी झाड पण पडते...का का का?
भूकंप होतो!
त्यांना मुंगीचा धक्का लागतो.
बसल्या बसल्या पहिला हत्ती पेंगत असतो, त्याचा तोल जातो.
आता सांगा दुसरा का पडतो?
पहिला पडतो तेव्हा मोठ्ठा आवाज होतो ठप्प्पाक्क्क.
तो ऐकून दुसरा दचकतो आणि पडतो. हे दोघे कसे पडले हे पहायला जाऊन तिसरा पडतो आणि या तिघांचे असे झाले या धक्क्यानेच चौथा पडतो.
आता झाड का पडले ते तूच सांग धमाल मुला...
चला आता मी घालते कोडी, दोन हत्ती ज॑गलातुन चालले असतात, एक जण असाच झाडावर जाऊन बसतो, तर दुसरा का नाही?
अरे, पहिला बसल्यावर झाड आडवे नाही का होणार, मग दुसरा बापुडा कसा बर बसणार ?
दुसरा पहिल्याच्या शेपटीला धरून बसलेला असतो ना...म्हणून
तिसरा 'काय झालं?' बघायला जातो आणि धुब्बुक!
चौथ्याला वाटतं हा काय बॉ नवा खेळ म्हणून तोही..धुब्बुक..
आणि शेवटी..............
झाडाला वाटतं............आपणही हत्तीच आहोत म्हणून तेही.....
खासच. लय लय भारी. हे हत्ती कुठल्या सर्कसचे आहेत पहावे लागेल.
धमुला वाटतं.. आपण झाड आहोत.. म्हणून मग तो उभा रहातो.
एका फ्रीज मध्ये जिराफ कसा बसेल ?
हॅ हॅ हॅ....
दार उघडून...बास का ताई...आमीच शिकवलं की त्याला असं फ्रिजात शिरायला :-)
बरोबर?
भिंतीवरुन मुंग्या चाललेल्या असतात्,रेडीओवर गाणं चालू असतं "ओ साथी चलऽऽ".
अचानक गाणं संपतं आणि सगळ्या मुंग्या खाली पडतात. ??????
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
आता टाळ्या वाजवायला लागल्यावर आणखी काय होणार भौ?
धम्या लेका अगदी सह्ही जवाब.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
बर, सगळे प्राणी पिकनिकला जातात, फक्त जिराफ सोडुन का?
अग्गं.. तो फ्रिजमध्ये नसतो का... विसरलीस पण इतक्यात!
हे उत्तर येणार असं. तेवढ्यात नारायणानं बोलावलं आणि इकडं मनस्वीनं बाजी मारली.
असे का?
चतुरंग
तिचा ब्रेक पर्यत पाय पोचला नसेल !!!!! :)
या चर्चेत ८०+ प्रतिसाद आले आहेत. एवढ्या लांबलेल्या चर्चा कुठेतरी थांबायला हव्यात. या आधीच पिके २ व पिके ३ सुरू झाले आहेत , तेथे प्रतिसाद द्यावा.
धन्यवाद.