Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रतिज्ञा....

अ
अवलिया
गुरुवार, 12/16/2010 - 06:39
🗣 70 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
12380 वाचन

💬 प्रतिसाद (70)
न
नितिन थत्ते गुरुवार, 12/16/2010 - 06:47 नवीन
काहीच नाही.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 12/16/2010 - 06:55 नवीन
मी थत्तेचाचांच्या शब्दाबाहेर नाही, ते म्हणत असतील तर खरच काही उपयोग नसावा असे म्हणतो. बाकी प्रार्थना पटकन उरकुन घ्यायची आणि नंतर उशीरा आलेल्या ( आमच्यासारख्यांना ) उगाच शिक्षा करायची हा ही प्रार्थना घेण्यामागचा मास्तरांचा सुप्त हेतु असावा अशी शंका आता आम्हास येते. बाकी सविस्तर नंतर सवडीन - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अवलिया गुरुवार, 12/16/2010 - 07:30 नवीन
आम्ही सुद्धा थत्तेचाचांच्या शब्दाबाहेर नाही... सदर प्रतिज्ञा शाळेतुन काढुन टाकली पाहिजे असा काही जनमत रेटा करावा काय याबाबत थत्तेचाचा काय मार्गदर्शन करतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
न
नितिन थत्ते गुरुवार, 12/16/2010 - 07:57 नवीन
हा हा हा. विपर्यास. प्रतिज्ञा काढून टाकावी असे माझे म्हणणे नाही. त्या प्रतिज्ञेत लिहिल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावाच. प्रतिज्ञा रोज पाठ म्हणण्याच्या कर्मकांडाविषयीच फक्त "काही उपयोग नाही" असे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया गुरुवार, 12/16/2010 - 08:03 नवीन
विपर्यास माझा की तुमचा? असो. मुद्द्याचे बोलु... मग नक्की कसे करायला हवे ज्यामुळे प्रतिज्ञेनुसार वागता पण येईल आणि विसर पण पडणार नाहि?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते गुरुवार, 12/16/2010 - 08:15 नवीन
माझा समजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ट
टारझन गुरुवार, 12/16/2010 - 08:20 नवीन
समजायला काय .. फंटा ही समजु हो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अवलिया गुरुवार, 12/16/2010 - 08:29 नवीन
तुम्ही म्हणता तर तुमचा समजतो. पण त्याच प्रतिसादातल्या प्रश्नाला उत्तर दिले नाहीत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते गुरुवार, 12/16/2010 - 08:55 नवीन
काही करायची गरजच नाही. मला नाही बॉ विसर पडत. पुस्तकात प्रतिज्ञा नसती तरी माझ्या वागण्यात फरक पडला नसता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया गुरुवार, 12/16/2010 - 08:56 नवीन
अच्छा ! म्हणजे तुम्ही भारतीय आहात हे तुम्हाला उपजत माहित होते.. कुणी सांगण्याची गरज पडली नाही असे म्हणता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
छ
छोटा डॉन गुरुवार, 12/16/2010 - 13:12 नवीन
>>म्हणजे तुम्ही भारतीय आहात हे तुम्हाला उपजत माहित होते.. कुणी सांगण्याची गरज पडली नाही असे म्हणता ! अच्छा, असे आहे काय ? नान्या, लेका मग आपले कसे होणार रे ? - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया गुरुवार, 12/16/2010 - 13:44 नवीन
तेच तर मी थत्यांना विचारत आहे. ज्यांना कुणाला आपली संस्कृती, देश, परिसर इत्यादी बद्दल माहित नसते. त्याबद्दल माहिती, त्याचा अभिमान असावा ही भावना कशी निर्माण करता येईल? इतर देशात कसे चालते ? हे विचारायचे होते.. पण थत्ते काही बोलतच नाही. नुस्तं कर्मकांड आहे.. गरज नाही असं बोलुन पसार झाले. चालायचेच.. नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ट
टारझन गुरुवार, 12/16/2010 - 13:49 नवीन
थत्तेचचा , अवलिया आणि संपादक मंडळाशी सहमत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
नितिन थत्ते गुरुवार, 12/16/2010 - 15:42 नवीन
गरज नाही असेच अजूनही म्हणतो. ज्यांची भारत देशाविषयीची कल्पना हिमालय, सिंधू, गंगा, यमुना, कावेरी, सह्याद्री यांच्या संदर्भात असते त्यांना प्रतिज्ञा घोकायची गरज पडत असावी. जे भारत देश म्हणजे भारतातली माणसं असं समजतात, त्यांना सारे भारतीय माझे बांधव आहेत असे घोकावे लागत नाही. माझ्या सारख्यांना ते स्वभावतःच जमते. राहता राहिलं विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान वगैरे. तो वाजवी तितका आहेच. जाज्ज्वल्य नसेल कदाचित. अवांतरः शाळेत प्रतिज्ञा घोकल्यामुळे मला मी भारतीय असल्याचे कळले नाही. ते कळण्याचे इतर खूप मार्ग आहेत. तशीही आमच्या शाळेत आम्ही रोज प्रतिज्ञा घोकत नव्हतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
क
कवितानागेश गुरुवार, 12/16/2010 - 16:05 नवीन
ज्यांची भारत देशाविषयीची कल्पना हिमालय, सिंधू, गंगा, यमुना, कावेरी, सह्याद्री यांच्या संदर्भात असते त्यांना प्रतिज्ञा घोकायची गरज पडत असावी.>>>> या सगळ्याचा उल्लेख प्रतिज्ञेत नाही, राष्ट्रगीत म्हणून जे गायले जाते त्यात आहे. चर्चा प्रतिज्ञेबद्दल सुरु आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते गुरुवार, 12/16/2010 - 17:09 नवीन
प्रतिज्ञेत हिमालय वगैरे नाही हे मला माहिती आहे. ज्यांच्या मनात देश म्हणजे हिमालय वगैरे अशा कल्पना असतात त्यांना देशातल्या बांधवांविषयी वगैरे उल्लेख असलेली प्रतिज्ञा गरजेची वाटत असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कवितानागेश गुरुवार, 12/16/2010 - 19:25 नवीन
ज्यांच्या मनात देश म्हणजे हिमालय वगैरे अशा कल्पना असतात त्यांना >> अशा बावळट कल्पना करुन घेणारे किती देशबांधव आपण आजपर्यंत पाहिलेत? मी एकही नाही पहिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते गुरुवार, 12/16/2010 - 19:28 नवीन
खूप पाहिलेत. (मोजले नाहीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
प
पक्या गुरुवार, 12/16/2010 - 21:52 नवीन
काहीतरीच काय बोलता हो थत्ते चाचा. मी पण अजून एकही नाही पाहिला असा माणुस. आणि तुम्ही खूप पाहिले म्हणजे खरच खूप झाले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
श
शिल्पा ब Fri, 12/17/2010 - 01:14 नवीन
ओ , तुम्ही चक्क थत्तेचाचांना च्यायलेंज करताय याचे भान आहे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
न
नितिन थत्ते Fri, 12/17/2010 - 03:33 नवीन
लोकांचं सोडा....आपल्या वंदे मातरमची सुद्धा सुरूवात सुजला, सुफला आणि मलयपर्वतावरून येणार्‍या वार्‍यांनी शीतल बनवलेल्या भूमीविषयी, फुलांनी, द्रुमदलांनी सुशोभित केलेल्या, सुखद आणि वरद अश्या भारतमातेविषयी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
अ
अवलिया Fri, 12/17/2010 - 03:57 नवीन
बर मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sat, 12/18/2010 - 06:05 नवीन
माझे उत्तर "पक्या" यांना होते. तुम्ही मध्येच कसे बॅटिंगला आले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
उ
उल्हास Sat, 12/18/2010 - 16:12 नवीन
काहीजणांच्या मते इंदिरा इज इंन्डीया आहे आपण काय करणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चिंतामणी Sat, 12/18/2010 - 18:44 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्हास
च
चंद्रू Sat, 12/18/2010 - 21:53 नवीन
राष्ट्रगीतात कावेरी व सह्याद्रीचा उल्लेख नाय. गोदावरी, भीमा, कृष्णा या दक्षिणेतल्या मुख्य नद्यांचा बी नाय. विंध्याच्या पलिकडे फक्त सुसंस्कृत भारतीय (भय्ये) राहतात. विध्याच्या अलिकडे सगळे मागासलेले द्रविड लोक राहतात. आपल्या नेमक्या परंपरा कुठल्या, ज्याचा अभिमान बाळगायचा ? ते एकदा सांगा राव. शिवाजी महाराजांशिवाय आपल्याला काय बी इतिहास म्हाइत नाय. खंडोबा, जोतिबा, जतरोबा, भैरोबा या आपल्या देवांची आनी काळूबाई, म्हाळसाई, मरिआई, सटवाई या आपल्या देवतांची बी नावं हिंदूंच्या धर्मग्रंथात नायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 12/16/2010 - 09:28 नवीन
प्रतिज्ञा रोज पाठ म्हणण्याच्या कर्मकांडाविषयीच फक्त "काही उपयोग नाही" असे मत आहे. सैनिक किंवा पोलिस परेडनंतर झेंड्याला सॅल्यूट करतात. सामान्य माणसेसुद्धा देवळात देवाला नमस्कार करतात. तेसुद्धा कर्मकांड आहे का ? प्रतिज्ञेऐवजी नमाज पढण्याची किंवा खुत्बा वाचण्याची संकल्पना कशी काय वाटते याबाबत श्री. थत्ते यांचे मत जाणण्यास उत्सुक आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
स्पा गुरुवार, 12/16/2010 - 09:31 नवीन
अप्पा...... क्या बात हे.............!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
न
नितिन थत्ते गुरुवार, 12/16/2010 - 15:44 नवीन
>>प्रतिज्ञा रोज पाठ म्हणण्याच्या कर्मकांडाविषयीच फक्त "काही उपयोग नाही" असे मत आहे. सैनिक किंवा पोलिस परेडनंतर झेंड्याला सॅल्यूट करतात. सामान्य माणसेसुद्धा देवळात देवाला नमस्कार करतात. तेसुद्धा कर्मकांड आहे का ? अर्थातच. >>प्रतिज्ञेऐवजी नमाज पढण्याची किंवा खुत्बा वाचण्याची संकल्पना कशी काय वाटते याबाबत श्री. थत्ते यांचे मत जाणण्यास उत्सुक आहे प्रत्येक प्रकारच्या कर्मकांडाला विरोध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
व
वेताळ गुरुवार, 12/16/2010 - 15:47 नवीन
प्रतिज्ञा म्हणण्या पेक्षा दररोज वंदे मातरम म्हणणे अधिक योग्य आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
स्पा गुरुवार, 12/16/2010 - 06:47 नवीन
आपल्या देशाबद्दलचा अभिमान, आपली देशाबद्दलची कर्तव्य , कायम आपल्या स्मरणात असावीत ... म्हणून .
  • Log in or register to post comments
र
रन्गराव गुरुवार, 12/16/2010 - 06:52 नवीन
ती प्रतिज्ञा रोज म्हणायला लावायला एक कारण असाव. कधीना कधी तरी आपण त्याचा विचार करू, अर्थ शोधायचा मनापासून प्रयत्न करू. पण तस शाळेच्या दहा वर्षात एकदाही झालं नाही. आज तुम्ही परत आठवण करून दिलीत. शब्द फारसे अवघड नाहीत, त्यामुळे कळायला काहीच अडचण नाही. खरी अडचण आहे ती वळायला! प्रतिज्ञा आजकाल फक्त मोडण्यासाठी असते असं ऐकून आहे. ते ह्या रोज शाळेत घेतलेल्या प्रतिज्ञेवरून तर म्हंटल नसेल!
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 12/16/2010 - 07:03 नवीन
ती प्रतिज्ञा दहा वर्षं अक्षरश: रोज म्हटली तरी आता पहिल्या 2 ओळींपुढे आठवत नाही म्हणून खूप काळ हैराण होतो. यंदा माझं पोर शाळेत गेलं. त्याच्या बुकातून वाचली. शांतावलो. उपयोग अज्ञात. (स्मृतिभ्रष्ट) गवि
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 12/16/2010 - 07:07 नवीन
प्रतिज्ञेतली सर्वांत नावडती ओळ होती " सारे भारतीय मेरे भाई - बहन है " बाकी प्रतिज्ञा घोकुन किंवा राष्ट्रगीत म्हणुन देशभक्ती जागी होते म्हणने म्हणजे दिवस्वप्न आहे :)
  • Log in or register to post comments
P
Pearl गुरुवार, 12/16/2010 - 08:07 नवीन
मला इतकीच आठवते, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बन्धु-भगिनी आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या सम्रुद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. ... त्यांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन... कोणाला पूर्ण प्रतिज्ञा आठवते का.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 12/16/2010 - 19:54 नवीन
होय, मला स्वच्छ आठवते! तुम्ही केलेली सुरवात बरोबर आहे... भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बन्धु-भगिनी आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या सम्रुद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. ... त्यांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन... ... मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा, आणि वडिलधार्‍या माणसांचा मान ठेवीन व प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करतो. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यांतच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl
श
शिल्पा ब Fri, 12/17/2010 - 01:22 नवीन
:star: छान...तुम्हाला संपुर्ण प्रतिज्ञा पाठ आहे याचं आश्चर्य आणि आनंद वाटला. धन्यवाद. बाकी पाईक म्हणजे काय व्हायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 12/17/2010 - 03:49 नवीन
आम्ही शाळेत प्रार्थना म्हणायचो तेव्हा त्यातल्या प्रतिज्ञेत "सारे भारतीय माझे बन्धु-भगिनी आहेत." च्या ऐवजी "सारे भारतीय माझे बांधव आहेत." असे म्हणत असू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ग
गणपा Sat, 12/18/2010 - 12:15 नवीन
वा रे वा पुपे !!!!! केवढा तो दुरदर्षीपणा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
च
चिंतामणी Sat, 12/18/2010 - 18:45 नवीन
हेच बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
स्पा गुरुवार, 12/16/2010 - 08:19 नवीन
आम्ही असं म्हणायचो..... त्यांचा पाईप होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन...
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम गुरुवार, 12/16/2010 - 09:57 नवीन
पाईकचा अर्थ काय???
  • Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र गुरुवार, 12/16/2010 - 13:24 नवीन
प्रतिज्ञा म्हणायला कधीच आवडलेले नव्हते आणि नाही; पण मास्तरांच्या धाकाने आम्ही म्हणत असू. खरं म्हणजे जी गोष्ट करायला आवडत नसताना करावी लागते, त्या गोष्टीचे जास्त हसू होते. मग ते पाळण्याऐवजी मोडण्याची खुमखुमी येते. (कायद्याचं पण असेच होत असावे का?)
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 12/16/2010 - 15:55 नवीन
असे एकोळी धागे चालू द्यावेत का?
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी गुरुवार, 12/16/2010 - 16:57 नवीन
कुठल्या गोटातले आहेत त्यावर अवलंबुन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
अवलिया Fri, 12/17/2010 - 04:01 नवीन
अशा एकोळीच काय दशोळी, सहस्त्रोळी, क्रमशोळी वगैरे धाग्यांनी मिपाच्या दर्जात घसरण होणार असेल तर संपादक मंडळाने असे धागे जरुर अप्रकाशित करावे नव्हे ते त्यांचे कर्तव्यच आहे.अपेक्षा फक्त एवढीच आहे की हाच न्याय हाच नियम सर्व धाग्यांना लागू व्हायला हवा. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रन्गराव Sat, 12/18/2010 - 06:15 नवीन
आज काल स्वयंघोषित नितीमत्तारक्षक पोलिसांचा सुळसुळाट झालाय नुसता! "हा कशाचा परिणाम आहे?" ह्यावर एक काथ्याकुट व्हायला पाहिजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मराठे गुरुवार, 12/16/2010 - 16:06 नवीन
रोज प्रतिज्ञा म्हणण्यात फार काही फायदा नाही तसेच न म्हणण्यातही नाही. क्वचित एखाद्या विद्यार्थ्याला प्रतिज्ञेचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा होइल अशी वेडी आशा शाळेला असावी. लहान मुलांचं सोडा, त्यांच्याकडून इतक्या प्रगल्भतेची अपेक्षा नाही. पण आजवर किती शिक्षक आणि पालक विद्यार्थ्यांबरोबर प्रतिज्ञा या विषयावर बोलले असतील? शाळेत प्रतिज्ञा आणि प्रार्थना केवळ उपचारापुरतेच आहेत.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 12/17/2010 - 00:47 नवीन
... प्रतिज्ञेचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा होइल अशी वेडी आशा शाळेला असावी.
मराठे, आपल्या शाळेला*तरी या प्रतिज्ञेचा अर्थ समजला असेल का? गणितापासून रामायणापर्यंत सगळ्या परीक्षा सक्तीने द्यायला लावणार्‍या शाळेतच कर्मकांडांचा तिरस्कार करायला मी शिकले. शाळेने तेवढंच शिकवलं म्हणायला हरकत नाही. *शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
श
शाहरुख गुरुवार, 12/16/2010 - 17:16 नवीन
नानाला ट्रिगर कुठून मिळतात याचं मला नेहमी कुतुहल वाटतं :-)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा