Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रतिज्ञा....

अ
अवलिया
गुरुवार, 12/16/2010 - 06:39
🗣 70 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
12380 वाचन

💬 प्रतिसाद (70)
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 12/16/2010 - 21:18 नवीन
भारताची काही टक्के वगळता भारतीय जनता निरक्षर आहे .त्यांना आपण भारतीय आहोत असे कसे बरे समझते? (त्यांच्यात परंपराचा अभिमान नसतो का ?)
  • Log in or register to post comments
प
पक्या गुरुवार, 12/16/2010 - 21:39 नवीन
प्रतिज्ञा फक्त भारतातच म्हटली जाते असे नाही. इतर देशांच्या प्रतिज्ञा त्या त्या देशांच्या शाळेत म्हटल्या जातात. हे नुसते कर्मकांड नाहिये . त्या मागे नक्कीच उद्देश चागला आहे. लोकांनी त्याचे कर्मंकांड करून टाकले असावे. काहीवेळेस मनात असलेल्या गोष्टींना बोलते केल्यास त्या भावनेला वेगळीच धार येते.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 12/17/2010 - 00:39 नवीन
हि प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, शाळा सुटायच्या वेळी म्हटलेले "सदा सर्वदा"... विद्यार्थ्यांकरता या सर्व औपचारिकताच असतात. शिक्षक, पालक वगैरे लोक जर या सर्व गोष्टींचा मतितार्थ समजवुन सांगणार नसतील, ते संस्कार हळुवारपणे विद्यार्थ्यांवर बिंबवणार नसतील तर त्याचा काय उपयोग?? शालेय शिक्षण म्हणजे केवळ घोकंपट्टी याचा वस्तुपाठ म्हणजे या औपचारिकता होत... आणि हा वस्तुपाठ देखील अगदी पहिल्या दिवसापासुन दिला जातो :( (विद्यार्थी) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 12/17/2010 - 01:18 नवीन
तुमच्या थिंकण्याला +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ग
गांधीवादी Fri, 12/17/2010 - 01:58 नवीन
मनातील एक सुप्त विचार खुल्या मंचावर आणल्याबद्दल सर्वप्रथम अवलिया यांचे अभिनंदन. माझ्या मते हि प्रतिज्ञा म्हणजे निव्वळ स्वार्थ आहे. माझा देश, आणि माझे देशवासीय ब्बस. इतकेच ? बाकी देश ? बाकी देशवासीय ? ते कोण नाही का ? आणि त्यांच्यासाठी आपले काहीच कर्तव्य नाही का ? बर मनुष्य सोडून इतर प्राणीमात्रांबाबत ? मी एक प्रतिज्ञा मनापासून घेतो आणि ती पाळण्याचा प्रयत्न करतो. हि धरती माझी आहे, आणि या धरतीवरील सर्व प्राणीमात्र माझे बंधू आहेत. खरेतर हि सुद्धा मला स्वार्थ वाटते, कारण जर उद्या कोणत्या दुसर्या ग्रहावर कोणी सापडले तर ? त्यांचे काय ? तर असेच का म्हणू नये ? हे विश्वाची माझे घर आणि या विश्वात राहणारा प्रत्येक जीव हा माझा बांधवच आहे. (शेवटी अनंत भूतकाळात उत्क्रांतीच्या कोणत्या न कोणत्या टप्प्यावर त्यांचे आणि आपले पूर्वज एक असणारच आहे) आम्हाला विश्वातील प्रत्येक गोष्टीचा अभिमान आहे. आणि ह्या विश्वातील एक घटक आहोत यात समाधान आहे. अवांतर : आज मानवाच्या न्यायानुसार जर दुसर्या ग्रहावर कोणी प्राणीमात्र सापडले आणि ते प्रगत नसतील तर आपण मनुष्य त्यांची चव आवडेल म्हणून त्यांना मारून खाईल, किंवा ते प्रगत असतील तर आणि त्यांना आपली चव आवडली तर ते आपल्याला मारून खातील.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Fri, 12/17/2010 - 03:00 नवीन
थोडक्यात वैश्विक सुखाचा पुरस्कार करणारे पसायदान तुम्हाला प्रार्थना म्हणून हवे आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
श
शुचि Fri, 12/17/2010 - 02:06 नवीन
रेवतीताई हा धागा जरी एकोळी असला तरी विचारांना चालना देणारा होता. काही धागे उगाच भारंभार लिहीलेले देखील असू शकतात आनि काही एकोळी धागे उत्तमही असू शकतात असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Fri, 12/17/2010 - 03:46 नवीन
थत्तेचाचा, लिमाउजेट, शिल्पा ब यांच्या विचारांना खूपच चालना मिळालेली दिसत आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
अ
अवलिया Fri, 12/17/2010 - 04:09 नवीन
जाउ द्या हो शुचिताई.... चालायचेच... नवीन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
च
चिंतामणी Sat, 12/18/2010 - 04:30 नवीन
असे वाचल्यावर प्रथमदर्शनी असे वाटले होते की (परासारखे) चित्रपट परीक्षण आहे की काय. पण उधडल्यावर तसे नाही हे लक्षात आल्यावर किमानपक्षी विजूभाउंच्या प्रतिज्ञेसारखी एखादी प्रतिज्ञा असावी असे वाटले होते. (http://www.misalpav.com/node/15753#comment-265229) पण दोन्हिही न दिसल्यामुळे अंमळ निराशा झाली.
  • Log in or register to post comments
र
रविंद्र प्रधान Sat, 12/18/2010 - 05:24 नवीन
प्रतिज्ञा जर पूर्णपणे पाळली तर 'सारे भारतीय माझे बन्धु-भगिनी आहेत'. हेही बरोबर. म्हणजेच भारतीय मुलामुलींची आपापसातील लग्ने म्हणजे भावाबहिणींचीच लग्ने नाहीका? आणि ते टाळण्यासाठी प्रत्येकाने परदेशी नागरिकांशीच लग्न करणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 12/18/2010 - 06:08 नवीन
तो तर आता सर्वानाच दहशतवादी म्हणतोय.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sat, 12/18/2010 - 11:43 नवीन
माझ्या इटालियन मित्राला विचारून सांगतो तेथील शाळेत काय शिकवतात . च्यायला इटालियन बायको केली असती तर खासदारकी नक्की पक्की होती माझी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
प
परिकथेतील राजकुमार Sat, 12/18/2010 - 12:10 नवीन
नान्या कशाला रे एकोळी धागे काढतो ? गुडबुकातला माणुस आहेस का तु ? नालायक कुठला. खरेतर मिपाकरांसाठी सुद्धा एक प्रतिज्ञा लिहिली गेली पाहिजे आणि ती त्यांना त्यांच्या खवत लावणे बंधनकारक केले पाहिजे.
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Sat, 12/18/2010 - 13:30 नवीन
माझ्या मते प्रतिज्ञा पाहीजे राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा ..... ही सगळी राष्ट्र जिवंत असण्याची लक्षणे आहेत. एक उदाहरण देतो सैन्यात जेव्हा चढाई करायची असते त्या अगोदर चढाई करणा-या कंपनीतले सारे जवान त्यांच्या कंपनी कमांडर बरोबर मंदीर परेड करतो. आता कोणी नास्तीक कंपनी कमांडर असेल तर त्याला हे सगळे निरर्थक वाटण्याची शक्यता आहे पण तरी सुद्धा इतरांसाठी तो मंदीर परेड करतो. प्रत्येकाची मानसिक प्रगल्भतेची श्रेणी वेगळी असते. त्या नुसार तो आपल्या बाजूचे जग बघतो, अनुमान काढतो व निर्णय घेतो. त्या त्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत, माणुस त्याच्या पुढे येणा-या सगळ्या गोष्टींचे आकलन करुन विचार करतो, निष्कर्ष काढतो. समोर येणा-या प्रश्नांना उत्तरं शोधतो. संकटाला तोंड देतो. ज्याची श्रेणी उच्च कोटीतली असते तो महापुरुष, महात्मा होतो. तो धर्म, देव, राष्ट्र इत्यादी संकल्पनांतून अलीप्त असतो. तरी सुद्धा जेव्हा तो लोकसंग्रह करतो तेव्हा ह्या संकल्पनांचा आधार त्याला घ्यायला लागतो. समाजाला सगळ्या प्रकारची लोकं असतात, मानसिक प्रगल्भता पण वेगवेगळी असते त्या मुळे सगळ्यांचा मेळ बसवायचा तर काही रुपकांची मदत घ्यावी लागते. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव इंग्रजांविरुद्ध लोकसंग्रह करण्यासाठीच सुरु केला होता. त्यात त्यांना स्वतःला काही पुण्य मिळणार नव्हते किंवा लाभ होणार नव्हता. स्वतःला एखादी संकल्पना पटणे व त्या नुसार अनुसरण करणे वेगळे व जेथे एखादा समाज जेव्हा एका संकल्पनेत बांधला जातो (राष्ट्र) तेव्हा त्याला लागणारी द्योतकं असली पाहीजेत व प्रतिज्ञा त्यातलेच एक आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Sat, 12/18/2010 - 16:06 नवीन
पटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे
च
चंद्रू Sat, 12/18/2010 - 21:28 नवीन
“राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा ..... ही सगळी राष्ट्र जिवंत असण्याची लक्षणे आहेत.” पन राष्ट्रगीत म्हणतांना आपन इतके मरगळल्यासारखे उभे राहून, खाली मान घालून, आनी सुतकी चेहर्‍याने राष्ट्रगीत म्हनतो की ते राष्ट्रगीत हाय का शोकगीत काय कलत नाय. इतर देशातले लोक राष्ट्रगीत म्हनतांना आनंदात डोलत व वर मान करून जोशात राष्ट्रगीत म्हनतात आपल्या राष्ट्रगीतात तसा जोश का नाही? ते संस्कृत मध्ये असल्याने आपल्याला कलत पन नाय. देशातल्या ९० टक्के लोकांना राष्ट्रगीताचा अर्थ विचारला तर बरोबर सांगता येनार नाय असा वांदा हाय. प्रतिज्ञेचं पन तसच हाय. अंमलात आणायला प्रतिज्ञा करायची असते, नुसता विधी म्हनून करण्यात अर्थ काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे
ग
गणपा Sun, 12/19/2010 - 11:41 नवीन
प्रतिज्ञा म्हणा वा राष्ट्रगीत काहींच्या मते ती नुसती पोपट्पंची असेल. मी शाळेत असताना मात्र २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला एक वेगळच वातावरण असायच. तश्या वातावरणात राष्ट्रगीत म्हणताना एक वेगळाच फिल यायचा. नक्की कसा ते शब्दात मांडण कठीण आहे. पोपट्पंचीच असेल पण, गोड मुलगी आहे आणि म्हणते ही सुरात.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sun, 12/19/2010 - 18:40 नवीन
खूप गोड! म्हणून झाल्यावर कसली छान हसते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
इ
इंटरनेटस्नेही Sun, 12/19/2010 - 12:38 नवीन
चांगला काथ्याकुट! ॠषिकेश चिंदरकर - फेसबुक प्रोफाईल: http://www.facebook.com/rishikesh.chindarkar
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा