ही लिंक पहा, पुरूष प्रधान संस्कृतीच्या नावाखाली पुरूषांवरच कसे अन्याय होतात हे आमच्या संत्यान छान मांडले आहे. पहा इथ.
http://www.youtube.com/watch?v=xEZqd8ddO0M
आज जग खुप पुढे गेले आहे. दोनभिन्न लिंगी व्यक्ती मधील मैत्री आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. नवीन जमान्यात अमेरिका सारख्या विकसित देश्यात समलिंगी मैत्री चालु आहे.त्यामुळे पुरुषानी एकमेकाबरोबर घट्ट मैत्री करुन स्त्री वर्चस्वाला धक्का द्यावा असे मला वाटते.
तसेच मला तुमच्या मालकाबद्दल देखिल आश्चर्य वाटते.कामधाम न करणार्या नुसत्या विचारजंताला कामावर ठेवुन त्याला कसे काय परवडते?
अरे व्वा.....
युयुत्सु काकांना एक णवा मुडदा अर्र.... ( कॅप्स लॉक प्रेस झाले वाटते) मुद्दा मिळाला.
आणखी काही उदाहरणे:
शूर्पणखेने लक्ष्मणाला प्रपोज केले म्हनून लक्ष्मणाने तीचे फक्त नाक कापले. बाकी काय नाय केले
रावणाने सीतेला अगोदरच प्रपोज केले होते. त्याने शूर्पणखेच्या नाक कान कापल्याचा बदला म्हणून सीतेला फक्त कीडनॅप केले. रामाने मारूतीभाय ला पाठवून त्याचे गाव च्या गाव पेटवून दिले.
( लक्षात घ्या रावणाने सीतेला टच्च सुदीक केल्ये नव्हते. कीडनॅप करताना झाले असेल तेवढेच . बाकी रावण झंटल्मॅण हुता)
एरवी गाडी पम्चर झाली की रस्त्यावरची माणसे मदत करतात्.पण दशरथाचा रथ एकदा पंचर झाला त्यावेळेस कैकयी ने त्याला मदत केली आणि त्याच्या कडून सौताच्या मुलासाठी आख्खे राज्य मागून घेतले.
भस्मासूर तसा कोणाच्या बाला सुदीक ऐकत नव्हता. सगळ्याना यकटाच भारी असायचा. शेवटी इश्णू ने बाइचे रूप घेतले तेंव्हा भस्मासुर एका बाई पाई आडवा झाला.
अगदी नवीन उदाहरणः अंतुले नामक सरदाराला दिल्लीने अभय दिले होते. वसंतदादा वगैरेनी त्या सरदाराचा पराभव करण्यासाठी जंगजंग पछाडले. अंतुल्यानी वसंतदादांच्या पत्नी शालीनीताई पाटील नामक महिलेचा एकदा अनादर केला. अंतुले सरदार त्यांच्या सरकारासहीत बाराच्या भावात गेले.
तुम्हाला खणखणीत प्रतिसाद दिलेला नाही यावरूनच आमचा संयम प्रतीत होतो...
oxymoron ला मराठीत विरोधाभास म्हणतात...चला, मराठी संस्थळावर येऊन थोडेतरी मराठी तुम्हाला शिकायला मिळते हेही नसे थोडके.. ;)
तुम्हाला खणखणीत प्रतिसाद दिलेला नाही यावरूनच आमचा संयम प्रतीत होतो...
ह्याला व्यक्तिगत जाणे म्हणतात :) संयमाच्या व्याख्येचा पुणर्पाठ करावा :) आमच्या लेखात आम्ही कोणालाही वैयक्तिक झोडपलेले दिसत नाही :) तुमच्या संयमाला उगाच ओढुन ताणुन ह्यात बसवु नये :)
बाकी खणखणित प्रतिसादांची आम्ही वाटंच पहात असतो :) तेवढाच विरंगुळा
चला, मराठी संस्थळावर येऊन थोडेतरी मराठी तुम्हाला शिकायला मिळते हेही नसे थोडके.
तर तर :) :) :) आम्हाला किमान शिकायला तरी मिळतं हे खरंच फार खुप आहे . बाकी कमनशिबी ;)
कर्णांगुली न्यायाने अत्यानंदप्राप्ती असूनही अदंतसर्पकुंभ योगामुळे व असाध्यकटपात्रदल कल्पनेमुळे आलेल्या भयातून असा अतिप्रत्याचार केला जात असावा असे आमचे मत आहे.
सोदाहरण आणि सचित्र स्पष्ट केल्यास हृदयपरिवर्तन होईल की नाही हे अज्ञात असले तरी धागानिवर्तन होईल हे तार्किकदृष्ट्या अनिवार्य वाटते. :-)
तस्मात आहे त्या व आहे तितक्या दिलखुलास प्रतिसादापेक्षा जास्त अनावरण करणे शक्य नाही. :-)
$$ होते की नाही याबद्दल आम्हाला किंचितही पर्वा नाही याची नोंद घ्यावी.
क्षमस्व.
- बारखण
ह्या प्रेमात जेंव्हा पुरुष इस्त्रिकडे प्रेमयाचना करतो तेंव्हा त्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन हा जेंव्हा इस्त्री पुरुषाकडे याचना करते त्यापेक्षा किती वेगळा असतो नाही ?
याला कारण असे असू शकते की,
पुरुष स्त्रिकडे प्रेमयाचना करतो त्यानंतर समजा त्याला नकार मिळाला, तर तो ठीक आहे बॉ म्हणतो आणि विषय तेथेच संपतो असे होत नाही बर्याचदा. त्यानंतरही प्रयत्न करत रहाणे(हा ही त्या स्त्री ला १ मानसिक त्रासच असतो), इगो दुखावला जाणे, यातून त्या स्त्री ला त्रास देणे, पाठलाग करणे असे प्रकार चालू होतात आणि चालू रहातात. यातून काही वाईट प्रकार/घटना घडण्याचा संभव असतो. आणि बर्याचदा तसे होते.
याउलट,
स्त्री पुरुषाकडे याचना करते त्यानंतर समजा तिला नकार मिळाला, तर मला नाही वाटत की कोणतीही स्त्री वरीलपैकी काही त्या पुरुषाच्या बाबतीत करत असेल. उलट तिला मिळालेल्या नकाराचा परिणाम तिच्यावरच जास्त नकारात्मक होत असावा.
तस्मात वरवर हा प्रश्न जितका साधा वाटतो तितका तो साधा नाही, हे लक्षात घ्यावे.
-----------------------------------------------------------------------------
>>>ज्युनियर कॉलेजात असताना आमच्या वर्गातल्या झंप्याने चिंगीला प्रपोज केलं . चिंगी तशी सर्वसाधरण.
...
पण चिंगीला थोडा भाव काय मिळाला ती तर माधुरी दिक्षित झाली.
>>
प्रपोज करणारे सर्वजण काही मदनाचे पुतळे नसतात.
लेखाच्या हेडिंग वरुनंच लेख अतिशयोक्तीने भरलेला आणि तद्दन भास णिर्माण करणारा आहे ह्याची कल्पणा सुज्ञ वाचकांना यायला हवी होती.
आमच्या धाग्यावर लोकांनी उगाच शिरियस होऊ णये . लोकांन्ना षिरियस करने आमचा प्रांत नाही ;)
बाकी बर्याच रोचक प्रतिक्रीयांची अपेक्षा वर "काही प्रमाणात " सार्थ झाली .. खॅखॅखॅ
लिखान जबरी केलेय की भावा ...
हाश्यसम्राट मध्ये एका भागात कोल्हापुरातला शिंदेने लय भारी बोलला आहे असा पुरुषमुक्ती साठी ..
ऐका मिळाल्यावर नक्की ..
---
बाकी ..
पुरुष स्त्री च्या प्रेमात पडला तर तो टुकार असतो ...
स्त्री पुरुषाच्या प्रेमात पडली की ती हुशार असते ...
पुरुषाने स्त्रीचा अपमान केला तर तो अन्याय असतो
स्त्री ने पुरुषाचा अपमान केला की तो समज असतो ...
पुरुष स्री कडे पाहुन हसला की दात विचकत असतो ..
स्त्री पुरुषाकडे पाहुन हसली की ती दाद देत असते ...
पुरुषाने ग्रुप मध्ये बोलताना तो चाटर बॉक्स असतो
स्त्री ग्रूप मध्ये बोलताना ती बोलकी भावली असते ..
कुठल्यापण पुरुषाने गाडी जोरात चालवली की तो माज असतो
स्त्री ने गाडि जोरात चालवली तरी ती शान असते ..
पुरुषाने कपडे कमी घातले की तो जोकर वाटतो
स्त्री ने कपदे कमी घातले की ती हिरॉइन असते ..
भले तेच तेच कपडे घातले तरी तशीच फॅशन असते बाबा ..
........
मराठी भाषेने सुद्धा पुरुषावर अन्याय केला आहे
सगळे चांगले शब्द स्त्रीलिंगी आहेत आणि सगळे वैट्ट शब्द पिल्लिंगी आहेत
उदा : ती माया , ती ममता , ती टापटीप , ती ठेवण , ती मिशी , ती हुशारी
तो राग , तो घोटाळा , तो आळस , तो गाढवपणा
१८५६ सालातल्या ५६ मजली बिल्डिंग च्या टेरेस वरून पडला आहेस की काय??
येथे "गुडघ्यावर" हा शब्द राहिला आहे . बाकी १८५६ साली ५६ मजल्यांचा एफ.एस.आय. कोणात्या चव्हाणांनी पास केला ,ही रोचक माहिती आहे . कॄपया ह्यावर प्राजु ने प्रकाश टाकावा. (कवितारुपी प्रकाश टाकला तरी चालेल )
@र्एवती : इट्स णॉट अबाऊट मी ,,, इट्स अबाऊट व्होल पुरुष ... दे आर अल्वेज सिण्गल्ड आउट बाय समाज ( णॉट बाय बायका )
बाकी हा काथ्याकुट आहे रे लोकांनो ललित लेख नव्हे .. प्रिय वाचक ह्यातही "छाण लिहीलंय " "खराब लिहीलंय "करताहेत =)) =))
ए बाबा तुझं ते विंग्रजी, त्यातून ण म्हणजे काही समजत नाही.
अगं .. मला फक्त एवढं सांगायचंय ... की पुरुषांना सिंगल आउट केलंत ते समाजाने ... म्हैलांनी नव्हे. म्हैला दिल पे णा ले :) आणि जो ले .. वो सणसणित प्रतिक्रीया दे :)
हा काथ्याकूटच आहे का नक्की? मला तर नृत्य, औषधोपचार , प्रवास असं सगळच दिसतय.
कोण बोल्या के ण्रुत्य , औषधोपचार आणि प्रवासात आपण काथ्याकुट करु शकत नाही म्हणुन :)
टारझनराव,
आपले काथ्यनर्तन पाहून आणंद जहाला. बाकी आम्ही काय बोलणार. आपलं या विषयावरचं आलोकन सखोल आहे. आपण उदाहरणं चपखल दिलेली आहेत. आपल्या अंतःकरणातून "सिंगल आऊट" केलेल्या पुरुषांविषयीचा कळवळा घळघळा वहातो आहे!! प्रत्यक्ष सरस्वतीला वीणा टाकून देऊन ताशा वाजवावासा वाटेल अशी भाषा आहे....
आपली तर टोपी निघाली (मराठीत "हॅटस ऑफ" म्हंत्यात तेला!!)
:)
आता कण्हून-कुंथून काथ्या कुटायचाच असेल तर हा एक नगण्य मुद्दा..
समाजात पुरुष आणि स्त्रिया हे दोनच प्रमुख घटक असतांना (तिसर्या संप्रदायाचे अनुयायी अत्यल्प परसेंटेजमधे असतील असं मानलं तर) एकटे पुरुषच कसे सिंगल आऊट केले गेले?
नाय म्हणजे जर सगळे पुरुष "सिंगल आऊट" केले गेले तर सगळ्या स्त्रिया आपसूकच "सिंगल इन" होणार नाहीत का? :)
(मला माहिती आहे की साल्या तोच तुझा ही & हि डाव आहे!!)
:)
असो. आमच्या दुर्गेला आम्ही 'पिंग" केल्यानंतर तिने "दुर चला जा .. मेरा खयाल छोड दे हे दुष्ट पापी .. तु जल कर भस्म हो जायेगा" वगैरे डायव्लॉक न बोलल्याबद्दल आम्ही तिचे अनंत आभारी आहोत!!!
तुमच्या जेनबाय काय बोलल्या व्हत्या? का अजून 'पिंग" केलं न्हाय? ;)
प्रत्यक्ष सरस्वतीला वीणा टाकून देऊन ताशा वाजवावासा वाटेल अशी भाषा आहे....
एवढ्या मोठ्याणे हसतोय की शेजारच्यांच्या घरातले दिवे लागले ( आहो खरंच माझ्या हसण्याचा आवाजा मुळे लागले असणार .. खरंच :) )
नाय म्हणजे जर सगळे पुरुष "सिंगल आऊट" केले गेले तर सगळ्या स्त्रिया आपसूकच "सिंगल इन" होणार नाहीत का?
सगळ्यांबाबत विधाण केलेले नसुन बहुतांशी तसाच दृष्टीकोण असतो असे लेखकास नमुद करावेसे वाटते. प्रेमयाचणा करणार्या म्हैलेचा अपमान झाला आहे , तिचा वध झाला आहे किंवा व्हिक्टीम ने तिला बुकलुन काढले आहे , अश्या संदर्भाचं एक जरी उदाहरण आपल्या कडे असल्यास मी माझा काथ्याकुट मागे घेतो ;)
बाकी जेणबाय ला पटवायला लै पापट भाजले होते ... ती ष्टोरी णिवांत कधीतरी .. खाजगीत ;)
- पिवळा बलक
आमच्या ओळखीतील एका काकांनी त्यांच्या भावाच्या मागे लागलेल्या(अर्थात प्रेम याचना करणार्या) महिलेस आपल्या अजून एका भावास बरोबर नेऊन खूप दमदाटी केली होती. मारहांण करायची वेळ आली नाही कारण महिला दमदाटी नंतर घाबरली असावी.
भले तेच तेच कपडे घातले तरी तशीच फॅशन असते बाबा ..एवढच नाही... तर भलतेच तेच कपडे घातले तरी तशीच फॅशन असते बाबा .. हे ही खरं आहे ;)