भारताला लष्करे तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांपेक्षा अतिउजव्या हिंदू गटांकडून अधिक धोका आहे. इति. युवराज.
💬 प्रतिसाद
(109)
च
चिंतामणी
Sat, 12/18/2010 - 10:35
नवीन
त्याला 'युवराज' संबोधणे थांबवा.
पण आपल्या कडुन का फुकाची प्रसिद्धी ?
एकदम बरोब्बर बोल्लात भौ.
१०० % सहमत.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Sat, 12/18/2010 - 10:40
नवीन
फारच वाहियात इन्सान आहे हा राहुल गांधी. कै. राजीव गांधींच्या आत्म्याच्या मनाला याचा वाहियातपणा पाहून किती यातना होत असतील तोच (म्हंजे आत्माच) जाणे.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 12/18/2010 - 10:51
नवीन
माननिय श्री. राहुल गांधी ह्यांच्याशी सहमत आहे. पुढे जाउन असे म्हणेन की केवळ भारतालाच न्हवे तर मिपाला देखील अतिउजव्या हिंदू गटांकडून अधिक धोका आहे.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sat, 12/18/2010 - 11:07
नवीन
हे विकीलिक्स ना खूप वाईट आहे.
,आणि ते अमेरिकन राजदूत तर भारी चोंबडे आहेत .
त्यांच्या तोंडावर तीळ भिजत नाही .
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 12/18/2010 - 12:12
नवीन
थत्तेचाचांना मिपाचे युवराज म्हणावे काय ? :)
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Sat, 12/18/2010 - 12:43
नवीन
तुमी म्हणून न म्हणून काय उपेग नाय. किताब-वाटप केंद्र थत्तेंकडेच आहे , त्यांनी स्वतःहून घोषणा केली तरच हा किताब अधिकृत मानन्यात येइल. तेंव्हा त्यांनाच तस सुचवा ;)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 12/18/2010 - 12:48
नवीन
सहमत आहे.
त्यामुळे त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यास सुरुवात होईल काय?
तसेच हातासरशी अवलिया ह्यांना अतिउजव्या गटाचे हिंदू दहशतवादी देखील घोषीत केले जावे.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 12/21/2010 - 07:09
नवीन
त्यांच्या तोंडावर तीळ भिजत नाही .
तोंदावर नाही भौ.... तोंडात तीळ भिजत नाही असा वाक्प्रचार आहे तो.
तोंडावर तीळ भिजत नाही .
हे षृंगारीक वाटते
- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 12/21/2010 - 08:56
नवीन
आता हे तिळ बिळ कुठुन आणले मधे ? नको तिथे षृंगार ? :) विजुभाउ .. ऑनसाईट कमी करा .. खि खि खि
तुम्ही तिळातिळाने घरच्या काश्मिर मधुन माघार घेताय.
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Sat, 12/18/2010 - 11:06
नवीन
माननिय श्री. राहुल गांधी असे स्पष्ट लिहील्याबद्दल धन्यवाद.
नुसतेच मा.श्री. राहुल गांधी लिहीले असतेस तर काहिही अर्थ काढला असता मिपाकरांनी. ;)
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 12/18/2010 - 13:41
नवीन
हा हा हा...
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sat, 12/18/2010 - 13:43
नवीन
सहमत... ;)
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Sat, 12/18/2010 - 11:09
नवीन
कुठलाही गुणविषेश नसताना (अपवाद: विशिष्ठ कुटुंबाशी संबधीत), ज्येष्ठ राजकारण्यांच्या कणाहीनते मुळे महत्व प्राप्त झालेले व्यक्तीमत्व . अनुल्लेखाने मारणे योग्य.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sat, 12/18/2010 - 11:19
नवीन
हे विकीलिक्स ना खूप वाईट आहे.
,आणि ते अमेरिकन राजदूत तर भारी चोंबडे आहेत .
त्यांच्या तोंडावर तीळ भिजत नाही .
अवांतर (आमच्या लग्नाला आम्ही हिंदू म्हणून माझ्या बायकोच्या घरच्यांनी विरोध केला नाही हे अत्यंत गोपनीय गुपित .हे अपेयपान करताना टर्मिनेटर ह्यांना निनाद ह्यांनी सांगितले व म्हणून राजकारणात कोणतेही मोठे पद आम्ही स्वताहून स्वीकारले नाही. .) बाकी मिपा वर आमच्या लग्नाची कहाणी व मोठे पद का नाकारले ह्या टर्मिनेटर च्या प्रश्नावर उत्तर म्हणून एक इ बुक लिहिणार आहोत जे इटालियन व इंग्रजीत लिहिणार आहोत )मराठीत अनुवाद करायचे हक्क मिपा वरील जेष्ठ सदस्यांना बहाल आधीच केले आहे .
- Log in or register to post comments
स
सुनील
Sat, 12/18/2010 - 12:38
नवीन
विकिलीक्समधिल मूळ वाक्य असे आहे.
Gandhi said there was evidence of some support for the group among certain elements in India's indigenous Muslim community. However, Gandhi warned, the bigger threat may be the growth of radicalized Hindu groups, which create religious tensions and political confrontations with the Muslim community.
जेव्हा बाह्य शक्तींकडून हल्ला होतो तेव्हा भारतातील सगळी जनता एक होते. हे आपण ७१ च्या युद्धात तसेच २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या वेळी पाहिले आहे.
पण देशाला खरा धोका अस्तनीतील निखार्यांपासूनच असतो. हे अस्तनीतील निखारे हिंदू अतिरेकी असतील वा मुस्लिम अतिरेकी. त्यांमध्ये हिंदू अतिरेक्यांचा धोका अधिक आहे असे मूळ वाक्य म्हणते.
आता हिंदू ८०% आणि मुस्लिम १२% आहेत हे लक्षात घेतले तर, ह्यात फारसे वावगे वाटत नाही.
बाकी लेख नेहेमीसारखाच! त्यामुळे त्यावर भाष्य नाही!
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Sat, 12/18/2010 - 12:45
नवीन
>>पण देशाला खरा धोका अस्तनीतील निखार्यांपासूनच असतो.
सहमत,
देशाला खरा धोका न भगव्या, न हिरव्या, न लाल दहशतवाद्यांकडून आहे.
देशाला खरा धोका पांढर्या दहशतवाद्यांकडून आहे.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sat, 12/18/2010 - 17:55
नवीन
देशाला सर्वात जास्त धोका लाल भाई नक्षलवाद्यांचा आहे .त्त्याचा उल्लेख सुध्धा केला नाही .
लालभाई विरुध्ध ऐकायला अमेरिकेला आवडले असते .त्यांचा उल्लेख हि नसावा .
- Log in or register to post comments
च
चेतन
Sun, 12/19/2010 - 10:19
नवीन
>>>हा हा हा... वरिल वेवेचन वाचुन "पण देशाला खरा धोका अस्तनीतील निखार्यांपासूनच असतो" याची खात्री पटली
विकिलीक्समधिल मूळ वाक्य असे आहे
Responding to the Ambassador's query about Lashkar-e-Taiba's activities in the region and immediate threat to India, Gandhi said there was evidence of some support for the group among certain elements in India's indigenous Muslim community. However, Gandhi warned, the bigger threat may be the growth of radicalized Hindu groups, which create religious tensions and political confrontations with the Muslim community.
यातिल मागिलपुढिल वाक्या़चा संबंध लावालात तर हे नक्कीच वावगे आहे
- Log in or register to post comments
स
सुनील
Sun, 12/19/2010 - 12:58
नवीन
ते वाक्य माझ्या प्रतिसादात गृहित धरलेच होते. म्हणूनच तर २६/११ चा उल्लेख मी केला होता.
थोडक्यात, कोणत्याही बाह्य (येथे लश्करे तोयबा) पेक्षा अंतर्गत धार्मिक अतिरेकी (हिंदू बहुसंख्य म्हणून हिंदू अतिरेकी अधिक) अधिक धोकादायक, हे विधान अजिबात वावगे ठरत नाही.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sun, 12/19/2010 - 20:15
नवीन
<<थोडक्यात, कोणत्याही बाह्य (येथे लश्करे तोयबा) पेक्षा अंतर्गत धार्मिक अतिरेकी (हिंदू बहुसंख्य म्हणून हिंदू अतिरेकी अधिक) अधिक धोकादायक, हे विधान अजिबात वावगे ठरत नाही.
काय म्हंता? तेज्यायला हे हिंदू लैच माजलेत...गपगुमान ऱ्हायचं सोडून ब्वांबची फोडाफोडी करतेत....मी त म्हंते हाकलून लावा त्यांना..कोन हाय रं पलिकडं, या हिकडं...काय म्हंता तुम्ही इऊ र्हायले पन ह्ये लोक तुम्हास्नी अतिरेकी म्हंतेत? आता काय कराव रावं?
काय कराचं वं?
- Log in or register to post comments
स
समंजस
Tue, 12/21/2010 - 04:42
नवीन
थोडक्यात, कोणत्याही बाह्य (येथे लश्करे तोयबा) पेक्षा अंतर्गत धार्मिक अतिरेकी (हिंदू बहुसंख्य म्हणून हिंदू अतिरेकी अधिक) अधिक धोकादायक, हे विधान अजिबात वावगे ठरत नाही.
>>मान्य, कुठलंही विधान मान्य जर त्याला वास्तवाची जोड असेल तर....
मागील १० वर्षातील काहि उदाहरणे ज्या मुळे देशातील सुरक्षीतता धोक्यात आली?? देशातील शेकडो निरपराध नागरीकांचा मॄत्यू झाला?? देशातील उच्च पदावरील नेत्यांचा मृत्यू झाला??
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Sun, 12/19/2010 - 14:55
नवीन
सर्वप्रथम त्या may be विषयी थोडेसे:
एकतर हे जे कोट केले गेले आहे ते अमेरीकन अधिकार्याच्या केबलवरून. तेव्हा हे may be राहूल गांधीचे असेलच असे नव्हे (तसे ते नसेलच असेही नव्हे). ह्या may be चा वापर केल्याने तशी शक्यता आहे, ठाम अॅसर्शन नव्हे, इतकेच स्पष्ट होते. तर मग प्रश्न असा: राहून गांधींना ही शक्यता का वाटली?
तर तुमच्या सरळ (लिनीयर) हिशेबाप्रमाणे देशातील हिंदू व मुस्लिम ह्यांच्या तुलनात्मक टक्केवारीमुळे! इतका सरळ हिशेब जर राजीव गांधी करीत असतील (--तितकेही चातुर्य त्यांच्यात आहे ह्याविषयी शंका आहे, पण त्या थोर वगैरे नेत्याला आपण इथे बेनिफिट ऑफ डाऊट देवू यात--) तर त्यांना देशाचा इतिहास, त्यातील धार्मिक दंगलींचा इतिहास अत्यंत तुटपुंजा माहिती आहे असे म्हणावे लागेल?
वास्तविक त्या गृहस्थाची आतापर्यंतची वाटचाल पहाता इतकाही विचार त्याने केला असेल असे म्हणणे चुकीचे वाटते. आपण (शिक्षीत लोक) असल्या एक्स्क्युजेस देऊन समाजाचा बुद्धिभेद तर करीत नाही आहोत ना?
पण २६/११ मधे देशांतील काही व्यक्तिंचा हात होता ना? आणि २६/११ सारखे काही झाल्यावर देशांतर्गत काहीही विपरीत धार्मिक दंगली उसळल्या नाहीत हे जर तुम्हाला अभिप्रेत असेल तर त्याचे श्रेय भारतातील दोन्ही प्रमुख धर्मियांकडे जाते.
ता. क.: तुम्ही केलेला युक्तिवाद हे वक्तव्य उघड झाल्यानंतर काँग्रेसच्य कुठच्यातरी नेत्याने केले आहे का? आज तर खुद्द सोनिया(जी)च वेगळाच (अॅपोलोजेटीक) सूर लावत असतांना दिसता आहेत!
- Log in or register to post comments
स
सुनील
Sun, 12/19/2010 - 15:28
नवीन
हा हा!!
मी काँग्रेसचा प्रवक्ता नाही! किंबहुना मी सातत्याने काँग्रेसलाच मतदान करतो असेही नाही. कालपरत्वे सेना-भाजप वा काँग्रेस-रा.काँग्रेसला मत देतो!
असो.
अल्पसंख्यांकांच्या जमातवादापेक्षा बहुसंख्यांकांचा जमातवाद हा देशाला अधिक धोकादायक असतो, असे माझे प्रामाणिक मत आहे. कारण अल्पसंख्यांकांच्या जमातवादाला फुटीरपणाचे लेबल लावून त्याच्याशी लढता तरी येते. बहुसंख्यांकांचा जमातवाद हा राष्ट्रवादाचे/देशभक्तीचे गोंडस लेबल लावून येतो आणि मग त्याविरुद्ध बोलणाराला सहज देशद्रोही ठरवता येते.
त्याविषयी विस्ताराने नंतर कधीतरी.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sun, 12/19/2010 - 20:19
नवीन
महाराष्ट्रातील हिंदूंचे जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड (भले त्या महान लोकांचे नाव घाण करणे का होईना) यांना सगळे बहुसंख्य मान्यता देतात? त्यांच्या मूर्खपणाला आळा बसावा म्हणून काहीच बोलत नाहीत? त्यांना देशभक्त म्हणतात, हि माहिती नवीनच.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Mon, 12/20/2010 - 02:55
नवीन
थोडीफार सहमती. [भारतातील दोन प्रमुख धर्मियांत निव्वळ स्वतःच्या जवळच्या फायद्यासाठी (short term gains) फूट पाडणार्या राजकारण्यांचाही तितकाच, किंबहूना त्याहून अधिक धोका आहे असे मला वाटते].
पण इथे प्रश्न केवळ होम-ग्रोन दहशतवादाचा नव्हता, तर भारतात दहशतवादी (अलिकडे हिंदीने आपल्या डोक्यावर मारलेला नवीन शब्दः 'आतंकवादी') काय धुमाकूळ घालू शकतात ह्याविषयी होता. वर चेतन ह्यांनी दर्शवल्याप्रमाणे राहूल गांधींची टिपण्णी अमेरिकन राजदूताच्या 'लष्कर-ऐ-तोयबा' च्या (भारतातील) हालचालींविषयीच्या पृच्छेवर केलेली होती.
तुम्ही काँग्रेसचे प्रवक्ते आहात असा आरोप मी तुमच्यावर कसा करेन? प्रामणिकपणे सांगतो, मला तुमच्याविषयी आदर आहे आणि तो अशा घाणेरड्या आरोपांनी मी भग्न करणार नाही. मला हे दर्शवायचे होते की काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांच्या सर्वेसर्वा नेत्याही ज्या दु:तर्काचा आधार घेतांना दिसत नाहीत, त्याचा तुम्ही घेतांना दिसत आहात!
- Log in or register to post comments
स
सुनील
Mon, 12/20/2010 - 14:16
नवीन
लष्करे तोयबाचा भारताला काय threat असू शकतो? थेट युद्ध (conventional war)? हे शक्य नाही.
मग भारताला नामोहरम करण्याचा दुसरा उपाय म्हणजे येथिल समाजात उभी फूट पाडणे.
हे शक्य आहे.
पण त्यासाठी येथिल बहुसंख्य मुस्लिमांमध्ये Uprising against the state ची भावना निर्माण व्ह्यायला हवी. तरच हे शक्य आहे.
आता वळूयात विकिलीक्सकडे.
राहुल गांधी म्हणतात, भारतातील काही मुस्लिमांचा लष्करे तोयबाला पाठिंबा आहे परंतु देशाला खरा धोका हा हिंदूंमधिल वाढता मूलतत्ववाद हा असू शकतो.
लक्षात घ्या, ह्यातील पहिले वाक्य हे ठाम विधान आहे. त्यात may be वगैरेचा गुळमटपणा नाही. भारतातील काही मुस्लिम हे Uprising against the state च्या भूमिकेत नक्कीच आहेत (पण ते बहुसंख्य नाहीत).
आता दुसरे वाक्य. ह्यात ते म्हणतात, हिंदूंमधिल वाढता मूलतत्ववाद. (सगळे हिंदू मूलतत्ववादी (अतिरेकी) आहेत असे बिलकूल नाही पण त्यांच्यात मूलतत्ववाद वाढतो आहे. हे खरे वा खोटे असेल पण जर ते खरे असेल), तर तो अधिक मोठा धोका असू शकतो.
ह्या वाक्यांत मला तरी काहीही गैर दिसत नाही.
असो. ह्या धाग्यावरील हा माझा शेवटचा प्रतिसाद. पटत नसेल तर let's agree to disagree!
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Tue, 12/21/2010 - 08:27
नवीन
पण त्यासाठी येथिल बहुसंख्य मुस्लिमांमध्ये Uprising against the state ची भावना निर्माण व्ह्यायला हवी. तरच हे शक्य आहे.
दुर्दैवाने मी आणि सुनीलसाहेब एका बाजूला क्वचित् असतो, पण आज त्यांच्या वरील वाक्याशी पूर्ण सहमत.
माझ्या इतरत्र दिलेल्या प्रतिसादात मीसुद्धा हेच लिहिलेले आहे कीं भारताचे नागरिकत्व स्वखुषीने निवडलेल्या मुस्लिम समाजाने व त्यांच्या नेतृत्वाने या सर्व तथाकथित निधर्मी पक्षांना (pseudo-secular political parties) सांगितले पाहिजे आमचा अनुनय थांबवा, आम्हाला इतर नागरिकांइतक्याच सोयी-सवलती द्या आणि आम्हाला इतर नागरिकांत मिळून-मिसळून बंधुभावाने जगू द्या!
हा दिवस मला "याचि देही याचि डोळा" पहायला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Mon, 12/20/2010 - 14:10
नवीन
लौकर लिही. हा विषय जोपर्यन्त वरती आहे तोवर लिही.
नंतर लोक विसरुन जातात आणि लिहायचे राहून जाईल.
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Tue, 12/21/2010 - 04:42
नवीन
माझ्या मते काँग्रेसने (व त्यांच्यातून फुटलेल्या राष्ट्रवादी वगैरेंसारख्या उपपक्षांनी व या पक्षांना झालेला फायदा बघून लालू-मुलायम वगैरेसारख्या संधीसाधूंनी) अल्पसंख्यांकांचा बेसुमार अनुनय केला आणि तो चढत्या भांजणीचा होताना दिसतोय त्यामुळे (व केवळ त्यामुळेच) हिंदू जनता नाइलाजास्तव धर्माच्या नावाने एक होऊ लागली! हिंदूंना "गृहीत धरले जाऊ लागल्यामुळे" (taken for granted) आजची परिस्थिती निर्माण होऊ घातली आहे. याला हिंदू जनता जबाबदार नसून निर्लज्जपणे अल्पसंख्यांकांचा अनुनय करणारे राजकारणी (मुख्यतः काँग्रेसी) जबाबदार आहेत. राहुल गांधी हे त्यातले नवे खिलाडी! अजूनही हा अनुनय बंद केला तर हिंदू परत आपल्या मूळस्वभावकडे वळतील.
हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात असे होते यातच हिंदूंचा मोठेपणा आहे आणि भारताचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारलेल्या मुस्लिम समाजाने-त्यांच्या नेतृत्वाने-हा निर्लज्ज अनुनय नाकारण्याची वेळ आता आली आहे.
मुस्लिम बहुसंख्य असलेल्या देशांत काय होते ते आपण पाकिस्तानात व बांगलादेशमध्ये पाहिलेच आहे आणि आजही पहातोच आहोत. अपवाद आहे इंडोनेशियाचा. पण तिथेही परिस्थिती बिघडत चालली आहे असे अलीकडील ख्रिश्चनविरोधी कारवायांमुळे वाटू लागलेले आहे.
(मी भाजपाचा मतदार नाहीं, पूर्वी शिवसेनेचा जरूर होतो. ती फुटल्यानंतर यापुढे काय करायचे ते भारतात परतल्यावर ठरवेन!)
- Log in or register to post comments
स
सुहास..
Sat, 12/18/2010 - 12:47
नवीन
स्कोर काय झालाय रे पशा ? (दोन्ही पशांना कळल असेल अश्या अपेक्षेत ..)
वाश्या
दोन्ही पश्यांच्या मित्र
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 12/18/2010 - 14:56
नवीन
तू मात्रा विसरला नाहीस ना? उत्तर खव मध्ये दिलंस तरी चालेल!
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 12/18/2010 - 15:22
नवीन
ओह हाय वाश्या ... गंभिर- शेवाग अनुक्रमे ६१-६२ वर खेळत आहेत ;)
भारत : १३२ / ०
- वनवाश्या
- Log in or register to post comments
ड
डिजेबॉय
Sat, 12/18/2010 - 16:18
नवीन
अरे हा दळभद्री मुम्बई ला आला तेव्हा याची दादर ला रस्त्यावरुन जायची हिम्मत नाही झाली, लोकल ट्रेन मधुन गेला साला.. अन पागल मिडिया साठी तो एक स्टन्ट झाला.
आणि फक्त हाच काय, पुर्ण congress च हिन्दुविरोधि आहे. :hat:
- Log in or register to post comments
प
पंगा
Sun, 12/19/2010 - 14:42
नवीन
कृपया वाक्य लिहिताना अन्वयार्थ नि:संदिग्ध राहील याकडे लक्ष द्यावे. नेमके कोणाला / कशाला दळभद्री म्हटले आहे ते लक्षात येत नाही.
बाकी दादरच्या सेनापती बापट मार्ग / रानडे रोड वगैरेंवरून (धक्के खात) एक वेळ चालत जाऊ शकेन, पण दादरचा रेल्वेपूल ओलांडायला (आणि दादरला लोकलमध्ये चढउतार करायला) आपण तरी जाम टरकतो बुवा! त्यामुळे श्रीयुत राहुल गांधी यांनी दादरला रस्त्यावरून चालण्या(चे स्टंट करण्या)ऐवजी लोकलमधून जाण्याचे स्टंट करण्याची हिंमत केली असेल, तर ते (तुलनात्मक, आणि बिगरमुंबईकरासाठी अॅब्सोल्यूट) शौर्याचेच लक्षण मानायला पाहिजे, असे मला तरी वाटते.
- Log in or register to post comments
ड
डिजेबॉय
Sun, 12/19/2010 - 17:15
नवीन
अर्थातच दळभद्री हा शब्द राहुल साठी वापरला आहे.
आणि सोबत पाळीव लोकान्चा समुह असताना लोकल मधे चढण्यात कसले आले शौर्य. :hat:
या हिशोबाने भिकारयाना अनेक शौर्य पदक मिळायला हवेत. [येथे भिकारी हा शब्द मी भिकारयानाच उद्देशुन लिहिला आहे] :hat:
- Log in or register to post comments
च
चंद्रू
Sat, 12/18/2010 - 21:11
नवीन
राहुल गांधींनी अखेर कबूल केलं की हिंदू दहशतवादी लष्करे तैयबापेक्षा भारी आहेत. नाही तर काही लोक आपल्याला फारच पुळचट व खुळचट समजत होते. आता राहुल गांधीनीच हे सांगितल्यामुळे लष्करे तैयबाला धडकी भरेल यात शंका नाही. राहुलचा स्पष्टपणा आपल्याला आवडला बुवा.
ते लोक गुप्तपणे कारवाया करतात. घाबरट आहेत. आपण हजारो लोकांनी उघडपने जगभरातल्या लोकांच्या सामनेच बाबरी मशीद पाडून टाकली. कोणी काय पण वाकडे करू शकले नाही. खरंतर तेव्हाच आपली ताकद सिद्ध झालेली आहे. राहुल गांधीना खूप उशीरा लक्षात आलेय. गुजरातमध्ये सुद्धा आपण उघडपणे लफडा करून टाकला. काय पण कोनी वाकडे करू शकले नाही. डिसेंबर १९९२ नंतर आपण पोलिसांच्या साक्षीने उघडपणे मुंबईत पण आपली ताकद दाखवली आहे. आपन जे करतो ते उघडपणे. गुपचुप गुपचुप नाही. म्हणूनच राहुला गांधीला आपला जास्त धोका वाटतो. मालेगाव, अजमेरचे बॉंबस्फोट गुपचूपपने झाले म्हणून ते आपल्या लोकांचं काम नाही हे कोणी पन सांगेल. आपण राडा, लफडी, दंगली यांना घाबरत नाय. जे काय करायचं ते खुल्लम खुल्ला. पाठीमागून वार करण्यात कसला पुरुषार्थ? पण भारताला आपल्यामुळे धोका नाय पाकिस्तानला धोका आहे. हा राहुलने पाकिस्तानला दिलेला इशाराच आहे असं समजा.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sat, 12/18/2010 - 21:13
नवीन
मस्त प्रतिसाद..मेरेकु आवड्या.
- Log in or register to post comments
स
सातबारा
Sun, 12/19/2010 - 05:15
नवीन
रॉबर्टो गांधी (मुस्लीम + सीआयए) व सोनिया मायनो (ख्रिश्चन + केजीबी) यांच्या रॉल मायनो गांधी (युनिव्हर्सल क्रॉस) अशा सुपुत्राकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार ?
- Log in or register to post comments
प
पंगा
Sun, 12/19/2010 - 14:44
नवीन
'ख्रिश्चन' आणि 'केजीबी' हे दोन शब्द एकाच दमात उच्चारलेले पाहून अंमळ मौज वाटली. असो.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Tue, 12/21/2010 - 04:06
नवीन
का बरं? आम्हाला पण सांगा ना..
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Tue, 12/21/2010 - 08:49
नवीन
कारण कम्युनिस्ट राजवट होती तेंव्हां कुणालाही कुठलाही धर्म पाळण्याची अनुज्ञा नव्हती. चीनमध्ये आजही तसेच आहे. आमच्याकडे व्यवसायानिमित्त येणार्या आणि माझा चांगला परिचय झालेल्या एका चिनी बाईला मी विचारले कीं "एरवी नसेल पण तुझे मूल खूप आजारी पडले तर देवाचा धावा करतेस कीं नाहीं?" ती उत्तरली "नाहीं.". "मग काय करतेस?" इति मी. ती म्हणाली कीं "आम्हाला लहानपणापासून logic वापरायला शिकवलेले असते त्यामुळे डॉक्टर चांगले/विश्वासू आहेत, औषधे बरोबर चालू आहेत या पलीकडे आमचा विचार जातच नाहीं!"
म्हणून ख्रिश्चन आणि केजीबीची मोट जरा विचित्र वाटली पंडित गागाभट्टांना!
- Log in or register to post comments
प
प्रशु
Sun, 12/19/2010 - 07:14
नवीन
रोजच्या रोज सापडणारे ह्या आधुनिक गांधीबाबांच्या मंत्रीमंडळातील आणि पक्षातील नेते हेच खरे दहशतवादी आहेत. देश भिकेला लावण्याचे सत्कार्य नित्यनेमाने पार पाडीत आहेत...
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Sun, 12/19/2010 - 11:09
नवीन
http://www.youtube.com/results?search_query=swami%20on%20soniya&search=Search&sa=X&oi=spell&resnum=0&spell=1
इथे ऐका
- Log in or register to post comments
र
रणजित चितळे
Sun, 12/19/2010 - 12:05
नवीन
यांनी उचलली जिभ आणि लावली टाळ्याला (त्यांचे नेहमीचेच आहे म्हणा) आपण काही अर्थ निघतो का ते बघतोय.
बेजबाबदार वागणुक. आपला (होउ घातलेला) पंतप्रधान (पण नशिबात काय लिहीले आहे कोणीच सांगु शकत नाही) काय कुवतीचा आहे हे आपण समजुन घ्यायला पाहीजे.
- Log in or register to post comments
ज
जयेश माधव
Sun, 12/19/2010 - 15:26
नवीन
म्ह्णे भावी प॑तप्रधान्,तो॑ड बघा.......अशी विधाने करुन जर हे महाशय प॑तप्रधान बनणार असतील तर या देशाचे देवच भले करो!...
बाकी गा॓धीवादी॑नी च॑गला विषय मा॑ड्ला आहे.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sun, 12/19/2010 - 18:47
नवीन
असा कसा कॉंग्रेसचा देव बाई ठकडा
राहुल वाटे डोक्याने लंगडा ||ध्रु||
दूताघरी जातो तारे तोडतो
करी काँग्रेसी धोरणांचा रगडा ||ध्रु||
असो थट्टा पुरे. जेव्हा जेव्हा पापाचा प्रभाव वाढून धर्म दुबळा होतो तेव्हा मी अवतार घेतो असे भगवान म्हटले आहेत. भगव्या हिंदूत्ववाद्यांच्या पापाचे मडके भरत आले आहे आणि त्यांचे निर्दालन करायला ख्रिस्तीवंशात राहुलजी अवतरले आहेत. लवकरच ते तमा हिंदूत्ववाद्यांचा नि:पात करोत आणि भगवा रंग भारतातून नामशेष होवो अशी आकाशाच्या बापाचरणी प्रार्थना.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 12/19/2010 - 20:49
नवीन
राजकारण, नागरी प्रशासन, पोलीस खाते, न्याय व्यवस्था, संरक्षण विभाग... या सर्व संस्था हिंदुच राबवत आहेत. जर या सर्व संस्था देशाचा कचरा करायला निघाल्यात तर त्या इतर कुठल्याहि बाह्य दहशतवादि संघटनेपेक्षा जास्त घातक आहेत. दहशतवादाचि समस्या या अंतर्गत समस्येपेक्षा फार फार सौम्य आहे. इतर समस्यांपुढे सामान्य माणुस हतबल झालेला आहे. तेंव्हा दहशतवादाच्या हिरव्या रंगाला झोडपण्यात भारतीय माणुस धन्यता मानतोय आणि त्याविरुद्ध २-४ वाक्य बोलुन आपण इतर सर्व समस्यांविरुद्ध लढल्याचा आव आणातोय.
दहशतवादाचा मुकाबला संरक्षणसंस्थेनेच करायला हवा. सामान्य नागरीकांची जागरुकताहि आवश्यक आहे. पण हिरव्या विरुद्ध भगवा दहशतवाद जर उभा राहाणार असेल तर देशाचे ३-१३ उद्या वाजायचे ते आज वाजतील. अराजकाशिवाय हाति काहिच पडणार नाहि. हिंसक स्वरुपाच्या भगव्या चळावळीने देशाचा घातच होईल.
अर्थात, राहुलबाबांना असलच काहि म्हणायच होतं अशातला भाग नाहि. त्यांच्याकडे आम्हि फार अपेक्षेने बघतोय, पण दिवसेंदिवस ते आमच्या पदरी निराशाच पाडताहेत :(
अर्धवटराव
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Mon, 12/20/2010 - 02:20
नवीन
>>राजकारण, नागरी प्रशासन, पोलीस खाते, न्याय व्यवस्था, संरक्षण विभाग... या सर्व संस्था हिंदुच राबवत आहेत. जर या सर्व संस्था देशाचा कचरा करायला निघाल्यात तर त्या इतर कुठल्याहि बाह्य दहशतवादि संघटनेपेक्षा जास्त घातक आहेत.
सहमत. आपल्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे. पण माझी चिंता नक्कीच वेगळी आहे.
आज विकीलीक्स ने जे काही प्रसिद्ध करते ते सर्व जगभर पसरायला वेळ लागत नाही. राहुलच्या विधानातून आपण वरील जो काही अर्थ काढला तोच अर्थ बाकीच्या जग काढेल असे नव्हे.
कोणतीही एक संस्था आणि दहशतवादी यांना जर एकाच मापाने जेव्हा तोलले जाते तेव्हा साहजिकच त्या संथ्वीरुद्ध मनात एक काळी प्रतिमा निर्माण होते. माननीय नितीन थत्ते यांच्या बरोबर झालेल्या चर्चेतील एका शंकेनुसार बाहेरच्यांना 'इथे हिंदू रस्तोरस्ती खूप पडत आहे' असे वाटले तर याला जबाबदार कोण ?
bar भारताला भ्रष्ट संस्थाकडून धोका आहे हे वेगळे सांगायची गरजच काय, हे कोणत्याही शेंबड्या पोराला देखील कळते. CWG, 2G, आदी घोटाळ्यांनी हे कधीच सिद्ध झालेले आहे. असे अनेक घोटाळे जगभर गाजले असताना, अमेरिकेच्या राजदूतांना गुप्तपणे हिदू दहशतवाद्यांपासून जास्त धोका आहे असे म्हणणे म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे.
याहून पुढे जाऊन असे म्हणता येतील कि अश्या भ्रष्ट संस्थांना नावे ठेवण्यापेक्षा त्यातील भ्रष्ट कारभार कमी करण्यासाठी राहुल (आणि त्याच्या हातातील खेळण्यांनी) यांनी किती ठोस पाऊले उचलली ?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 12/20/2010 - 05:20
नवीन
राहुलबाबांची जीभ (आणि त्यामागे काहि विचार असेल तर ते सुद्धा) कधिकधी फारच सैल सुटते. एका निवडणुक प्रचाराच्यावेळी त्यांनी पाकिस्तानची फाळणी आणि बांगलादेशची निर्मिती हि "गांधी घराण्याची अचिव्हमेंट" आहे असं जाहिर विधान केलं होतं (आत्ता त्याचा नेमका संदर्भ आठवत नाहि... पण बहुतेक मागच्या बिहार विधानसभा/लोकसभा निवडणुकिची वेळ असावी). तेंव्हा आमचा प्रथम अपेक्षाभंग झाला :(. त्यानंतरही राहुलबाबा आपली सवय बदलायला तयार नाहि...
(अपेक्षार्थी) अर्धवटराव
- Log in or register to post comments
अ
अविनाश कदम
Sun, 12/19/2010 - 21:15
नवीन
एकूण दहशतवाद हा देशाला धोकादायकच. तो हिंदू, असो,जिहादी असो की माओवादी. लहान असो की मोठा. दहशतवादाबाबत जास्त धोकादायक व कमी धोकादायक असे काही नसते. तो सर्वसामान्य निरपराधांचे बळी घेतो. २६/११ च्या हल्ल्यात मुस्लिमही मारले गेले होतेच. दहशतवाद जात-धर्म बघत नाही. त्यामुळे “जास्त धोकादायक” म्हटले येवढ्यावरून नाहक काथ्याकूट करण्यात अर्थ नाही. कमी असो की जास्त जर.दहशतवाद असेल तर ते वाईटच. विकीलीक्स ने उद्या विरोधीपक्षांचीही अंडीपीली बाहेर काढल्यावर परत सत्ताधारी पक्षवाले घोळ घालणारच आहेत. आपण जनतेने यातील तथ्य काय ते ओळखायला हवे
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »