Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मासे १८) खुबड्या - खुबड्यांचे सुके आणि एलवण्याची कढी

ज
जागु
Tue, 12/21/2010 - 10:47

प्रतिक्रिया द्या
12524 वाचन

💬 प्रतिसाद (22)
ग
गवि Tue, 12/21/2010 - 12:47 नवीन
एकदम नवीन काही पहिल्यांदाच कळलं. तिसर्‍या माहीत होत्या पण हे पण खूप इंटरेस्टिंग वाटतंय. घरी बनवणे शक्यच नाही. हॉटेलात कधी मेनूत वाचलं नाही. बहुधा सोलण्यातला वेळ आणि कष्ट यामुळे हॉटेलात ठेवत नसतील्..(क्वांटिटी जास्त करणे अवघड आहे..) कुठे खायला मिळेल. जबरदस्त इच्छा झाली आहे. कसे लागते? माशांसारखे की शिंपल्यांकडे झुकणारी चव?
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 12/21/2010 - 12:57 नवीन
जागू, तू ग्रेट आहेस. मी हे इथे एशियन स्टोअरमधे पाहिले होते. आता दिसले की करुन बघेन. शिंपल्या प्रमाणे हे ताजे/खराब ओळखायचे काही खूण आहे का?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 12/21/2010 - 13:02 नवीन
जबर्‍याच दिसतोय हा प्रकार. पाहूनच समाधान झाले. आणि काय ग येवढा कांदा कुठून आणलास ? ऑ ??
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 12/22/2010 - 07:35 नवीन
मायला बघून लाळ गळायला लागलीये........... Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ज
जागु Tue, 12/21/2010 - 13:09 नवीन
गगनविहारी धन्स. स्वाती अग ह्या जिवंत असतात. भांड्याला चिकटून बसतात किंवा थोड्या जगच्या जागी गोगलगाई सारख्या हालचाल करतात. आणि काय ग येवढा कांदा कुठून आणलास ? ऑ ?? कांदा स्वस्त असताना केलेला प्रकार आहे हा. आत्ता केला असता तर अर्धा कांदा दिसला असता त्यात.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 12/21/2010 - 14:22 नवीन
काही गडबड आहे की हापिसातून ब्लॉक आहेत ते कळले नाही. खुबड्या म्हणजे कालवे का?
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 12/21/2010 - 15:29 नवीन
जागु असले प्रकार फक्त आम्हाला फोटोतच बघायला मिळणार का कधी बोलवणार तु ?
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 12/21/2010 - 15:32 नवीन
ज ब र द स्त!!!
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Tue, 12/21/2010 - 18:33 नवीन
जागू, नेहमी प्रमाणे छान माहीती आणि पाककृतीही पण ते कच म्हण्जे नक्की काय ते समज्लं नाही ... माझ्या आईकडे आजुबाजूला आग्री-कोळी च राहतात, त्यानी हे आणलेलं पाहीलंय पण कधी खाण्याचा योग नाही आला आणि इकडे चायनिज दुकानातही अस्तं. ते कच नक्की काय असतं ते सांग म्हणजे आणून बघेन एकदा तरी...
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Wed, 12/22/2010 - 02:02 नवीन
वर्टिब्रेट्स वरुन एकदम इनवर्टिब्रेट्स? इतके दिवस तुमच्या पाक कृतींनी तोंडाला पाणी सुटायचे. पण त्या खुबड्या भांड्यात हालचाल करतात ऐकून कसेसेच वाटले.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 12/22/2010 - 07:19 नवीन
हो.. रत्नांग्रीस असताना ते मोठ्ठे खेकडे विकायला कोळीणमाम्या दारावर यायच्या. त्यांच्या हातात ते भयंकर नांग्या हलवत वळवळत असायचे. माम्यांची बोटेही पकडायला पहायचे पण माम्या बोलता बोलता शिताफीने बोटांत खेकडा फिरवून त्याला चकवायच्या. सौदा फिक्स झाला की मग त्यांच्या नांग्या तोडून त्या गिर्‍हाईकाने आणलेल्या भांड्यात टाकायच्या. नंतर अगदी पातेल्यात शिजवायला घातल्यानंतरही हालचाल करायचे. कारण हेच असावे की त्यांना शिजवण्यापूर्वी कसे मारायचे हे माहीत नाही. मासे ऑक्सिजन अभावी आधीच मरतात. बकरे, कोंबडे मान कापून आधीच मारलेले असतात. खेकडे, शिंपले, निवट्या हे हवेतही जगू शकतात. सर्वच प्राण्यांना मारताना असे काहीतरी होते पण आपले मनाचे लाड असतात.. डोळ्याआड झाले की ते क्रूर नाही..डोळ्याला दिसले की वाईट वाटते. मलाही खेकडा ताटात पडताना टण असा आवाज येतो म्हणून तो आवडायचा नाही..असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
ज
जागु Wed, 12/22/2010 - 06:58 नवीन
गोगोल, आहो सगळेच मासे आधी हालचाल करत असतात. फक्त मासे पाण्यातुन बाहेर काढल्यावर मरतात पण चिंबोरे, खुबड्या, खुबे, निवट्या हे प्रकार काही काळ जिवंत राहतात. प्रियाली नाही ग कालवे वेगळी ती दगडाला चिकटलेली असतात पुर्णपणे आणि बाहेरुन पांढरे कवच असते ते कवच फोडून तिथल्यातिथे कालव काढावी लागतात. मी आधी कालव टाकली आहेत. मी थोड्यावेळाने सगळ्याच माझ्या माश्यांच्या लिंक देते इथे. त्यात समजेल. खुबड्या ह्या गोगलगाईच्या आकाराच्या पण छोट्या आणि काळ्या असतात. वेताळ कधी येताय सांगा. दिपाली धन्स ग. मी अजुन फोटो टाकते खाली त्यात कच खाली भांड्यात पडलेल्या आहेत बघ. आख्ख्या खुबड्यांचाही देते. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 12/22/2010 - 07:12 नवीन
थोडे अधिक स्पष्ट करायचे झाल्यास शंखाचे तोंडाचे झाकण उचकटून आतील खाद्यभाग (मऊ) काढण्याच्या प्रक्रियेत ते धारदार कवचसदृश झाकण (किंवा / आणि) शंखाचे कवच हे पूर्ण किंवा याचा काही भाग तुटून मऊ पदार्थात मिसळू शकते (अंडे फोडल्यावर त्यात चुकून कवचाचा एखादा तुकडा पडावा तसे). पण या प्राण्याचे हे कवच धारदार असल्याने तसेच अन्नात आले तर टोचू/कापू शकते, म्हणून अधिक खबरदारी घ्यावी.. इतिश्री.. बरोबर ना जागु ताई? बाकी.. हॉटेलात कधी मेनूत वाचलं नाही. बहुधा सोलण्यातला वेळ आणि कष्ट यामुळे हॉटेलात ठेवत नसतील्..(क्वांटिटी जास्त करणे अवघड आहे..) कुठे खायला मिळेल. जबरदस्त इच्छा झाली आहे. कसे लागते? माशांसारखे की शिंपल्यांकडे झुकणारी चव? या आमच्या उपरिनिर्दिष्ट भागावर काहीच उत्तर नाही.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
ज
जागु Wed, 12/22/2010 - 07:15 नवीन
गगनविहारी ह्यांची चव शिंपल्यांकडे झुकणारी आहे. पण या प्राण्याचे हे कवच धारदार असल्याने तसेच अन्नात आले तर टोचू/कापू शकते, म्हणून अधिक खबरदारी घ्यावी.. हो अगदी बरोबर. कालवांच्या बाबतीतही तसेच आहे. हॉटेलात कधी मेनूत वाचलं नाही. बहुधा सोलण्यातला वेळ आणि कष्ट यामुळे हॉटेलात ठेवत नसतील्..(क्वांटिटी जास्त करणे अवघड आहे..)
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 12/22/2010 - 07:22 नवीन
धन्यवाद. म्हणजे मिळाले नाहीत तरी तिसर्‍या खाऊन समाधान करून घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
द
दिपाली पाटिल Wed, 12/22/2010 - 07:34 नवीन
अच्छा कच म्हणजे एक छोटासा झाकणासरखा भाग...
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 12/22/2010 - 07:43 नवीन
हॉटेलात कधी मेनूत वाचलं नाही. बहुधा सोलण्यातला वेळ आणि कष्ट यामुळे हॉटेलात ठेवत नसतील्..(क्वांटिटी जास्त करणे अवघड आहे..) हॉटेलातील खुबड्या निवडणारी पोर पळून जातिल किंवा त्यांना रोज रोज साफ करुन स्पाँडीलायसीस तरी होईल. :sad:
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 12/22/2010 - 08:02 नवीन
याच कारणाने बिरड्याची उसळ, गव्हल्याची खीर वगैरे पदार्थ हाटेलांत फार दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
क
कच्ची कैरी गुरुवार, 12/23/2010 - 14:15 नवीन
जागुताईची रेसेपी म्हटली म्हणजे काहितरी 'हटके'च असणार्,नाही का?बाकी पदार्थ बघुन तोंडाला पाणीच सुटले.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 12/23/2010 - 21:24 नवीन
पहिल्यांदाच पाहिले आणि ऐकले या बद्दल. जे आहे ते मी स्वतः करीन असे वाटत नाही. जागु, तुझ्याकडेच येईन मी. चालेल ना?
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 12/23/2010 - 21:30 नवीन
@तुझ्याकडेच येईन मी. चालेल ना? मी पण आम्ही सारेच खवय्ये
  • Log in or register to post comments
ख
खादाड Sun, 12/26/2010 - 08:16 नवीन
जागुताई तुझ्यामुळे हे सगळे प्रकार बघायला मिळातात नाहितर आमच्या सारख्या मध्यभारतात राहणार्‍या लोकांना कोण सांगतोय!! धन्यवाद !! :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा