जे न देखे रवी...

मला मनाचे पटले नाही

Primary tabs

मला मनाचे पटले नाही
वाद आमचे मिटले नाही

मला नेहमी ऐकू येते
मनातही जे म्हटले नाही

राग तुला याचाच असावा
नाव तुझे पुटपुटले नाही

मला भेटल्या जखमा सुंदर
कुणात मन गुरफटले नाही?

अभिलाषेचे वादळ आले
पाय काधी लटपटले नाही

फक्त ठेवले नावा पुरते
नाते मी विस्कटले नाही

शब्द आणले उधार थोडे
दुःख तरी पण नटले नाही

तुझे एवढे कर्ज उरावर
या श्वासांनी फिटले नाही

नको नकोसे जगणे झाले
पाश तरी पण तुटले नाही

तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये
व्यसन कधी मग सुटले नाही

अनिरुद्ध अभ्यंकर

ठणठणपाळ

>शब्द आणले उधार थोडे
दुःख तरी पण नटले नाही

>नको नकोसे जगणे झाले
पाश तरी पण तुटले नाही

वा,वा, बहुत खूब!
सशक्त कविता.

इनोबा म्हणे

शब्द आणले उधार थोडे
दुःख तरी पण नटले नाही

नको नकोसे जगणे झाले
पाश तरी पण तुटले नाही

तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये
व्यसन कधी मग सुटले नाही
या ओळी विशेष आवडल्या

आता याच्या विडंबनाची वाट पाहतोय.:)

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

धमाल मुलगा

मला भेटल्या जखमा सुंदर
कुणात मन गुरफटले नाही?

तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये
व्यसन कधी मग सुटले नाही

वा! आमची अवस्था अगदी शब्दांत बांधलीत बॉ!

मस्त!!!!

विसोबा खेचर

फक्त ठेवले नावा पुरते
नाते मी विस्कटले नाही

वा! केवळ सुरेख.....!

तात्या.

चेतन

राग तुला याचाच असावा
नाव तुझे पुटपुटले नाही

सही रावं

आनंदयात्री

तुझे एवढे कर्ज उरावर
या श्वासांनी फिटले नाही

फारच सहजतेने व्यक्त केलय शेठ, काय व्यक्त केलेय याला शब्द जरा शोधावा लागेल, दु:ख दर्द च्या पलिकडचे काहीतरी असे काही तरी !
किती ती बोच, सगळे श्वासही देउन न फिटावी, काय असेल तो हताश पणा ..... छ्या छ्या काय लिहावे बॉ .. सुचत नाही साला.

मदनबाण

तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये
व्यसन कधी मग सुटले नाही

व्वा !!!!!

(नयन प्रेमी)
मदनबाण

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर