चिलीया बाळ कोण होता ? दत्त संप्रदाय आणि नाथसंप्रदाय हे एकच की वेगवेगळे?
हे संप्रदाय कोणी स्थापन केले? नाथ संप्रदयातील गुरुपरंपरेबद्दल कोणी सांगेल का?
सगळेच T.P. करत आहेत.
प्रश्ण निट वाचा आणि पुढे जा. :|
एकदा आम्ही रुपककथेचा अर्थ कसा लावायचा हे नीट समजवुन दिले.
आता विजुभाउंना १००+ चा धागा आपला पण असावा असे डोहाळे लागले त्याला आपण काय करणार?
तेव्हा चालु द्या!!
अरे देवा..
बरं..
त्या मूळ चर्चेच्या धाग्यातच धागालेखिकेने एक लिंक दिली आहे, चिलियाबाळाच्या कथेसाठी.
पहिल्या दहा बारा कॉमेंटस मधेच दिसेल.
असेच एक अतिथी सत्कारापोटी "शिजवलेले मूल" पैकी आहे.
(वैधानिक इशारा: प्रतीकात्मक अर्थही असू शकतो. तात्पर्यः अतिथी देवो भवः)
गहन आहे विषय पण उगीचच सूचना: फक्त तात्पर्य समजून घेतले तर गोळीबार टळेल.
'प्रसाद' या मासिकाने (प्रसाद प्रकाशन, पुणे) फार पूर्वी 'दत्त संप्रदाय विशेषांक' नावाचा व्यापक, सुंदर आणि अभ्यासकांसाठी संग्राह्य विशेषांक काढला होता. हा अंक सध्या बाजारात दुर्मीळ आहे, परंतु प्रकाशनाच्या कार्यालयात संपर्क साधून बघावा. दत्त अवधूत संप्रदायाची परंपरा-इतिहास-शिस्त-महत्त्वाची स्थळे असे खूप लेख आहेत. मी तो अंक वाचून परत केला त्याचवेळी त्याची झेरॉक्स करायला हवी होती. आता हळहळ वाटते.
अरे शिंदे शेक्रेटरी, तुमी इकडे काय थांबला भिंतीला तुंबड्या लावत?
'अरे' ह्या एकेरी उल्लेखा नंतर "तुमी" ( पक्षी : तुम्ही) हा दुहेरी उल्लेख मराठी व्याकरणात चालतो काय ? कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा. वडिलांना "अरे तुम्ही माझी गाडी घेऊन गेला होतात काय ? " असे वाक्य कर्णमधुर वाटत नाही.
फुकट (धागे) खाऊ!
मराठीच्या व्याकरणात "भाड" ला समानार्थी शब्द म्हणुन "फुकट" चालुन जाते काय ? इथेही जाणकारांच्या प्रकाशात बघायला उत्सुक आहे.
- शब्दधारा
चिडून नाय काय! :)
चिल्लर पिल्लर लोकांवर काय चिडायचे? तसे तर तुकाराम महाराजांचे पण आम्ही ऐकतो. नाठाळांचे माथी काठी घालायलाही शिकवते आमचे प्रॅक्टीकल अध्यात्म.
आता जा, कामाला लागा.
>>मग त्याच तुकाराममहाराजांचे ऐकून भल्यांना काय देता भले?>> पंगा, त्याची उठाठेव तुम्हांला कशाला? भलेपणाशी तुमचा दुरुनही संबंध असावा असे वाटत नाही. उगाच चांचौ.
आणि तुम्ही भले आहात असे गृहीत धरुन जरी तुम्हांला काही दिले तरी मुळातच तुमच्यापाशी सभ्यता वा लाज नाहीच ती झाकायचाही प्रश्न उद्भवत नाही, नाही का? असो. शहाणे असाल तर एवढे पुरेसे होईल असे वाटते.
चिलीया नाही, चिलया बाळ.
नाथपरंपरा म्हणजे बहुदा श्रीदत्तात्रेयांची शिष्यपरंपरा.
ती आदिगुरु गहिनीनाथांपासून सुरु होऊन मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ वगैरे करत करत अलीकडे निवृत्तीनाथांपर्यंत आली आहे. (जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा)
प्रतिक्रिया