Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आंतरजालीय अतिरेक्यांना पोसण्यासाठी अस्तित्वात असलेले संस्थळ : मिपा

प
परिकथेतील राजकुमार
Fri, 12/24/2010 - 07:30
🗣 72 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
16102 वाचन

💬 प्रतिसाद (72)
ध
धमाल मुलगा Fri, 12/24/2010 - 10:21 नवीन
मला हे मुद्दे पटतात. अशा अतिरेक्यांना 'सहिष्णू' आणि 'सेक्युलर' सरकारच्या गरीबपणामुळे जास्त चेव चढतो. पकडले गेलेले अतिरेकी आम्ही भरलेल्या करातून खरडबिर्याण्या आणि व्यनिरोट्या चापतात आणि आम्ही मात्र काही चूक नसताना एकदा धाग्यावर गेलो की परत जिवंत स्वगृही येऊ की नाही अशी धास्ती मनात घेऊनच वावरतो. एक गोष्ट मनापासून सांगतो, मिपा-स्पिरिट वगैरे काही नाही. रोजची पोट जाळायची..हे आपलं...वाचन करायची गरज आणि इच्छा ह्यापायी घटना घडून गेली तरी आम्ही मुर्दाड मनानं पुन्हा दुसर्‍या दिवशी सात अठ्ठावीसची फाष्ट लॉगिनलोकल पकडायला पुन्हा दादर्‍याखाली गर्दी करतोच.... सरकारने अशा अतिरेक्यांना त्यांच्याच पध्दतीने शिक्षा केली पाहिजे. भर चौकात बांधून गोळ्या मारल्या पाहिजेत..दगडांनी ठेचून काढलं पाहिजे..... सरकारने अतिरेक्यांना जनतेच्या हवाली करावं....जनताच काय तो न्याय करेल. जय हिंद जय महाराष्ट्र जय मिपा. -सामान्य नागरिक. मी मिपाचा, मिपा माझं.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 12/24/2010 - 10:48 नवीन
सुरुवात डुपलिकेट आयड्यांच्या मुखवट्यांमागच्या 'एकूणएक' खर्‍या चेहर्‍यांची नावं जाहीर करुन होऊदे. कोणाचेही नाव दडवू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
असुर Fri, 12/24/2010 - 12:24 नवीन
अगदी अगदी! हौन जाऊंदे! एकडाव तरी सर्कार्ने सामान्य जन्तेला विशवासात घिउन म्हायती ओपन करैला हविये. काळाचि गर्ज अहे ती! आज सर्कार्ने म्हाय्ती ओपनलि तर बराच है, नैतर पुढेमागे विकिलिक्सला दुसरा काय पन काम उरला नाय की ते ओपनतीलच! =)) =)) बाकी पंत आणि आत्याला आपला सप्पोर्ट हैच! ते जर आमरण उपोषण वगैरे करणार असतील तर आपणसुद्धा एकवेळचा चहा सोडायला तयार हौत! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 12/24/2010 - 12:33 नवीन
मेल्या! =)) आयजीच्या जिवावर का रे मेल्या? =)) तूच बस उपोषणाला, त्येवढंच कमी खाशील मेल्या. नाय तर नव्या दमाचे कार्यकर्ते (बिपिन नव्हेत :D ) कशे तैय्यार व्हनार? आँ? पर असं कायबी व्हनार न्हाय रं सोन्या.. गप पड आपला तू तिकडं. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
अ
असुर Fri, 12/24/2010 - 12:48 नवीन
बगा!! येवडा सप्पोर्ट दिला तरी लोक मनावर घ्येत नायत! कसं व्हायचं या देशाचं? पायजेल तर मी आमच्या मंडळाचा सप्पोर्टपण झाईर करतो. कुनीतरी असलं कायतरी क्येल्याशिवाय खर्रीखर्री म्हायती भायेर येनार नै!! =)) =)) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
परिकथेतील राजकुमार Fri, 12/24/2010 - 12:53 नवीन
माहितीच्या अधिकाराखाली काय माहिती मिळते का बघ ;) पराण्णा हजारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
अ
असुर Fri, 12/24/2010 - 13:13 नवीन
असल्या अधिकारांच्या कश्या सुरनळ्या होतात हे तुम्हापेक्षा कुणास जास्त ठाउक असेल अण्णा? याआधीच्या सुरनळ्या जपून ठेवल्या असतील तर उलगडून पहाव्यात. कचरापेटीहून अधिक मोल नाही त्यांचे अण्णा, हल्ली जमाना खरं बोलणार्‍यांचा र्‍हायला नाहीये म्हणे! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
य
यशोधरा Fri, 12/24/2010 - 12:55 नवीन
है का आत्ता! मग कर की, अगदी मरीस्तोवर उपाशी र्‍हा की लेका! ऑ? हित्तं कोनाला काय फरक बिरक पडंल आस वाट्टय का तुला? येडंच हाय! अशी ही निस्ती हूल द्याची आसतीया. समाजलं का? खरच म्हायती भायीर यायची असती आनं खरच बंदोबस्त करायचा आस्ता तर त्यो कधीच झाला असता ल्येका! जा आता. आभ्यास वाढीव जरा, मंग समजंल आनि उमजंल. जावंद्या. खरं बोलनारे वाईट असन्याचा जमाना है पोरा. आता गपचिप बस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
अ
असुर Fri, 12/24/2010 - 13:09 नवीन
खरं बोलनारे वाईट असन्याचा जमाना असल्याने गप पडलो आहे! खोटं बोलन्याची प्र्याक्टीस सुरु केल्येली आहे!! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 12/24/2010 - 13:35 नवीन
हाहाहा!!! नव्या दमाचे कार्यकर्ते तय्यार आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 12/24/2010 - 10:48 नवीन
खुलासा करणार नाही. ज्जा!
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Fri, 12/24/2010 - 10:59 नवीन
हम्म..... याल म्हनत्यात 'जान जाय पर वचन न जाय'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
प्राजक्ता पवार Fri, 12/24/2010 - 11:31 नवीन
मस्तं !
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 12/24/2010 - 11:40 नवीन
ज्या गोडबोल्या अतिरेक्यांच्या यादीत नाहीत त्यांच्यावरही पार्ट २ होऊन जाऊ दे रे परा .. न्हाईत जळुन जळुन पावशेराचे आतपाव व्हत्याल =)) हे गोडबोले अतिरेकी हल्ली मराठीचं आणि जालसंस्कृतीचं उक्तं फक्त स्वत:च्याच खांद्यावर असल्याच्या आवेशात वावरतात म्हणे :) आणि ते एकटेच मराठीचा उद्धार करत आहेत असं त्यांना वाटतं :) त्यांच्या टिर्‍र्‍या ताशाच्या काड्यांनी शेकता येतील म्हणजे =)) - (गोडबोले द्वेष्टा) टारझन
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Fri, 12/24/2010 - 11:43 नवीन
हे गोडबोले अतिरेकी हल्ली मराठीचं आणि जालसंस्कृतीचं उक्तं फक्त स्वत:च्याच खांद्यावर असल्याच्या आवेशात वावरतात म्हणे >>>> =)) हेच लिहीत होतो पान भरुन , पण चार शब्दात लिहीलस !! धन्स
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 12/24/2010 - 11:50 नवीन
खल्लास्स! युव्वर थिंकिंग इज राईट ..आय से! सुहाश्या , सुहाश्या , सुहाश्या.. (असं पण्णास वेळा म्हणायचं , ग्गोग्गो वाट्टं ) अरे तुझा हा प्रतिसाद येणारच हे माहित होतं रे वाचताना आपोआप डोळे पाणावले रे ..अंमळ बादल्या भरल्या रे .. च्यायला, ह्याला म्हणतात ग्रेट पिपल थिंक अलाईक का काय ते =)) - गोडबोले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
च
चिंतामणी Fri, 12/24/2010 - 18:42 नवीन
म्हणजे (राजकाराणात) उजवे म्हणतात ते हेच का??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 13:04 नवीन
हे गोडबोले अतिरेकी हल्ली मराठीचं आणि जालसंस्कृतीचं उक्तं फक्त स्वत:च्याच खांद्यावर असल्याच्या आवेशात वावरतात म्हणे >>>> हेच अगदी असेच... च्यायला यांच्या टेर्‍या झोडल्या पाहिजेत चिंचेच्या फोकाने..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
च
चिंतामणी Fri, 12/24/2010 - 11:44 नवीन
ह.ह.पु.वा.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Fri, 12/24/2010 - 12:34 नवीन
___/\___ धन्य आहात परासाहेब
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 12/24/2010 - 13:03 नवीन
अरेच्चा इथे मघाशी काही प्रतिसाद दिसत होते. ते आत्ता का दिसत नाहीय्येत. सरकारने त्याना पंख फोडले वाट्तं
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 13:05 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा