Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझे छळवादी.

न
नगरीनिरंजन
Fri, 12/24/2010 - 08:27
🗣 20 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4252 वाचन

💬 प्रतिसाद (20)
य
यकु Fri, 12/24/2010 - 08:41 नवीन
"फुर्र फुर्र" किंवा "मच्याक मच्याक मच्याक..".
=) ) =) ) =) ) खरंय तुमचं... मला पण भारी राग येतो असल्या आवाजकाढू लोकांचा.. तसेच ते मोबाईलवर बोलणारे... अख्ख्या गावाला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात भाषण ठोकल्यासारखे बोलत असतात.. पण त्यांची ती सवय फार जुनाट अतैव दुर्धर असते .. मग अशा जागेहून आपणच लांब जाणे बेहतर
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 08:46 नवीन
>>>जेवणाचे डबे भरलेल्या या सॅक्सनी अशा बर्‍याच डब्यांचा वास अंगात जिरवलेला असतो आणि मग मागे उभ्या असलेल्या माणसाला तो 'सु'गंधी मसाज सहन करण्यावाचून पर्याय उरत नाही.<<< कोरीयात पीक अवर्समधे मेट्रो रेल मधे चढून बघा. किंवा खच्चून भरलेल्या लिफ्ट मधे उभे रहा. लसूण ह्या प्रकाराशी जन्माची अढी बसेल. बर्याच ढेरपोट्यांनी लसणाचा वास आपापल्या पोटात जिरवला असतो. आणि तो सगळ्या सिमा शक्य असेल तिथे तोडून बाहेर येत असतो! त्या पुढे आपले देशबांधव बरेच बरे!
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 12/24/2010 - 09:10 नवीन
मस्त आणि खुश्कुशीत लेख कोरीयात पीक अवर्समधे मेट्रो रेल मधे चढून बघा. किंवा खच्चून भरलेल्या लिफ्ट मधे उभे रहा. लसूण ह्या प्रकाराशी जन्माची अढी बसेल. बर्याच ढेरपोट्यांनी लसणाचा वास आपापल्या पोटात जिरवला असतो. आणि तो सगळ्या सिमा शक्य असेल तिथे तोडून बाहेर येत असतो! त्या पुढे आपले देशबांधव बरेच बरे! आपण परदेशात राहतो हे दाखवण्याचा "क्षीण" प्रयत्न... - आतून न्हाणीघर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 10:58 नवीन
काही जळल्याचा वास आला काहो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
न
नावातकायआहे Fri, 12/24/2010 - 16:08 नवीन
मायक्रोवेव मंदला मुरवलेला लसुन आसल... ;-) आम्चा पन क्शीन प्रयत्न...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
इ
इंटरनेटस्नेही Fri, 12/24/2010 - 08:56 नवीन
वा वा चान चान! आवडलं!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 12/24/2010 - 09:08 नवीन
छोटेखानी लेखण छाण आहे. निरिक्षणे नेहमीच्या पहाण्यातली ;) अशीच वागणुक काहिंची जालावरही असते बरं :) त्यांची ती बळेच लगट करण्याची प्रवृत्ती पाहिली की किळस येते ;)
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Fri, 12/24/2010 - 09:10 नवीन
बर्‍याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही. मागून मग सतत त्यांचा वैतागवाणा स्पर्श सहन करत रांगेत एका पायावरून दुसर्‍या पायावर भार टाकत उभे राहणे नशिबी येते. दोन-तीन वेळा धक्के देउन, प्रसंगी सांगूनही पुन्हा पाच-दहा मिनिटातच अक्षरश: ये रे माझ्या मागल्या. (हा अनुभव इतक्यांदा आलाय की मागचा माणूस गे आहे की काय ही आधी आलेली शंका नंतर येईनाशी झाली.) मी मागे अश्यच एका देशबांधवच्या श्रीमुखात भडकवलेली आठवली!.. अजुन एक अशीच तिडिक आणणारी गोष्ट म्हणजे... तो मावा कि काय तो असतो ना... कि गुटखा....कि ज्याचा अत्यंत उग्र आणि घाण वास येतो.... तो गर्दीच्या ठिकाणी खाणं... वाटतं एक सण्ण्कुन कानाखाली लावावी.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Fri, 12/24/2010 - 15:53 नवीन
बर्‍याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही. परिस्थिति परमाने याच्या व्याख्या बदलत जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
स
सुहास.. Fri, 12/24/2010 - 16:24 नवीन
मी मागे अश्यच एका देशबांधवच्या श्रीमुखात भडकवलेली आठवली!.. >>>> बर झाल बाबा मी गुटखा सोडला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
ट
टारझन Fri, 12/24/2010 - 16:26 नवीन
च्यायला .. मी हे वाचुन गुटखा खायला सुरु करीन म्हणतो .. - (बॅड मॅन) गुलषण गुल्वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
य
योगी९०० Fri, 12/24/2010 - 09:50 नवीन
देशी बांधवाचे वागणे पटले.. पण परदेशी (गोरे) पण काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतात असे नाही. माझ्या ऑफिसातले काही लोकं तर रोज आंघोळ करत नाहीत. काही जण खुप जोरात नाक शिंकरतात. केवळ गोरे म्हणून त्यांच्या या गोष्टी दुर्लक्षण्यासारख्या नाहीत. हेच लोंक भारतात जर आले तर उगाच आपल्याला नावे ठेवतात...White Skin syndrome मुळे आपण त्यांचे असे वागणे चालवून घेतो का?
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 12/24/2010 - 11:47 नवीन
गोरे लोक कागदाने काम करत असल्याने आंघोळ न करता आल्यास अतिशय घाण वास मारतात असा अनुभव आहे. तेव्हा फार त्रास होतो आणि त्यांना तो सूचकपणे जाणवून देण्यात अजिबात वाईट वाटत नाही उलट झाला तर असुरी आनंदच होतो. चालवून तर शेवटी सगळ्यांचेच घ्यावे लागते पण आपल्या लोकांना कोणी वाईट म्हणू नये अशी इच्छा असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
स
सूर्यपुत्र Fri, 12/24/2010 - 12:19 नवीन
म्हणजे स्वःताच्या भारी मोबाइलची, त्यावर मोठ्ठ्याने गाणी लावून मिरवणूक काढणे... हेडसेट वापरायला काय जाते??
  • Log in or register to post comments
ए
ए.चंद्रशेखर Fri, 12/24/2010 - 12:36 नवीन
तुमचे ब्लड प्रेशर वाढले आहे वाटते? असल्या साध्या साध्या गोष्टींचा मनस्ताप व्हायला लागला की हमखास समजावे.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 12/24/2010 - 13:11 नवीन
असेल बुवा. लिहीलंय त्यातून खूप मनस्ताप झालाय, चीडचीड होतेय असं वाटतंय का? पण तसं काही नाहीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए.चंद्रशेखर
प
प्रदीप Fri, 12/24/2010 - 12:59 नवीन
बर्‍याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही. मागून मग सतत त्यांचा वैतागवाणा स्पर्श सहन करत रांगेत एका पायावरून दुसर्‍या पायावर भार टाकत उभे राहणे नशिबी येते. दोन-तीन वेळा धक्के देउन, प्रसंगी सांगूनही पुन्हा पाच-दहा मिनिटातच अक्षरश: ये रे माझ्या मागल्या. (हा अनुभव इतक्यांदा आलाय की मागचा माणूस गे आहे की काय ही आधी आलेली शंका नंतर येईनाशी झाली.) (या अनुभवामुळे स्त्रियांबद्दल मला अतीव सहनुभूति वाटते.)
अगदी १००% सहमत. ह्या सवयीचा उगम कुठून होतो ह्याचा मी थोडा विचार केला (म्हणजे 'इन मिटीगेशन ऑफ दोज ग्रायंडर्स'). तेव्हा मला असे वाटते की आपल्याकडे शिस्त मुळात नाही, आणि त्यातून कुठेही सार्वजनिक ठिकाणी जी काही थोडीफार शिस्त असेल तर ती तोडण्यात धन्यता मानली जाते. त्यामुळे एकतर शिस्तबद्ध क्यूची तशी संवय देशबांधवांना नाही, आणि जर ते क्यूमधे उभे राहिले, आणि समोरची व्यक्ति व स्वतःमध्ये थोडी जागा जरी सोडली तर तात्काळ कुणीतरी शहाणी व्यक्ति त्या मधल्या गॅपमधे येऊन उभी राहील, अशी भीति त्यांच्या मनात असावी!! काही अजून काही खास संवयी : * सार्वजनिक ठिकाणी (ऑफिसात, रेल्वेत, फेरीवर, रस्त्यावर...) आपापसात मोठमोठ्याने बोलणे. * शक्य तितका भोंगळपणा करीत रहाणे. उदा. काही कार्यक्रमासाठी हॉल एका ठराविक वेळेसाठी बुक केला आहे, हे माहिती असूनही हॉल वेळेवर खाली न करणे. तेथील कर्मचार्‍यांनी तसे सूचित करताच 'गिव्ह अस टेन मोर मिनीट्स' वगैरे अजीजी करणे. * रोखून पहाणे, विशेषतः स्त्रीयांकडे. * शक्य असेल तिथे पान खाऊन थुंकणे.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 12/25/2010 - 02:06 नवीन
अगदी बरोबर. भोंगळपणा तर भरपूर बाबतीत दिसून येतो. साधं मीटींगमध्ये स्टेटस सांगतानाही स्वतः केलेल्या कामाची अचूक माहिती न देता येणारे खूप लोक असतात आणि मग दुसर्‍याकोणी प्रश्न, शंका विचारली की लगेच अहं दुखावला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 12/24/2010 - 15:50 नवीन
खरंच छळवादीपणा असतो हा सगळा!
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 12/24/2010 - 23:50 नवीन
सॅकधारींच्या वर्णनावरून चार्ली चाप्लीनचं खांद्यावर मोठी शिडी घेऊन चालणं, वळणं आठवलं. बाकी प्रत्येकच समाजाच्या काही इतरांना विचित्र वाटणाऱ्या पद्धती असतात. तेव्हा आपल्या सवयी सुधारता आल्या नाहीत तरी किमानपक्षी इतरांना सरसकट शिव्या तरी कमी द्याव्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा