कोडे
💬 प्रतिसाद
(119)
N
Nile
Tue, 12/28/2010 - 01:53
नवीन
कोड्यात विसंगती आहे! ;-)
विचार करतो आहे.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 02:05
नवीन
:)
- Log in or register to post comments
प
पंगा
Tue, 12/28/2010 - 02:23
नवीन
१. आणि २. मधील आकडे गावकर्यांना माहीत आहेत का?
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 02:24
नवीन
हे आकडे माहीत नाहीत. हे सांगायला मी विसरले होते. :)
- Log in or register to post comments
P
Pain
Tue, 12/28/2010 - 03:02
नवीन
जमातीवर काही परिणाम होणार नाही.
------------------------------------------
१) लोक रंगांधळे आहेत किंवा नाहीत हे स्पष्ट केलेले नाही. अपूर्ण माहिती.
---------------------------------------------
२) परदेशी माणसावरील परिणाम: त्याला गावाचे नियम लागू आहेत का ? असल्यास कळणे आणि आधीपासून माहिती असणे यातला फरक मान्य केला जाईल का?
(पिंगटला पिंगा म्हणतात ही नवीन माहिती कळली.)
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 03:09
नवीन
वरील उत्तर चूकीचे वाटते.
लोक रंगांधळे नाहीत.
परदेशी माणूस परदेशी आहे आणि असे धरू यात आभार प्रदर्शनानंतर तो तेथून तत्काळ एकही शब्द न बोलता निघून गेला. मी याबद्दल अधिक माहीती वाचली नाही.
पिंगा रंग हा शब्दप्रयोग मी ऐकला आहे.
___________________________
आपले स्पष्टीकरण ऐकायला आवडेल की का परीणाम होणार नाही?
- Log in or register to post comments
P
Pain
Tue, 12/28/2010 - 04:01
नवीन
जर एखाद्याला त्याच्या स्वतःच्या डोळ्यांचा रंग कळलाच तर त्याला दुसर्या दिवशी दुपारी , सर्वांसमक्ष मृत्यूदंड ठोठविण्यात येतो
या एका नियमासंदर्भात:
प्रत्येकाने त्याला दिसणार्या व्यक्तींची विभागणी आणि मोजणी पूर्ण केली आहे असे मानू.
कुठल्याही एका पिंग्या व्यक्तीने ९९ पिंगे आणि ९०० काळे पाहिलेले आहेत.
कुठल्याही एका काळ्या व्यक्तीने १०० पिंगे आणि ८९९ काळे पाहिलेले आहेत.
ते स्वत: आपल्या डोळ्यांचा रंग तपासू शकत नाहीत आणि कोणा दुसर्याकडून माहिती करून घेउ शकत नाहीत. तसेच प्रत्येकाला दोन्ही प्रकारच्या डोळ्यांचे किती लोक दिसले असा एकत्रित डाटाबेसही तयार केलेला नाही (नियम ४ भाग ३), नाहीतर त्यावरून सगळ्यांनाच काय ते कळले असते. टेलीपथी किंवा तसेही काही नाही असे मानू.
आता परदेशी व्यक्तीने जे अर्धसत्य व्यक्त केले (की एक व्यक्ती पिंग्या डोळ्याची आहे), ते लोकांना माहिती ( आपल्यापैकी काही लोक पिंग्या डोळ्याचे आहेत) आधीपासून आहेच. त्यामुळे जर काही फरक पडला नसेल तर परदेशी व्यक्तीने तसे सांगूनही तो पडणार नाही.
-----------------------------------
नियम ८: परदेशी व्यक्ती खरे बोलते यावर गावकर्यांचा विश्वास आहे आणि तूर्तास आम्हीही ठेवला आहे. तसे नसेल तर सगळे बदलेल. लोक खोटे बोलणार्यांवरही विश्वास ठेवतात.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 04:09
नवीन
पेन सामान्य लोकांना या अर्धसत्याचा उपयोग करता आला नसता पण या लोकांची तर्काची बाजू खूप भक्कम आहे आणि तर्काच्या एका पद्धतीचा वापर करून हे लोक एका ठोस कनक्लुजनवर पोहोचणार आहेत.
कसे ते मी सांगेनच.
- Log in or register to post comments
प
पंगा
Tue, 12/28/2010 - 03:22
नवीन
...प्रथमदर्शनी माझीही होत आहे, पण अजून खात्री नाही. विचार चालू आहे.
कायदा परदेशी व्यक्तीसही लागू असेल, तर त्याचे दिवस भरले. त्याच्या वाक्यातून इतर कोणाला स्वतःच्या डोळ्याच्या रंगाबद्दल क्लू मिळतो की नाही, यावर विचार करत आहे. अजून तरी असे काही सापडले नाही. पण असू शकेल. पण तरीही, कायदा माहीत असूनही तर्क लढवण्याचा मूर्खपणा कोण करेल, कळत नाही. अर्थात, असा तर्क कोणासतरी लढवता येण्याची शक्यता आहे असा क्लू जरी कोणाला मिळाला, तरी खेळ खल्लास होणार असेल, तर मात्र कठीण आहे. विचार करावा लागेल.
मात्र गावात २०० पिंगेमंडळी असताना श्री. परदेशी यांना असा एक माणूस आहे याचा अचंबा का वाटावा? कदाचित यात काही क्लू असू शकेल काय?
दुसरे म्हणजे, अनुवांशिकतेच्या नियमांबद्दल गावकर्यांना कितपत कल्पना आहे? तशी असल्यास, श्री. परदेशी यांनी काहीही न बोलतासुद्धा अनेकांना मृत्युदंड होऊ शकणार नाही का?
असो. कोड्यावर विचार करीत आहे.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 03:29
नवीन
१०० पिंगेमंडळी आहेत. अनुवंशिकतेचा संबंध नाही.
असा कोठेही उल्लेख नाही पण कदाचित तो परदेशी फक्त एका पिंग्याला भेटला असेल. कोणी सांगावं?
- Log in or register to post comments
ग
गोगोल
Tue, 12/28/2010 - 04:21
नवीन
तुम्ही!!
(८) एकदा एक परदेशी या गावात येतो आणि या जमातीचा संपूर्ण विश्वास प्राप्त करतो.
डिफाइन "या जमातीचा संपूर्ण विश्वास प्राप्त करतो." कसा?
किती लोकांना भेटून?
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 04:52
नवीन
कोड्यात एवढाच उल्लेख आहे की हा परदेशी विश्वास संपादीत करतो. कसा वगैरे ह्या गोष्टी गौण आहेत. आउट ऑफ स्कोप.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Tue, 12/28/2010 - 03:33
नवीन
या घटनेनंतर गावातल्या प्रत्येकाला आपल्या डोळ्यांचा रंग कळेल. धार्मिक प्रथेप्रमाणे डोळ्यांच्या रंगाबद्दल बोलणे वर्ज्य असले तरी "तो माणूस जे बोलला ते मला लागू होते का?" असे विचारण्यास प्रत्यवाय नसावा असे मला वाटते.
धार्मिक नियमांतून सोयीप्रमाणे पळवाट काढणे हे सार्वत्रिक आहेच.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 03:36
नवीन
कारण ते इन्डायरेक्टली डोळ्याच्या रंगाविषयी बोलणे झाले. ते उत्तर नाही आहे.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 04:20
नवीन
जर कोणी दिलं नाही तर, उत्तर उद्या सकाळी देते. गुड नाईट.
- Log in or register to post comments
ग
गोगोल
Tue, 12/28/2010 - 04:22
नवीन
ही परदेशी व्यक्ती स्वयंभू आहे का?
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Tue, 12/28/2010 - 04:23
नवीन
शुचि,
समजा मी काळ्या ( किंवा कुठल्याही ) डोळ्यांचा असेन पण मला गावातले पिगट आणि काळ्या अश्या दोन्ह्यी प्रकारच्या डोळ्यांचे लोक दिसतच असतील. त्यामुळे असे दोन प्रकारचे डोळ्यांचे रंग आहेत हे मला माहीत असेल. शिवाय हे ही माहीत असेल की काळ्या डोळ्यांचे लोक जास्त प्रमाणात आहेत. फक्त मला हे माहीत नसेल की माझ्या डोळ्यांचा रंग कोणता आहे. त्यामुळे त्या पाहुण्याच्या बोलण्याचे मला विशेष नवल वाटणार नाही. हाच प्रकार प्रत्येक गावकर्याला लागू होईल.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 04:54
नवीन
स्वानंद मला जरी काळे आणि पिंगे एवढेच लोक दिसत असले तरी मी ही शक्यता नाकारू शकतच नाही की माझ्या डोळ्यांचा रंग हिरवा, घारा, नीळा असू शकेल.
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Tue, 12/28/2010 - 05:02
नवीन
ती शक्यता तर तो पाहुणा गावात येऊन ते वाक्य बोलण्या आधीही होतीच की.
- Log in or register to post comments
ग
गोगोल
Tue, 12/28/2010 - 04:36
नवीन
पाहून मला खूप आश्चर्य वाटलं"
एक उत्तर:
या परदेशी व्यक्तीला इतक्या साध्या गोष्टीच आश्चर्य वाटल हे पाहुन सगळी तर्कशुद्ध लोक (पहा नियम ६: त्यांना स्वत: च्या डोळ्यांचा रांग माहीत नसला तरी इतक अनुमान काढता येत की या गावात दोन्ही डोळ्यांची लोक आहेत) अचंबित होतात. परदेशी लोकांना तर्क शिकवायची आत्यनतिक गरज असल्याच्या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचतात. सगळे लोक आपला गाव सोडून परदेशी निघून जातात आणि तेथे बाकी लोकांना तर्क शिकवतात. गावात कोणीच न राहिल्यामुळे तेथील घरांची पडझड होते. काही वर्षांनी ते गाव नामशेष होते. वाढत्या शहरीकरणामुळे शहराच्या सीमा त्या गावाला येऊन भिडतात लवकरच तेथे एक टुमदार अपार्टमेंट कॉंप्लेक्स उभ राहत. काही वर्षांनी तिथे आयटी मधील एम्प्लोई आणि त्यांचे पाहुणे राहू लागतात. अश् प्रकारे आता त्या जागेवर पिंगे, काळे, हिरवे, निळे, करडे अश्या अनेक प्रकारचे डोळे असलेल्या व्यक्ती राहू लागतात.
सांगा मी काय जिंकल ते?
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 04:57
नवीन
पण उत्तर चूक आहे.
- Log in or register to post comments
ग
गोगोल
Tue, 12/28/2010 - 05:01
नवीन
हाउ अबाउट धिसः १०१ व्या दीवशी, फक्त एकच माणूस जिवंत राहील?
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 05:12
नवीन
उत्तर चूक आहे.
तुमचं स्पष्टीकरण काय?
- Log in or register to post comments
ग
गोगोल
Tue, 12/28/2010 - 05:07
नवीन
बरोब्बर एका वर्षानी गावातील ८९९ काळ्या डोळ्यांची लोक मरतील.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 05:13
नवीन
स्पष्टीकरण?
उत्तर चूक आहे.
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 12/28/2010 - 05:27
नवीन
गहन विचार प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी प्राथमिक मत :
१) शिक्षेचा (दुसर्या दिवशी दुपारी मृत्युदंड) उल्लेख खूप स्पेसिफिक केलाय. त्यामुळे अनेक मृत्युदंड हा उत्तराचा भाग असण्याची शक्यता आहे. (नाटकाच्या नियमानुसार पहिल्या अंकात भिंतीवर बंदूक दाखवली की तिसर्या अंकात तिचा बार उडालाच पाहिजे. - इति पु.ल. आणि शि. क.)
२) तर्काची बाजू भक्कम असणे याचा शुचिताईंना अभिप्रेत असलेला अर्थ असा असावा:
कोणीही काहीही लाईटली घेणार नाही, म्हणजेच कायदा, मृत्युदंडाची शिक्षा, परदेसीबाबूचं बोलणं, त्याचा कायदेशीर अर्थ, इत्यादि बाबतीत हे सर्व लोक अगदी मेटिक्युलसली लीगल आणि कडक आहेत (अॅड. उज्ज्वल निकमजी)
आता पुढे विचार करावा. ह्म्म.. तेवढ्यात कोणीतरी उत्तर दिले की फुस्स.
उत्सुकता वाढवणारं आणि डोक्याला खुराक कोडं.. धन्यवाद शुचि.
- Log in or register to post comments
ग
गोगोल
Tue, 12/28/2010 - 05:30
नवीन
पण मला भीती वाटतीय की त्यांनी अनुवाद करताना महत्वाचा नियम चुकीचा तर अनुवादित केला नाहीये ना?
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 11:44
नवीन
तर्काची बाजू पक्की आहे म्हटले आहे कारण हा प्रॉब्लेम गावकर्यांनी गणितातील एक पद्धत वापरून सोडविला आहे.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 12/28/2010 - 05:36
नवीन
उत्तर - काहीच परिणाम होणार नाही.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Tue, 12/28/2010 - 05:42
नवीन
नियम फक्त गावातल्या लोकांसाठी असेल तर परदेशी माणसाला शिक्षा वगरै नाही.
लोक दुर्लक्ष करतील.
कारण, मृत्युदण्डाच्या भितीनी गावातले पिंगे/काळे कुणीही, सरपंच वगरै सुद्धा या विषयावर बोलु धजवणार नाहीत.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 11:31
नवीन
माउ परदेशी माणसाला शिक्षा नाहीच आहे पण त्याने दिलेल्या माहीतीचा गावातल्या जमातीवर काय परीणम झाला हा प्रश्न आहे.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 12/28/2010 - 06:42
नवीन
शुचि मामी तुझा उपक्रमावर आयडी आहे काय गो ? नसेल तर उघडून घे.
अवांतर :- च्यायला आधिचीच शुचि बरी होती.
आता कोणितरी 'जोडे' नावाचे विडंबन घेउन येईलच ;)
- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 12/28/2010 - 10:49
नवीन
भावनांना वाट करुन दिल्याबद्दल परिकथेतील राजकुमारांचे द्धन्यवाद :)
त्यांनीच "जोडे" लिहीण्याचे शिवधणुक्ष पेलावे अशी मी त्यांना जाहिर विणंती करतो
- Log in or register to post comments
व
वेताळ
Tue, 12/28/2010 - 06:55
नवीन
त्यानंतर ती जमात सर्व रंगाच्या डोळ्याची लोकसंख्या कशी व्यवस्थित वाढवता येईल ह्या करिता त्या परदेशी व्यक्तीची मदत घेईल.
तसेच डोळ्याचे रंग न कळण्याकरिता काळे चश्मे वापरण्यास सुरुवात करतील.
- Log in or register to post comments
N
Nile
Tue, 12/28/2010 - 07:08
नवीन
दोन शक्यता आहेत.
१. सर्व लोकांना डोळ्यांचा रंग कळतो आणि ते आत्महत्या करतात.
२. काही फरक पडत नाही कारण लोकांना इतरांच्या डोळ्याचे रंग माहित असतातच.
आधी २ चे स्पष्टीकरण पाहु.
जोपर्यंत प्रवासी स्पष्ट पणे सांगत नाही कीती लोक पिंग्या डोळ्यांचे आहेत तो पर्यंत अडचण नाही. कारण २०० लोक पिंगा डोळ्यांचे आहेत (हे काळ्या डोळ्यांच्यांना माहित आहे)किंवा १९९ पिंग्या डोळ्यांचे आहेत (हे पिंग्यांना माहित आहे). त्यामुळे कोणीतरी पिंग्या डोळ्यांचा आहे हे सत्य सर्वांनाच माहित होते. परदेशी प्रवाश्याने कुठलीही नवी माहिती दिली नाही.
पण हे उत्तर ट्रिव्हिअल आहे (म्हणुनच दोन क्रमांकावर दिले). त्यामुळे उत्तर १ बरोबर असेल असे मला वाटते. का हे विचार करुन सांगतो.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 11:37
नवीन
नाही सर्वांना कळत नाही.
मी आता हिंट दिली आहे हा शब्द अधोरेखीत करून.
- Log in or register to post comments
U
utkarsh shah
Tue, 12/28/2010 - 07:14
नवीन
जर एखाद्याला त्याच्या स्वतःच्या डोळ्यांचा रंग कळलाच तर त्याला दुसर्या दिवशी दुपारी , सर्वांसमक्ष मृत्यूदंड ठोठविण्यात येतो
"मित्रांनो माझ्यासारखी पिंग्या डोळ्याची व्यक्ती तुमच्या गावात पाहून मला खूप आश्चर्य वाटलं"
वरील २ वाक्यांवरुन हाच निष्कर्ष निघतो की, परदेशी व्यक्तिला स्वतःच्या डोळ्यांचा रंग कळला.म्हणुन त्याला मृत्यूदंड ही शिक्षा मिळेल.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 11:41
नवीन
उत्कर्ष प्रश्न हा आहे की या एका वाक्याचा "जमातीवर" काय परीणाम होईल?
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Tue, 12/28/2010 - 11:54
नवीन
शुचिताई मूळ कोडं, अनुवाद न करता देउ शकाल काय. म्हणजे जसंच्या तसं नसलं तरी, मला वाटतं की अनुवाद करताना काही तरी राहुन गेलं आहे.
अवांतर - त्या परदेशी माणसाचा पुतळा बसवावा काय,म्हणजे उद्या त्याच्या किरकोळ चुकीचा परिणाम लक्षात आल्यावर तो हलवता येईल.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 15:03
नवीन
There is an island upon which a tribe resides. The tribe consists of 1000 people, with various eye colours. Yet, their religion forbids them to know their own eye color, or even to discuss the topic; thus, each resident can (and does) see the eye colors of all other residents, but has no way of discovering his or her own (there are no reflective surfaces). If a tribesperson does discover his or her own eye color, then their religion compels them to commit ritual suicide at noon the following day in the village square for all to witness. All the tribespeople are highly logical and devout, and they all know that each other is also highly logical and devout (and they all know that they all know that each other is highly logical and devout, and so forth).
[Added, Feb 15: for the purposes of this logic puzzle, "highly logical" means that any conclusion that can logically deduced from the information and observations available to an islander, will automatically be known to that islander.]
Of the 1000 islanders, it turns out that 100 of them have blue eyes and 900 of them have brown eyes, although the islanders are not initially aware of these statistics (each of them can of course only see 999 of the 1000 tribespeople).
One day, a blue-eyed foreigner visits to the island and wins the complete trust of the tribe.
One evening, he addresses the entire tribe to thank them for their hospitality.
However, not knowing the customs, the foreigner makes the mistake of mentioning eye color in his address, remarking “how unusual it is to see another blue-eyed person like myself in this region of the world”.
What effect, if anything, does this faux pas have on the tribe?
दुवा येथून साभार
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Tue, 12/28/2010 - 20:40
नवीन
त्यातील दुसरा युक्तिवाद (इन्डक्शन = विगमन असलेला) चुकलेला आहे. इन्डक्शनचे तर्क पूर्ण झालेले नाहीत.
(इन्डक्शन करण्यासाठी n=१ साठी सिद्धता किंवा स्वयंस्पष्टता दाखवावी लागते. मग "जर nसाठी सिद्ध तर n+१ साठी सिद्ध" असा तर्क दाखवावा लागतो. येथे n=१ साठी सिद्धता किंवा स्वयंस्पष्टता दाखवलेली नाही. म्हणून इन्डकशन चुकते.)
तसेच "हायर लॉजिक" ब्लॉगवरती दिलेल्या स्पष्टीकरणात "मॉर्ट आणि बॉब" सिद्धता चुकलेली आहे.
दुव्यावरील पहिला युक्तिवाद ठीक आहे. तो येथे लोकांनी दिलेलाच आहे.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 21:07
नवीन
धनंजय इन्ड्क्शन ची व्याख्या आपण अचूक केलीत.
न=१ करता,
पिंगा=१ असेल तर तो सर्व काळे पाहील आणि त्याला कळून चुकेल की अरे मीच ज्याच्याबद्दल परदेशी बोलला. आणि दुसर्या दिवशी तो आत्महत्या करेल. तेव्हा १ करता हा सिद्धांत बरोबर आहे.
मॉर्ट आणि बॉब करता देखील बरोबर्च आहे.
मॉर्ट हा बॉब ला पहातो आनो तो विचार करतो दुसर्या दिवशी बॉब येऊन आत्महत्या करेल. पण बॉब करत नाही त्यावरून मॉर्ट अनुमान काढतो की अजून एक पिंगा आहे. तो कोण तर मीच कारण इतर काळे आहेत. सेम हॅपन्स विथ बॉब टू.
तीसर्या दिवशी मॉर्ट आणि बॉब आत्महत्या करतात.
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Tue, 12/28/2010 - 21:22
नवीन
खाली आणखी एक चुकलेल्या इन्डक्शनचे उदाहरण दिलेले आहे. कदाचित त्यावरून येथील इन्डक्शनमधली चूक लक्षात येऊ शकेल.
पुन्हा विचार करा : येथे १०१ दिवसांचे काय देणेघेणे? कोड्यात "दिवस" या काल-एककाचा उल्लेख नाही. १०१ सेकंदांत हेच होऊ शकत नाही काय? तर्क हा काल-एककाच्या पलीकडचा आहे. यावरूनसुद्धा काहीतरी चुकलेले आहे, हे दिसते खास.
येथे इन्डक्शनसाठी "इनिशियल कंडिशन" अशी नाही की फक्त एक व्यक्ती पिंगी आहे. येथे इनिशियल कंडिशन आहे, की एकापेक्षा अधिक व्यक्ती पिंग्या आहेत. n=१ म्हणजे एकच पिंगी व्यक्ती नव्हे, तर "शंभरांपैकी विचार करणारा पहिला".
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 21:43
नवीन
धन्यवाद धनंजय. :) मला पहील्यांदा पटलं पण ....
पण परत एकदा विचार करता -
समजा २ पिंगे आहेत (राम आणि शाम) मी राम आहे तर मी नक्कीच १ दिवस थांबणार ना धनंजय? कारण दुसर्या दिवशीच फासावर देणार त्याला.
पण दुसरा दिवस उजाडल्यावर जर कोणी फासावर गेलं नाही तर मला कळणार की अरे अजून कोणीतरी आहे....... इथे दिवस हे युनिट येते आहे.
- Log in or register to post comments
N
Nile
Tue, 12/28/2010 - 22:31
नवीन
हे कोडे ज्या मुळ कोड्यावर आधारीत आहे त्यात निळ्या डोळ्यांच्या लोकांना संध्याकाळी गाव सोडुन जावे लागते. म्हणजेच एक ठराविक वेळ आहे ज्यावेळी निर्णय होतो. म्हणुनच मी तुम्हाला कोणत्या वेळी हे ठरणार हे विचारत होतो. पण मला कोडे माहित असल्याने तो मुद्दा महत्त्वाचा नाही म्हणुन (किंवा दिवसाच्या कुठल्यातरी वेळी हा निर्णय होतो असे मानुन) पुढे जाता येते.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 22:34
नवीन
पण दुसर्या दिवशी दुपारी मृत्यूदंड ठोठावतातच की या कोड्यात्देखील.
- Log in or register to post comments
N
Nile
Tue, 12/28/2010 - 22:41
नवीन
अरे हो, ते नजरेतुन सुटले होते :(. धनंजयांचा मुद्दा वेगळा असावा मग?
(त्यांचा मुद्दा न=१ पासुन सुरु करणेच चुक आहे असा आहे का?)
बाकी एक शंका मात्र अजुनही सुटली नाही. (पुर्वी व्यक्त केलेलीच)
समजा चार पिंगे असतील, तर तुमच्या तर्काप्रमाणे पहिल्या तीन दिवशी कोणीही पुढे येणार नाही चौथ्या दिवशी चारही पिंगे पुढे येतील. इथे असे गृहित धरले आहे की फक्त पिंगे डोळे असलेली व्यक्तीच असा विचार करेल की अरे कोणीच पुढे येत नाही म्हणजे मीही पिंगाच आहे? पन असा विचार एखादी काळ्या डोळ्याची व्यक्तीही करु शकते ह्या शक्यतेचे निर्मुलन कसे झाले हे मला स्पष्ट झालेले नाही.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 22:44
नवीन
काळ्याला चारी पिंगे दिसत असतील :) तो वाट पहात राहील ते बाहेर येण्याची.
- Log in or register to post comments
N
Nile
Tue, 12/28/2010 - 22:49
नवीन
हो पण चारच पिंगे आहेत हे ज्ञान त्याला नाही. त्याच बरोबर पिंग्यांना तीन पिंगे दिसत आहेतच.
म्हणजे, चार पिंगे दिसत आहेत त्यामुळे आपणच पिंगे असु अशी शंका पाचव्याला (पिंगा वा काळा) पाचव्याच दिवशी येईल हे काही तर्कात बसत नाही, गणितात ठिक आहे, पण इथे विचार मॅथेमॅटीकल इंडक्शनप्रमाणेच लोकांच्या डोक्यात येईल हे काही पटत नाही.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/28/2010 - 23:18
नवीन
>> हो पण चारच पिंगे आहेत हे ज्ञान त्याला नाही>>
पण त्याला हे माहीत आहे की जास्तीत जास्त ५ पिंगे असतील (= तो स्वतः धरून). मग तो थोडा धास्तावणारा चिंताळू काळा असेल तर ची केस घेऊ यात
४ पिंगे आहेत (अ, ब, क, ड).
मी चिंताळू काळी आहे. मला धास्ती वाटतेय आपण काळे आहोत की पिंगे.पहीला दिवस भाकड गेला. दुसरा, तिसरा तसेच गेले.
चवथ्या दिवशी मी म्हटलं आज जर अ, ब, क ड वधस्तंभावर आले नाहीत तर उद्या मी सूळावर जाणार :(
पण ते आले कारण माझे डोळे काळे असल्याने अ,ब,क,ड ला प्रत्येकाला साक्षात्कार झाला की चवथा माणूस तो स्वतःच पिंगा आहे.
मी सुटले. हुश्श!!
____________________________________________
असा अत्यंत लॉजीकल विचार हे लोक करू शकतात हे गृहीतक आहे नाईल .
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »