भजाची आमटी---
💬 प्रतिसाद
(10)
न
निवेदिता-ताई
गुरुवार, 12/30/2010 - 14:02
नवीन
कॄती:- प्रथम बेसन पिठात फक्त मिठ घालून सरसरीत भजाचे पिठ भिजवुन घ्यावे,
त्याची छोटी छोटी भजी तळून घ्यावीत
आता कढईतील जास्त तेल काढून ठेवावे, फक्त फोडणीपुरते तेल त्यात ठेवावे,
मोहरी-जिरे , हिंग, हळद घालून खमंग फोडणी करा त्यात लसुण, मिरची, जिरे,ओले खोबरे पेस्ट चांगली परतून घ्या, आता त्यात चार पाच वाट्या पाणी घाला, चांगले उकळू द्या, गुळ,मिठ घाला चवीनुसार,
आमसुले टाका, परत चांगले उकळू द्या, आता त्यात तळलेली भजी घाला, कोथिंबीर घाला, जर आमटी पातळ वाटली तर थोडेसे बेसन पिठ कालवून आमटीला लावा.
गरम गरम भजाची आमटी तय्यार.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/30/2010 - 14:21
नवीन
येवढ्या सुंदर चकण्याचे (तेही ३१ च्या आदल्या रात्री) केलेले वाटोळे आवडले नाही.
निवेदितातैचा णिषेध ! आणि हि पाकृ ह्या आठवड्याला न छापण्याबद्दल सम्राटला कळवले आहे ;)
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
गुरुवार, 12/30/2010 - 15:16
नवीन
परा---तु़झ्यासाठी थोडी भजी आमटीत न घालता बाजूला ठेवली आहेत.
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 12/30/2010 - 14:23
नवीन
करून बघीतली पाहीजे.
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 12/30/2010 - 14:32
नवीन
निवेदिता ताया.... ह्या बरोबर मला गरम गरम भात पण वाढ ना ;).
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 12/30/2010 - 14:59
नवीन
बरेच दिवसानी आणि सोपी पाकृ दिलीस. करून बघायलाच पाहिजे.
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
गुरुवार, 12/30/2010 - 18:51
नवीन
छान्,मस्तच
- Log in or register to post comments
स
सुहास..
गुरुवार, 12/30/2010 - 18:55
नवीन
अरे , सुग्रण-भगीणी मंडळाच्या कार्यकर्तींनो ,
जरा दम घ्या की !!
- Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे
Fri, 12/31/2010 - 06:38
नवीन
याला गोळ्याची आमटी म्हणतात ना ?
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 12/31/2010 - 07:51
नवीन
नाही. गोळ्याच्या आमटीत वाटलेल्या डाळीचे गोळे न तळता आमटीत घालून उकळी काढतात .
- Log in or register to post comments