कलादालन
देवप्रयागला भेट
Primary tabs
अलिकडे कंपनीच्या कामानिमित्त हरिद्वार ला दिडेक महीने होतो.
एका रवीवारी वेळ मिळाल्यावर देवप्रयागला फेरी मारली.
येथे बद्रिनाथ जवळून येणारी अलकनंदा व गोमुखहून येणारी भागीरथी चा संगम आहे.
येथून पुढे हि नदी गंगा म्हणून ओळखली जाते.
ह्रिषीकेश पासुन ८० कि.मी. तर हरिद्वार पासुन ११० कि.मी. वर असलेले शांत व सुंदर ठीकाण.
त्याची काही चित्रे.
अलकनंदा (डा) व भागीरथी (उ) संगम. येथून पुढे हि नदी गंगा म्हणून ओळखली जाते.
गंगेवरच्या राफ्टिंग कँप साईट्सः
हिमालयातले धडकी भरवणारे रस्ते. रौद्रभीषण गंगा येथून शांत वाटत आहे
शांत वाटणारी परंतु भोवर्यांनी भरलेली अलकनंदा. स्थानीक पट्टीचे पोहणारे ही भागीरथीच्या बाजूने पाण्यात उड्या मारतात.
अलकनंदेच्या वाटेला गेलेला जर भोवर्यात अडकला तर सहसा वाचत नाही असे स्थानीक सांगतात.
प्रचंड थंड व अतीवेगवान पाण्यातही जीवन आहे. भावीकांनी अर्पिलेला प्रसाद खाण्यासाठी घुटमळणारे मासे.
११० कि.मी. प्रवासाला ४ तास लागतात. अंमळ पाय मोकळे करणारे अस्मादीक व सहकारी
हिमालयातले वळणावळणाचे, उंचावरचे व बिन कठड्याचे रस्ते:
ह्रिषिकेशचे विहंगम दृश्य
उरलेले फोटो खालील लिंक वरून पहाता येतीलः
http://www.flickr.com/photos/23049638@N07/sets/72157625601572661/
फारच छान दर्शन झाले देवप्रयाग, अलकनंदा आणि भागीरथीचे.
फोटो २,३,४ मधे दोन्ही नद्यांच्या पात्रातील पाण्याचा वेगवेगळा रंग स्पष्ट दिसत आहे.
अलकनंदा तीच्या उअगमापासुन आकाशी निळी, तर भागीरथी मातकट आहे.
भागीरथीच्या उगमाजवळ म्हणजे गोमुखला जरी आंघोळ केली तरी, शरीरावर वाळू चिकटलेली दिसते.
(हिमालयाच्या ठीकाणी पूर्वी समुद्र होता असे म्हणतात).
अलकनंदेचा रंग किंचीत गडद दिसतो, तो मंदाकिनी मुळे.
देवप्रयागला येण्यापूर्वी रुद्र्प्रयागला मंदाकीनी व अलकनंदेचा संगम आहे.
मंदाकीनी हि गर्द हिरवी तर अलकनंदा आकाशी निळी.
रुद्रप्रयागला ही मनोहारी दृश्य दिसते. दोन्ही नद्या बराच काळ समांतर वाहतात असे वाटते. आणी मग पाण्याचा रंग हा त्यांच्यापैकी मोठ्या नदी सारखा होतो.
मस्त फोटो. इथे टाकल्याबद्दल धन्यवाद.
वा, फारच सुंदर !!! :)
आलेत फोटो मालक.
चिंतामणी, यशोधरा, मदनबाण व विलासराव, प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद!
मस्तं फोटो आहेत, हा धागा बघायचाच राहून गेला होता.
मन एकदम ताज तवानं झाल फोटो बघून, धन्यवाद.
मला जावंसं तर वाटेल पण कधी प्रत्यक्षात जाणं होणार नाही अशा ठिकाणाचं फोटोतून दर्शन घडवल्याबद्दल अनेक धन्यवाद!!
फोटो एकदम मस्त आले आहेत. लगेच जावेसे वाटले.
वरून शांत असलेल्या भूभागातील अंतर्गत हालचालीत कितीतरी गोष्टी लाखो वर्षे घडत आल्या आहेत आणि घडत रहाणार आहेत, ज्यातून समुद्र लोपून हिमालय झाला अथवा उद्या नेपाळ लोपून जाणार, हे लक्षात घेतले तर आश्चर्यकारक इतकेच म्हणावेसे वाटते.
मी ह्या स्थानाच्या जवळपासच्या भागात फिरले आहे बर्याच वर्षांपूर्वी.... खूप तर्हेतर्हेच्या आठवणी आहेत. तुम्ही काढलेले फोटो पाहून त्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद! :-)
खूप आवडले फोटो.
अतिशय सुरेख!! मनमोहक फोटो आहेत.
फोटोज आवडले.
फोटो अन वर्णन दोन्ही छान. आवडले. धन्यवाद.