Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी चित्रपट - एकंदरीत साधकबाधक चर्चा..

व
विसोबा खेचर
Mon, 01/03/2011 - 08:03
🗣 107 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
36825 वाचन

💬 प्रतिसाद (107)
व
विसोबा खेचर Mon, 01/03/2011 - 08:09 नवीन
बाबूजींचं संगीत असलेला सुवासिनी, जगाच्या पाठीवर आणि हृदयनाथ मंगेशकारांचें संगीत असलेला उंबरठा व जैत रे जैत हे दोन चित्रपट, म्हणजे मराठी चित्रसंगीताच्या दुनियेतले सर्वोच्च क्षण हे माझं वैयक्तिक मत.. इतरांचीही मतं वाचायला आवडतील.. तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 01/03/2011 - 08:13 नवीन
ध्यासपर्व पाहिला नाही, हरिश्चंद्राची फॅक्टरी पाहिला पण भावला नाही. एका महान कार्याची ओळख करुन देणारा चित्रपट त्यातील नायकाच्या विविध बदलत्या भावावस्थेला न्याय देऊ शकला नाही. जुने काही मराठी चित्रपट बरे होते पण त्यापेक्षा हिंदी चित्रपट किंवा आंग्ल चित्रपट पहाणे मी ठीक मानतो. इतर भाषा मला समजत नाहीत, सबटायटल्स वाचुन चित्रपट समजुन घेणे मला जमत नाही. जुनी मराठी गाणी हा अमुल्य ठेवा आहे. मात्र बरेचसे मराठी चित्रपट पहाणे हा जन्मठेपेपेक्षा भयानक अनुभव असतो असे मी स्वत: मराठी असुन आणि माझी मातृभाषा मराठी असुनही मत आहे. एकही मराठी चित्रपट कालातीत किंवा सुरेख, परिपुर्ण, बेस्ट या लायकीचा नाही. अवांतर - मी चित्रपट क्षेत्राशी संबंधित नसल्याने आणि त्यात कधी जाईल अशी शक्यता नसल्याने उगाचच मग तुम्ही तरी दा़खवा करुन चांगला चित्रपट ! असल्या विचारजंती प्रतिक्रिया देऊ नये. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 01/03/2011 - 08:17 नवीन
ध्यासपर्व पाहिला नाही,
अवश्य पाहा.. मला तरी खूप आवडला होता हा सिनेमा..
एकही मराठी चित्रपट कालातीत किंवा सुरेख, परिपुर्ण, बेस्ट या लायकीचा नाही.
अपवाद म्हणून नावे घ्यायची झाली तर जब्बारच्या सिंहासन या चित्रपटाचे नांव आत्ता तरी चटकन आठवत आहे.. असो.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
प्रचेतस Mon, 01/03/2011 - 08:31 नवीन
जब्बार पटेलांचाच 'सामना'ही सर्वोत्तमच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
न
निनाद मुक्काम … Mon, 01/03/2011 - 08:34 नवीन
माझे आजोबा व त्यांचे जेष्ठ भाऊ कर्व्यांचे खंदे पाठीराखे होते .व त्यांच्या कार्यात फुल न फुलाची पाकळी म्हणून मदत करत .त्यांना स्वताला त्याकाळात अनुक्रमे दोन मुल व दोन मुली होत्या . हा सिनेमा अप्रतिम आहे, मात्र त्याचे मार्केटिंग अजून केले पाहिजे होते .असे राहून राहून वाटते .माझ्या मते ती किशोर ह्यांची सर्वोत्कृष्ट भूमिका .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अवलिया Mon, 01/03/2011 - 08:36 नवीन
अवश्य पाहा.. मला तरी खूप आवडला होता हा सिनेमा..
जरुर.
अपवाद म्हणून नावे घ्यायची झाली तर जब्बारच्या सिंहासन या चित्रपटाचे नांव आत्ता तरी चटकन आठवत आहे..
मान्य आहे. सिंहासन असो की अजुन कुठलाही नाव घ्या .. हे चित्रपट चांगलेच आहेत. पण .... हा पण मोठा गंमतीचा आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ब
बाप्पा Tue, 01/04/2011 - 11:29 नवीन
अशोक सराफ चा " वजीर " देखील सुरेख, परिपुर्ण आणी बेस्ट म्हणता येईल. पाहीला नसेल तर जरुर पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
आ
आत्मशून्य Mon, 01/03/2011 - 08:14 नवीन
असे एकदा वाचले होते आणी या मधे तथ्य आहे असे वाटते. त्यांचे चीत्रपट कला, मनोरंजन, कथा, दीग्दर्शन, संगीत, अभीनय, ग्लॅमर व अंबट्शौकीनता यांनी परीपूर्ण असल्याने त्याला समाजाचा व्यापक पाठींबा मिळतो. जे सध्या आपण मराठीत मीस करतोय.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Mon, 01/03/2011 - 08:23 नवीन
'हो आणि दबंग मधील व्रात्य पणाची. शीला आणि मुन्नी मराठी सिने सुष्टीत आहेत ० साईज च्या .पण त्यांच्या पुढ्यात जरठ ./खुजे (अभिनय व शारीरिक ) अवाढव्य केसाळ पोटाचे चट्टेरी पट्टेरी कापड घालणारे अभिनेते असतात .एक हाणामारीचे कथानक असलेला सिनेमा हवा आहे .ज्यात विनोद चतकोर असेल मराठी सिनेमा नेट च्या माध्यमातून जगभर नेणे व इतर भाषेत भाषांतरित करणे आदी उपायांनी त्याचे उत्पन्न वाढू शकेल .. बाकी राजीव पाटील कला व दर्जा सांभाळून सिनेमे काढेन पण जेष्ठ मात्र त्याच जुन्या पुराण्या आयडिया तून धमाल करू पाहत आहेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
व
विजुभाऊ Mon, 01/03/2011 - 08:15 नवीन
मकरंद अनासपुरे सुरुवातीला चांगला वाटला पण नन्तर कुठे घोडे अडले कोण जाणे. त्याच्या अभिनयात तोचतोच पणा आलाय. भरतजाधव बद्दल काहीच बोलायचे नाही. तो अतीसामान्य आणि पठडीतला ( जिवावर येतय मण दुसरा शब्द नाही म्हणून लिहितोय) अभिनय सिद्धार्थ जाधव. खरच गुणी अभिनेता. याला चांगल्या भुमीका मिळतील त्याचे तो सोने करेल सम्जय नार्वेकर हा देखील बरेच दिवसात दिसला नाही. कोणत्याही प्रकारच्या भुमीका उत्तम सादर करु शकतो. नव्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडे छान काम करते. पण उत्तम कथानक जोवर येत नाही तोवर काहीच उपयोग नसतो. नुसते पीजे आणि मरुनमुटकून केलेले विनोद याचा काहीच उपयोग होत नाही
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 01/03/2011 - 08:19 नवीन
नव्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडे छान काम करते.
मला हरिश्चंद्राच्या फॅक्टरीतली विभावरी देशपांडे खूप आवडली.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
र
रेवती Mon, 01/03/2011 - 15:08 नवीन
मलाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मृत्युन्जय Mon, 01/03/2011 - 08:31 नवीन
मराठीत इतक्यात चांगले चित्रपट आलेच नाहीत असे नाही. सातच्या आत घरात, श्वास, नितळ, गोष्ट छोटी डोंगराएवढी, कायद्याचे बोला, नटरंग, टिंग्या, जोगवा, डोम्बिवली फास्ट, वळू, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हे अलिकडच्या काळातले काही चांगले चित्रपट. मला यंदा कर्तव्य आहे, अगं बाई अरेच्या, गुलमोहर आदि पिक्चर सुद्धा आवडले. चित्रपट संगीत मात्र फारसे चांगले येत नाही आहे. नटरंग वगळता फार आवडेल असे कुठले नाव संगीताच्या बाबतीत घेण्यासारखे नाही. मधल्या काळात जे भंकस, बक्वास, टिनपाट चित्रपट येउन गेले त्यामानाने आत्ता परिस्थिती बरीच चांगली आहे असे माझे मत आहे. लक्ष्या चांगला अभिनेता खरा. अशोक सराफ पण. पण या दोघांनी मिळुन मराठी चित्रपटसृष्टीची जेवढी वाट लावली तेवढी अजुन कोणी लावली नसेल.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 01/03/2011 - 10:24 नवीन
लक्ष्या चांगला अभिनेता खरा. अशोक सराफ पण. पण या दोघांनी मिळुन मराठी चित्रपटसृष्टीची जेवढी वाट लावली तेवढी अजुन कोणी लावली नसेल.
या मृत्युंजयाच्या मताशी १००% सहमत दोन पावलं पुढे जाउन अस म्हणेन की हिंदी चित्रपटांत केविलवाण्या भुमिका करुन मराठी अभिनेत्यांसाठी हिंदी चित्रपटांतील चांगल्या भुमिकांची कवाडं बंद करुन ठेवलीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
आ
आत्मशून्य Mon, 01/03/2011 - 16:59 नवीन
जास्त आवश्यक आहेत.
मधल्या काळात जे भंकस, बक्वास, टिनपाट चित्रपट येउन गेले त्यामानाने आत्ता परिस्थिती बरीच चांगली आहे असे माझे मत आहे. लक्ष्या चांगला अभिनेता खरा. अशोक सराफ पण. पण या दोघांनी मिळुन मराठी चित्रपटसृष्टीची जेवढी वाट लावली तेवढी अजुन कोणी लावली नसेल
चालायचेच, मराठीत वीनोदाची लाट आली आणी क्रीएटीव्हीटि संपली भंपकपणा वाढला आणी हेच सध्या बोलीवुड्ला लागू पडत आहे.. नूसतेच इनोदी चीत्रपट येतायत एका मागून एक ह्यामूळे लवकरच बोलीवुड पण डब्यात जाणारच आहे म्हणून तर साला जो तो स्टार आज टी.वी. प्रोग्राम पटकावत आहे. कारन पैका तीथच भेटतो आन धंदा बी सेफ.. कालाय तस्मै नमः
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
५
५० फक्त Mon, 01/03/2011 - 08:32 नवीन
मी माझ्या मुलाला चित्रपट क्षेत्राची ओळखच जॅत रे जॅत नं करुन दिलि आहे, श्री. जब्बार पटेल हे आमचे गाव वाले आणि हदेचे माजी विद्यार्थी त्यामुळे ही मनात कुठेतरी जवळीक होतिच. एकेकाळी ' गो-या देहावरती' कॉलेजचं गॅदरिंग ३ वर्षे गाजवलं आहे. हृदयनाथ मंगेशकारांचें संगीत असलेला निवडुंग हा पण मला आवडणारा चित्रपट आहे, त्यातली गाणि, संगित आणि अर्चना जोगळेकर. लहानपणी शिवाजी महाराजांचे सगळे चित्रपट आवडायचे, विशेष करुन सुर्यकांतांचे वगॅरे. साधी माणसं पण खुप छान आहे. नवीन पॅकी चेकमेट, जोगवा, आघात, गाभडीचा पाउस हे चित्रपट काही आशा जागवुन गेले होते. हर्षद.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Mon, 01/03/2011 - 08:39 नवीन
अशोक सराफ पण >> मान्य !! वजीर, एक डाव धोबी पछाड आणि एक उनाड दिवस या विषयी काय मत आहे आपले. (यातल ' हुरहुर असते हे गाण झक्कास !! ). धाग्याकर्त्यास विनम्र सुचना (म्हणजे बस क्या तात्या, बच्चे की जान लोगे क्या !! ;) ) अजुन काही चित्रपटांची यादी देत आहे, नक्की पहा मग आपले मत बनवा ही विनंती. १) सावरखेड- एक गाव २) मुंबई-पुणे-मुंबई ३) वळु ४) दहावी फ ५) मी सिंधुताई सपकाळ ६) एक कप चहा ७) जोगवा ८) त्या रात्री पाउस होता. ९) गाभ्रीचा पाउस १०)रानभुल ११) गैर तुर्तास ईतके बघा , बाकीची यादी देतो लवकरच !!
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 01/03/2011 - 15:10 नवीन
आणि नितळसुद्धा. भयानक सुंदर नाहिये पण चांगला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
आ
आत्मशून्य Mon, 01/03/2011 - 17:00 नवीन
पन शेवट फारच चूकवला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
य
यशोधरा Mon, 01/03/2011 - 08:45 नवीन
मातीमाय?
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 01/03/2011 - 08:45 नवीन
वजीर, लपंडाव, गोष्ट छोटी डोंगराएवढी, यंदा कर्तव्य आहे असे काही आवडलेले मराठी सिनेमे. बाय द वे.. महेश कोठारेचे थरथराट, धांगडधिंगा, झपाटलेला, खबरदार, दे दणादण, धडाकेबाज अशा नावांवरूनच त्यांचे जीनर काय आहे ते कळते. जरा थ्रिलर, कधी हॉरर, हॉलीवूडच्या थीम्सचे मराठी अर्धशहरी अर्ध गावरान रूप अशा एका साच्यातले चालतात म्हणून काढत राहिलेले सिनेमे. तेच सचिनचंही. त्याचे नर्मविनोदी सिनेमे "नवरी मिळे नवर्‍याला" पासून "नवरा माझा नवसाचा" पर्यंत हे एकूण जुळी पात्रं, वेषांतर, हलकेफुलके कौटुंबिक जोक्स, फसवाफसवी, काहीतरी करायला जाऊन लफड्यात पाय फसणे अशा थीमचे एकसाची असतात. नावावरुन आणि अनुभवाने माहीत होणारी जातकुळी त्या त्या वेगळ्याच ट्रेडमार्क प्रकारची असल्याने त्याची तुलना श्वास, वळू, ध्यासपर्व वगैरे या गटाशी होऊ शकत नाही. ध्यासपर्व, श्वास, वजीर, सरकारनामा वगैरे हे गंभीरपणे बघण्याचे सिनेमे आहेत. त्यांचा दर्जा अत्युच्च आहेच पण उच्च नीच म्हणावे की "वेगळा" म्हणावे असा प्रश्न पडतो. नवीन काळात तर खूप नवीन धाडसी विषय घेऊन मराठी सिनेमे निघताहेत असं दिसतं. टेक्निकली आणि आशयात सुद्धा. फ्रेश तर नक्कीच आहे बदल..
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 01/04/2011 - 05:39 नवीन
त्यांचा दर्जा अत्युच्च आहेच पण उच्च नीच म्हणावे की "वेगळा" म्हणावे असा प्रश्न पडतो. सहमत आहे. या धमाल जोड्यांचे धूमधडाका, बनवाबनवी, झपाटलेला हे टाईमपास सिनेमे आमचे ऑल टाईम फेव्हरीट आहेत. :) तसेच अगं बाई अरेच्चा, कायद्याचं बोला, जाऊ तिथं खाऊ हे देखील खूप आवडले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ऋ
ऋषिकेश Mon, 01/03/2011 - 09:04 नवीन
मराठी चित्रपट तांत्रिक अंगांने अगदीच मागासलेला वाटायचा.. आताही चित्र तुलनात्मदृष्ट्या वाईटच आहे.. मात्र अभिनय व काहि प्रमाणात कथा यांत मराठी चित्रपट मला हिंदी चित्रपटांपेक्षा उजवा वाटतो. अर्थात उत्तम प्रेमकथा नसणे हा मराठी चित्रपटसृष्टीचा पराभव की मराठी मानसिकता हा प्रश्न उरतोच :)
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Tue, 01/04/2011 - 08:46 नवीन
साले भडक साऊथवाले सूध्दा एक एक नीतांत सून्दर प्रेमकथा सादर करत असतात आणे आपण ? श्वास सारखे संवेदन्शील चित्रपट चूचकारण्यातच महानता मानतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
म
मैत्र Mon, 01/03/2011 - 09:11 नवीन
वर असंख्य चांगल्या चित्रपटांची यादी दिलीच आहे. एक दोन वर्षापूर्वी एकदा चाफळकरांनी (मंगला / सिटी प्राईड) कोथरूड सिटी प्राईड ला चक्क सगळे मराठी पिक्चर लावले होते आणि सगळे उत्तम चालत होते मल्टिप्लेक्स मध्ये. या दोघा / तिघा म्हातार्‍यांना आणि सगळ्यात जास्त सचिनला वेड लागलं आहे किंवा बळंच मूर्खपणा / माज आला आहे. महागुरू हा तर फक्त हसण्याच्या किंवा अनुल्लेखे मारावे या लायकीचा प्रकार होता. त्याचा तो विग आणि अनेक वर्षांच्या कारकिर्दीचा पुन्हा पुन्हा वापर उल्लेख हा वीट आणणारा प्रकार असतो. पण अनेक चांगले पिक्चर्स गेल्या ८-१० वर्षात बनले आहेत -- १) श्वास, २) नितळ, ३)गोष्ट छोटी डोंगराएवढी, ४) कायद्याचे बोला, ५)नटरंग, ६)टिंग्या, ७)जोगवा, ८)डोम्बिवली फास्ट, ९)वळू, १०)मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ११) दहावी फ १२) गाभ्रीचा पाउस १३) गैर इतर काही १) वास्तुपुरुष - सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर २) पक पक पकाक - सई परांजपे ३) उत्तरायण - एक अतिशय सुंदर चित्रपट ४) दोघी ५) तू तिथे मी - अप्रतिम ... ६) बनगर वाडी - अमोल पालेकर - जुना आहे ९५-९७ असावा. ७) मुक्ता - पुन्हा जब्बार आणि जुना आहे. ८) हरिश्चंद्राची फॅक्टरी एक गोष्ट ही आहे की जब्बार / सुमित्रा - सुनील / सई परांजपे/ अमोल पालेकर इत्यादींनी गेल्या दहा वर्षात जास्त चित्रपट केले नाहीत. जे एक दोन केलेत ते अतिशय उत्तम दर्जाचे आहेत. अस्मिता चित्र / संजय सूरकरचा एकही नवीन पिक्चर गेल्या काही वर्षात आला नाही. पण अनेक नवीन दिग्दर्शक आणि कलाकार पुढे आले आहेत. आनंद मोडकांसारखं मधुर नसेल अगदी पण अजय अतुलने खूप मोठा बदल नक्कीच घडवला आहे. महेश कोठारेच्या डॅम इट आणि उघडी बटणं आणि पोट सुटलेला हिरो म्हणून अशोक सराफ पेक्षा आता अतुल कुलकर्णी ( दहावी फ / नटरंग / वळू/वास्तुपुरुष), गिरीश कुलकर्णी (वळू/ गोष्ट छोटी डोंगराएवढी) असे उत्तम नायक, सोनाली कुलकर्णी (मुक्ता मधली आपली जुनी सोनाली :)), अमृता सुभाष, देविका दफ्तरदार, मुक्ता बर्वे, शर्वरी जमेनीस अशा अनेक चांगल्या अभिनय करू शकणार्‍या नायिका, सहनायिका आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगल्या पिक्चरला महाग तिकीट काढून थिएटरला जाणारे प्रेक्षकही आहेत. एकूण थोडा जास्त उठाव मिळण्याची गरज आहे. जरा दोन वर्षापूर्वी जसा जोर धरला होता तसे परत खूप चांगले पिक्चर्स एकामागोमाग एक प्रदर्शित व्हायला हवेत. काही जुन्या कलाकारांनी (आनंद मोडक, नीना कुलकर्णी, संजय सूरकर, स्मिता तळवलकर, दिलीप प्रभावळकर) काही नवीन कामं केली तर कधीही उत्तम चित्रपट होऊ शकतात आणि कुठल्याही मल्टिप्लेक्स मध्ये चुलबुल पांडे आणि शीलाच्य बरोबरीने हाउस फुल चालू शकतात.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 01/03/2011 - 09:12 नवीन
यादी मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
स
स्वानन्द Mon, 01/03/2011 - 10:45 नवीन
पुन्हा एकदा ... अगदी मनातलं बोललात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
आ
आत्मशून्य Tue, 01/04/2011 - 08:48 नवीन
मूळ चीत्रपट अप्रतीमच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
म
मैत्र Tue, 01/04/2011 - 09:57 नवीन
कायद्याचं बोला हा बराच चांगला चित्रपट आहे. My cousin Vinny चे कुठलेही कोर्टातले प्रसंग वापरलेले नाहीत. शर्वरी जमेनीस ला केस मध्ये कुठलाही भाव / जागा नाही. मराठीकरण उत्तम केलं आहे. राहण्याची जागा बदलण्याच्या गोष्टी कॉपी केलेल्या नाहीत. फडणवीसाने त्याला शेवटी नियमात पकडणे हे मूळ चित्रपटात नाही. वर कोणी म्हटल्या प्रमाणे ती फुलराणी ही पण कॉपीच आहे. पण अजरामर आहे... तसा हाही चांगला प्रयत्न आहे. ठराविक साच्यातल्या गोष्टी.. तोच हिरो, भरतचे तेच तेच तेच तेच परत परत बोलणं. तोच चेहरा यापेक्षा खूप बरा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
स
सुहास.. Mon, 01/03/2011 - 09:32 नवीन
" बनवा-बनबी " नंतर सचिन हा माझ्यासाठी बहिष्कृत नट आहे. १२ ) क्षण १३ ) गोजिरी (कॉपी असला तरी छानच होता.) १४ ) सनई चौघडे १५) विहीर १६ ) उलाढाल (एक भरतचा पचकुळा अभिनय सोडला तर ) १७ ) रीटा
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Mon, 01/03/2011 - 09:16 नवीन
कलाकारांची बलस्थानं आणि उणिवा ह्यांचा तात्यांइतका सखोल अभ्यास दुसर्‍या कुणाचा नसेल. हे स्किल असे छोट्या लेखांपुरते मर्यादित न ठेवता अजून पुढे न्यावे ही विनंती. उत्तम कलाकॄती घडण्यासाठी अंकूश असणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच आपल्या अनेक ठिकाणी ओळखीही आहेत. मनावर घेऊन आपण समिक्षा केल्यास ती पोकळी आपण भरू शकता ह्यात शंका नाही.
  • Log in or register to post comments
म
मी ऋचा Mon, 01/03/2011 - 09:20 नवीन
अश्विनी भावेचा "कदाचित" नाही का आवडला कुणाला? मला खूपच आवडला होता! कथा, अभिनय, सादरीकरण, तांत्रिक बाजू, अश्विनी भावेचं "वय" ग्रेसफुल्ली कॅरी करणं, सगळंच मला खुप आवडलं होतं.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 01/03/2011 - 09:25 नवीन
मला तो पहायला मिळाला नाही. त्याची डीव्हीडी वगैरे आहे का ते बघायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा
म
मी ऋचा Mon, 01/03/2011 - 09:44 नवीन
डीव्हिडी आहे बाजारात.. यु ट्युबवर मात्र नाहीए अजुन :(...नाहीतर परत बघितला असता नक्की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Mon, 01/03/2011 - 10:34 नवीन
हो का? धन्यवाद. नक्की पाहते मिळते का ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा
स
सखी गुरुवार, 01/06/2011 - 14:33 नवीन
यशो कदाचित तुनळीवरुने काढलेला दिसतोय. पण नेटफ्लिक्सवर आहे - मराठी चित्रपटांसाठी अजुन एक चांगली गोष्ट, पण तुला नेटफ्लिक्स किती सोयीस्कर आहे याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 01/06/2011 - 14:36 नवीन
घरुन पाहते सखी. कितपत सोयीचं आहे माहित नाही. धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी
स
सखी गुरुवार, 01/06/2011 - 14:47 नवीन
अगं सोयीच अशासाठी म्हटलं कारण त्याला महीन्याची वर्गणी असते - इथे अमेरीकेत ८-१० डॉलर, म्हणजे खूप काही महाग नाही , पाहीजे तितके चित्रपट पाहू शकतो महीनाभरा. आणि मुख्य म्हणजे पायरेटेड नसते, त्यामुळे ते समाधानही मिळते. बाकी ठिकाणचं माहीती नाही म्हणून म्हटलं की कितपत सोयीचं आहे ते माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
मुक्तसुनीत गुरुवार, 01/06/2011 - 16:40 नवीन
अमेरिकेबाहेर (बहुदा कॅनडाचा अपवाद वगळता) तुम्हाला नेटफ्लिक्स स्ट्रीमिंग अ‍ॅक्सेस करता येत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी
य
यशोधरा गुरुवार, 01/06/2011 - 17:10 नवीन
अगदीच सोयीचं नाही की :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी
स
स्वतन्त्र Mon, 01/03/2011 - 10:08 नवीन
अश्विनी भावेचा कदाचित मला फार आवडला होता. कथा,पटकथा अणि सादरीकरण सुद्दा मस्तच होत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा
ट
टारझन Mon, 01/03/2011 - 09:35 नवीन
आयुश्य हे ....... . .. .. हे हे हे .... चुलीवरल्या ... ल्या ल्या ल्या ... कढई मधले ... ले ले ले ... कान्द्द्द्द्द्द्द्दे प्प्प्प्प्पोह्ह्ह्हे .... ह्हे ह्हे ह्हे !!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 01/03/2011 - 09:57 नवीन
मराठी सिनेमात बर्‍याच वेळा चांगल्या विषयाची वाट लावलेली बघायला मिळते. उदा: सनई चौघडे. काही वाट न लावलेले सिनेमे गंभीर असतात म्हणून चालत नाहीत. उदा: कवडसे. गाण्यांशिवाय, कथा असलेले, वेगवान सिनेमे क्वचितच येतात. उदा: चेकमेट.
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Mon, 01/03/2011 - 11:03 नवीन
सचिन कुंडलकरचा 'गंध' पाहावा अशी शिफारस करेन. किमान मध्यमवर्गीय नागरी प्रेक्षकास रंजक वाटेल आणि तरीही निव्वळ टाईमपास वाटणार नाही अशा दुहेरी निकषांवर तो उतरतो. अर्थात लहान गावांत असे चित्रपट चालत नाहीत त्यामुळे प्रदर्शित होतच नाहीत. त्यामुळे दूरचित्रवाणीवर यायची वाट पाहणे नाहीतर डीव्हीडी किंवा पायरेटेड पाहाणे याला पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 01/03/2011 - 11:28 नवीन
मी बर्‍याच वर्षात खिशातली दमडी खर्च करुन अथवा गेलाबाजार लोकाच्या पैशाने देखील थेटरात जाउन मराठी सिनेमा पाहिलेला नाही. त्यामुळे ह्या विषयावर काही अक्कल पाजळायचा मला अधीकार आहे असे वाटत नाही. बाकी चर्चा वाचतोय...
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Mon, 01/03/2011 - 12:06 नवीन
वरील अनेक प्रतिसादात "चांगल्या" चित्रपटांची यादी दिली आहे (जी खरोखरच चांगली आहेत यात दुमत दिसत नाही...) त्यातील नावे वाचल्यावर हे प्रकर्षाने जाणविले की, मुंबई आणि पुणे सोडल्यास महाराष्ट्रात हे चित्रपट प्रदर्शितच झाले नसावेत. आमचे कोल्हापूर तर मराठी चित्रपटसृष्टीची एकेकाळची कर्मभूमी समजली जाते पण मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यार्‍या इथल्या थिएटरची शोचनीय अवस्था पाहता तिथे जागा असलीच तर 'अलकाताईं' ते जगप्रसिद्ध जीवघेणे रडणे पाहून स्वतःला तिच्या जागी कल्पणार्‍या स्त्रियांनाच व तसल्या भट्टीतीलच चित्रपटांना. त्यामुळे वरील कल्पक नावीन्यपूर्ण कथानक असलेल्या चित्रपटाना इथे (आणि तत्सम शहरात) एकदोन दिवसासाठीही थिएटर नसते [सन्माननीय अपवाद "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय....] आणि शिवाय त्या निर्मात्याला "आपला चित्रपट फक्त मुंबई-पुणेकरा" साठीच आहे असेही कुठेतरी वाटत असेल. फक्त एकदा येथील स्थानिक फिल्म क्लबच्या लोकांनी प्रयत्नपूर्वक 'श्वास', 'दहावी फ', 'वास्तुपुरूष', 'विहीर' असे मोजके चित्रपट निमंत्रितांसाठी आणले होते, त्याचा लाभ झाला आणि मराठी चित्रपटसृष्टी म्हणजे निव्वळ 'ती' त्रयी नव्हे असेही वाटून गेले. त्या सप्ताहात कोल्हापुरकरांशी झालेल्या संवादात "वास्तुपुरुष" च्या सुमित्रा भावे यानी कबुली दिली होती की निव्वळ वितरणव्यवस्थेच्या त्रुटीमुळे असे चित्रपट महाराष्ट्रात जावू शकत नाहीत त्यामुळे मराठी चित्रपटाने जागतिक पातळीवर जाण्याइतपत प्रगती केली आहे हे फक्त माध्यमात वाचण्याचीच बाब राहिली आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
म
मिहिर Wed, 01/05/2011 - 11:47 नवीन
सहमत. अनेकदा असे होते की चित्रपट येणार म्हणून कुठेतरी वाचतो आणि येण्याची वाट बघतो, विसरूनही जातो नंतर. काही दिवसांनी लक्षात येते की तो चित्रपट आपल्याकडे आलाच नाही. 'देवराई'चे असे झालेले आठवतेय मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
स
सखी Wed, 02/09/2011 - 18:20 नवीन
जुना धागा या प्रतिसादाने परत वर काढते आहे मंडळी, पण एकोळी/अतिछोटा धागा न काढण्याचा इतका एकच उपाय समोर होता. ह्या चित्रपटांचे नाव मागच्या वर्षी कानावर आले होते, पण नंतर काहीच ऐकलं नाही, २००९ च्या बीएमएमला दाखवणार होते. मिपांकरांनी यातले कोणतेही चित्रपट पाहीले आहेत का? आणि त्याबद्दलची त्यांची मतं (बरी/वाईट) वाचायला उत्सुक आहे. अचानक - लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण म्हणून चित्रपटाविषयी उत्सकता आहे http://in.bookmyshow.com/movies/Achanak-(Marathi)/ET00002285 वावटळ - राजश्रीच्या साईटवर याचं ट्रेलर असावं, पणं इथुन आत्ता दुवा देता येत नाही. तांदळा - याची स्वतःची अशी बेबसाईटही आहे http://www.tandalathefilm.com/homeM1.html . यात एक गाणं आरती अंकलीकरांनी गायलेले दिसतयं आणि कलाकारांमध्ये आसावरी जोशीचे नाव आहे, म्हणजे बहुदा ती 'ढुंढते रह जाओगे' मधलीच ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर
न
नगरीनिरंजन Mon, 01/03/2011 - 12:10 नवीन
चांगले असलेले गंभीर मराठी चित्रपट नेहमीच राजकारण, समाजकारण किंवा कौटुंबिक विषयांवर असतात. जे विनोदी चित्रपट असतात तेही बर्‍याच घासून गुळगुळीत झालेल्या विषयावर असतात आणि त्यात त्या विषयापेक्षा अभिनेत्यांचे संवाद आणि टायमिंग यातून विनोद निर्मीती करायचा प्रयत्न असतो. वरती आत्मशून्य यांनी म्हटल्याप्रमाणे, निव्वळ करमणूकप्रधान आणि सगळा मालमसाला भरलेले व्यवस्थित बजेटचे चित्रपट फारसे नसतातच आणि असले तरी त्यातली पात्रं इतकी अविश्वसनीय मराठी बोलतात, इतके विचित्र कपडे घालतात आणि इतके टुक्कार दिसतात की त्या चित्रपटाचा 'ग्लॅमर क्वोशंट' पार रसातळाला जातो. खूप पैसा लावून, भरपूर मेहनत घेऊन आणि खरोखर चांगले दिसणारे (म्हणजे उदाहरणार्थ अतिश्रीमंताच्या रोलमध्येही मध्यमवर्गीय न वाटणारे) नट-नट्या घेऊन प्रेमकथा, थ्रीलर्स वगैरे जोपर्यंत बनत नाहीत तोपर्यंत मराठी चित्रपट बहुजनांमध्ये लोकप्रिय होणार नाही. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांशी स्पर्धा करण्याची इच्छा जोपर्यंत मराठी चित्रपट निर्मात्यांमध्ये निर्माण होत नाही तो पर्यंत दर्जा सुधारणार नाही. वरती काही लोकांनी दिलेल्या यादीतले चित्रपट चांगले आहेत पण फक्त एका विशिष्ट वर्गाला आवडतील असे आहेत. भाषा न समजणार्‍या माणसाने पाहिला तरी त्याला चित्रपट आवडला पाहिजे.
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Mon, 01/03/2011 - 12:38 नवीन
वरती काही लोकांनी दिलेल्या यादीतले चित्रपट चांगले आहेत पण फक्त एका विशिष्ट वर्गाला आवडतील असे आहेत. भाषा न समजणार्‍या माणसाने पाहिला तरी त्याला चित्रपट आवडला पाहिजे.
म्हणजे काय ते नीटसे कळले नाही. मराठी न समजणार्‍या माणसाने दादा कोंडक्यांचे सिनेमे पाहिले असते तर त्याला त्यातल्या द्वयर्थी संवादांचा एकही अर्थ कळला नसता. तमाशापटांतले सवाल-जबाब वगैरे भाषानिष्ठ प्रकारही मराठी न समजणार्‍या माणसांना कळणार नाहीत. अभिजनांना आवडणारे वेगळ्या वळणाचे चित्रपट न ध्यानात घेता इथे मुद्दाम लोकप्रिय मराठी पिच्चरांची उदाहरणे घेऊन पाहिली तरीही तुमचा मुद्दा लक्षात आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा